अभ्यास लेख ४७
तुमचा विश्वास मजबूत असेल का?
“तुमची मनं अस्वस्थ होऊ देऊ नका. देवावर विश्वास ठेवा.”—योहा. १४:१.
गीत ५४ खरा विश्वास बाळगू या!
सारांश *
१. कोणत्या गोष्टींची आपल्याला चिंता वाटू शकते?
लवकरच मोठमोठ्या घटना घडणार आहेत. जसं की, खोट्या धर्माचा नाश, मागोगच्या गोगचा हल्ला आणि हर्मगिद्दोनचं युद्ध. या घटनांचा विचार करून तुम्हाला भीती वाटते का? ‘या भयंकर घटना घडतील तेव्हा मी विश्वासात टिकून राहीन का,’ असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? असेल, तर येशूच्या शब्दांनी तुम्हाला खूप मदत होईल. त्याने आपल्या शिष्यांना म्हटलं होतं: “तुमची मनं अस्वस्थ होऊ देऊ नका. देवावर विश्वास ठेवा.” (योहा. १४:१) मजबूत विश्वासच आपल्याला या सगळ्या गोष्टींचा धैर्याने सामना करायला मदत करेल.
२. आपण आपला विश्वास कशा प्रकारे मजबूत करू शकतो, आणि या लेखात आपण काय पाहणार आहोत?
२ आज आपण ज्या प्रकारे परीक्षांचा सामना कसा करत आहोत त्यावरून दिसून येईल, की भविष्यात येणाऱ्या परीक्षांचा आपण कसा सामना करू. आपल्याला जर जाणवलं, की आपला विश्वास कमजोर आहे, तर तो मजूबत करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्यावर येणाऱ्या प्रत्येक परीक्षेतून गेल्यानंतर आपला विश्वास आणखी मजबूत होतो. आणि त्यामुळे पुढे येणाऱ्या परीक्षांचा धीराने सामना करायला आपण तयार होतो. या लेखात आपण अशा चार परिस्थितींचा विचार करू ज्यांचा येशूच्या शिष्यांना सामना करावा लागला. त्या परिस्थितींवरून शिष्यांना कळलं, की त्यांना त्यांचा विश्वास आणखी मजबूत करायची गरज आहे. त्यानंतर आपण या लेखात हे पाहू, की अशाच प्रकारच्या समस्यांचा आज आपल्याला कशा प्रकारे सामना करावा लागू शकतो. आणि त्यामुळे भविष्यात येणाऱ्या परीक्षांचा सामना करण्यासाठी आपण कशा प्रकारे तयार राहू शकतो.
देव आपल्या गरजा भागवेल असा विश्वास बाळगा
३. मत्तय ६:३०, ३३ मध्ये सांगितल्याप्रमाणे विश्वासाबद्दल कोणती गोष्ट येशूने आपल्या शिष्यांना समजावून सांगितली?
३ प्रत्येक कुटुंबप्रमुखाला वाटतं, की आपल्याला आपल्या कुटुंबाच्या गरजा चांगल्या प्रकारे भागवता याव्यात. पण सध्याच्या काळात हे खूप कठीण होत चाललं मत्तय ६:३०, ३३ वाचा.) काहीही झालं तरी यहोवा आपल्याला सोडणार नाही असा भक्कम विश्वास असेल, तर यहोवाची सेवा करण्यावर आपल्याला आपलं लक्ष केंद्रित करता येईल. यहोवा आपल्या गरजा कशा पूर्ण करत आहे हे जेव्हा आपण प्रत्यक्ष पाहू, तेव्हा आपण त्याच्या आणखी जवळ येऊ आणि आपला विश्वास आणखी भक्कम होईल.
