व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ५

आम्ही तुमच्याबरोबर येऊ

आम्ही तुमच्याबरोबर येऊ

“आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.”—जख. ८:२३.

गीत ५३ ऐक्य जपू या

सारांश *

दुसरी मेंढरे (“दहा जण”) यांना अभिषिक्‍त जनांसोबत (“यहुदी” माणसासोबत) मिळून यहोवाची उपासना करण्याचा बहुमान मिळाला आहे (परिच्छेद १-२ पाहा)

१. आपल्या काळात काय होईल याबद्दल यहोवाने काय सांगितलं आहे?

आपल्या काळात काय होईल याबद्दल यहोवाने आधीच सांगितलं होतं. त्याने म्हटलं होतं की, “त्या दिवसांत सर्व भाषा बोलणाऱ्‍या राष्ट्रांपैकी दहा जण यहुदी माणसाचा पदर धरून म्हणतील, आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.” (जख. ८:२३) या वचनात “यहुदी” अशा लोकांना सूचित करतं ज्यांना यहोवाने त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्‍त केलं आहे. त्यांना ‘देवाचं इस्राएल’ असंही म्हटलं आहे. (गलती. ६:१६) तसंच, “दहा जण” अशा लोकांना सूचित करतं ज्यांना पृथ्वीवर सर्वकाळाच्या जीवनाची आशा आहे. त्यांना माहीत आहे की यहोवाने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या या गटाला निवडलं आहे. तसंच, त्यांच्यासोबत मिळून यहोवाची सेवा करणं हा आपल्यासाठी एक मोठा बहुमान आहे असंही त्यांना वाटतं.

२. “दहा जण” अभिषिक्‍त जनांसोबत जातात याचा काय अर्थ होतो?

आज पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक अभिषिक्‍त व्यक्‍तीचं नाव * माहीत करून घेणं शक्य नसलं, तरी वचनात सांगितल्याप्रमाणे पृथ्वीवरच्या जीवनाची आशा असणारे लोक अभिषिक्‍त जनांसोबत ‘जाऊ शकतात.’ ते कसं? बायबल म्हणतं की “दहा जण” हे “यहुदी माणसाचा  पदर धरून म्हणतील, आम्ही तुम्हाबरोबर  येतो, कारण देव तुम्हाबरोबर  आहे असे आम्ही ऐकले आहे.‏” या वचनात एका यहुदी माणसाचा उल्लेख केला आहे. पण “तुम्हाबरोबर” असं जे म्हटलं आहे, त्यावरून असं कळतं हे फक्‍त एका माणसाला नाही अनेकांना सूचित करतं. म्हणजेच तो यहुदी माणूस अभिषिक्‍त जनांच्या संपूर्ण समूहाला  सूचित करतो. जे अभिषिक्‍त नाहीत ते यहोवाची सेवा अभिषिक्‍त जनांसोबत मिळून करतात. असं असलं तरी ते अभिषिक्‍त जनांना त्यांचे प्रमुख समजत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की त्यांचा प्रमुख येशू आहे.—मत्त. २३:१०.

३. या लेखात कोणत्या प्रश्‍नांची उत्तरं दिली जातील?

यहोवाच्या लोकांमध्ये आजही अभिषिक्‍त ख्रिस्ती असल्यामुळे काही जण असा विचार करतील की (१) अभिषिक्‍त जनांनी स्वतःबद्दल कोणता दृष्टिकोन बाळगला पाहिजे? (२) स्मारकविधीच्या दिवशी प्रतिकांचं सेवन करण्याऱ्‍यांसोबत आपण कसं वागलं पाहिजे? (३) प्रतिकांचं सेवन करण्याऱ्‍यांची संख्या वाढत असेल तर त्याबद्दल आपल्याला चिंता वाटली पाहिजे का? या सर्व प्रश्‍नांची उत्तरं या लेखात दिली जातील.

अभिषिक्‍त जनांनी स्वतःबद्दल कोणता दृष्टिकोन बाळगला पाहिजे?

