अभ्यास लेख ३४
नवीन नेमणुकीमुळे होणाऱ्या बदलांशी जुळवून घेणं
“तुमचे काम व देवाच्या नावाबद्दल तुम्ही दाखवलेले प्रेम विसरून जाण्यासाठी देव अन्यायी नाही.”—इब्री ६:१०.
गीत २३ यहोवा आमचे बळ!
सारांश *
१-३. कोणकोणत्या कारणांमुळे पूर्ण वेळेच्या सेवेत असणाऱ्या भाऊबहिणींना आपली नेमणूक सोडावी लागू शकते?
रॉबर्ट आणि मेरी-जो म्हणतात: “२१ वर्षं आनंदाने मिशनरी सेवा केल्यानंतर, आमच्या दोघांचे आईवडील आजारी असल्यामुळे त्यांना आमची गरज होती. आम्हाला त्यांची काळजी घ्यायची होती, पण तरीही आमच्या मनाच्या इतक्या जवळ असलेली सेवा सोडताना आम्हाला खूप वाईट वाटलं.”
२ विलियम आणि टेरी म्हणतात: “आम्हाला जेव्हा समजलं की आजारपणामुळे आता आम्हाला परत जाऊन आमची नेमणूक पूर्ण करता येणार नाही, तेव्हा आम्ही खूप रडलो. दुसऱ्या देशात यहोवाची सेवा करण्याचं आमचं स्वप्न होतं, पण आता ते कधीच पूर्ण होणार नव्हतं.”
३ ॲलेक्सी म्हणतात: “आम्हाला जाणीव होती की सरकारला आमचं शाखा कार्यालय बंद करायचं आहे. पण तरीही जेव्हा असं घडलं तेव्हा आम्हाला खूप मोठा धक्का बसला, आम्हाला बेथेल सोडून जावं लागलं.”
४. या लेखात आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?
४ बेथेल कुटुंबातल्या हजारो भाऊबहिणींनाही असेच अनुभव आले आहेत, कारण त्यांनाही नवीन नेमणूक मिळाली आहे. * या विश्वासू भाऊबहिणींना आपली आवडती नेमणूक सोडणं खूप कठीण जाऊ शकतं. या बदलाशी जुळवून घ्यायला कोणती गोष्ट त्यांना मदत करू शकते? तुम्ही त्यांना मदत कशी करू शकता? या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यामुळे आपल्या सर्वांनाच जीवनातल्या बदलत्या परिस्थितींशी जुळवून घ्यायला मदत मिळेल.
बदलाशी कसं जुळवून घ्याल?
५. नेमणूक बदलल्यामुळे एखाद्याला कोणकोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागू शकतं?
५ आपण क्षेत्रात सेवा करत असो किंवा बेथेलमध्ये, आपल्या सर्वांच्याच मनात तिथल्या लोकांबद्दल आणि त्या जागेबद्दल प्रेम उत्पन्न होतं. पण मग काही कारणामुळे आपल्याला जेव्हा तिथून जावं लागतं तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं. तिथल्या भाऊबहिणींची आपल्याला आठवण येते आणि जर छळामुळे आपल्याला ते ठिकाण सोडावं लागलं, तर तिथल्या बांधवांची आपल्याला काळजीही वाटते. (मत्त. १०:२३; २ करिंथ. ११:२८, २९) तसंच, एखादी नवीन नेमणूक स्वीकारल्यामुळे किंवा बऱ्याच वर्षांनंतर घरी परतल्यामुळे आपल्याला नवीन संस्कृतीशी जुळवून घेणं कठीण जाऊ शकतं. बरीच वर्षं मिशनरी म्हणून सेवा करणारे रॉबर्ट आणि मेरी-जो म्हणतात: “आमचीच संस्कृती आता आम्हाला नवीन वाटू लागली होती आणि आमच्या मातृभाषेत प्रचार करणंही आम्हाला कठीण गेलं. आमच्याच देशात आम्हाला विदेशांसारखं वाटत होतं.” नेमणूक बदलल्यामुळे काही जणांवर अचानक आर्थिक भार येऊ शकतो. यामुळे ते निराश होऊ शकतात किंवा त्यांना असुरक्षित वाटू शकतं. असं असेल तर त्यांना कोणती गोष्ट मदत करू शकते?