आहे. कारण आपल्यापैकी अनेकांनी आपली नोकरी गमावली आहे आणि भरपूर प्रयत्न करूनही त्यांना दुसरी नोकरी मिळत नाही. काहींना नोकरी मिळते, पण ख्रिस्ती तत्त्वात बसत नसल्यामुळे त्यांना ती करता येत नाही. अशा वेळी यहोवा कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या कुटुंबाच्या गरजा पुरवेल असा भक्कम विश्वास ठेवण्याची आपल्याला गरज आहे. ही गोष्ट येशूने आपल्या शिष्यांना डोंगरावच्या प्रवचनात खूप चांगल्या रितीने समजावून सांगितली. (४-५. एका कुटुंबाला आर्थिक समस्यांचा सामना करत असताना कशामुळे मदत झाली?
४ यहोवा आपल्या रोजच्या गरजा कशा पुरवतो हे व्हेनेझुएला देशातल्या एका कुटुंबाने कसं अनुभवलं त्याचा विचार करा. आधी या कुटुंबाकडे एक शेत होतं. त्यावर त्यांच्या सगळ्या गरजा भागायच्या. मग गुंडांच्या एका टोळीने त्यांचं हे शेत ताब्यात घेतलं आणि त्यांना तिथून हाकलून लावलं. या कुटुंबातले वडील म्हणतात: “सध्या आम्ही दुसऱ्याच्या मालकीच्या एका छोट्याशा जमिनीवर शेती करून आमचं पोट भरतो. मी रोज सकाळी यहोवाला प्रार्थना करतो आणि आमच्या त्या दिवसाच्या गरजा पुरवाव्यात अशी विनंती करतो.” या कुटुंबासाठी त्यांच्या रोजच्या गरजा भागवणं खूप कठीण आहे. पण आपला प्रेमळ पिता आपल्या रोजच्या गरजा भागवेल असा पूर्ण विश्वास त्यांना आहे. त्यामुळे या गोष्टीची चिंता न करता ते नियमितपणे सभांना हजर राहतात आणि आवेशाने प्रचारकार्य करतात. या कुटुंबाने आपल्या जीवनात देवाच्या सेवेला पहिलं स्थान दिलं आहे आणि यहोवाही त्यांच्या गरजा पुरवत आहे.
५ या संपूर्ण काळात यहोवाने आपल्याला कसं सांभाळलं या गोष्टीवर मिगेल आणि त्यांचे पती युराय यांनी नेहमी लक्ष दिलं. काही वेळा यहोवाने भाऊ-बहिणींच्याद्वारे त्यांच्या गरजा पुरवल्या. तर कधी त्यांच्याद्वारे मिगेल यांना छोटंमोठं काम मिळवून दिलं. इतकंच नाही, तर कधीकधी यहोवाने शाखा कार्यालयाच्या मदतकार्यातून त्यांच्या गरजा भागवल्या. यहोवाने त्यांना कधीच सोडलं नाही. त्यामुळे या संपूर्ण कुटुंबाचा यहोवावरचा विश्वास वाढला. यहोवाने आपल्याला कशी मदत केली याचा एक अनुभव सांगितल्यावर, त्यांची सगळ्यात मोठी मुलगी होसलीन म्हणते: “यहोवाने आम्हाला कशी मदत केली हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवलंय. माझ्यासाठी तो एका अशा मित्रासारखा आहे, ज्याच्यावर मी कायम भरवसा ठेवू शकते. आजपर्यंत आम्ही ज्या समस्यांचा सामना केलाय, त्यामुळेच भविष्यात येणाऱ्या समस्यांना तोंड द्यायला आम्ही तयार झालो आहोत.”
६. आर्थिक समस्यांना तोंड देत असतानाही तुम्ही तुमचा विश्वास कसा मजबूत करू शकता?
