व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला आठवतं का?

तुम्हाला आठवतं का?

टेहळणी बुरूज नियतकालिकातले अलीकडचे अंक तुम्ही काळजीपूर्वक वाचले आहेत का? तर मग, पुढील प्रश्‍नांची उत्तरं द्यायला तुम्हाला जमतं का ते पाहा:

आपल्या मुलांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी स्थलांतरित पालकांनी भाषेच्या बाबतीत कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?

मुलं शाळेतून किंवा इतरांकडून स्थानिक भाषा शिकतात. मुलं जेव्हा एकापेक्षा जास्त भाषा बोलतात, तेव्हा त्यांना त्याचा फायदा होतो. पालकांनी हे ठरवलं पाहिजे, की सत्य चांगल्या प्रकारे समजायला आणि आध्यात्मिक प्रगती करायला मुलांसाठी कोणती भाषा उपयुक्‍त ठरेल; ते राहत असलेल्या क्षेत्रातल्या वेगळ्या भाषेच्या मंडळीत, की त्यांच्या मातृभाषेतल्या मंडळीत. मुलांच्या आध्यात्मिक गरजांसाठी ख्रिस्ती पालक स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला सारतात.—टेहळणी बुरूज१७.०५, पृ. ९-११.

“तू यांच्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतोस का?” असं जेव्हा येशूने पेत्रला विचारलं, तेव्हा “यांच्यापेक्षा” हा शब्द कशाला सूचित करत होता? (योहा. २१:१५)

असं दिसतं, की येशू तिथे असलेल्या माशांबद्दल किंवा मासेमारीच्या व्यवसायाबद्दल बोलत असावा. येशूच्या मृत्यूनंतर पेत्र त्याच्या पूर्वीच्या मासेमारीच्या व्यवसायाकडे परतला होता. नोकरीला कोणत्या स्थानी ठेवावं, याचं परीक्षण ख्रिश्‍चनांनी केलं पाहिजे.—टेहळणी बुरूज१७.०५, पृ. २२-२३.

हिब्रू भाषा शिकणाऱ्‍या विद्यार्थ्यांसाठी एलीयास हटर यांनी कोणत्या तंत्राचा शोध लावला?

बायबलमधला मूळ हिब्रू शब्द आणि उपसर्ग किंवा प्रत्यय जोडलेला मूळ शब्द यातला फरक विद्यार्थ्यांना ओळखता यावा अशी हटर यांची इच्छा होती. म्हणून त्यांनी मूळ शब्द ठळक रूपात आणि उपसर्ग व प्रत्यय यांच्या अक्षरांना साध्या रूपात छापलं. द न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स—विथ रेफरेनसेस या बायबलच्या तळटीपांमध्येही याच पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१७.०२, पृ. ११-१२.

इतर मानवांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी बंदूक बाळगण्याबाबतीत ख्रिश्‍चनांनी कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत?

ख्रिस्ती लोकांनी पुढील काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत: यहोवाच्या नजरेत मानवी जीवन पवित्र आहे. येशूने आपल्या शिष्यांना स्वतःच्या संरक्षणासाठी तलवारी बाळगायला सांगितल्या नव्हत्या. (लूक २२:३६, ३८) आपण आपल्या तलवारी मोडून त्यांचे फाळ केले पाहिजेत. भौतिक गोष्टींपेक्षा जीवन खूप मौल्यवान आहे. आपण इतरांच्या विवेकाचा आदर करतो आणि इतरांसमोर चांगलं उदाहरण ठेवण्याची आपली इच्छा आहे. (२ करिंथ. ४:२)—टेहळणी बुरूज१७.०७, पृ. ३१-३२.

येशूच्या सुरुवातीच्या जीवनाबद्दल मत्तयच्या अहवालात दिलेली माहिती ही लूकच्या अहवालापेक्षा वेगळी का आहे?

मत्तयचा अहवाल योसेफवर लक्ष केंद्रित करतो. जसं की, मरीया गर्भवती आहे हे कळल्यावर आणि मिसर देशात पळून जाण्याचा व परत येण्याचा देवदूताच्या संदेशाबद्दल योसेफची प्रतिक्रिया. पण लूकच्या अहवालात मरीयावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. उदाहरणार्थ, अलीशिबाला तिने दिलेली भेट आणि येशू लहान असताना मंदिरात राहिला त्या वेळी तिची प्रतिक्रिया.—टेहळणी बुरूज१७.०८, पृ. ३२.

बायबलला टिकून राहण्यासाठी कोणत्या काही गोष्टींचा सामना करावा लागला?

काळानुसार भाषा बदलत असल्यामुळे, बायबलमधल्या शब्दांच्या अर्थात आणि वाक्यांशात बदल झाला. तसंच, राजकीय क्षेत्रात झालेल्या बदलांमुळे लोकांच्या दररोजच्या भाषेत बदल झाला. याशिवाय, दररोजच्या भाषेत बायबलचं भाषांतर करतानाही विरोध झाला. बायबलला या काही समस्यांचा सामना करावा लागला.—टेहळणी बुरूज१७.०९, पृ. १९-२१.

सर्वश्रेष्ठ प्रेम काय आहे?

योग्य तत्त्वांवर आधारित असलेलं अगापे, हे सर्वश्रेष्ठ प्रेम आहे. यात जिव्हाळ्याची आणि कनवाळूपणाची भावना समाविष्ट आहे. पण यात इतरांच्या हितासाठी केलेल्या निःस्वार्थ कार्यांसारख्या श्रेष्ठ तत्त्वांचा देखील समावेश होतो.—टेहळणी बुरूज१७.१०, पृ. ७.