४. १ करिंथकर ११:२७-२९ या वचनांत दिलेल्या कोणत्या इशाऱ्‍यावर अभिषिक्‍त जनांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि का?

१ करिंथकर ११:२७-२९ या वचनांत दिलेल्या इशाऱ्‍यावर अभिषिक्‍त जनांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. (वाचा.) वचनांत सांगितल्याप्रमाणे एका अभिषिक्‍त व्यक्‍तीकडून स्मारकविधीच्या प्रतिकांचं सेवन “अयोग्य प्रकारे” कसं होऊ शकतं? जर ती व्यक्‍ती त्या प्रतिकांचं सेवन करत असेल पण यहोवाच्या नीतिमान स्तरांनुसार जगत नसेल तर तिच्या हातून प्रतिकांचं सेवन अयोग्य प्रकारे होऊ शकतं. (इब्री ६:४-६; १०:२६-२९) अभिषिक्‍त जनांना जाणीव आहे, की “ख्रिस्त येशूद्वारे देवाने [त्यांना] दिलेल्या वरील बोलावण्याचे बक्षीस” मिळवायचं असेल तर त्यांनी विश्‍वासू राहणं खूप महत्त्वाचं आहे.—फिलिप्पै. ३:१३-१६.

५. अभिषिक्‍त जनांनी स्वतःबद्दल कोणता दृष्टिकोन बाळगला पाहिजे?

यहोवाचा पवित्र आत्मा त्याच्या सेवकांना गर्विष्ठ बनायला नाही तर नम्र राहायला मदत करतो. (इफिस. ४:१-३; कलस्सै. ३:१०, १२) त्यामुळे अभिषिक्‍त जन स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत नाहीत. त्यांना माहीत आहे की यहोवा त्यांना इतर सेवकांपेक्षा जास्त पवित्र आत्मा देत नाही. तसंच, बायबल सत्यांविषयी त्यांना इतरांपेक्षा जास्त समजतं असंही ते मानत नाही. त्यासोबतच, ते इतर कोणाला कधीच सांगणार नाही की ‘आता तूसुद्धा अभिषिक्‍त झाला आहेस आणि स्मारकविधीच्या प्रतिकांचं सेवन करू शकतोस.’ याउलट अभिषिक्‍त ख्रिस्ती नम्रपणे मान्य करतात की फक्‍त यहोवाच लोकांना स्वर्गातल्या जीवनासाठी बोलवू शकतो.

६. १ करिंथकर ४:७, ८ या वचनांत सांगितल्यानुसार अभिषिक्‍त जनांनी कसं वागलं पाहिजे?

अभिषिक्‍त जनांना माहीत आहे की स्वर्गातल्या जीवनासाठी त्यांची निवड होणं ही एक बहुमानाची गोष्ट आहे, पण यामुळे त्यांना खास वागणूक मिळाली पाहिजे अशी ते अपेक्षा करत नाहीत. (फिलिप्पै. २:२, ३) त्यांना हेदेखील माहीत आहे की यहोवाने त्यांना अभिषिक्‍त केलं तेव्हा त्याबद्दल त्याने सर्वांना कळू दिलं नाही. म्हणून जर इतरांनी त्यांच्या अभिषिक्‍त होण्याबद्दल त्यांच्यावर लगेच विश्‍वास ठेवला नाही, तर याचं त्यांना आश्‍चर्य वाटत नाही. कारण बायबल म्हणतं की देवाने एखाद्याला खास जबाबदारी दिली, असं जर कोणी म्हटलं तर त्याच्यावर लगेच विश्‍वास ठेवू नका. आणि ही गोष्ट अभिषिक्‍त जनांना माहीत आहे. (प्रकटी. २:२) तसंच, लोकांनी आपल्याकडे विशेष लक्ष द्यावं असंही एका अभिषिक्‍त व्यक्‍तीला वाटणार नाही. त्यामुळे ते ज्या कोणाला भेटतात त्यांना, ‘मी अभिषिक्‍त आहे’ असं सांगणार नाहीत. त्यासोबतच, ते अभिषिक्‍त असल्याची इतरांसमोर बढाईही मारणार नाही.—१ करिंथकर ४:७, ८ वाचा.