६ सध्या तुम्हीसुद्धा आर्थिक समस्यांमधून जात आहात का? असाल, तर हा नक्कीच तुमच्यासाठी एक कठीण काळ आहे. तुमची परिस्थिती कशीही असली तरी तुम्ही या वेळेचा उपयोग तुमचा विश्वास मजबूत करण्यासाठी करू शकता. यहोवाला प्रार्थना करा आणि मत्तय ६:२५-३४ मध्ये दिलेल्या येशूच्या शब्दांवर मनन करा. तसंच, आजच्या काळातल्या भाऊबहिणींचाही विचार करा. परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांनी यहोवाच्या सेवेत स्वतःला कसं व्यस्त ठेवलं आणि यहोवाने त्यांच्या गरजा कशा पुरवल्या यावर विचार करा. (१ करिंथ. १५:५८) यामुळे तुमच्या स्वर्गीय पित्यावरचा तुमचा भरवसा आणखी वाढेल. यहोवाने जशी त्यांना मदत केली तशीच तो तुम्हालाही करेल. त्याला तुमच्या गरजा चांगल्या प्रकारे माहीत आहेत आणि त्या कशा पूर्ण करायच्या हेही माहीत आहे. यहोवा तुम्हाला कशी मदत करत आहे हे जसजसं तुम्ही अनुभवत जाल, तसतसा तुमचा विश्वास वाढत जाईल. आणि पुढे येणाऱ्या मोठ्या परीक्षांना तोंड द्यायला तुम्ही तयार असाल.—हब. ३:१७, १८.
“मोठ्या वादळाचा” सामना करण्यासाठी विश्वासाची गरज
७. वादळामुळे शिष्यांच्या विश्वासाची परीक्षा कशी झाली? (मत्तय ८:२३-२६)
७ येशू आणि त्याचे शिष्य समुद्रातून प्रवास करत होते तेव्हा ते एका मोठ्या वादळात सापडले. त्या वेळी, शिष्यांना आपला विश्वास आणखी मजबूत करायची का गरज आहे हे येशूने त्यांना समजायला मदत केली. (मत्तय ८:२३-२६ वाचा.) ते वादळ इतकं भयंकर होतं, की मोठमोठ्या लाटा नावेवर आदळू लागल्या. तेव्हा येशू गाढ झोपला होता. त्याचे शिष्य खूप घाबरले होते. त्यांनी येशूला उठवलं आणि आपल्याला वाचवण्याची विनंती केली. तेव्हा येशूने प्रेमळपणे ते कुठं कमी पडत आहेत, हे त्यांच्या लक्षात आणून दिलं. तो त्यांना म्हणाला: “इतकं का घाबरता? किती कमी विश्वास आहे तुमच्यात!” येशूचे शिष्य घाबरले होते. पण त्यांना हे लक्षात ठेवायची गरज होती, की यहोवा येशूला आणि त्यांना अगदी सहजपणे वाचवू शकतो. मग यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? हेच, की आपला विश्वास मजबूत असेल, तर कितीही मोठं वादळ आलं, तरी आपण त्याचा सामना करू शकतो; मग ते खरोखरचं वादळ असो किंवा वादळासारख्या मोठ्या समस्या.
८-९. ॲनेलच्या विश्वासाची परीक्षा कशी झाली, आणि कोणत्या गोष्टीमुळे तिला मदत झाली?
८ पोर्टो-रिकोमध्ये राहाणाऱ्या ॲनेल नावाच्या एका तरुण बहिणीचा विचार करा. तिने ज्या परीक्षेचा सामना केला, त्यामुळे तिचा विश्वास मजबूत झाला. तिला एका खरोखरच्या वादळाचा सामना करावा लागला. २०१७ मध्ये मरीया नावाच्या एका चक्रीवादळामुळे ॲनेलचं घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. तसंच, या वादळाचा आणखी एक परिणाम म्हणजे तिची नोकरीही गेली. ती म्हणते: “मी या कठीण काळात चिंतेत अगदी बुडून गेले होते. पण मी यहोवावर भरवसा ठेवायला शिकले. मी नेहमी यहोवाला प्रार्थना करायचे. आणि हार न मानता, ज्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत त्या करत राहायचे.”
९ आणखी एका गोष्टीमुळे तिला परीक्षांचा सामना करायला मदत झाली. ती म्हणजे, सूचनांचं पालन करणं. ती म्हणते: “संघटनेकडून मिळालेल्या सूचनांचं पालन केल्यामुळे माझं मन शांत ठेवायला मला मदत झाली. भाऊबहिणींनी मला धीर दिला आणि ज्या गोष्टींची मला गरज होती, त्या गोष्टी मला पुरवल्या. या सगळ्यातून यहोवाची मदत मला अनुभवायला मिळाली. मी मागितलं होतं त्यापेक्षा कितीतरी जास्त यहोवाने मला दिलं. त्यामुळे माझा विश्वास आणखी भक्कम झाला.”
