टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) जून २०१७

या अंकात, ३१ जुलै ते २७ ऑगस्ट २०१७ पर्यंतचे अभ्यास लेख दिले आहेत.

तुम्हाला आठवतं का?

टेहळणी बुरूज नियतकालिकातील अलीकडील अंक तुम्ही काळजीपूर्वक वाचले आहेत का? तर मग, पुढील प्रश्नांची उत्तरं देण्यास जमतं का ते पाहा.

यहोवा आपल्या सर्व परीक्षांमध्ये आपलं सांत्वन करतो

आज ख्रिश्चनांना आपल्या वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनात कोणत्या काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो? आणि तुम्ही जर अशा समस्यांचा सामना करत असाल तर देवाकडून तुम्हाला सांत्वन कसं मिळू शकतं?

आध्यात्मिक धनावर आपलं लक्ष केंद्रित करा

आपण कोणत्या प्रकारचं धन जतन केलं पाहिजे? आणि आपण ते कसं करू शकतो?

बाहेरच्या रूपापेक्षा आतल्या रूपाला महत्त्व द्या

रस्त्यांमागील गल्यांमध्ये राहणाऱ्या, लोकांना चीड आणणाऱ्या आणि त्यांना आपल्यापासून दूर ठेवणाऱ्या मनुष्याला एका यहोवाच्या साक्षीदाराने धीराने साक्ष दिल्यामुळे काय परिणाम झाला?

मतभेद मिटवून तुम्ही शांती प्रस्थापित कराल का?

जीवनात सर्वांनाच शांती हवी असते. असं असलं, तरी लोकांच्या प्रतिष्ठेला किंवा आत्मसन्मानाला धक्का पोचतो तेव्हा ते अशा रीतीने वागतात ज्यामुळे शांतता भंग होते. अशा प्रकारे वागण्याचं तुम्ही कसं टाळू शकता?

‘धन्य तुझा समंजसपणा!’

हे शब्द, प्राचीन इस्राएलच्या काळातील दावीदने अबीगईलची स्तुती करण्यासाठी उद्‌गारले होते. कोणत्या कारणामुळे दावीदने अबीगईलची स्तुती केली, आणि तिच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावा

मानवजातीसमोर असलेला महत्त्वाचा विषय कोणता आहे? आणि आपण त्याबद्दल जाणून घेणं गरजेचं का आहे?

यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराचं समर्थन करा!

यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराचं समर्थन केल्याने आपल्याला काय फायदा होतो?

तुम्हाला माहीत होतं का?

यरुशलेमच्या मंदिरात प्राण्यांचा व्यापार करणाऱ्यांना येशूने ‘लुटारू’ का म्हटलं?