६. आपण यहोवाच्या जवळ कसं राहू शकतो?
६ यहोवाच्या जवळ राहा. (याको. ४:८) आपण हे कसं करू शकतो? यहोवा आपल्या “प्रार्थना ऐकतो” यावर पूर्ण भरवसा ठेवण्याद्वारे. (स्तो. ६५:२) स्तोत्र ६२:८ म्हणतं की “त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा.” यहोवा “आपण मागितलेल्या किंवा कल्पना केलेल्या गोष्टींपेक्षाही कित्येक पटींनी जास्त प्रमाणात आपल्यासाठी करू शकतो.” (इफिस. ३:२०) आपण प्रार्थनेत त्याला जे मागतो फक्त तितकंच तो आपल्याला देत नाही. तर आपण विचारही केला नसेल अशा प्रकारे तो आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला मदत करू शकतो.
७. (क) यहोवाच्या जवळ राहण्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला मदत होईल? (ख) इब्री लोकांना ६:१०-१२ या वचनांनुसार यहोवाची विश्वासूपणे सेवा करत राहिल्यामुळे काय होईल?
७ यहोवाच्या जवळ राहण्यासाठी दररोज बायबलचं वाचन करा आणि त्यावर मनन करा. आधी मिशनरी सेवेत असलेले एक बांधव म्हणतात: “तुम्ही आधी जसं करत होता तसंच नियमितपणे कौटुंबिक उपासना आणि सभेची तयारी करत राहा.” तसंच, तुमच्या नवीन मंडळीत प्रचार कार्यात पुरेपूर सहभाग घ्या. आधी इतकी सेवा करणं शक्य नसलं, तरी जे लोक विश्वासूपणे यहोवाची सेवा करत राहतात त्यांना इब्री लोकांना ६:१०-१२ वाचा.
तो नेहमी आठवणीत ठेवतो.—८. १ योहान २:१५-१७ या वचनांतील शब्द आपल्याला आपलं जीवन साधं ठेवायला कशी मदत करतील?
८ तुमचं राहणीमान साधं ठेवा. सैतानाच्या जगातल्या चिंतांना तुमच्या आध्यात्मिक प्रगतीच्या आड येऊ देऊ नका. (मत्त. १३:२२) यहोवाची सेवा न करणारे लोक, तुमचे नातेवाईक किंवा मित्र तुम्हाला सैतानाच्या जगात भरपूर पैसा कमवण्याचा सल्ला देतील. पण अशा दबावांना बळी पडू नका. (१ योहान २:१५-१७ वाचा.) याऐवजी यहोवावर पूर्ण भरवसा ठेवा. तो तुमच्या आध्यात्मिक, भावनिक आणि भौतिक गरजा “योग्य वेळी” पूर्ण करेल.—इब्री ४:१६; १३:५, ६.
९. नीतिसूत्रे २२:३, ७ या वचनांनुसार विनाकारण कर्ज घेण्याचं टाळणं गरजेचं का आहे आणि सुज्ञ निर्णय घेण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?
९ विनाकारण कर्ज घेण्याचं टाळा. (नीतिसूत्रे २२:३, ७ वाचा.) नेमणूक सोडल्यावर एखाद्या नवीन ठिकाणी जाणं खूप खर्चीक असू शकतं आणि अशा वेळी एक व्यक्ती कर्जात बुडू शकते. हे टाळण्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टींची खरंच गरज नाही, त्या गोष्टी पैसे उसने घेऊन किंवा क्रेडिट कार्डवर घेण्याचं टाळा. आपण तणावात असताना, कदाचित जवळची व्यक्ती आजारी असेल, अशा वेळी किती कर्ज काढायचं हे ठरवणं कठीण जाऊ शकतं. अशा परिस्थितींमध्ये नेहमी लक्षात ठेवा की “प्रार्थना व याचना” आपल्याला सुज्ञ निर्णय घेण्यासाठी मदत करू शकतात. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर म्हणून यहोवा तुम्हाला शांती देईल जी तुमच्या “मनाचे व बुद्धीचे रक्षण करेल.” यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल.—फिलिप्पै. ४:६, ७; १ पेत्र ५:७.