१०. तुम्हाला एखाद्या मोठ्या वादळाचा सामना करावा लागला तर तुम्ही काय कराल?
१० तुम्हीसुद्धा एखाद्या “मोठ्या वादळाचा” सामना करत आहात का? तुम्ही कदाचित नैसर्गिक आपत्तींमुळे आलेल्या समस्यांचा सामना करत असाल. किंवा एखाद्या गंभीर आजारामुळे तुमच्या आयुष्यात जणू एक मोठं वादळच आलं असेल. अशा प्रकारच्या समस्यांमुळे तुम्ही पार खचून गेला असाल, आणि काय करावं हे तुम्हाला सुचत नसेल. तुम्ही चिंतेत पार बुडून गेला असला. पण अशा चिंतांमुळे यहोवावर भरवसा ठेवायचं विसरू नका. उलट, अशा वेळी यहोवाला कळकळीची प्रार्थना करा आणि त्याच्यासमोर आपलं मन मोकळं करा. पूर्वी यहोवाने तुमची कशी मदत केली, त्या गोष्टी आठवा आणि त्यांवर विचार करा. म्हणजे तुमचा स्तो. ७७:११, १२) तुम्ही खातरी बाळगू शकता, की यहोवा तुम्हाला कधीच सोडणार नाही; आताही नाही आणि पुढेही नाही.
विश्वास आणखी मजबूत होईल. (११. संघटनेकडून मिळणाऱ्या सूचनांचं आपण पालन का केलं पाहिजे?
११ आणखी कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला परीक्षांचा सामना करता येईल? ॲनेलने म्हटल्याप्रमाणे, सूचनांचं पालन केल्यामुळे. म्हणून यहोवा आणि येशूचा ज्यांच्यावर भरवसा आहे, त्यांच्यावर भरवसा ठेवायला शिका. कधीकधी संघटनेत पुढाकार घेणारे बांधव आपल्याला अशा काही सूचना देतील ज्या आपल्या तर्काला पटणार नाहीत. पण तरीसुद्धा आपण त्यांच्या सूचनांचं पालन केलं पाहिजे. कारण आपण जेव्हा आज्ञाधारकता दाखवतो तेव्हा यहोवा आपल्याला आशीर्वाद देतो. आज्ञा पाळल्यामुळे आपलं संरक्षण कसं होतं याची कितीतरी उदाहरणं बायबलमध्ये आणि आधुनिक काळात पाहायला मिळतात. (निर्ग. १४:१-४; २ इति. २०:१७) त्या उदाहरणांवर मनन करा. त्यामुळे आत्ता आणि भविष्यात संघटनेकडून मिळणाऱ्या सूचनांचं पालन करण्याचा तुमचा निर्धार आणखी पक्का होईल. (इब्री. १३:१७) तसंच, लवकरच येणाऱ्या सगळ्यात ‘मोठ्या वादळाचा’ सामना करायलाही तुम्ही तयार असाल.—नीति. ३:२५.
