टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) फेब्रुवारी २०१८

या अंकात, २-२९ एप्रिल २०१८ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

नोहा, दानीएल आणि ईयोब यांच्या विश्‍वासाचं व आज्ञाधारकतेचं अनुकरण करा

या विश्‍वासू सेवकांनी आपल्यासारख्या काही समस्यांचा सामना केला. कोणत्या गोष्टीमुळे निष्ठा टिकवून ठेवण्यासाठी त्यांना मदत झाली?

नोहा, दानीएल आणि ईयोब यांच्यासारखं तुम्ही यहोवाला जवळून ओळखता का?

या लोकांना देवाची ओळख कशी झाली? देवाची ओळख झाल्यामुळे त्यांना मदत कशी मिळाली? आणि आपण त्यांच्यासारखा विश्‍वास कसा विकसित करू शकतो?

जीवन कथा

यहोवाला सर्वकाही शक्य आहे

किर्गिझस्तानमध्ये बसमधून प्रवास करताना काही चांगले शब्द कानांवर पडल्यामुळे एका जोडप्याचं आयुष्य बदलून गेलं.

आध्यात्मिक मनुष्य असण्याचा काय अर्थ होतो?

बायबल आपल्याला एक “आध्यात्मिक विचारसरणीचा मनुष्य” कसा असतो आणि तो “शारीरिक विचारसरणीचा” मनुष्यापेक्षा कसा वेगळा आहे हे सांगतं.

आध्यात्मिक व्यक्‍ती बनण्यासाठी प्रगती करत राहा

फक्‍त बायबलचं ज्ञान तुम्हाला एक आध्यात्मिक व्यक्‍ती बनवत नाही. मग आणखी कशाची गरज आहे?

आनंद—देवाकडून मिळवता येणारा गुण

जर रोजच्या समस्यांमुळे तुम्ही जर आपला आनंद गमावत असाल तर तुम्ही तो पुन्हा कसा मिळवू शकता?

आपल्या संग्रहातून

जाहीर भाषणांमुळे आयर्लंड देशात राज्याची आनंदाची बातमी पसरली.

बंधू रस्सल यांना कोणत्या गोष्टीमुळे खात्री पटली होती की “क्षेत्र कापणी करण्यास तयार आहे”?