व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रस्तावना

प्रस्तावना

आनंदी कुटुंबाचं गुपित काय?

कुटुंबं कशामुळे तुटतात याची बरीच कारणं आपण ऐकली आहेत. पण कुटुंबं आनंदी कशामुळे होतात हे आपण जाणण्याचा प्रयत्न करू या.

  • अमेरिकेत १९९० ते २०१५ या सालादरम्यान ५० पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांच्या घटस्फोटाच्या प्रमाणात दुप्पटीने वाढ झाली आहे आणि ६५ पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांच्या घटस्फोटाच्या प्रमाणात तीन पटीने वाढ झाली आहे.

  • पालक गोंधळात आहेत. कारण काही तज्ज्ञ म्हणतात की मुलांची सतत स्तुती केली पाहिजे, तर इतर तज्ज्ञ म्हणतात की त्यांना कडक शिस्त लावली पाहिजे.

  • यशस्वी होण्यासाठी लागणारी कौशल्यं विकसित न करताच तरुण प्रौढ होत आहेत.

तरीही, सत्य हेच आहे की . . .

  • विवाहबंधन आनंदी आणि कायमस्वरूपी टिकणारं बनू शकतं.

  • आपल्या मुलांना प्रेमाने शिस्त लावण्याचं पालक शिकू शकतात.

  • तरुण, प्रौढ होण्यासाठी लागणारी कौशल्यं शिकू शकतात.

हे सर्व कसं शक्य आहे? सावध राहा! च्या या अंकात अशा १२ गोष्टींवर चर्चा करण्यात आली आहे ज्यामुळे कुटुंबं आनंदी बनू शकतात.