टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) नोव्हेंबर २०१६

या अंकात २६ डिसेंबर २०१६ ते २९ जानेवारी २०१७ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

अतिशय अर्थभरीत असा एक शब्द

येशूने स्त्रियांशी बोलताना असा कोणता शब्द वापरला ज्यात कोमलता आणि दयाळूपणाच्या भावना आहेत?

नेहमी एकमेकांना प्रोत्साहन देत राहा

इतरांना प्रोत्साहन देणं का गरजेचं आहे? यहोवा देव, येशू आणि पौलाकडून प्रोत्साहन देण्याच्या बाबतीत आपण काय शिकू शकतो? आणि तुम्ही इतरांना प्रोत्साहन कसं देऊ शकता?

देवाच्या वचनांनुसार सुसंघटित

यहोवा देव हा व्यवस्थेचा परमेश्वर आहे. मग त्याच्या सेवकांकडून आपण संघटित असण्याची अपेक्षा करू शकत नाही का?

तुम्ही यहोवाच्या वचनाला मौल्यवान लेखता का?

देवाचे लोक जेव्हा त्याच्या वचनातून मिळणाऱ्या सल्ल्याचं पालन करतात आणि एकनिष्ठतेने त्याच्या संघटनेला आपला पाठिंबा देतात, तेव्हा त्याचे चांगले परिणाम त्यांना पाहायला मिळतात.

हे काम मोठं आहे

तुम्हालाही या कार्यात हातभार लावण्याची संधी आहे.

अंधकारातून बोलावण्यात आलेले

दुसऱ्या शतकापासून देवाचे लोक कोणत्या अर्थाने अंधकारात गेले? केव्हा आणि कशा प्रकारे त्यांना प्रकाश दिसू लागला?

खोट्या धर्मापासून त्यांनी स्वतःला मुक्त करून घेतलं

देवाच्या लोकांनी केव्हा स्वतःला मोठ्या बाबेलच्या बंदिवासातून पूर्णपणे मुक्त करून घेतलं?

“ब्रिटनमधील राज्य प्रचारकांनो—जागे व्हा!”

ब्रिटनमधील राज्य प्रचारकांमध्ये “मागील दहा वर्षांत कोणतीही लक्षणीय वाढ नाही!” मग यासाठी १९३८ मध्ये कोणती पावलं उचलली गेली ज्यामुळे हे चित्र संपूर्णपणे पालटलं गेलं?