व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १

जा आणि लोकांना शिष्य करा

जा आणि लोकांना शिष्य करा

२०२० सालासाठी असलेलं आपलं वार्षिक वचन: म्हणून, जा लोकांना शिष्य करा आणि त्यांना बाप्तिस्मा द्या.—मत्त. २८:१९.

गीत ७ ख्रिस्ती समर्पण

सारांश *

१-२. येशूच्या कबरीजवळ आलेल्या स्त्रियांना एका स्वर्गदूताने काय सांगितलं आणि येशूने त्यांना कोणती सूचना दिली?

इ. स. ३३ च्या निसान १६ या दिवसाची सकाळची वेळ. देवाची सेवा करणाऱ्‍या काही स्त्रिया खूप दुःखी आहेत आणि त्या एका कबरीजवळ येतात. येशूचं शरीर दोन दिवसांआधी इथे ठेवण्यात आलं होतं. त्या स्त्रिया त्याच्या शरीराला सुगंधी मसाले आणि सुवासिक तेल लावण्याच्या हेतूने तिथे आल्या आहेत. पण ती कबर रिकामी पाहून त्या अचंबित होतात. एक स्वर्गदूत त्या स्त्रियांना म्हणतो की येशूला मेलेल्यांतून उठवण्यात आलं आहे. तो पुढे म्हणतो: “तो तुमच्यापुढे गालीलात जात आहे. तुम्ही त्याला तिथे पाहाल.”—मत्त. २८:१-७; लूक २३:५६; २४:१०.

त्या स्त्रिया तिथून निघून गेल्यानंतर येशू स्वतः त्यांना भेटतो आणि म्हणतो: “जाऊन माझ्या बांधवांना ही बातमी सांगा म्हणजे ते गालीलात जातील आणि तिथे ते मला पाहतील.” (मत्त. २८:१०) येशूला त्याच्या शिष्यांना नक्कीच काहीतरी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन द्यायचं होतं, म्हणून पुनरुत्थानानंतर त्याने सर्वात आधी त्याच्या सर्व शिष्यांना भेटण्याची योजना केली.

शिष्य बनवण्याची आज्ञा कोणाला देण्यात आली?

येशू पुनरुत्थानानंतर गालीलमध्ये त्याच्या प्रेषितांना आणि इतरांना भेटला व त्याने त्यांना “जा आणि . . . शिष्य करा” अशी आज्ञा दिली (परिच्छेद ३-४ पाहा)

३-४. मत्तय २८:१९, २० मध्ये दिलेली आज्ञा ही फक्‍त प्रेषितांसाठी नव्हती असं आपण का म्हणू शकतो? (मुखपृष्ठावरचं चित्र पाहा.)

मत्तय २८:१६-२० वाचा. येशू त्याच्या शिष्यांना भेटला तेव्हा त्याने त्यांना अशा एका महत्त्वपूर्ण कामाबद्दल सांगितलं, जे ते पहिल्या शतकात पूर्ण करणार होते. हे तेच काम होतं जे आज आपणही करत आहोत. येशूने त्यांना म्हटलं: “म्हणून, जा आणि सर्व राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा आणि . . . मी तुम्हाला आज्ञा दिलेल्या सर्व गोष्टी त्यांना पाळायला शिकवा.”

येशूची इच्छा आहे की त्याच्या सर्व शिष्यांनी प्रचारकार्य करावं. पण ही आज्ञा त्याने फक्‍त त्याच्या ११ विश्‍वासू प्रेषितांना दिली नाही. असं आपण खातरीने का म्हणू शकतो? कारण गालीलच्या डोंगरावर जेव्हा शिष्य बनवण्याची आज्ञा देण्यात आली तेव्हा फक्‍त प्रेषितच तिथे उपस्थित नव्हते. त्या स्वर्गदूताने त्या स्त्रियांना काय सांगितलं होतं ते आठवा. त्याने म्हटलं होतं: “तुम्ही  त्याला [गालीलमध्ये] पाहाल.” याचाच अर्थ त्या विश्‍वासू स्त्रियाही तिथे उपस्थित होत्या. तसंच, प्रेषित पौलने म्हटलं की येशू “एकाच वेळी पाचशेहून अधिक बांधवांना दिसला.” (१ करिंथ. १५:६) तर यावरून आपण असं म्हणू शकतो की तिथे आणखी लोकसुद्धा उपस्थित होते. पण इतके शिष्य नेमके कुठे जमले होते?