७. अभिषिक्‍त जन कोणकोणत्या गोष्टी करण्याचं टाळतील आणि का?

आपण जणू विशेष मंडळाचे किंवा क्लबचे सदस्य आहोत असा विचार करून अभिषिक्‍त ख्रिश्‍चन फक्‍त इतर अभिषिक्‍त जनांसोबत वेळ घालवत नाहीत. तसंच, अभिषिक्‍त झाल्याच्या आपापल्या अनुभवांबद्दल चर्चा करण्यासाठी किंवा बायबलचा सखोल अभ्यास करण्यासाठी एक खासगी समूह तयार करता यावा म्हणून ते इतर अभिषिक्‍त जनांना शोधण्याचा प्रयत्न करत नाहीत. (गलती. १:१५-१७) अभिषिक्‍त जनांनी अशा काही गोष्टी केल्या तर ख्रिस्ती मंडळीत एकोपा राहणार नाही. तसंच, ते पवित्र आत्म्याच्या विरोधात कार्यं करत असतील जो देवाच्या लोकांमध्ये शांती आणि ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी मदत करतो.—रोम. १६:१७, १८.

इतरांनी अभिषिक्‍त जनांना कशी वागणूक दिली पाहिजे?

आपण अभिषिक्‍त जनांची किंवा पुढाकार घेणाऱ्‍या इतर कोणाचीही व्यक्‍तिपूजा करू नये (परिच्छेद ८ पाहा) *

८. अभिषिक्‍त जनांशी आपण जसं वागतो त्याबद्दल आपण दक्ष का राहिलं पाहिजे? (तळटीपही पाहा.)

आपण अभिषिक्‍त भाऊबहिणींना कशी वागणूक दिली पाहिजे? एखाद्याला खूप जास्त महत्त्व देणं चुकीचं ठरेल, मग तो ख्रिस्ताचा बांधव असला तरीही. (मत्त. २३:८-१२) बायबल म्हणतं की आपण वडिलांच्या “विश्‍वासाचे  अनुकरण” केलं पाहिजे. पण त्याचा अर्थ असा होत नाही की आपण कोणा व्यक्‍तीला  आपला पुढारी बनवावं. (इब्री १३:७) हे खरं आहे की काही जणांना आपण “दुप्पट मान देण्यास योग्य समजले” पाहिजे असं बायबल म्हणतं. पण ते अभिषिक्‍त आहेत म्हणून नाही, तर ते “चांगल्या प्रकारे नेतृत्व करतात” आणि “बोलण्याच्या व शिकवण्याच्या बाबतीत मेहनत घेतात” म्हणून. (१ तीम. ५:१७) आपण जर अभिषिक्‍त जनांना खूप जास्त महत्त्व दिलं किंवा त्यांची प्रशंसा केली तर त्यांना अवघडल्यासारखं वाटेल. * इतकंच काय तर आपल्या अशा वागणुकीमुळे ते गर्विष्ठही बनतील. (रोम. १२:३) आणि आपल्यापैकी कोणालाच असं काही करायची इच्छा नाही, ज्यामुळे ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त बांधवाकडून अशी गंभीर चूक होईल.—लूक १७:२.

९. आपण अभिषिक्‍त जनांचा आदर करतो हे कसं दाखवू शकतो?