अन्यायाचा सामना करण्यासाठी विश्वासाची गरज
१२. अन्याय सहन करत असताना विश्वासाची का गरज आहे? (लूक १८:१-८)
१२ येशूला माहीत होतं, की अन्यायामुळेसुद्धा आपल्या शिष्यांच्या विश्वासाची परीक्षा होऊ शकते. म्हणून त्याने शिष्यांना एक उदाहरण दिलं. ते उदाहरण आपल्याला लूकच्या पुस्तकात वाचायला मिळतं. येशूने त्यांना एका विधवेची गोष्ट सांगितली. ती विधवा एका अनीतिमान न्यायाधीशाकडे सतत न्याय मागायला जात होती. कारण तिला असं वाटत होतं, की आपण जर सतत विनंती करत राहिलो, तर एक ना एक दिवस तो नक्की आपल्याला दाद देईल. आणि शेवटी तसंच झालं. एक दिवस त्याने तिचं म्हणणं ऐकून घेतलं. यातून आपण काय शिकतो? हेच, की जर अनीतिमान न्यायाधीश सतत केलेल्या विनंतीला दाद देऊ शकतो, तर यहोवा नक्कीच आपल्या विनंतीकडे लक्ष देईल. कारण तो तर एक न्यायी देव आहे. आणि म्हणूनच येशूनेही म्हटलं: “तर मग, देवसुद्धा रात्रंदिवस त्याच्याकडे मदतीची याचना करणाऱ्या त्याच्या निवडलेल्या लोकांना न्याय मिळवून देणार नाही का?” (लूक १८:१-८ वाचा.) येशू पुढे म्हणाला: “मनुष्याचा मुलगा येईल, तेव्हा त्याला खरंच पृथ्वीवर अशा प्रकारचा विश्वास दिसून येईल का?” आपल्यालाही जर अन्यायाचा सामना करावा लागत असेल, तर आपणही त्या विधवेसारखा धीर धरला पाहिजे आणि सतत यहोवाला विनंती करत राहिली पाहिजे. त्यावरून दिसून येईल, की आपला विश्वास मजबूत आहे. आणि विश्वास जर मजबूत असेल, तर एक ना एक दिवस यहोवा नक्कीच आपल्या प्रार्थनेचं उत्तर देईल. प्रार्थनेत जबरदस्त ताकद असते हे आपण कधीही विसरू नये. कारण कधीकधी आपण अपेक्षाही केली नसेल, अशा प्रकारे यहोवा आपल्या प्रार्थनेचं उत्तर देतो.
१३. प्रार्थनेमुळे एका कुटुंबाचं कसं संरक्षण झालं?
१३ काँगो प्रजासत्ताक देशात राहणाऱ्या व्हेरो नावाच्या एका बहिणीचं उदाहरण घ्या. तिच्या गावात एकदा विद्रोही गटाच्या लोकांनी हल्ला केला. त्यामुळे या बहिणीला आपल्या १५ वर्षांच्या मुलीसोबत आणि सत्यात नसलेल्या आपल्या पतीसोबत पळून जावं लागलं. ते जात असताना विद्रोही गटातल्या काही लोकांनी त्यांना अडवलं आणि मारून टाकायची धमकी दिली. हे ऐकून व्हेरो रडू लागली. तेव्हा तिच्या मुलीने मोठ्याने प्रार्थना करायला सुरुवात केली. आणि प्रार्थनेत ती वारंवार यहोवाचं नाव घेऊ लागली. तिची प्रार्थना झाल्यावर त्या गटाच्या मत्तय ६:९-१३) त्यावर तो म्हणाला: “जा मुली, आपल्या आईवडिलांना घेऊन जा. तुझा देव यहोवा तुमचं संरक्षण करो.”
प्रमुखाने तिला विचारलं: “मुली, तुला प्रार्थना करायला कोणी शिकवलं?” त्यावर ती म्हणाली: ‘माझ्या आईने. तिने मला बायबलमधून शिकवलं.’ (१४. तुमच्या विश्वासाची परीक्षा केव्हा होऊ शकते, आणि अशा वेळी धीर धरण्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला मदत होऊ शकते?
१४ अशा सुंदर अनुभवांमधून, प्रार्थनेत किती ताकद आहे ते आपल्याला दिसून येतं. पण जेव्हा तुमच्या प्रार्थनेचं लगेच किंवा आश्चर्यकारक पद्धतीने उत्तर मिळत नाही, तेव्हा मात्र तुमच्या विश्वासाची परीक्षा होऊ शकते. असं जर तुमच्या बाबतीत घडलं, तर कोणती गोष्ट तुम्हाला धीर धरायला मदत करू शकते? येशूने दिलेल्या उदाहरणातल्या विधवेसारखं सतत विनंती करत राहा. आणि भरवसा ठेवा, की यहोवा तुम्हाला कधीच सोडणार नाही. योग्य वेळी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तो नक्कीच तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. म्हणून त्याच्या पवित्र शक्तीसाठी सतत विनंती करत राहा. (फिलिप्पै. ४:१३) नेहमी लक्षात ठेवा, की लवकरच यहोवा तुम्हाला इतके आशीर्वाद देईल, की पूर्वी तुम्ही जे सोसलं होतं ते तुम्हाला कधीच आठवणार नाही. यहोवाच्या मदतीने तुम्ही परीक्षांचा धीराने सामना करत राहिलात, तर पुढे येणाऱ्या मोठमोठ्या परीक्षांसाठीही तुम्ही नक्कीच तयार असाल.—१ पेत्र १:६, ७.
