व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भविष्याबद्दलची अचूक माहिती

भविष्याबद्दलची अचूक माहिती

भविष्यात काय होणार आहे याबद्दल कधी तुम्ही विचार केला आहे का? बायबल आपल्याला सांगतं की भविष्यात लवकरच महत्त्वपूर्ण घटना घडणार आहेत आणि त्याचा परिणाम पृथ्वीवरच्या सर्व लोकांवर होईल.

“देवाचं राज्य जवळ आलं आहे” हे आपण कसं ओळखू शकतो याबद्दल येशूने सांगितलं. (लूक २१:३१) त्याने सांगितलं की बऱ्‍याचशा घटना घडतील. त्यांपैकी काही म्हणजे जागतिक युद्धं, मोठमोठे भूकंप, रोगांच्या साथी आणि दुष्काळ. आणि या सर्व गोष्टी आज आपण आपल्या डोळ्यांनी खऱ्‍या होताना पाहत आहोत.—लूक २१:१०-१७.

बायबलमध्ये हेही सांगितलं आहे की मानवी सरकारांच्या “शेवटच्या दिवसांत” लोक खूप वाईट वागतील. बायबलमधल्या २ तीमथ्य ३:१-५ या वचनांत आपल्याला याबद्दल वाचायला मिळतं. वचनांत उल्लेख केलेले, म्हणजेच वाईट विचार आणि कार्य करणारे लोक आज आपण आपल्या आजूबाजूला बघतो तेव्हा आपल्याला एका गोष्टीची खातरी पटते. ती म्हणजे, आज जे घडत आहे आणि बायबलमध्ये जे सांगितलं आहे त्यात खूप साम्य आहे.

याचा काय अर्थ होतो? देवाचं सरकार पृथ्वीवर लवकरच राज्य करणार आहे आणि यामुळे पृथ्वीवर खूप चांगले बदल होतील. (लूक २१:३६) बायबलमध्ये सांगितलं आहे की देव पृथ्वीसाठी आणि तिच्यावर राहणाऱ्‍या लोकांसाठी बऱ्‍याच चांगल्या गोष्टी करणार आहे. त्या कोणत्या गोष्टी असतील याची काही उदाहरणं आता आपण पाहू या.

सर्वोत्तम सरकार

“सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक, यांनी त्याची [येशूची] सेवा करावी म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिली; त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे; त्याचे राज्य अविनाशी आहे.”दानीएल ७:१४.

याचा काय अर्थ होतो? देवाने येशूसोबत मिळून एक सर्वोत्तम जागतिक सरकार स्थापित केलं आहे. त्या सरकारच्या अधीन राहून आपण आनंदी जीवन जगू शकतो.

चांगलं आरोग्य

“मी रोगी आहे असे एकही रहिवासी म्हणणार नाही.”यशया ३३:२४.

याचा काय अर्थ होतो? आपण कधीही आजारी पडणार नाही, कोणालाही अपंगत्व येणार नाही आणि कोणीही कधी मरणार नाही.

सर्वत्र शांती असेल

“तो [देव] दिगंतापर्यंत लढाया बंद करतो; तो धनुष्य मोडतो.”स्तोत्र ४६:९.

याचा काय अर्थ होतो? कोणालाही कधी युद्धाची भीती नसणार आणि दुःखाची सर्व कारणं काढून टाकण्यात येतील.

पृथ्वीवर सर्व चांगले लोक असतील

“थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल . . . पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील.”स्तोत्र ३७:१०, ११.

याचा काय अर्थ होतो? पृथ्वीवर वाईट लोक नसतील आणि देवाच्या आज्ञांचं पालन करणारेच या पृथ्वीवर असतील.

सर्व पृथ्वीला सुंदर बागेसारखं बनवलं जाईल

“ते घरे बांधून त्यात राहतील. द्राक्षाचे मळे लावून त्यांचे फळ खातील.”यशया ६५:२१, २२.

याचा काय अर्थ होतो? संपूर्ण पृथ्वीला सुंदर बनवलं जाईल. ‘तुझी इच्छा पृथ्वीवर पूर्ण होवो’ या मानवांच्या प्रार्थनेचं उत्तर देव नक्कीच देईल.—मत्तय ६:१०.