व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पालकांनो, आपल्या मुलांना “तारणासाठी सुज्ञ” व्हायला मदत करा

पालकांनो, आपल्या मुलांना “तारणासाठी सुज्ञ” व्हायला मदत करा

“बालपणापासून तुला पवित्र लिखाणांचे ज्ञान आहे, . . . या गोष्टी, . . . तुला तारणासाठी सुज्ञ बनवू शकतात.”—२ तीम. ३:१५.

गीत क्रमांक: १, ३१

१, २. मुलं समर्पण आणि बाप्तिस्मा घेण्याची इच्छा व्यक्‍त करतात तेव्हा काही पालकांना काळजी का वाटू शकते?

दरवर्षी, हजारो बायबल विद्यार्थी यहोवाला आपलं जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतात. यांपैकी अनेक लहान मुलं असतात. ख्रिस्ती कुटुंबात वाढलेल्या या मुलांनी, बाप्तिस्मा घेण्याद्वारे जीवनाचा सगळ्यात चांगला मार्ग निवडलेला असतो. (स्तो. १:१-३) तुम्ही जर एक ख्रिस्ती पालक असाल, तर तुम्हीसुद्धा आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या बाप्तिस्म्याची आतुरतेने वाट पाहत असाल.—३ योहान ४ पडताळून पाहा.

पण, त्यासोबतच तुम्हाला काळजीही वाटत असेल. कारण, तुम्ही कदाचित अशी मुलं पाहिली असतील, ज्यांनी कमी वयात बाप्तिस्मा तर घेतला, पण देवाच्या स्तरांनुसार जीवन जगणं खरंच योग्य आहे का, असा प्रश्‍न पुढे त्यांना पडला. आणि काही मुलांनी तर सत्य सोडून दिल्याचंही तुम्ही पाहिलं असेल. त्यामुळे, तुम्हाला कदाचित अशी चिंता वाटत असेल, की आपली मुलं यहोवाची सेवा करू लागल्यावर पुढे सत्यावरचं त्यांचं प्रेम नाहीसं झालं तर काय? प्राचीन काळी, इफिस मंडळीतल्या काही ख्रिश्‍चनांच्या बाबतीत जे घडलं तेच आपल्या मुलांच्या बाबतीत घडलं तर? त्या ख्रिश्‍चनांविषयी येशूने म्हटलं होतं: “तुझं सुरुवातीचं प्रेम आता आटलं आहे.” (प्रकटी. २:४) तर मग, मुलांच्या मनात सत्याबद्दल असलेलं प्रेम टिकवून ठेवण्यासाठी आणि ‘तारण मिळवण्यासाठी’ तुम्ही त्यांची मदत कशी करू शकता? (१ पेत्र २:२) त्यासाठी, तीमथ्यच्या उदाहरणावरून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल.

“तुला पवित्र लिखाणांचे ज्ञान आहे”

३. (क) तीमथ्य ख्रिस्ती कसा बनला आणि किशोरवयीन असूनही त्याने काय केलं? (ख) पौलने तीमथ्यबद्दल कोणत्या तीन गोष्टी सांगितल्या?

इ.स. ४७ मध्ये, प्रेषित पौलने पहिल्यांदा लुस्त्र शहराला भेट दिली होती. कदाचित त्याच काळात तीमथ्यला ख्रिस्ताच्या शिकवणींबद्दल शिकायला मिळालं असेल. त्या वेळी, तीमथ्य एक किशोरवयीन असावा. असं असलं, तरी शिकलेल्या गोष्टींचं त्याने चांगल्या प्रकारे पालन केलं. आणि पुढे दोन वर्षांनंतर, प्रवासी कार्यात तो पौलचा साथीदार बनला. सुमारे १६ वर्षांनंतर, पौलने तीमथ्यला लिहिलं: “तू मात्र, ज्या गोष्टी शिकलास व ज्यांविषयी तुला खात्री पटवून देण्यात आली त्यांचे पालन करत राहा; कारण, या गोष्टी तू कोणापासून शिकलास हे तुला माहीत आहे; आणि बालपणापासून तुला पवित्र लिखाणांचे [इब्री शास्त्रवचनांचे] ज्ञान आहे, याचीही तुला जाणीव आहे. या गोष्टी, ख्रिस्त येशूवरील विश्‍वासाद्वारे तुला तारणासाठी सुज्ञ बनवू शकतात.” (२ तीम. ३:१४, १५) इथे पौल तीमथ्यबद्दल काय म्हणाला त्याकडे लक्ष द्या. तो म्हणाला: (१) तीमथ्यला पवित्र लिखाणांचं ज्ञान होतं, (२) शिकलेल्या गोष्टींविषयी त्याला खात्री पटवून देण्यात आली होती आणि (३) ख्रिस्त येशूवर असलेल्या विश्‍वासाद्वारे तो तारणासाठी सुज्ञ बनला होता.