१०. आपण नवीन मित्र कसे बनवू शकतो?
१० नवीन मित्र बनवा. तुमच्या मित्रांना आपल्या भावना सांगा खासकरून अशांना ज्यांनी तुमच्यासारख्या परिस्थितीचा सामना केला असेल. असं केल्याने तुम्हाला बरं वाटेल. (उप. ४:९, १०) तुम्ही आधीच्या नेमणुकीत बनवलेले मित्र नेहमीच तुमचे मित्र राहतील, पण आता नवीन नेमणूक जिथे मिळाली तिथे मात्र तुम्हाला नवीन मित्र बनवावे लागतील. लक्षात असू द्या, मित्र बनवण्यासाठी आपण स्वतः आधी एक चांगला मित्र असणं गरजेचं आहे. तुम्हाला नवीन लोकांशी मैत्री कशी करता येईल? हे करण्याचा एक मार्ग म्हणजे, यहोवाच्या सेवेतले तुमचे अनुभव इतरांना सांगणं. यामुळे यहोवाच्या सेवेत तुम्हाला मिळालेला आनंद ते पाहू शकतील. हे खरं आहे, की मंडळीत सर्वांनाच समजणार नाही की तुम्ही पूर्ण वेळेच्या सेवेबद्दल इतक्या आवेशाने का बोलता. पण त्यांपैकी असे काही असतील ज्यांना त्याबद्दल आणखी जाणून घ्यायची इच्छा असेल आणि ते तुमचे चांगले मित्र बनतील. पण असं करताना एका गोष्टीची सावधगिरी बाळगा. ती म्हणजे, स्वतःकडे लक्ष वेधण्याचं टाळा. तसंच, नकारात्मक भावनांबद्दल बोलू नका.
११. तुम्ही तुमच्या विवाहात आनंद कसा टिकवून ठेवू शकता?
११ तुमच्या विवाहसोबत्याच्या आजारपणामुळे तुम्हाला जर पूर्ण वेळेची सेवा सोडावी लागली, तर त्याला दोष देऊ नका. आणि जर तुमच्या आजारपणामुळे तुम्हाला सेवा सोडावी लागली, तर स्वतःला दोषी ठरवू नका. तुमच्यामुळे तुमच्या सोबत्याला सेवा सोडावी लागत आहे असा नकारात्मक विचार करू नका. नेहमी आठवणीत ठेवा की तुम्ही मत्त. १९:५, ६) पूर्ण वेळेची सेवा सोडावी लागण्याचं आणखी एक कारण म्हणजे मूल होणं. तुमच्या बाबतीत जर असं झालं तर त्या मुलाला दोष देऊ नका. याउलट त्याला याची जाणीव करून द्या की तुमच्या नेमणुकीपेक्षा तो तुमच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. तुम्ही त्याला देवाकडून मिळालेली एक मौल्यवान भेट समजता याची तुमच्या मुलाला जाणीव करून द्या. (स्तो. १२७:३-५) तसंच, तुम्हाला पूर्ण वेळेच्या सेवेत मिळालेले चांगले अनुभव त्याला सांगा. असं केल्यामुळे तुमच्यासारखंच त्यालादेखील यहोवाची पूर्ण वेळेची सेवा करण्याचं प्रोत्साहन मिळेल.
“एकदेह” आहात आणि लग्न करताना तुम्ही यहोवासमोर एकमेकांना सर्व प्रसंगात साथ देण्याचं वचन दिलं होतं. (इतर जण कशी मदत करू शकतात?
