व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मृत्यू या शत्रूवर कसा विजय मिळवला जाईल?

मृत्यू या शत्रूवर कसा विजय मिळवला जाईल?

आपले पहिले आईवडील आदाम-हव्वा यांनी देवाची आज्ञा मोडल्यामुळे आपण पापी झालो आणि आपल्यावर मरण आलं. असं असलं तरी मानवांबद्दल देवाचा उद्देश बदललेला नाही. संपूर्ण बायबल हे देवाचं वचन आहे आणि त्यात देव सतत याची खातरी करून देत आहे की त्याचा उद्देश बदललेला नाही.

  • “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील.”स्तोत्र ३७:२९.

  • “तो मृत्यू कायमचा नाहीसा करतो, प्रभु परमेश्‍वर सर्वांच्या चेहऱ्‍यावरील अश्रू पुसतो.”यशया २५:८.

  • “शेवटचा शत्रू म्हणजे मृत्यू नाहीसा केला जाईल.”१ करिंथकर १५:२६.

  • “तो त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल, आणि यापुढे मरण नसेल; तसंच शोक, रडणं किंवा दुःखही नसेल; कारण, आधीच्या गोष्टी नाहीशा झाल्या आहेत.”प्रकटीकरण २१:४.

देव “मृत्यू कायमचा नाहीसा” कसा करेल? आधी सांगितल्याप्रमाणे बायबल स्पष्ट करतं की “नीतिमान . . . सर्वदा वास करतील.” पण त्यात असंही सांगितलं आहे की “सदोदित चांगला वागणारा [नीतिमान] . . . असा एकही माणूस जगात नाही.” (उपदेशक ७:२०, सुबोधभाषांतर) याचा अर्थ देव अपरिपूर्ण आणि पापी मानवांना सर्वकाळ जगू देईल का? तो आपल्याच स्तरांशी तडजोड करेल का? असं होणं शक्य नाही! कारण देव “कधीही खोटे बोलू शकत नाही.” (तीत १:२) मग मानवांबद्दल असलेला प्रेमळ उद्देश पूर्ण करण्यासाठी देव काय करेल?

देव मृत्यू कायमचा नाहीसा” करेल.​यशया २५:८

खंडणी देण्याद्वारे मृत्यूवर विजय मिळवणं

यहोवाने मानवांना मृत्यूपासून सोडवण्यासाठी एक प्रेमळ तरतूद केली आहे. ती म्हणजे खंडणीची तरतूद. खंडणी याचा अर्थ एखाद्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी तितकीच किंमत देणं किंवा न्यायानुसार जे अपेक्षित आहे ते देणं. सर्वच मानव पापी आहेत आणि सर्वांना मृत्यूची शिक्षा झाली आहे. याबद्दल बायबल असं म्हणतं: “कोणाही मनुष्यास आपल्या भावाला मुक्‍त करता येत नाही; किंवा त्याच्याबद्दल देवाला खंडणी देता येत नाही. त्याने सर्वदा जगावे, त्याला कधी गर्तेचा अनुभव घडू नये, म्हणून त्याला देवाला खंडणी भरून देता येत नाही.”—स्तोत्र ४९:७, ८.

एका अपरिपूर्ण व्यक्‍तीचा मृत्यू होतो तेव्हा ती फक्‍त आपल्याच पापांसाठी दंड भरू शकते. पण असं करून ती व्यक्‍ती पापापासून स्वतःची सुटका करू शकत नाही किंवा इतरांसाठी भरपाई करू शकत नाही. (रोमकर ६:७) खरंतर आपल्याला परिपूर्ण आणि पापापासून मुक्‍त अशा व्यक्‍तीची गरज होती जी स्वतःच्या पापांसाठी नाही तर इतरांच्या पापांसाठी बलिदान देईल.—इब्री लोकांना १०:१-४.

देवाने असाच एक प्रबंध केला. त्याने आपल्या मुलाला, येशूला स्वर्गातून पृथ्वीवर पाठवलं. पृथ्वीवर येशू एक परिपूर्ण आणि पापापासून मुक्‍त असलेला व्यक्‍ती म्हणून जन्माला आला. (१ पेत्र २:२२) येशूने म्हटलं की तो “अनेकांच्या मोबदल्यात आपलं जीवन खंडणी म्हणून देण्यासाठी आला आहे.” (मार्क १०:४५) आपल्याला पाप आणि मृत्यू यांपासून सोडवण्यासाठी आणि आपल्याला जीवन मिळावं यासाठी त्याने मरण सोसलं.—योहान ३:१६.

मृत्यूवर विजय केव्हा मिळेल?

आज आपण बायबलमध्ये दिलेल्या एका भविष्यवाणीच्या पूर्ततेच्या काळात, म्हणजे “अतिशय कठीण” काळात जगत आहोत. यावरून स्पष्ट होतं, की आपण या जगाच्या दुष्ट व्यवस्थेच्या “शेवटच्या दिवसांत” जगत आहोत. (२ तीमथ्य ३:१) या शेवटच्या दिवसांच्या अखेरीस दुष्ट लोकांचा न्याय केला जाईल आणि त्यांचा नाश होईल. (२ पेत्र ३:३, ७) पण देवावर प्रेम करणारे लोक त्या नाशातून वाचतील आणि त्यांना “सर्वकाळाचं जीवन” मिळेल.—मत्तय २५:४६.

येशू “अनेकांच्या मोबदल्यात आपलं जीवन खंडणी म्हणून देण्यासाठी आला.”—मार्क १०:४५

मरण पावलेल्या लोकांचं पुनरुत्थान म्हणजे त्यांना पृथ्वीवर जिवंत केलं जाईल, तेव्हा त्यांच्याकडे सर्वकाळ जगण्याची संधी असेल. येशू नाईन या शहरात गेला तेव्हा त्याने एका व्यक्‍तीला पुन्हा जिवंत केलं. त्या शहरात एका विधवेचा एकुलता एक मुलगा मरण पावला होता. येशूला “कळवळा आला” आणि त्याने त्या मुलाला पुन्हा जिवंत केलं. (लूक ७:११-१५) देवाचा एक सेवक पौल याने लिहिलं: “नीतिमान आणि अनीतिमान अशा सर्व लोकांचं पुनरुत्थान होणार आहे, अशी मीसुद्धा . . . देवाकडे आशा बाळगतो.” ही आशा देवाचं मानवजातीवर असलेल्या प्रेमाचा उल्लेखनीय पुरावा आहे.—प्रेषितांची कार्ये २४:१५.

आज लाखो लोकांकडे सर्वकाळाचं जीवन जगण्याची संधी आहे. बायबल म्हणतं: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील.” (स्तोत्र ३७:२९) त्या वेळी ते खूप आनंदी असतील आणि पौलने २,००० वर्षांपूर्वी लिहिलेले शब्द पूर्ण होण्याची उत्सुकता त्यांना असेल. त्याने म्हटलं: “अरे मरणा, तुझा विजय कुठे आहे? अरे मरणा, तुझी नांगी कुठे आहे?” (१ करिंथकर १५:५५) मानवांचा क्रूर शत्रू मृत्यू याच्यावर कायमचा विजय मिळवला जाईल!