४. मुलांना शिकवण्यासाठी तुम्ही कोणत्या साधनांचा उपयोग केला आहे? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

ख्रिस्ती पालक असल्यामुळे, आपल्या मुलांना पवित्र लिखाणांचं ज्ञान असावं, असं नक्कीच तुम्हाला वाटत असेल. आज या पवित्र लिखाणांत, इब्री शास्त्रवचनांचा आणि ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचा समावेश होतो. लहान मुलंसुद्धा बायबलमधल्या व्यक्‍तींविषयी आणि घटनांविषयी शिकू शकतात. त्यासाठी, यहोवाच्या संघटनेने कितीतरी पुस्तकं, माहितीपत्रकं आणि व्हिडिओ तयार केले आहेत. आपल्या मुलांना शिकवण्यासाठी पालक या साधनांचा उपयोग करू शकतात. यांपैकी तुमच्या भाषेत उपलब्ध असलेली साधनं तुम्हाला माहीत आहेत का? यहोवासोबत घनिष्ठ नातं जोडण्यासाठी तुमच्या मुलांना बायबलचं ज्ञान असणं आवश्‍यक आहे.

“खात्री पटवून देण्यात आली”

५. तीमथ्यला कोणत्या गोष्टीची खात्री पटली, आणि हे कशावरून म्हणता येईल?

पण, मुलांना केवळ बायबलमधल्या व्यक्‍तींविषयी आणि घटनांविषयी शिकवणं पुरेसं नाही. तीमथ्यचा विचार करा. त्याला “खात्री पटवून देण्यात आली” होती. तीमथ्यला इब्री शास्त्रवचनांची “बालपणापासून” माहिती होती. पण, येशू हाच मसीहा आहे याची खात्री त्याला नंतर पटली. यामुळे त्याचा विश्‍वास इतका दृढ झाला, की त्याने बाप्तिस्मा घेतला आणि पौलसोबत एक मिशनरी म्हणून सेवा केली.

६. तुम्ही आपल्या मुलांना बायबलवरचा विश्‍वास वाढवण्यास कशी मदत करू शकता?

तीमथ्यसारखा दृढ विश्‍वास उत्पन्‍न करण्यासाठी तुम्ही आपल्या मुलांना ‘खात्री कशी पटवून’ देऊ शकता? पहिली गोष्ट म्हणजे, धीर आणि सहनशीलता दाखवा. कारण, दृढ विश्‍वास उत्पन्‍न करण्यासाठी वेळ लागतो. शिवाय, एखादी गोष्ट तुम्ही मानता म्हणून तुमची मुलंही ती मानतीलच असं नाही. बायबलवरचा विश्‍वास वाढवण्यासाठी प्रत्येक मुलाने स्वतःच्या ‘तर्कबुद्धीचा’ वापर करणं खूप गरजेचं आहे. (रोमकर १२:१ वाचा; तळटीप.) पालक या नात्याने आपल्या मुलांचा विश्‍वास वाढवण्यासाठी तुम्ही खूप काही करू शकता; खासकरून, मुलं प्रश्‍न विचारतात तेव्हा. या बाबतीत एका पित्याकडून काय शिकायला मिळतं ते पाहू या.

७, ८. (क) एक ख्रिस्ती पिता आपल्या मुलीला शिकवताना धीर कसा दाखवतो? (ख) तुमच्या मुलाच्या बाबतीत असा धीर दाखवण्याची गरज तुम्हाला केव्हा पडली?