यहोवाने ज्यांना अभिषिक्‍त केलं आहे त्यांना आपण आदर कसा देऊ शकतो? ते अभिषिक्‍त कसे झाले याबद्दल आपण त्यांना विचारणार नाही. खरंतर हा त्यांचा वैयक्‍तिक प्रश्‍न आहे, तेव्हा याबद्दल जाणून घ्यायचा कोणालाही हक्क नाही. (१ थेस्सलनी. ४:११; २ थेस्सलनी. ३:११) तसंच, अभिषिक्‍त व्यक्‍तीचा विवाहसोबती, आईवडील किंवा कुटुंबातले इतर सदस्य हेसुद्धा अभिषिक्‍त असतीलच असं आपण गृहीत धरणार नाही. कारण एका व्यक्‍तीला स्वर्गातल्या जीवनाची आशा आपल्या कुटुंबाकडून वारशाने मिळत नाही, तर ती देवाकडून मिळते. (१ थेस्सलनी. २:१२) त्यासोबतच आपण त्यांच्या नातेवाइकांना किंवा कुटुंबातल्या लोकांना असे काही प्रश्‍न विचारणार नाही ज्यामुळे त्यांचं मन दुखावेल. जसं की, आपण अभिषिक्‍त बांधवाच्या पत्नीला असं विचारणार नाही की तिला पृथ्वीवर नंदनवनात आपल्या पतीशिवाय राहावं लागेल, त्याबद्दल तिला कसं वाटतं. कारण आपल्याला खातरी आहे की नवीन जगात यहोवा प्रत्येकाची “इच्छा” पूर्ण करेल.—स्तो. १४५:१६.

१०. “व्यक्‍तिपूजा” करण्याचं टाळल्यामुळे आपण स्वतःचं संरक्षण कसं करतो?

१० अभिषिक्‍त जनांना जेव्हा आपण इतरांपेक्षा जास्त महत्त्व देत नाही तेव्हा आपण स्वतःचंसुद्धा संरक्षण करत असतो. कारण बायबल म्हणतं की काही अभिषिक्‍त ख्रिश्‍चन कदाचित विश्‍वासात टिकून राहणार नाही. (मत्त. २५:१०-१२; २ पेत्र २:२०, २१) आपण “व्यक्‍तिपूजा” करण्याचं टाळलं पाहिजे; म्हणजे लोक ज्या प्रकारे सिनेतारकांना महत्त्व देतात तसं आपण कोणत्याही व्यक्‍तीला खूप जास्त महत्त्व देणार नाही. मग ते अभिषिक्‍त ख्रिश्‍चन असोत, खूप वर्षांपासून यहोवाची सेवा करणारे सेवक असोत किंवा असे भाऊबहीण असोत ज्यांना बरेच जण ओळखतात. (यहू. १६, तळटीप) असे लोक पुढे अविश्‍वासू बनले किंवा मंडळी सोडून गेले, तरी आपला यहोवावरचा विश्‍वास कमी होणार नाही किंवा आपण त्याची सेवा करायचं सोडणार नाही.

प्रतीकांचं सेवन करण्याऱ्‍यांची संख्या वाढल्यामुळे आपण चिंतित व्हावं का?

११. स्मारकविधीत प्रतीकांचं सेवन करणाऱ्‍यांच्या संख्येबद्दल आपल्याला काय म्हणता येईल?

११ अनेक वर्षांपर्यंत स्मारकविधीत प्रतीकांचं सेवन करणाऱ्‍यांची संख्या कमी होत गेली. पण अलीकडच्या काही वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी ही संख्या वाढत असल्याचं दिसून आलं आहे. मग यामुळे आपल्याला चिंता व्हावी का? मुळीच नाही. आता आपण अशा काही महत्त्वाच्या पैलूंवर चर्चा करू या, ज्यांमुळे आपण या गोष्टीबद्दल चिंता करायचं टाळू शकतो.

१२. प्रतीकांचं सेवन करणाऱ्‍यांच्या संख्येबद्दल आपण चिंता का करू नये?

