व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला आठवतं का?

तुम्हाला आठवतं का?

२०१९ च्या टेहळणी बुरूज  यातल्या काही प्रश्‍नांची उत्तरं तुम्ही देऊ शकता का?

“तुझ्यावर चालवण्याकरता घडलेले कोणतेही हत्यार तुजवर चालणार नाही.” (यश. ५४:१७) देवाने दिलेल्या या अभिवचनाचा काय अर्थ होतो?

यहोवा ‘निर्दय लोकांच्या झपाट्यापासून’ आपलं संरक्षण करू शकतो याची आपल्याला पक्की खातरी आहे. (यश. २५:४, ५) आपले शत्रू आपल्याला कायमस्वरूपी नुकसान पोहोचवण्यात कधीच यशस्वी होणार नाहीत.—टेहळणी बुरूज१९.०१,  पृ. ६-७.

यहोवा जसं कनानी आणि भरकटलेल्या इस्राएली लोकांशी वागला त्यावरून त्याच्या न्यायाबद्दल काय कळतं?

स्त्रियांवर आणि मुलांवर अन्याय करणाऱ्‍यांना आणि घृणास्पद लैंगिक कृत्ये करणाऱ्‍यांना देवाने शिक्षा दिली. यहोवाची आज्ञा पाळणाऱ्‍या लोकांना आणि जे इतरांशी न्यायाने वागले त्यांना त्याने आशीर्वादित केलं.—टेहळणी बुरूज१९.०२,  पृ. २२-२३.

साक्षीदार नसलेली व्यक्‍ती प्रार्थना करत असताना आपण काय केलं पाहिजे?

अशा वेळी आपण शांत राहू आणि कुठल्याही प्रकारे अनादर दाखवणार नाही. आपण “आमेन” म्हणून प्रार्थनेत सहभाग घेणार नाही किंवा प्रार्थना चालू असताना एकमेकांचे हात धरणार नाही. आपण मनातल्या मनात स्वतःची प्रार्थना करू शकतो.—टेहळणी बुरूज१९.०३,  पृ. ३१.

मुलांचं लैंगिक शोषण हे किती गंभीर पाप आहे?

मुलांचं लैंगिक शोषण हे पीडित मुलांविरुद्ध, मंडळीविरुद्ध, सरकारी अधिकाऱ्‍यांविरुद्ध आणि देवाविरुद्ध पाप आहे. ज्या देशांमध्ये मुलांच्या शोषणाबद्दलच्या आरोपांविषयी सरकारी अधिकाऱ्‍यांना कळवायचा नियम आहे, तिथे वडील त्यांचं पालन करून त्याबद्दल अधिकाऱ्‍यांना कळवतात.—टेहळणी बुरूज१९.०५,  पृ. ९-१०.

आपण विचारांना दिशा देणाऱ्‍या मनोवृत्तीत कशा प्रकारे बदल करू शकतो?

महत्त्वाची पावलं: यहोवाला प्रार्थना करा. मनन करताना स्वतःचं परीक्षण करा. सुज्ञ मित्र निवडा.—टेहळणी बुरूज१९.०६,  पृ. ११.

छळाचा सामना करण्यासाठी आपण आताच काय करू शकतो?

यहोवासोबतचा आपला नातेसंबंध आणखी घनिष्ठ करा. यहोवाचं तुमच्यावर प्रेम आहे आणि तो तुम्हाला कधीच सोडणार नाही अशी पक्की खातरी बाळगा. बायबलचं दररोज वाचन करा आणि नियमितपणे प्रार्थना करा. देवाच्या राज्यामुळे मिळणाऱ्‍या आशीर्वादांबद्दल पक्की खातरी बाळगा. आपली आवडती वचनं आणि स्तुती गीतं तोंडपाठ करा.—टेहळणी बुरूज१९.०७,  पृ. २-४.

आपल्या नातेवाइकांचा जीव वाचावा म्हणून आपण त्यांना कशी मदत करू शकतो?

आपण त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत, त्यांच्यासमोर चांगलं उदाहरण मांडलं पाहिजे. त्यामुळे त्यांना एक चांगली साक्ष मिळू शकते. आणि आपण त्यांच्याशी धीराने व विचारपूर्वक वागलं पाहिजे.—टेहळणी बुरूज१९.०८,  पृ. १५-१७.

मत्तय ११:२८ मध्ये येशूने वचन दिल्यानुसार आपण तजेला कसा मिळवू शकतो?

आपल्याकडे सर्वोत्तम देखरेख करणारे, सर्वात चांगले मित्र आणि सर्वात चांगलं काम आहे.—टेहळणी बुरूज१९.०९,  पृ. २३.

यहोवा आपल्याला इच्छा आणि कार्य करण्याची ताकद कशी देऊ शकतो? (फिलिप्पै. २:१३)

आपण देवाचं वचन वाचलं आणि त्यावर मनन केलं तर देव आपल्याला कार्य करण्याची प्रेरणा देऊ शकतो आणि कार्य करण्याची ताकदही देऊ शकतो. आपल्याकडे जी कौशल्यं आहेत त्यात आणखी निपुण बनण्यासाठी यहोवा आपल्याला त्याचा पवित्र आत्मा देऊ शकतो.—टेहळणी बुरूज१९.१०,  पृ. २१.

निर्णय घेण्याआधी आपल्याला कोणती सुज्ञ पावलं उचलणं गरजेचं आहे?

पाच पावलं: सखोल संशोधन करा, बुद्धीसाठी प्रार्थना करा, आपल्या हेतूंचं परीक्षण करा, विशिष्ट ध्येय ठेवा, अवाजवी अपेक्षा ठेवू नका.—टेहळणी बुरूज१९.११,  पृ. २७-२९.

अमर आत्म्याच्या शिकवणीची सुरुवात सैतान हव्वाशी जे बोलला तेव्हा झाली का?

नक्कीच नाही. हव्वाचं शरीर मरेल, पण तिच्यातला अदृश्‍य भाग कुठेतरी जिवंत राहील असं सैतानाने हव्वाला सांगितलं नाही. जलप्रलयानंतर खोट्या शिकवणी शिकवणारं कोणीही उरलं नव्हतं. बाबेलचा बुरुज बांधणाऱ्‍या लोकांकडून कदाचित अमर आत्म्याची शिकवण अस्तित्वात आली. देवाने नंतर त्या लोकांच्या भाषेत गोंधळ निर्माण केला आणि ते लोक पृथ्वीवर पसरले.—टेहळणी बुरूज१९.१२,  पृ. १५.