थॉमस नावाच्या एका बांधवाला ११ वर्षांची मुलगी आहे. ते म्हणतात, काही वेळा ती मला विचारते: “आपल्याला, प्राण्यांना बनवण्यासाठी यहोवाने उत्क्रांतीचा उपयोग केला असेल का?” किंवा “चांगले बदल करण्यासाठी आपण सामाजिक कार्यात सहभागी का होत नाही? आपण वोट का देत नाही?” ती असे काही प्रश्‍न विचारते, तेव्हा त्या बांधवाला त्यांची थेट उत्तरं देण्याचा खूप मोह होतो. पण, अशा वेळी त्याला स्वतःला खूप आवरावं लागतं. कारण थॉमसला हे माहीत आहे, की एखाद्या गोष्टीबद्दल फक्‍त सत्य सांगितलं तर समोरच्याला ते पटेलच असं नाही, तर त्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टींचा पुरावा देऊन ते पटवूनही सांगावं लागतं.

थॉमसला याची कल्पना आहे, की आपल्या मुलीला शिकवताना धीर दाखवण्याचीही गरज आहे. खरंतर, सर्वच ख्रिश्‍चनांना धीर किंवा सहनशीलता दाखवण्याची गरज आहे. (कलस्सै. ३:१२) आपल्या मुलीचा विश्‍वास वाढवण्याकरता वेळ देण्याची आणि बऱ्‍याचदा तिच्याशी बोलण्याची गरज आहे याची जाणीव थॉमसला आहे. ती बायबलमधून जे काही शिकते त्यावर तर्क करण्याची गरज आहे हेसुद्धा थॉमसला माहीत आहे. ते म्हणतात: “खासकरून महत्त्वपूर्ण विषयांच्या बाबतीत आमची मुलगी जे काही शिकते ते ती खरंच मानते का आणि ते तिच्या तर्कबुद्धीला पटतं का, हे जाणून घेण्याचा मी आणि माझी पत्नी प्रयत्न करतो. ती जर प्रश्‍न विचारत असेल, तर ती चांगलीच गोष्ट आहे. खरं सांगायचं तर, तिने प्रश्‍न न विचारताच सगळं काही स्वीकारलं, तर मग आम्हाला चिंता वाटू लागेल.”

९. तुम्ही आपल्या मुलांना देवाच्या वचनावर विश्‍वास ठेवण्यास कशी मदत करू शकता?

पालकांनी जर धीराने मुलांना शिकवलं, तर काही काळाने मुलांना सत्याची “रुंदी, लांबी, उंची व खोली” समजायला लागेल. (इफिस. ३:१८) आपण मुलांचं वय आणि समजण्याची क्षमता विचारात घेऊन त्यांना शिकवू शकतो. शिकलेल्या गोष्टींवरचा त्यांचा विश्‍वास जसजसा वाढत जाईल, तसतसं आपल्या विश्‍वासांबद्दल प्रश्‍न विचारणाऱ्‍यांना, अगदी शाळासोबत्यांनाही उत्तर देणं त्यांना आणखी सोपं जाईल. (१ पेत्र ३:१५) उदाहरणार्थ, मृत्यूनंतर काय होतं हे तुमच्या मुलांना बायबलमधून सांगता येईल का? त्याविषयी बायबलमध्ये जे सांगण्यात आलं आहे ते त्यांना स्वतःला पटतं का? * तुमच्या मुलांना देवाच्या वचनावर विश्‍वास ठेवण्यास मदत करण्यासाठी तुम्हाला धीर दाखवण्याची गरज आहे. पण, लक्षात ठेवा असं करणं फायद्याचंच ठरेल.—अनु. ६:६, ७.

१०. मुलांना शिकवण्यासाठी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे?

