व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

हे काम मोठं आहे

हे काम मोठं आहे

यरुशलेममध्ये एका खूप महत्त्वाच्या सभेची वेळ झाली आहे. दाविदाने इस्राएलमधील आपल्या सर्व राजपुत्रांना, सरदारांना आणि शूरवीरांना एकत्र बोलवलं आहे. दावीद आज एक खास घोषणा करणार आहे. ती घोषणा ऐकून सगळ्यांना फार आनंद होतो. यहोवाने दाविदाच्या मुलावर, शलमोनावर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. ती जबाबदारी म्हणजे यहोवाची उपासना करण्यासाठी त्याला समर्पित असलेलं एक विशाल भवन बांधण्याची. हे भवन कसं बनवावं याचा नमुना दाविदाने देवाच्या प्रेरणेनं तयार केला आहे आणि हा नमुना तो शलमोनाला देतो. मग दावीद म्हणतो: “काम तर मोठे आहे; कारण हे भवन मानवासाठी नव्हे तर परमेश्वर देवासाठी आहे.”—१ इति. २८:१, २, ६, ११, १२; २९:१.

मग दावीद लोकांना एक प्रश्न विचारतो: “परमेश्वरास आज स्वेच्छेने वाहून घेण्यास कोण तयार आहे?” (१ इति. २९:५) समजा तुम्ही त्या ठिकाणी असता तर दाविदाने केलेल्या आर्जवाला तुम्ही कसा प्रतिसाद दिला असता? या भव्य कामात हातभार लावण्यासाठी तुम्ही पुढे आला असता का? इस्राएली लोकांनी अगदी हेच केलं. या कामात त्यांनी स्वतःला आनंदाने झोकून दिलं. बायबल सांगतं, “त्यांनी प्रसन्न होऊन खऱ्या मनाने व स्वेच्छेने परमेश्वराप्रीत्यर्थ . . . अर्पणे केली.”—१ इति. २९:९.

अनेक शतकांनंतर यहोवा देवाने या मंदिरापेक्षाही मोठ्या अशा एका गोष्टीची स्थापना केली. त्याने एका मोठ्या आध्यात्मिक मंदिराची स्थापना केली. ही एक अशी तरतूद आहे, ज्यामुळे मानव येशूच्या बलिदानाच्या आधारावर यहोवाची खरी उपासना करून त्याच्यासोबत जवळचा नातेसंबंध जोडू शकतात. (इब्री ९:११, १२) मग आज यहोवा देव कोणत्या मार्गाने लोकांना त्याच्यासोबत समेट करण्यास मदत करत आहे? जगभरात शिष्य बनवण्याचं जे कार्य आज चालू आहे त्याद्वारे तो हे करत आहे. (मत्त. २८:१९, २०) त्याचा परिणाम म्हणजे, दरवर्षी लाखो लोक बायबल अभ्यास घेत आहेत, हजारो लोकांचा बाप्तिस्मा होत आहे आणि शेकडो नवीन मंडळ्या स्थापन होत आहेत.

पण, झपाट्याने होणाऱ्या या वाढीमुळे आपल्याला जास्तीतजास्त बायबल प्रकाशनांची, राज्य सभागृह बांधून त्यांची देखरेख करण्याची, आणि संमेलनं व अधिवेशनांसाठी मोठमोठ्या सभागृहांचा वापर करण्याची गरज पडते. या गोष्टींवरून हेच दिसून येतं, की सुवार्ता घोषित करण्याचं काम हे खूप भव्य आणि प्रतिफलदायी आहे. तुम्हालाही असंच वाटत नाही का?—मत्त. २४:१४.

यहोवा देवावर आणि शेजाऱ्यांवर असलेल्या प्रेमामुळे, तसंच राज्य प्रचाराचं काम किती निकडीचं आहे याची जाणीव असल्यामुळे, देवाचे सेवक स्वतःला “स्वेच्छेने वाहून घेण्यास” प्रेरित होतात; ते हे स्वखुशीनं अनुदान देण्याद्वारे करतात. “आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान” करणं, हा खरंच किती मोठा विशेषाधिकार आहे! आणि जेव्हा आपण पाहतो की राज्याच्या कामासाठी या अनुदानाचा प्रामाणिकपणे व योग्य प्रकारे वापर केला जात आहे, तेव्हाही आपल्याला खूप आनंद होतो. राज्याचं हे कार्य मानवी इतिहासातील आजवर होत असलेलं असं एक भव्य कार्य आहे, जे पुन्हा कधीही केलं जाणार नाही!—नीति. ३:९.

^ परि. 9 भारतात हे “जेहोवाज विट्‌नेसेस ऑफ इंडिया”ला देय असावे.

^ परि. 11 भारतीय पासपोर्ट धारक www.jwindiagift.org या वेबसाईटचा उपयोग करू शकतात.

^ परि. 13 अंतिम निर्णय घेण्याआधी स्थानिक शाखा कार्यालयाशी याबद्दल खात्री करून घ्या.

^ परि. 20 भारतात, “तुमच्या मौल्यवान वसतूंनी यहोवाचा सन्मान करा” नावाची पत्रिका इंग्रजी, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम व हिंदी या भाषांत उपलब्ध आहे.