१२ “जे आपले आहेत त्यांना यहोवा ओळखतो.”  (२ तीम. २:१९) स्मारकविधीत प्रतीकांचं सेवन करणारे खरोखर अभिषिक्‍त आहेत की नाही हे यहोवाला माहीत आहे, पण जे बांधव स्मारकविधीच्या वेळी त्यांची मोजणी करतात त्यांना ही गोष्ट माहीत नाही. त्यामुळे या संख्येत अशांचाही समावेश आहे, ज्यांना वाटतं की ते अभिषिक्‍त आहेत पण खरंतर ते अभिषिक्‍त नाहीत. उदाहरणार्थ, काही जण आधी स्मारकविधीत प्रतीकांचं सेवन करायचे पण नंतर त्यांनी ते करण्याचं थांबवलं. इतर काही जणांना मानसिक किंवा भावनात्मक समस्या असल्यामुळे ते असं मानायचे की ते स्वर्गात ख्रिस्तासोबत राज्य करतील. तेव्हा हे स्पष्टच होतं, की आज पृथ्वीवर किती अभिषिक्‍त जन उरले आहेत हे आपण सांगू शकत नाही.

१३. मोठं संकट सुरू होईल तेव्हा नेमके किती अभिषिक्‍त जन या पृथ्वीवर असतील याबद्दल बायबलमध्ये काही सांगितलं आहे का?

१३ येशू जेव्हा अभिषिक्‍त जनांना पृथ्वीवरून घेऊन जाण्यासाठी येईल तेव्हा पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांत अभिषिक्‍त ख्रिस्ती असतील.  (मत्त. २४:३१) बायबल म्हणतं की शेवटच्या दिवसांत पृथ्वीवर कमी अभिषिक्‍त जन उरतील. (प्रकटी. १२:१७) पण मोठं संकट सुरू होईल तेव्हा या पृथ्वीवर नेमके किती अभिषिक्‍त जन असतील त्याबद्दल बायबलमध्ये काहीही सांगितलेलं नाही.

स्मारकविधीत जर कोणी प्रतिकांचं सेवन केलं तर आपली प्रतिक्रिया कशी असली पाहिजे? (परिच्छेद १४ पाहा)

१४. रोमकर ९:११क, १६ या वचनांत सांगितल्यानुसार अभिषिक्‍त जनांना निवडण्यात येतं त्या बाबतीत आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे?

१४ अभिषिक्‍त जनांना केव्हा निवडायचं हे यहोवा ठरवतो.  (रोम. ८:२८-३०) येशूचं पुनरुत्थान झाल्यावर यहोवाने अभिषिक्‍त जनांना निवडायला सुरू केलं. असं दिसून येतं की पहिल्या शतकात सगळे खरे ख्रिस्ती अभिषिक्‍त होते. मग त्यानंतर बरीच वर्षं अनेकांनी ख्रिस्ती असण्याचा दावा केला पण ते येशूचे खरे शिष्य नव्हते. असं असलं तरी त्या वर्षांदरम्यान यहोवाने काही खऱ्‍या ख्रिश्‍चनांना अभिषिक्‍त केलं. ते येशूने उदाहरणात सांगितलेल्या गव्हाप्रमाणे होते ज्यांची वाढ जंगली गवतासोबत होणार होती. (मत्त. १३:२४-३०) शेवटच्या दिवसांमध्ये यहोवाने अशा लोकांना निवडण्याचं काम सुरू ठेवलं आहे जे १,४४,००० जणांपैकी असणार आहेत. * म्हणून यहोवाने जर त्यांपैकी काहींना अंत येणाच्या फक्‍त काही काळाआधी निवडलं तरी आपण त्याच्या निर्णयाबद्दल शंका घेणार नाही. (रोमकर ९:११क, १६ वाचा.) * येशूने एका उदाहरणात सांगितलेल्या मजुरांसारखं वागण्याचं आपण टाळलं पाहिजे. त्यांचा मालक शेवटच्या तासाला काम करायला आलेल्या मजुरांशी जसा वागला त्याबद्दल ते कुरकुर करू लागले.—मत्त. २०:८-१५.

१५. मत्तय २४:४५-४७ या वचनांत सांगितल्याप्रमाणे सर्वच अभिषिक्‍त ख्रिस्ती “विश्‍वासू आणि बुद्धिमान दास” आहेत का? स्पष्ट करा.