१० अर्थात, मुलांचा विश्‍वास वाढवण्यासाठी त्यांच्यासमोर तुमचं चांगलं उदाहरण असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. स्टेफ्नी या बहिणीला तीन मुली आहेत. ती म्हणते: “माझ्या मुली अगदी लहान होत्या तेव्हापासून मी नेहमी स्वतःला विचारत आले आहे, की ‘यहोवा अस्तित्वात आहे, त्याचं आपल्यावर प्रेम आहे आणि त्याचे मार्ग योग्यच असतात याची मला खात्री का आहे, याबद्दल मी माझ्या मुलींशी बोलते का? मी यहोवावर मनापासून प्रेम करते, हे माझ्या मुलींना स्पष्टपणे दिसून येतं का?’ कारण, या गोष्टींविषयी जर माझीच खात्री पटलेली नसेल, तर मुलींकडून मी ती अपेक्षा कशी करू शकते?”

“तारणासाठी सुज्ञ”

११, १२. सुज्ञता म्हणजे काय? आणि सुज्ञता केवळ वयाने येत नसते असं का म्हणता येईल?

११ आतापर्यंत आपण शिकलो, की (१) तीमथ्यला पवित्र लिखाणांचं ज्ञान होतं आणि (२) आपल्या विश्‍वासांची त्याला खात्री पटली होती. पण, पवित्र लिखाणं त्याला “तारणासाठी सुज्ञ बनवू शकतात,” असं जे पौलने म्हटलं त्याचा काय अर्थ होतो?

१२ इन्साइट ऑन द स्क्रिप्चर्स, व्हॉल्यूम २, यात सांगितल्यानुसार सुज्ञता म्हणजे: “समस्या सोडवण्यासाठी, धोके टाळण्यासाठी, विशिष्ट ध्येयं गाठण्यासाठी किंवा या गोष्टींच्या बाबतीत इतरांना सल्ला देण्यासाठी ज्ञानाचा आणि समजशक्‍तीचा यशस्वीपणे उपयोग करण्याची क्षमता. तसंच, सुज्ञता ही मूर्खपणाच्या विरुद्ध आहे.” आणि बायबल म्हणतं, की “बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते.” (नीति. २२:१५) जर मूर्खपणा सुज्ञतेच्या विरुद्ध आहे, तर याचा अर्थ सुज्ञता हे प्रौढतेचं एक लक्षण आहे. एक व्यक्‍ती, केवळ वयाने मोठी झाली म्हणून आध्यात्मिक रीत्या प्रौढ होते असं नाही; तर, यहोवाबद्दल असलेल्या आदरयुक्‍त भीतीमुळे आणि त्याच्या आज्ञांचं पालन करण्याच्या इच्छेमुळे ती आध्यात्मिक रीत्या प्रौढ होते.—स्तोत्र १११:१० वाचा.

१३. मुलं कसं दाखवू शकतात, की ती तारणासाठी सुज्ञ बनली आहेत?

१३ आध्यात्मिक रीत्या पुरेशी प्रौढ असलेली मुलं आपल्या इच्छांमुळे किंवा इतर मुलांच्या प्रभावामुळे ‘लाटांनी हेलकावे खात’ नाहीत आणि ‘वाऱ्‍याने इकडेतिकडे वाहवत जात’ नाहीत. (इफिस. ४:१४) या उलट, “चांगले व वाईट यांतला फरक ओळखण्यासाठी” त्यांची ‘समजशक्‍ती’ प्रशिक्षित केली जात असते. (इब्री ५:१४) त्यामुळेच, आईवडील किंवा इतर मोठी माणसं सोबत नसतात तेव्हासुद्धा अशी मुलं सुज्ञ निर्णय घेतात. (फिलिप्पै. २:१२) अशा प्रकारची सुज्ञता तारणासाठी आवश्‍यक आहे. (नीतिसूत्रे २४:१४ वाचा.) तुम्ही तुमच्या मुलांना अशी सुज्ञता विकसित करायला कशी मदत करू शकता? त्यासाठी, बायबलवर आधारित असलेली तुमची नीतिमूल्यं काय आहेत, हे त्यांना माहीत असलं पाहिजे. तसंच, तुम्ही बायबलच्या स्तरांनुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहात, हे तुमच्या वागण्या-बोलण्यातून त्यांना दिसून आलं पाहिजे.—रोम. २:२१-२३.