५. १ करिंथकर १५:६ या वचनातून आपल्याला काय कळतं?

मत्तय २८ या अध्यायात उल्लेख केला आहे की येशू त्याच्या शिष्यांना गालीलमध्ये भेटला. आणि पौलने १ करिंथकर १५:६ या वचनात जे म्हटलं त्या वेळी त्याच्या मनात हीच घटना असावी. असं आपण का म्हणू शकतो? पहिलं कारण, येशूचे शिष्य जास्तकरून गालीलचे होते. त्यामुळे त्याला इतक्या मोठ्या जमावाला यरुशलेममध्ये कोणाच्यातरी घरी भेटण्याऐवजी गालीलच्या डोंगरावर भेटणं जास्त सोयीचं होतं. दुसरं कारण, येशूचं पुनरुत्थान झाल्यावर तो आधीच यरुशलेममध्ये ११ प्रेषितांना एका खोलीत भेटला होता. जर त्याला फक्‍त त्याच्या प्रेषितांनाच प्रचाराची आणि शिष्य बनवण्याची आज्ञा द्यायची असती, तर त्याने ती त्यांना तिथेच दिली असती. पण येशूने तसं न करता त्याच्या प्रेषितांना, त्या स्त्रियांना आणि इतरांना गालीलमध्ये एकत्र भेटायला सांगितलं.—लूक २४:३३, ३६.

६. मत्तय २८:२० मध्ये दिलेली शिष्य बनवण्याची आज्ञा आजच्या काळासाठी आहे हे आपण कशावरून म्हणू शकतो आणि आज या आज्ञेचं पालन किती मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे?

तिसरं कारण काय होतं याकडे लक्ष द्या. येशूने शिष्य बनवण्याची आज्ञा दिली तेव्हा ती फक्‍त पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांसाठीच नव्हती. हे आपण कशावरून म्हणू शकतो? येशूने आपल्या अनुयायांना दिलेल्या निर्देशनाच्या शेवटी त्याने म्हटलं: “जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीपर्यंत  मी नेहमी तुमच्यासोबत असेन.” (मत्त. २८:२०) आणि येशूचे शब्द आज शंभर टक्के खरे ठरले आहेत. आज शिष्य बनवण्याचं काम अगदी आवेशाने चालू आहे. प्रत्येक वर्षी जवळपास तीन लाख लोक बाप्तिस्मा घेऊन यहोवाचे साक्षीदार व येशू ख्रिस्ताचे शिष्य बनत आहेत आणि ही खरंच आश्‍चर्याची गोष्ट आहे!

७. आता आपण कशावर चर्चा करणार आहोत आणि का?

बायबलचा अभ्यास करणारे अनेक लोक प्रगती करून बाप्तिस्मा घेतात. पण नियमितपणे बायबल अभ्यास करत असलेले काही बायबल विद्यार्थी शिष्य बनायला कचरतात. त्यांना बायबल अभ्यास करायला आवडतं पण ते बाप्तिस्मा घेण्याइतपत प्रगती करत नाहीत. आपल्या बायबल विद्यार्थ्यांनी शिकलेल्या गोष्टी त्यांच्या जीवनात लागू कराव्यात आणि ख्रिस्ताचं शिष्य बनावं असं आपल्याला मनापासून वाटतं आणि म्हणून आपण त्यांना मदतही करतो. या लेखात आपण चर्चा करणार आहोत की आपण विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत कसं पोहोचू शकतो आणि त्यांना आध्यात्मिक प्रगती करायला कशी मदत करू शकतो. पण या विषयावर चर्चा करणं का गरजेचं आहे? कारण बायबल अभ्यास चालवताना एक वेळ अशी येते, जेव्हा तो बायबल अभ्यास सुरू ठेवायचा की नाही हे आपल्याला ठरवावं लागतं.

आपल्या विद्यार्थ्याला यहोवावर प्रेम करायला शिकवा

८. बायबल विद्यार्थ्यांना यहोवावर प्रेम करायला शिकवणं आपल्याला कधीकधी कठीण का जाऊ शकतं?