१२. (क) पूर्ण वेळेची सेवा करत राहण्यासाठी आपण भाऊबहिणींना कशी मदत करू शकतो? (ख) नवीन परिस्थितीशी जुळवून घ्यायला आपण त्यांना कशी मदत करू शकतो?
१२ पूर्ण वेळेच्या सेवकांना आपली सेवा करत राहण्यासाठी बऱ्याच मंडळ्या आणि भाऊबहिणी आपआपल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करतात. ही खरंच प्रशंसेची गोष्ट आहे. पूर्ण वेळेच्या सेवकांना ते आर्थिक किंवा इतर गोष्टी देऊन मदत करतात किंवा दुसऱ्या ठिकाणी राहणाऱ्या त्यांच्या आईवडिलांची काळजी घेण्याद्वारे ते त्यांना मदत करतात. (गलती. ६:२) जर पूर्ण वेळेची सेवा करणाऱ्यांना तुमच्या मंडळीत नेमण्यात आलं, तर त्यांच्याबद्दल चुकीचा विचार करू नका. त्यांनी काहीतरी चूक केली असेल किंवा सेवेत ते कमी पडले म्हणून त्यांना इथे नेमण्यात आलं असा विचार करू नका. * याऐवजी नवीन परिस्थितीशी जुळवून घ्यायला त्यांना मदत करा. त्यांचं मनापासून स्वागत करा आणि त्यांनी आतापर्यंत केलेल्या सेवेबद्दल त्यांची प्रशंसा करा. कदाचित आजारपणामुळे त्यांना पूर्वीइतकी सेवा करणं शक्य नसेल, तरीदेखील त्यांना मदत करत राहा. त्यांच्याशी मैत्री करा. पूर्ण वेळेची सेवा केल्यामुळे त्यांना मिळालेलं प्रशिक्षण, ज्ञान आणि अनुभव त्यातून फायदा मिळवण्याचा प्रयत्न करा.
१३. नवीन नेमणूक मिळालेल्या भाऊबहिणींना आपण कशा प्रकारे मदत करू शकतो?
* अथवा ते बोलून दाखवत नसले, तरी आधीच्या नेमणुकीतल्या मित्रांची त्यांना आठवण येत असल्यामुळे ते कदाचित निराश असतील. त्यांच्या जीवनात झालेल्या या बदलांशी जुळवून घ्यायला त्यांना वेळ लागू शकतो आणि अशा वेळी त्यांच्या मनात वेगवेगळ्या भावना येत असल्यामुळे ते गोंधळून जाऊ शकतात.
१३ नवीन नेमणूक मिळालेल्या भाऊबहिणींना सुरुवातीला तुमच्या मदतीची गरज पडू शकते. घर किंवा नोकरी शोधण्यासाठी आणि इतर गरजेच्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही त्यांना मदत करू शकता. तुम्ही त्यांना चांगलं हॉस्पिटल, बाजार किंवा दररोजच्या गोष्टी कुठे मिळतात या बाबतीत माहिती देऊ शकता. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तुम्ही त्यांना आणि त्यांच्या परिस्थितीला समजून घेणं गरजेचं आहे. कारण ते कदाचित स्वतःच्या किंवा जवळच्या व्यक्तीच्या आजारपणामुळे चिंतित असतील किंवा कुटुंबातल्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे दुःखी असतील.१४. स्थानिक भाऊबहिणींनी एका बहिणीला तिच्या नवीन नेमणुकीत आनंदी राहायला कशी मदत केली?