पालकांनी प्रयत्न करत राहणं का गरजेचं आहे? (परिच्छेद १४-१८ पाहा)

१४, १५. (क) बाप्तिस्मा घेण्याची इच्छा असलेल्या मुलाने आधी कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे? (ख) देवाच्या नियमांचं पालन केल्यामुळे मिळणाऱ्‍या आशीर्वादांवर मनन करण्यासाठी तुम्ही मुलांना कशी मदत करू शकता?

१४ पण, मुलांचा विश्‍वास वाढवण्यासाठी योग्य काय आणि अयोग्य काय, हे केवळ सांगणं पुरेसं नाही. तर, त्यांना तर्क करायलाही मदत करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, “काही गोष्टी कदाचित आकर्षक वाटत असल्या, तरी बायबल आपल्याला त्यांपासून दूर राहायला का सांगतं? तसंच, बायबलचे स्तर नेहमीच आपल्या भल्यासाठी असतात याची मला खात्री कशी होऊ शकते?” अशा प्रश्‍नांवर तर्क करण्यासही मुलांना मदत करण्याची गरज आहे.—यश. ४८:१७, १८.

१५ तुमच्या मुलांनी जर बाप्तिस्मा घेण्याची इच्छा व्यक्‍त केली, तर बाप्तिस्म्यासोबत येणाऱ्‍या जबाबदाऱ्‍यांचा गांभीर्याने विचार करायला त्यांना मदत करा. त्या जबाबदाऱ्‍यांबद्दल त्यांना काय वाटतं? बाप्तिस्मा घेण्याचे फायदे काय आहेत? कोणत्या समस्या येण्याची शक्यता आहे? आणि समस्या आल्या तरी फायदे त्याहून जास्त कसे आहेत? (मार्क १०:२९, ३०) अशा सर्व गोष्टींचा बाप्तिस्मा घेण्याआधी काळजीपूर्वक विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. देवाच्या नियमांचं पालन केल्यामुळे कोणते आशीर्वाद मिळू शकतात? तसंच, त्याचे नियम मोडल्यामुळे कोणते वाईट परिणाम घडू शकतात? या प्रश्‍नांवर विचार करायला तुमच्या मुलाला मदत करा. असं केल्यामुळे, बायबलचे स्तर नेहमीच आपल्या भल्यासाठी असतात याची त्याला खात्री पटण्याची अधिक शक्यता आहे.—अनु. ३०:१९, २०.

मुलं बाप्तिस्म्यानंतर शंका व्यक्‍त करू लागतात तेव्हा

१६. बाप्तिस्मा घेतल्यानंतर मुलांचा विश्‍वास कमी होऊ लागला तर पालकांनी काय केलं पाहिजे?

१६ तुमचं मूल बाप्तिस्मा घेतल्यानंतर सत्याबद्दल शंका व्यक्‍त करू लागतं तेव्हा काय? कदाचित तुमचं मूल जगातल्या गोष्टींकडे आकर्षित झालं असेल किंवा त्याला प्रश्‍न पडत असेल, की बायबलच्या तत्त्वांनुसार जीवन जगणं खरंच योग्य आहे का? (स्तो. ७३:१-३, १२, १३) अशा वेळी, तुमचं मूल यहोवाची सेवा करत राहील की नाही हे बऱ्‍याचदा तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेवर अवलंबून असतं. त्यामुळे वाद घालू नका; मग, तुमचं मूल वयाने लहान असो किंवा किशोरवयीन. त्याऐवजी, त्याला याची जाणीव करून द्या, की तुम्ही मनापासून त्याच्यावर प्रेम करता आणि त्याला मदत करण्याची तुमची इच्छा आहे.

१७, १८. एखाद्या तरुणाच्या मनात सत्याबद्दल शंका निर्माण झाल्यावर पालक त्याला कशी मदत करू शकतात?