यहोवाची इच्छा आहे की लोकांनी त्याच्यावर प्रेम असल्यामुळे त्याची सेवा करावी. म्हणून आपला उद्देश आपल्या बायबल विद्यार्थ्यांना हे समजायला मदत करणं आहे की यहोवाचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि तो प्रत्येक व्यक्‍तीची काळजी करतो. बायबल विद्यार्थ्यांनी यहोवाला ‘अनाथांचा पिता आणि विधवांची काळजी घेणारा’ समजावं म्हणून आपण त्यांना मदत करतो. (स्तो. ६८:५) त्यांना जेव्हा जाणीव होईल की देवाचं त्यांच्यावर किती प्रेम आहे तेव्हा तेही त्याच्यावर प्रेम करू लागतील. काही विद्यार्थ्यांना यहोवाला एक प्रेमळ पिता म्हणून पाहणं कठीण जाऊ शकतं, कारण त्यांच्या वडिलांनी त्यांना कधीच प्रेमाने आणि आपुलकीने वागवलेलं नसतं. (२ तीम. ३:१, ३) तेव्हा बायबल अभ्यास घेताना यहोवाच्या चांगल्या गुणांवर जोर द्या. तुमच्या विद्यार्थ्यांना हे समजायला मदत करा की त्यांना सर्वकाळाचं जीवन मिळावं अशी आपल्या प्रेमळ पित्याची इच्छा आहे.  आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तो त्यांना मदत करायला तयार आहे हेही त्यांना समजवा. पण आपण आणखी काय करू शकतो?

९-१०. आपण विद्यार्थ्यांसोबत बायबल अभ्यास करताना कोणती पुस्तकं वापरली पाहिजेत आणि का?

बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?” आणि “देवाच्या प्रेमात टिकून राहा” या पुस्तकांचा वापर करा.  ही पुस्तकं विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी मदत व्हावी या खास उद्देशाने बनवण्यात आली आहेत. उदाहरणार्थ, बायबलमधून शिकायला मिळतं  याच्या पहिल्या अध्यायात आपल्याला पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं मिळतात: देवाला खरंच आपली काळजी आहे का? लोकांना दुःख सहन करावं लागतं तेव्हा देवाला कसं वाटतं? आणि तुम्ही यहोवाचे मित्र बनू शकता का? तसंच, देवाचे प्रेम  या पुस्तकामुळे विद्यार्थ्याला समजायला मदत होईल की बायबलमध्ये दिलेली तत्त्वं लागू केल्याने त्याचं जीवन कसं सुधारू शकतं आणि तो यहोवाच्या आणखी जवळ कसा जाऊ शकतो. तुम्ही जरी ही पुस्तकं अनेकदा बायबल अभ्यास करताना आधी वापरली असली, तरी तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजा लक्षात ठेवून प्रत्येक वेळी अभ्यासासाठी चांगली तयारी करा.

१० पण समजा बायबल विद्यार्थ्याने दुसऱ्‍या एखाद्या विषयाबद्दल प्रश्‍न विचारला तर काय? आणि तो विषय शिकवण्याच्या साधनांमध्ये नसून दुसऱ्‍या प्रकाशनांमध्ये असला तर आपण काय करू शकतो? असं झालं तर अभ्यासाच्या वेळी त्या विषयावर चर्चा करण्याऐवजी तुम्ही विद्यार्थ्याला सांगू शकता की त्याने तो विषय त्याच्या फावल्या वेळेत वाचावा. असं केल्यामुळे तुम्हाला बायबल अभ्यासासाठी असलेल्या पुस्तकातूनच म्हणजे बायबलमधून शिकायला मिळतं  किंवा देवाचे प्रेम  यांतून अभ्यास चालू ठेवता येईल.

प्रार्थनेने बायबल अभ्यासाची सुरुवात करा (परिच्छेद ११ पाहा)

११. अभ्यासाच्या सुरुवातीला आणि शेवटी प्रार्थना करणं आपण कधीपासून सुरू करू शकतो आणि प्रार्थनेच्या विषयाबद्दल आपण विद्यार्थ्यासोबत कशी चर्चा करू शकतो?