समस्यांचा सामना करण्यासाठी विश्वासाची गरज
१५. मत्तय १७:१९, २० मध्ये सांगितल्याप्रमाणे येशूच्या शिष्यांसमोर कोणती समस्या होती?
१५ येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं, की त्यांच्यामध्ये जर विश्वास असेल, तर मोठमोठ्या समस्यांवरसुद्धा ते अगदी सहजपणे मात करू शकतील. (मत्तय १७:१९, २० वाचा.) येशूच्या शिष्यांनी बऱ्याचदा लोकांमधून दुष्ट स्वर्गदूत काढले होते. पण एका प्रसंगी मात्र त्यांना ते जमत नव्हतं. का बरं? कारण त्यांना आणखी विश्वासाची गरज होती असं येशूने त्यांना सांगितलं. त्याने त्यांना म्हटलं, की त्यांच्यात जर भक्कम विश्वास असेल, तर ते डोंगरासारख्या मोठ्या समस्यांचासुद्धा सहजपणे सामना करू शकतील. आज आपल्यालासुद्धा डोंगरासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
१६. विश्वासामुळे एका बहिणीला आपल्या मोठ्या दुःखातून सावरायला कशी मदत झाली?
१६ ग्वातेमाला देशात राहणाऱ्या गेडी नावाच्या बहिणीचा विचार करा. एकदा सभेवरून घरी येत असताना तिच्या पतीचा खून झाला. मग या बहिणीला आपल्या मोठ्या दुःखातून सावरायला विश्वासामुळे कशी मदत झाली? याबद्दल बोलताना ती म्हणते: “प्रार्थनेमुळे मला खूप मदत होते. प्रार्थनेत मी यहोवासमोर माझं मन मोकळं करते तेव्हा मला खूप शांत वाटतं. माझ्या घरचे लोक आणि मंडळीतले भाऊबहीण मला जी मदत करतात त्यातून मला यहोवाची काळजी दिसून येते. मी स्वतःला यहोवाच्या सेवेत व्यस्त ठेवते, तेव्हा मला या दुःखातून सावरायला मदत होते. आणि दुसऱ्या दिवसाची मी जास्त चिंता करत बसत नाही. या सगळ्या अनुभवातून मी एक गोष्ट शिकले; ती म्हणजे, पुढे कोणतीही समस्या आली तरी यहोवाच्या, येशूच्या आणि आपल्या संघटनेच्या मदतीने मी नक्की त्यावर मात करू शकेन.”
१७. आपल्यासमोर डोंगरासारख्या समस्या येतात तेव्हा आपण काय केलं पाहिजे?
१७ जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे तुम्ही दुःखातून सावरायचा प्रयत्न करत आहात का? तर मग, बायबलमध्ये दिलेल्या अशा लोकांचे अहवाल वाचा ज्यांना पुन्हा नीति. १८:१) तुमची समस्या आठवून तुम्हाला कदाचित खूप राडायला येत असेल. पण तरी यहोवाची सेवा करत राहा. (स्तो. १२६:५, ६) नियमितपणे सभांना जा, प्रचार कार्य करा आणि रोज बायबल वाचा. तसंच, पुढे यहोवा आपल्याला जे आशीर्वाद देणार आहे त्यांवर विचार करत राहा. यहोवा कशा प्रकारे तुम्हाला मदत करत आहे हे जेव्हा तुम्ही पाहाल, तेव्हा तुमचा विश्वास आणखी वाढेल.