१४ तुम्ही अशा भाऊबहिणींसोबत प्रचार केला आणि त्यांना आधार दिला तर त्यांना नवीन परिस्थितीशी जुळवून घ्यायला मदत होईल. बरीच वर्षं दुसऱ्या देशात सेवा करणारी एक बहीण म्हणते: “माझ्या आधीच्या नेमणुकीत मी दररोज अनेक बायबल अभ्यास घ्यायचे. पण माझ्या नवीन नेमणुकीत, मला प्रचारात साधं बायबलमधून वाचणं किंवा व्हिडिओ दाखवणंही खूप कठीण गेलं. पण इथले भाऊबहीण मला त्यांच्यासोबत पुनर्भेटीसाठी आणि स्टडीसाठी घेऊन गेले. ते खूप आवेशाने आणि धाडसाने प्रगती करणारे बायबल अभ्यास चालवतात, हे पाहून मला सेवेबद्दल सकारात्मक विचार करायला मदत झाली. नवीन क्षेत्रात लोकांशी संभाषण कसं सुरू करायचं हे मी शिकले. मला मिळालेल्या मदतीमुळे मी पुन्हा आनंदाने सेवा करू लागले.”
आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत राहा!
१५. तुम्ही तुमच्या नवीन नेमणुकीत यशस्वी कसे होऊ शकता?
१५ तुम्ही तुमच्या नवीन नेमणुकीत यशस्वी होऊ शकता. तुमची नेमणूक बदलली म्हणजे तुमच्या आधीच्या नेमणुकीत तुमचं काम चांगलं नव्हतं किंवा आता कोणी तुमची कदर करत नाही, असा चुकीचा विचार करू नका. यहोवा आजही तुम्हाला कशी मदत करत आहे यावर आपलं लक्ष केंद्रित करा आणि प्रचार करत राहा. पहिल्या शतकातल्या विश्वासू ख्रिश्चनांच्या उदाहरणाचं अनुकरण करा. ते कोणत्याही प्रे. कार्ये ८:१, ४) प्रचार करत राहण्यासाठी तुम्ही जी काही मेहनत घेता त्याचे चांगले परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ, सरकारने काही पायनियरांना एका देशातून काढून टाकलं तेव्हा ते अशा देशात जाऊन सेवा करू लागले, जिथे त्यांच्या भाषेत प्रचारकांची खूप गरज होती. आणि तिथे गेल्यावर काही महिन्यांतच ते प्रचार करत असलेल्या भाषेचे अनेक नवीन गट तयार झाले.
ठिकाणी असले तरी ते “सबंध देशात वचनाविषयीचा आनंदाचा संदेश घोषित करत गेले.” (१६. नवीन नेमणुकीत आनंदी कसं राहावं?
१६ “परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग” आहे. (नहे. ८:१०) आपल्याला आपली नेमणूक खूप प्रिय असली, तरी आपला आनंद नेमणुकीवर अवलंबून नसून यहोवासोबत असलेल्या आपल्या नातेसंबंधावर आहे. तेव्हा, आपल्याला जर आनंदी राहायचं असेल तर यहोवासोबत आपलं नातं घनिष्ठ असलं पाहिजे. आणि आपण बुद्धी, मार्गदर्शन आणि मदतीसाठी त्याच्यावर अवलंबून राहिलं पाहिजे. लक्षात असू द्या, की आधीच्या नेमणुकीत तुम्ही लोकांना मदत करण्यासाठी पूर्णपणे मेहनत घ्यायचा आणि म्हणून तुम्हाला ती नेमणूक प्रिय होती. त्यामुळे तुम्हाला सध्या मिळालेली नेमणूकही मनापासून पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, मग यहोवा तुम्हाला ही नेमणूकसुद्धा तितकीच प्रिय समजायला मदत करेल.—उप. ७:१०.
१७. आपल्या सध्याच्या नेमणुकीबद्दल आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?