११ बायबल अभ्यास सुरू करण्याआधी प्रार्थना करा.  नियमित अभ्यास सुरू झाल्याच्या काही आठवड्यांतच म्हणजे लवकरात लवकर, बायबल अभ्यासाआधी आणि नंतर प्रार्थना करणं योग्य राहील. देवाच्या पवित्र आत्म्यामुळे आपल्याला त्याचं वचन समजायला मदत होते या गोष्टीची जाणीव आपण विद्यार्थ्याला करून द्यायला हवी. काही प्रचारक प्रार्थनेचं महत्त्व सांगण्याआधी याकोब १:५ हे वचन वाचून त्यावर चर्चा करतात. त्यात म्हटलं आहे: “तुमच्यापैकी कोणाला बुद्धीची गरज असल्यास त्याने ती देवाजवळ मागत राहावी.” त्यानंतर प्रचारक विद्यार्थ्याला विचारू शकतो, ‘आपण देवाजवळ बुद्धी कशी मागू शकतो?’ आणि सहसा असं होतं की विद्यार्थी याचं उत्तर ‘देवाकडे प्रार्थना करून’ असं देतो. अशा प्रकारे विद्यार्थी मान्य करतो की प्रार्थना करणं महत्त्वाचं आहे.

१२. स्तोत्र १३९:२-४ चा वापर करून तुम्ही विद्यार्थ्याला यहोवाशी मनमोकळेपणाने बोलण्याचं प्रोत्साहन कसं देऊ शकता?

१२ प्रार्थना कशी करायची हे तुमच्या विद्यार्थ्याला शिकवा.  विद्यार्थ्याने मनापासून केलेली प्रार्थना यहोवाला ऐकण्याची इच्छा आहे हे त्याला समजायला मदत करा. आपल्या वैयक्‍तिक प्रार्थनांमध्ये आपण यहोवाला मनमोकळेपणाने आपल्या भावना सांगू शकतो; अशा भावना ज्या कदाचित आपण इतर कोणालाही सांगणार नाही. शिवाय, आपल्याला माहीत आहे की आपण आपले विचार आणि भावना यहोवाला सांगण्याआधीच त्याला ते माहीत आहेत. (स्तोत्र १३९:२-४ वाचा.) तसंच, आपले चुकीचे विचार बदलण्यासाठी आणि वाईट सवयींवर मात करण्यासाठी विद्यार्थ्याने देवाकडे मदत मागावी असंही प्रोत्साहन आपण त्याला देऊ शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही एका व्यक्‍तीसोबत काही काळापासून बायबल अभ्यास करत आहात. पण त्या विद्यार्थ्याला खोट्या धर्माशी संबंधित असलेला एखादा सण आवडत असेल. ही गोष्ट योग्य नाही हे त्याला माहीत आहे पण तरी त्या सणाच्या काही गोष्टी त्याला आवडतात. मग अशा वेळी तुम्ही त्याला आपल्या मनातल्या भावना यहोवाला सांगण्याचं आणि यहोवाला आवडणाऱ्‍या गोष्टीच त्याला आवडाव्यात याबद्दल कळकळून विनंती करण्याचं प्रोत्साहन देऊ शकतात.—स्तो. ९७:१०.

तुमच्या विद्यार्थ्याला सभेला येण्याचं आमंत्रण द्या (परिच्छेद १३ पाहा)

१३. (क) विद्यार्थ्यांना आपण लवकरात लवकर सभेला येण्याचं आमंत्रण का दिलं पाहिजे? (ख) राज्य सभागृहात आल्यावर विद्यार्थ्याला आपलेपणा वाटावा यासाठी आपण काय करू शकतो?

१३ विद्यार्थ्याला लवकरात लवकर सभेला येण्याचं आमंत्रण द्या.  तुमचा विद्यार्थी ख्रिस्ती सभांमध्ये जे ऐकतो आणि पाहतो त्यामुळे त्याला प्रगती करायला आणि यहोवाची सेवा करायला प्रोत्साहन मिळू शकतं. तेव्हा, यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात?  हा व्हिडिओ त्याला दाखवा आणि तुमच्यासोबत सभेला येण्याचं आमंत्रण द्या. जर शक्य असेल तर त्याला सभेपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करा; तुम्ही त्याला तुमच्या गाडीतून नेऊ शकता किंवा त्याच्यासोबत प्रवास करू शकता. तुम्ही जेव्हा त्याच्यासोबत अभ्यास करता तेव्हा वेगवेगळ्या भाऊबहिणींना सोबत घेऊन जा. अशा प्रकारे, तुमच्या विद्यार्थ्याची मंडळीतल्या इतर लोकांशी ओळख वाढेल. त्यामुळे त्याला सभेला आल्यावर अनोळखी लोकांमध्ये आल्यासारखं वाटणार नाही तर आपलेपणा जाणवेल.