१५ स्वर्गातल्या जीवनाची आशा असणारे सर्वच अभिषिक्‍त ख्रिस्ती “विश्‍वासू आणि बुद्धिमान दास” नाहीत.  (मत्तय २४:४५-४७ वाचा.) पहिल्या शतकाप्रमाणे यहोवा आणि येशू आजसुद्धा काही बांधवांचा उपयोग करून बऱ्‍याच लोकांना आध्यात्मिक अन्‍न पुरवत आहेत किंवा शिकवत आहेत. पहिल्या शतकात ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनं लिहिण्यासाठी फक्‍त काही अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचाच वापर करण्यात आला होता. आजही देवाच्या सेवकांना “योग्य वेळी अन्‍न पुरवण्यासाठी” फक्‍त काही अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना जबाबदारी देण्यात आली आहे.

१६. या लेखातून आपल्याला काय शिकायला मिळालं?

१६ या लेखातून आपण काय शिकलो? यहोवाने ठरवलं आहे की तो जास्तीत जास्त लोकांना पृथ्वीवर सर्वकाळाचं जीवन देईल आणि येशूसोबत राज्य करण्यासाठी काहींना स्वर्गातलं जीवन देईल. यहोवा आपल्या सर्व सेवकांना, म्हणजे “यहूदी” आणि “दहा जण” यांना प्रतिफळ देतो. यहोवाने त्या सर्वांना सारखेच नियम दिले आहेत आणि त्यांनी ते पाळणं गरजेचं आहे. तसंच त्यांनी विश्‍वासू आणि नम्र राहणंही गरजेचं आहे. त्यासोबतच, सर्वांनी एकतेने सेवा करण्याचा आणि मंडळीत शांती टिकवून ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे. आपण जसजसं अंताच्या जवळ जात आहोत, तसतसं आपण यहोवाची सेवा करत राहू या आणि “एक कळप” या नात्याने ख्रिस्ताचं अनुकरण करत राहू या.—योहा. १०:१६.

^ परि. 5 यावर्षी येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी, मंगळवारी संध्याकाळी ७ एप्रिल या दिवशी असणार आहे. स्मारकविधीत प्रतीकांचं सेवन करणाऱ्‍यांबद्दल आपण कसा दृष्टिकोन बाळगला पाहिजे? त्या प्रतीकांचं सेवन करणाऱ्‍यांची संख्या वाढत असेल तर त्याबद्दल आपण चिंता केली पाहिजे का? या लेखात आपल्याला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील. हा लेख जानेवारी २०१६ च्या टेहळणी बुरूज मधल्या एका लेखावर आधारित आहे.

^ परि. 2 भविष्यात येशूसोबत जे स्वर्गात राज्य करणार आहेत त्यांची नावं देव कदाचित आपल्याला सांगेल, हे आपल्याला स्तोत्र ८७:५, ६ या वचनांतून कळतं.—रोम. ८:१९.

^ परि. 8 टेहळणी बुरूज,  जानेवारी २०१६ मध्ये “प्रीती ‘गैरशिस्त वागत नाही’” ही चौकट पाहा.

^ परि. 14 प्रेषितांची कार्ये २:३३ या वचनात जरी सांगितलं असलं की येशूद्वारे पवित्र आत्मा ओतण्यात येत आहे, तरी प्रत्येक व्यक्‍तीला यहोवाच बोलवतो.

^ परि. 14 अधिक माहितीसाठी टेहळणी बुरूज -E १ मे, २००७ यात वाचकांचे प्रश्‍न पाहा.

गीत २९ खरेपणाने चालणे

^ परि. 56 चित्राचं वर्णन: कल्पना करा, जर एका अधिवेशनात मुख्यालयाचे प्रतिनिधी आणि त्यांची पत्नी यांचे फोटो काढण्यासाठी जमावाने त्यांना घेरलं तर ही खूप लाजिरवाणी गोष्ट असेल!