व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मरण पावलेल्यांसाठी कोणती आशा आहे?

मरण पावलेल्यांसाठी कोणती आशा आहे?

मृत्यूमुळे सगळ्यांनाच दुःख होतं, पण यामुळे सगळ्या गोष्टींचा शेवट होतो का? मृत लोकांना आपण पुन्हा कधीच पाहू शकणार नाही का? मरण पावलेल्यांसाठी कोणती आशा आहे?

बायबल काय सांगतं यावर विचार करा:

मरण पावलेल्या लोकांना आशा आहे

“स्मारक कबरींमध्ये असलेले सर्व जण . . . पुनरुत्थानासाठी बाहेर येतील.”—योहान ५:२८, २९.

मरण पावलेले लोक देवाच्या स्मरणात आहेत आणि त्यांना पुन्हा जिवंत केलं जाईल.

मरण पावलेल्यांना पृथ्वीवर पुन्हा जिवंत केलं जाईल

“नीतिमान आणि अनीतिमान अशा सर्व लोकांचं पुनरुत्थान होणार आहे.”—प्रेषितांची कार्ये २४:१५.

लाखो लोकांना पुन्हा जिवंत केलं जाईल आणि ते शांतीपूर्ण परिस्थितीत सदासर्वकाळासाठी राहतील.

मरण पावलेल्यांना पुन्हा जिवंत केलं जाईल यावर आपण विश्‍वास ठेवू शकतो

देव “ताऱ्‍यांची गणती करतो; तो त्या सर्वांना त्यांची त्यांची नावे देतो.”—स्तोत्र १४७:४.

देव जर अगणित ताऱ्‍यांना नावाने हाक मारू शकतो, तर ज्यांना तो पुन्हा जिवंत करणार आहे त्यांना तो लक्षात ठेवू शकत नाही का? नक्कीच ठेवू शकतो.