जिवंत करण्यात आलं होतं. त्यामुळे, तुमच्या प्रिय व्यक्तीलाही पुन्हा जिवंत केलं जाईल यावरचा तुमचा विश्वास आणखी वाढेल. कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला बहिष्कृत केल्यामुळे तुम्ही खूप दुःखी आहात का? मग बायबलचा अभ्यास करून स्वतःला याची खातरी पटवून द्या, की यहोवा जेव्हा शिस्त लावतो तेव्हा ते आपल्या भल्यासाठीच असतं. तुमच्यासमोर कोणतीही समस्या असोत, तिचा वापर आपला विश्वास वाढवण्यासाठी करा. यहोवासमोर आपलं मन मोकळं करा. आणि एकटं-एकटं राहू नका, तर आपल्या भाऊबहिणींसोबत वेळ घावला. (“आमचा विश्वास वाढव”
१८. तुमच्यामध्ये विश्वासाची कमतरता आहे असं जर तुम्हाला जाणवलं तर तुम्ही काय करू शकता?
१८ तुमच्यावर पूर्वी किंवा आता आलेल्या परीक्षांवरून तुम्हाला जर जाणवलं, की तुमच्यामध्ये विश्वासाची कमतरता आहे तर निराश होऊ नका. उलट, आपला विश्वास वाढवायची ही एक संधी आहे असं समजा. तुम्हीसुद्धा येशूच्या प्रेषितांसारखीच देवाला अशी विनंती करू शकता, की “आमचा विश्वास वाढव.” (लूक १७:५) तसंच, या लेखात आपण भाऊबहिणींची जी उदाहरणं पाहिली त्यांवर विचार करा. मिगेल आणि युरायसारखं, यहोवाने तुम्हाला पूर्वी कशी मदत केली ते आठवा. जीवनात मोठ्या समस्या येतात तेव्हा व्हेरोच्या मुलीसारखं आणि ॲनेलसारखं यहोवाला कळकळीची प्रार्थना करा. तसंच, यहोवाने जशी गेडीला मदत केली तशी तो आपल्यालाही मदत करेल. तो आपल्या घरच्या लोकांचा आणि मंडळीतल्या भाऊबहिणींचा वापर करून आपल्याला मदत करेल हे लक्षात ठेवा. समस्यांचा सामना करण्यासाठी जर आत्ता तुम्ही यहोवाची मदत घेतली, तर भविष्यात येणाऱ्या संकटांचा सामना करायलाही तो तुम्हाला नक्कीच मदत करेल.
१९. येशूला कोणत्या गोष्टीची खातरी होती, आणि आपणही कोणती खातरी बाळगू शकतो?
१९ आपल्या शिष्यांना कुठे विश्वास वाढवायची गरज आहे हे येशूने त्यांना दाखवून दिलं. पण भविष्यात येणाऱ्या संकटांना ते यशस्वीपणे तोंड देतील याबद्दल त्याला मुळीच शंका नव्हती. (योहा. १४:१; १६:३३) उलट, भक्कम विश्वासामुळेच एक मोठा लोकसमुदाय येणाऱ्या संकटातून वाचेल अशी त्याला पक्की खातरी होती. (प्रकटी. ७:९, १४) त्या मोठ्या लोकसमुदायात तुम्हीसुद्धा असाल का? तुमचा विश्वास वाढवण्यासाठी तुम्ही जर सतत प्रयत्न करत राहिलात, तर यहोवाच्या अपार कृपेने तुम्ही नक्कीच त्यांपैकी एक असाल!—इब्री १०:३९.
गीत ३८ आपला भार यहोवावर टाक
^ परि. 5 आपण सगळेच या दुष्ट जगाच्या अंताची आतुरतेने वाट पाहत आहोत. पण तो कठीण काळ पार करण्याइतपत आपला विश्वास मजबूत असेल का, असा प्रश्न कदाचित आपल्या मनात येत असेल. म्हणून या लेखात आपण काही अनुभव पाहू या, आणि त्यांपासून विश्वास मजबूत करण्याच्या बाबतीत काय शिकता येईल ते पाहू या.