बायबल विद्यार्थ्याला आध्यात्मिक रीत्या प्रगती करायला मदत करा

१४. विद्यार्थ्याला आध्यात्मिक रीत्या प्रगती करण्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे प्रोत्साहन मिळू शकतं?

१४ बायबल विद्यार्थ्याला आध्यात्मिक रीत्या प्रगती करण्यासाठी मदत करणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे. (इफिस. ४:१३) जेव्हा एखादी व्यक्‍ती आपल्यासोबत बायबल अभ्यास करायला तयार होते तेव्हा तिला मुख्यतः हे जाणून घ्यायची इच्छा असते की त्या अभ्यासातून तिला कसा फायदा होणार आहे. पण जसजसं तिचं यहोवावर प्रेम वाढत जातं, तसतसं ती इतरांना आणि मंडळीतल्या लोकांना मदत करण्याबद्दल विचार करू लागते. (मत्त. २२:३७-३९) त्यामुळे योग्य वेळ आल्यावर आपल्या विद्यार्थ्याला सांगायला कचरू नका की राज्याच्या कामाला आर्थिक रीत्या हातभार लावणं हा आपल्यासाठी एक बहुमान आहे.

समस्या आल्यावर काय करायचं हे विद्यार्थ्याला शिकवा (परिच्छेद १५ पाहा)

१५. विद्यार्थ्याला समस्या येते तेव्हा योग्य निर्णय घ्यायला आपण त्याला कशी मदत करू शकतो?

१५ समस्या उद्‌भवतात तेव्हा काय करावं हे विद्यार्थ्याला शिकवा.  कल्पना करा, तुमचा विद्यार्थी एक बाप्तिस्मारहित प्रचारक आहे आणि तो येऊन तुम्हाला सांगतो की मंडळीतल्या एका व्यक्‍तीने त्याचं मन दुखावलं आहे. मग अशा वेळी कोणा एकाची बाजू घेण्याऐवजी बायबलमध्ये काय सल्ला दिला आहे हे त्याला समजायला मदत करा. तो एकतर बांधवाला किंवा बहिणीला क्षमा करून, झालं गेलं विसरू शकतो. किंवा त्याला असं करणं शक्य नसलं तर तो त्यांच्याशी प्रेमळपणे व दयाळूपणे बोलू शकतो. पण त्यांच्याशी बोलताना मात्र त्याचा उद्देश ‘आपल्या भावाला मिळवणं’ हा असला पाहिजे. (मत्तय १८:१५ पडताळून पाहा.) विद्यार्थ्याने काय बोलावं याची तयारी करण्यासाठी तुम्ही त्याला मदत केली पाहिजे. उद्‌भवलेल्या समस्येला व्यावहारिक रीतीने सोडवण्यासाठी JW Library® ॲप, यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक  आणि jw.org® यांचा वापर कसा करावा हे विद्यार्थ्याला शिकवा. एका विद्यार्थ्याला बाप्तिस्मा घेण्याआधी जितकं जास्त प्रशिक्षण मिळेल, तितकं त्याला पुढे जाऊन मंडळीतल्या लोकांसोबत चांगलं नातं टिकवून ठेवण्यासाठी मदत होईल.

१६. बायबल अभ्यासासाठी इतरांना सोबत नेणं कसं फायद्याचं ठरू शकतं?

