“तुझं राज्य येवो”—लाखो लोक दररोज करतात अशी प्रार्थना
देवाचं राज्य यावं यासाठी तुम्ही कधी प्रार्थना केली आहे का? अनेक शतकांपासून लाखो लोकांनी अशी प्रार्थना केली आहे, की “तुझं राज्य येवो.” पण त्यांनी अशी प्रार्थना का केली? कारण येशूने त्याच्या शिष्यांना देवाच्या राज्यासाठी प्रार्थना करायला सांगितलं होतं.
येशूने आपल्या शिष्यांना देवाच्या राज्याबद्दल बऱ्याच गोष्टी शिकवल्या. पण सुरुवातीला त्यांना सगळ्याच गोष्टी समजल्या नाहीत. म्हणूनच त्यांनी एकदा त्याला विचारलं, “प्रभू, तू आताच इस्राएलच्या राज्याची पुनःस्थापना करणार आहेस का?” येशूने त्यांना या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर दिलं नाही, म्हणून त्यांना कदाचित आश्चर्य वाटलं असेल. (प्रेषितांची कार्ये १:६, ७) मग याचा अर्थ असा होतो का, की देवाचं राज्य काय आहे आणि ते कधी येईल, या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कधीच मिळणार नाहीत? मुळीच नाही!
टेहळणी बुरूज च्या या अंकामधून तुम्हाला पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील:
आपल्याला देवाच्या राज्याची गरज का आहे?
देवाच्या राज्याचा राजा कोण आहे?
देवाचं राज्य पृथ्वीवर कधी येईल?
देवाचं राज्य कोणकोणत्या गोष्टी करेल?
आपण आत्ताच देवाच्या राज्याची बाजू का घेतली पाहिजे?
देवाचं राज्य नेमकं काय आहे?