व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

सैतानाने हव्वाला म्हटलं की तिने बऱ्‍यावाइटाचं ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचं फळ खाल्लं तर ती मरणार नाही. असं सांगण्याद्वारे तो तिला आज सर्वसामान्य असलेल्या अमर आत्म्याच्या शिकवणीबद्दल सांगत होता का?

नक्कीच नाही. हव्वाने मनाई केलेल्या झाडाचं फळ खाल्लं तर तिचं शरीर मरेल, पण तिच्यातला अदृश्‍य भाग मात्र (ज्याला लोक आज अमर आत्मा म्हणतात) कुठेतरी जिवंत राहील असं सैतानाने हव्वाला सांगितलं नाही. सैतानाने सापाच्या माध्यमाने असा दावा केला की हव्वाने त्या झाडाचं फळ खाल्लं तर ती “खरोखर मरणार नाही.” त्याने असं भासवलं की तिला कधीही मरण येणार नाही, ती पृथ्वीवर एका चांगल्या जीवनाचा आनंद घेऊ शकेल आणि तिला देवावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.—उत्प. २:१७; ३:३-५.

आज शिकवल्या जाणाऱ्‍या अमर आत्म्याच्या शिकवणीचा उगम जर एदेन बागेत झाला नाही तर मग कधी झाला? हे आपण खातरीने सांगू शकत नाही. नोहाच्या दिवसांत आलेल्या जलप्रलयानंतर सर्व प्रकारच्या खोट्या उपासनेचा अंत झाला हे आपल्याला माहीत आहे. जलप्रलयानंतर फक्‍त नोहा आणि त्याचं कुटुंबच वाचलं आणि ते देवाचे खरे उपासक होते. त्यामुळे जलप्रलयानंतर खोट्या शिकवणी शिकवणारं कोणीही उरलं नव्हतं.

तर मग आज शिकवल्या जाणाऱ्‍या अमर आत्म्याच्या शिकवणीचा उगम नक्कीच जलप्रलयाच्या काही काळानंतर झाला असेल. देवाने बाबेलमध्ये लोकांच्या भाषेत गोंधळ निर्माण केल्यामुळे सर्व लोक “पृथ्वीच्या पाठीवर” पसरले आणि यात काहीच शंका नाही की ते जिथे कुठे गेले तिथे अमर आत्म्याची शिकवण पसरत गेली. (उत्प. ११:८, ९) अमर आत्म्याच्या शिकवणीचा उगम कधीही झाला असो, आपल्याला हे माहीत आहे की “खोटेपणाचा बाप” म्हणजेच दियाबल सैतान याच्यामुळे या खोट्या शिकवणीचा उगम झाला. आणि ती शिकवण जास्तीत जास्त पसरल्यामुळे त्याला नक्कीच आनंद झाला असेल!—योहा. ८:४४.