१६ मंडळीतल्या इतरांना आणि विभागीय पर्यवेक्षकांना तुमच्यासोबत बायबल अभ्यासासाठी घेऊन जा.  असं का? कारण इतर प्रचारक तुमच्या बायबल विद्यार्थ्याला अशी मदत पुरवू शकतात जी कदाचित तुम्हाला पुरवणं शक्य नाही. कल्पना करा, तुमच्या विद्यार्थ्याने सिगारेट सोडण्याचा बराच प्रयत्न केला असेल पण त्यात तो अनेकदा अपयशी ठरला असेल. मग अशा वेळी तुम्ही अशा एका प्रचारकाला तुमच्यासोबत नेऊ शकता ज्याला तशीच सवय होती आणि त्यालाही कित्येकदा अपयश आलं, पण शेवटी तो त्या सवयीवर मात करू शकला. तो साक्षीदार बांधव कदाचित तुमच्या विद्यार्थ्याला असे व्यावहारिक सल्ले देऊ शकेल जे कदाचित त्याच्या कामी येतील. तसंच, समजा तुम्ही जर एखाद्या अनुभवी बांधवासमोर बायबल अभ्यास घ्यायला कचरत असाल तर त्या बांधवाला बायबल अभ्यास घ्यायला सांगा. तुमच्यासोबत जेव्हा इतर जण बायबल अभ्यासासाठी येतात तेव्हा त्यांच्या अनुभवावरून तुम्ही खूप काही शिकू शकता. लक्षात असू द्या की तुमचं ध्येय विद्यार्थ्याला आध्यात्मिक रीत्या प्रगती करण्यासाठी मदत करणं हे आहे.

मी बायबल अभ्यास थांबवला पाहिजे का?

१७-१८. एखाद्याचा बायबल अभ्यास बंद करण्याचा निर्णय घ्यावा की नाही हे ठरवताना तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?

१७ जर बायबल विद्यार्थी आपल्या जीवनात बदल करत नसेल तर एक वेळ अशी येते जेव्हा तुम्हाला स्वतःला असा प्रश्‍न विचारावा लागतो की, ‘मी याचा बायबल अभ्यास थांबवायला हवा का?’ पण याबद्दल विचार करताना तुम्ही त्या व्यक्‍तीच्या क्षमता लक्षात घेणं आवश्‍यक आहे. कारण काही लोकांना प्रगती करायला इतरांपेक्षा जरा जास्त वेळ लागतो. स्वतःला विचारा: ‘बायबल विद्यार्थी त्याच्या परिस्थितीनुसार प्रगती करत आहे का?’ ‘तो जे काही शिकतो त्याप्रमाणे त्याने वागायला सुरुवात केली आहे का?’ (मत्त. २८:२०) हे खरं आहे की एक विद्यार्थी कदाचित लवकर प्रगती करणार नाही, पण त्याने हळूहळू आपल्या जीवनात बदल करायलाच हवेत.

१८ अशा व्यक्‍तीबद्दल काय जिच्यासोबत आपण काही काळापासून अभ्यास करत आहोत पण असं दिसून येतं की तिला बायबल अभ्यासाबद्दल कदर नाही? कल्पना करा: तुम्ही एका विद्यार्थ्यासोबत बायबलमधून शिकायला मिळतं?  या पुस्तकातून अभ्यास संपवला आहे आणि कदाचित देवाचे प्रेम या पुस्तकातून अभ्यास सुरू केला आहे. पण तो विद्यार्थी एकदाही सभेला किंवा स्मारकविधीला आला नाही. त्यासोबतच तो अनेकदा क्षुल्लक कारणं सांगून ‘आज स्टडी नको करू या’ असं म्हणतो. मग अशा वेळी तुम्ही त्याच्याशी स्पष्टपणे चर्चा करणं योग्य राहील. *

१९. एखाद्या विद्यार्थ्याला बायबल अभ्यासाबद्दल कदर वाटत नसेल तर तुम्ही त्याला काय विचारू शकता आणि तुम्हाला कोणती गोष्ट लक्षात घ्यावी लागेल?

१९ तुम्ही विद्यार्थ्याला असं विचारून चर्चेची सुरुवात करू शकता, ‘यहोवाचा साक्षीदार बनायला तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात जास्त कठीण वाटते?’ विद्यार्थी कदाचित उत्तर देईल की ‘मला अभ्यास करत राहायला काहीच हरकत नाही पण मी एक यहोवाचा साक्षीदार कधीच बनणार नाही!’ अभ्यास सुरू झाल्याच्या काही काळानंतर त्याची जर अशीच मनोवृत्ती राहिली तर अभ्यास सुरू ठेवण्यात काही अर्थ आहे का? दुसरीकडे पाहता, कदाचित तुमचा विद्यार्थी तुम्हाला पहिल्यांदाच सांगेल की कोणत्या गोष्टीमुळे तो प्रगती करत नाही. उदाहरणार्थ, घरोघरचं प्रचारकार्य त्याला कधीच जमणार नाही असं त्याला वाटत असेल. विद्यार्थ्याने तुम्हाला आपल्या मनातल्या गोष्टी सांगितल्यामुळे आता तुम्हाला खरी परिस्थिती काय ते समजेल आणि त्यानुसार तुम्ही त्याला मदत करू शकाल.