१७ आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण सर्वकाळासाठी यहोवाची सेवा करणार आहोत, पण आपली सध्याची नेमणूक तात्पुरती आहे. आपण आता त्याच्या सेवेत जे करत आहोत ते कदाचित आपण नवीन जगात करणार नाही. आधी उल्लेख केलेले ॲलेक्सी म्हणतात, की नेमणुकीतले बदल त्यांना भविष्यात होणाऱ्या बदलांसाठी तयार करत आहेत. “यहोवा आणि नवीन जग माझ्यासाठी खरं आहे, पण तरीही मी त्यांपासून फार दूर आहे असं मला आधी वाटायचं. पण आता यहोवा मला अगदी माझ्या डोळ्यांसमोर उभा असल्यासारखा आणि नवीन जगही उंबरठ्यावर असल्यासारखं वाटतं,” असंही ते म्हणतात. (प्रे. कार्ये २:२५) तेव्हा आपल्याला कोणतीही नेमणूक मिळाली तरी आपण यहोवासोबत चालत राहू या! तो आपल्याला कधीच सोडणार नाही, तर आपण करत असलेल्या सेवेत आनंदी राहण्यासाठी आपल्याला मदत करेल. मग आपण त्याच्या सेवेत कोणतंही काम करत असू किंवा त्याची सेवा कुठेही करत असू!—यश. ४१:१३.
गीत ५३ ऐक्य जपू या
^ परि. 5 कधीकधी पूर्ण वेळेच्या सेवेत असलेल्या भाऊबहिणींना आपली नेमणूक सोडावी लागते किंवा त्यांना नवीन नेमणूक मिळते. अशा वेळी या भाऊबहिणींना कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं याबद्दल या लेखात चर्चा करण्यात आली आहे. तसंच, कोणत्या गोष्टींमुळे त्यांना आपल्या नवीन परिस्थितीशी जुळवून घ्यायला मदत होईल हेदेखील यात सांगितलं आहे. या लेखात हेसुद्धा सांगितलं आहे की आपण अशा भाऊबहिणींना मदत आणि प्रोत्साहन कसं देऊ शकतो. तसंच, आपल्या सगळ्यांनाच बदलत्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला बायबलमधली तत्त्वं कशी मदत करू शकतात हेही यात सांगितलं आहे.
^ परि. 4 जबाबदारीच्या पदावर असलेल्या बऱ्याच बांधवांना अशाच प्रकारच्या बदलाला सामोरं जावं लागलं. एक विशिष्ट वय झाल्यानंतर त्यांना आपली जबाबदारी इतर बांधवांना द्यावी लागली आहे. सप्टेंबर २०१८ च्या टेहळणी बुरूज मधील “वयस्क बांधवांनो—यहोवा तुमच्या एकनिष्ठतेला मौल्यवान लेखतो” हा लेख पाहा. तसंच, ऑक्टोबर २०१८ च्या टेहळणी बुरूज मधील “बदलत्या परिस्थितींत मनाची शांती टिकवून ठेवा” हा लेखही पाहा.
^ परि. 12 हे भाऊबहीण आधी ज्या मंडळीत सेवा करत होते तिथल्या वडिलांनी, त्यांच्याबद्दल नवीन मंडळीला लगेच शिफारस पत्र पाठवलं पाहिजे. यामुळे त्यांना पायनियर, साहाय्यक सेवक किंवा वडील म्हणून सेवा करत राहणं शक्य होईल.
^ परि. 13 २०१८ सालच्या सावध राहा! क्र. ३ यातली “शोक करणाऱ्यांसाठी मदत” ही शृंखला पाहा.
^ परि. 57 चित्रांचं वर्णन: विदेशात सेवा करत असलेल्या एका मिशनरी जोडप्याला काही कारणामुळे नेमणूक सोडावी लागते, तेव्हा मंडळीतल्या भाऊबहिणांचा निरोप घेताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटून येतात.
^ परि. 59 चित्रांचं वर्णन: आपल्या मायदेशी परतल्यावर त्या जोडप्याला नवीन परिस्थितीशी जुळवून घ्यायला मदत व्हावी म्हणून ते यहोवाला कळकळून प्रार्थना करतात.
^ परि. 61 चित्रांचं वर्णन: यहोवाच्या मदतीने ते जोडपं पुन्हा एकदा पूर्ण वेळेची सेवा सुरू करतं. मिशनरी असताना त्यांनी नवीन भाषा शिकली होती त्यामुळे ते आपल्या नवीन मंडळीच्या क्षेत्रात, दुसऱ्या देशातून स्थलांतरित झालेल्या लोकांना प्रचार करतात.