१७ बाप्तिस्मा घेतलेल्या मुलांनी यहोवाला आपलं जीवन समर्पित केलेलं असतं. असं करण्याद्वारे त्यांनी यहोवाला वचन दिलेलं असतं, की दुसऱ्‍या कोणत्याही गोष्टीपेक्षा ते यहोवावर जास्त प्रेम करतील आणि त्याचीच सेवा करतील. (मार्क १२:३० वाचा.) यहोवाच्या दृष्टीने हे एक गंभीर वचन आहे आणि त्याकडे पाहण्याचा आपलाही दृष्टिकोन तसाच असला पाहिजे. (उप. ५:४, ५) त्यामुळे, योग्य वेळ पाहून मुलांना त्यांनी यहोवाला दिलेल्या त्या वचनाची प्रेमळपणे आठवण करून द्या. पण त्याआधी, यहोवाच्या संघटनेने पालकांसाठी तयार केलेलं साहित्य वाचा आणि त्यांचा अभ्यास करा. मग, मुलांशी बोलताना या गोष्टीवर भर द्या, की समर्पण आणि बाप्तिस्म्याचा जो निर्णय त्यांनी घेतला होता तो गंभीर जरी असला, तरी त्यामुळे मिळणारे आशीर्वाद अनेक आहेत.

१८ या बाबतीत टेहळणी बुरूज, जुलै १, २०१२ मध्ये “तुमची किशोरवयीन मुले तुमच्या धार्मिक विश्‍वासावर प्रश्‍न करतात तेव्हा . . .” या लेखात पालकांना मोलाचा सल्ला दिला आहे. यात असं सांगितलं आहे, की बाप्तिस्म्यानंतर मुलांच्या मनात सत्याबद्दल शंका निर्माण होतात, तेव्हा मुलांनी सत्य नाकारलं आहे असा लगेच विचार करू नये. तर, नेमकी समस्या काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. कदाचित मित्रांचा दबाव किंवा एकटेपणा ही त्या मागची कारणं असू शकतील. किंवा मग, इतर तरुण यहोवाच्या सेवेत माझ्यापेक्षा जास्त करत आहेत असं त्यांना वाटत असेल. यात हेही समजवण्यात आलं आहे, की मुलांच्या मनात शंका निर्माण होतात याचा अर्थ ते तुमच्या विश्‍वासांशी असहमत आहेत, असं नाही. त्यामागे मुलं अनुभवत असलेली दुसरीच एखादी समस्या असू शकते. अशा वेळी, ख्रिस्ती पालक मुलांना कशा प्रकारे मदत करू शकतात हे या लेखात सांगण्यात आलं आहे.

१९. पालक आपल्या मुलांना “तारणासाठी सुज्ञ” बनायला कशी मदत करू शकतात?

१९ ख्रिस्ती पालक या नात्याने, आपल्या मुलांना “यहोवाच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवण्याची” एक महत्त्वाची जबाबदारी आणि बहुमान तुम्हाला मिळाला आहे. (इफिस. ६:४) आणि त्यासाठी आतापर्यंत पाहिल्याप्रमाणे, आपल्या मुलांना बायबलचं ज्ञान द्या; इतकंच नाही, तर शिकलेल्या गोष्टींची खात्री पटण्यासाठी त्यांना मदत करा. त्यांना इतकी पक्की खात्री पटली पाहिजे, की यहोवाला आपलं जीवन समर्पित करण्याची आणि पूर्ण मनाने त्याची सेवा करण्याची प्रेरणा त्यांना मिळेल. यहोवाचं वचन, त्याचा पवित्र आत्मा आणि तुमचे प्रयत्न या सर्व गोष्टींमुळे तुमची मुलं “तारणासाठी सुज्ञ” बनोत.

^ परि. 9बायबल नेमके काय शिकवते?” या पुस्तकावर आधारित असलेली मार्गदर्शिका हिंदी भाषेत उपलब्ध आहे. ही मार्गदर्शिका, तरुणांना व प्रौढांना बायबलच्या शिकवणी समजण्यास आणि त्या इतरांना शिकवण्यास मदत करणारं उत्तम साधन आहे. हे साधन jw.org वर अनेक भाषांत उपलब्ध आहे. त्यासाठी शास्त्र से जानिए > पवित्र शास्त्र को गहराई से जानिए यात ‘अभ्यास’ हा भाग पाहा.