प्रगती करत नसलेल्या व्यक्‍तीसोबत बायबल अभ्यास करण्यात वेळ घालवू नका (परिच्छेद २० पाहा)

२०. एखाद्याचा बायबल अभ्यास सुरू ठेवायचा की नाही हे ठरवण्यासाठी प्रेषितांची कार्ये १३:४८ हे वचन आपल्याला कशी मदत करू शकतं?

२० पण दुःखाची गोष्ट म्हणजे काही विद्यार्थी यहेज्केलच्या दिवसांतल्या इस्राएली लोकांसारखे असतात. यहोवाने त्या इस्राएली लोकांबद्दल काय म्हटलं त्याकडे लक्ष द्या: “पाहा, एखादा मधुर कंठाचा व वाद्ये चांगली वाजवणारा प्रेमगीत गातो तसा तू त्यांस वाटतोस कारण ते तुझी वचने ऐकतात पण त्याप्रमाणे चालत नाहीत.” (यहे. ३३:३२) आपल्याला कदाचित बायबल अभ्यास बंद करण्याबद्दल एखाद्या विद्यार्थ्याला सांगायला अवघड जाईल. पण आपण लक्षात ठेवायला हवं की “उरलेला वेळ कमी करण्यात आला आहे.” (१ करिंथ. ७:२९) प्रगती न करणाऱ्‍या विद्यार्थ्यांमागे जास्त वेळ घालवण्याऐवजी आपण अशा एका व्यक्‍तीला शोधण्यात वेळ दिला पाहिजे जी “सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती” बाळगणारी आहे.—प्रेषितांची कार्ये १३:४८ वाचा.

तुमच्या क्षेत्रात असे इतरही लोक असतील जे मदतीसाठी प्रार्थना करत आहेत (परिच्छेद २० पाहा)

२१. २०२० सालासाठी आपलं वार्षिक वचन काय आहे आणि यामुळे आपल्याला कशी मदत होईल?

२१ २०२० सालासाठी असलेलं आपलं वार्षिक वचन आपल्याला शिष्य बनवण्याचं कौशल्यं वाढवण्यावर लक्ष केंद्रित करायला मदत करेल. येशू आपल्या अनुयायांना गालीलमध्ये डोंगरावर भेटला तेव्हा त्या ऐतिहासिक घटनेच्या वेळी त्याने जे म्हटलं त्यातले काही शब्द या वार्षिक वचनात आहेत. ते म्हणजे: म्हणून, जा लोकांना शिष्य करा आणि त्यांना बाप्तिस्मा द्या. मत्त. २८:१९.

शिष्य बनवण्याचं कौशल्यं वाढवण्याचा आणि विद्यार्थ्यांना बाप्तिस्मा घ्यायला प्रगती करण्यासाठी मदत करण्याचा आपला पक्का निर्धार असला पाहिजे (परिच्छेद २१ पाहा)

गीत ४४ कापणीत आनंदाने सहभागी व्हा!

^ परि. 5 २०२० सालासाठी असलेलं वार्षिक वचन आपल्याला “शिष्य करा” असं प्रोत्साहन देतं. सर्व यहोवाच्या सेवकांना ही आज्ञा पाळणं गरजेचं आहे. आपण ज्यांच्यासोबत बायबल अभ्यास करतो त्यांनी येशूचे शिष्य बनावं म्हणून आपण त्यांना प्रोत्साहन कसं देऊ शकतो? यहोवासोबत घनिष्ठ नातं जोडण्यासाठी आपण आपल्या बायबल विद्यार्थ्यांना कशी मदत करू शकतो हे या लेखात सांगितलं आहे. तसंच, एखाद्यासोबत बायबल अभ्यास सुरू ठेवायचा की नाही हे आपण कसं ठरवू शकतो हेदेखील आपण या लेखात पाहू या.

^ परि. 18 प्रगती न करणारे बायबल अभ्यास थांबवणं  हा व्हिडिओ JW लायब्ररीवर  OUR MEETING AND MINISTRY > IMPROVING OUR SKILLS इथे पाहा.