आध्यात्मिक मनुष्य असण्याचा काय अर्थ होतो?
“धीर आणि सांत्वन देणारा देव तुम्हा सर्वांना ख्रिस्त येशूसारखी मनोवृत्ती बाळगण्यास साहाय्य करो.”—रोम. १५:५.
१, २. (क) आध्यात्मिक मनोवृत्तीबद्दल बऱ्याच बंधुभगिनींचा काय दृष्टिकोन आहे? (ख) या लेखात आपण कोणत्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?
कॅनडामध्ये राहणारी आपली एक बहीण म्हणते की आध्यात्मिक मनोवृत्ती बाळगल्यामुळे तिला आनंदी राहायला आणि जीवनातील समस्या सोडवायला मदत मिळाली आहे. ब्राझीलमध्ये राहणारे एक बांधव म्हणतात, की आध्यात्मिक मनोवृत्ती ठेवल्यामुळे त्यांना आणि त्यांच्या पत्नीला मागील २३ वर्षांपासून आनंदी वैवाहिक जीवन जगण्यास मदत झाली आहे. फिलिपीन्झ देशात राहणारा बांधव म्हणतो की आध्यात्मिक मनोवृत्ती बाळगल्यामुळे त्याला मनःशांती मिळाली आहे. तसंच, यामुळे त्याला वेगवेगळ्या संस्कृतीच्या बंधुभगिनींशी जुळवून घ्यायलाही मदत झाली आहे.
२ आध्यात्मिक मनोवृत्ती बाळगल्यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात हे या अनुभवांवरून अगदी स्पष्ट आहे. मग, आपली आध्यात्मिकता वाढवण्यासाठी आणि वरील फायदे अनुभवण्यासाठी आपण काय करू शकतो? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याआधी आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की बायबल आध्यात्मिक लोकांबद्दल काय सांगते. असे लोक देवाच्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन स्वीकारतात आणि यहोवासारखा विचार करतात. या लेखात आपण तीन महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत. (१) आध्यात्मिक असण्याचा किंवा आध्यात्मिक
मनोवृत्ती बाळगण्याचा काय अर्थ होतो? (२) आपली आध्यात्मिकता वाढवण्यासाठी कोणती उदाहरणं आपल्याला मदत करू शकतात? (३) “ख्रिस्ताचे मन” विकसित करण्यासाठी आपण जी मेहनत घेतो त्यामुळे आपल्याला आध्यात्मिक व्यक्ती बनण्यास कशी मदत होईल?आध्यात्मिक मनुष्य असण्याचा काय अर्थ होतो?
३. शारीरिक विचारसरणीचा मनुष्य आणि आध्यात्मिक विचारसरणीचा मनुष्य यांमधील फरकाबद्दल बायबल काय सांगते?
३ प्रेषित पौलच्या शब्दांमुळे आपल्याला “शारीरिक विचारसरणीचा मनुष्य” आणि “आध्यात्मिक विचारसरणीचा मनुष्य” यांतील फरक समजण्यास मदत होते. (१ करिंथकर २:१४-१६ वाचा.) शारीरिक विचारसरणीचा मनुष्य “देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही, कारण त्याला त्या मूर्खपणाच्या गोष्टी वाटतात; आणि तो त्या जाणून घेऊ शकत नाही.” याच्या अगदी उलट आध्यात्मिक विचारसरणीचा मनुष्य “सर्व गोष्टींचे परीक्षण करतो.” तो “ख्रिस्ताचे मन जाणतो,” म्हणजेच तो ख्रिस्तासारखा विचार करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. पौलने आपल्याला आध्यात्मिक मनुष्य बनण्याचं प्रोत्साहन दिलं. आणखी कोणत्या बाबतीत शारीरिक विचारसरणीचा मनुष्य एका आध्यात्मिक मनुष्यापेक्षा वेगळा असतो?
४, ५. एक शारीरिक मनोवृत्तीचा मनुष्य कसा असतो?
४ शारीरिक विचारसरणीचा मनुष्य कसा विचार करतो? तो स्वार्थी इच्छा पूर्ण करण्यावर जोर देणारी जगाची मनोवृत्ती आत्मसात करतो. या मनोवृत्तीबद्दल पौलने म्हटलं की “आज्ञा न मानणाऱ्यांमध्ये ती आज कार्य करत आहे.” (इफिस. २:२) ही मनोवृत्ती लोकांना इतर लोकांचं अनुकरण करायला शिकवते. या लोकांना देवाच्या स्तरांबद्दल जराही आदर नसतो, त्यांना जे योग्य वाटतं तेच ते करतात. शारीरिक मनोवृत्ती बाळगणारा मनुष्य सहसा शारीरिक गोष्टींबद्दल विचार करतो. तसंच, या मनुष्याला असं वाटतं की समाजातील त्याचं स्थान, पैसा किंवा त्याचे वैयक्तिक हक्क, हे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत.
५ बायबलमध्ये “शरीराची कामे” यांबद्दल सांगितलं आहे आणि शारीरिक मनुष्य बऱ्याचदा अशी कामे करतो. (गलती. ५:१९-२१) करिंथमधील ख्रिश्चनांना पौलने आपल्या पहिल्या पत्रात शारीरिक मनुष्य करत असलेल्या आणखी काही कामांबद्दल सांगितलं. असे मनुष्य वादविवादात भाग घेतात, लोकांमध्ये फुटी पाडतात, इतरांना बंड करायला लावतात, एकमेकांना न्यायालयात नेतात, मस्तकपदाचा मुळीच आदर करत नाहीत आणि खाण्या-पिण्याला आपल्या जीवनात सर्वात जास्त महत्त्व देतात. चुकीचं काम करण्याचं प्रलोभन आलं तर एक शारीरिक मनुष्य त्याचा प्रतिकार करत नाही. (नीति. ७:२१, २२) शारीरिक मनोवृत्ती असलेले लोक यहोवाचा आत्मा गमावतील, असं यहूदाने आपल्या पत्रात सांगितलं.—यहू. १८, १९.
६. एक आध्यात्मिक मनोवृत्तीचा मनुष्य कसा असतो?
६ पण एक आध्यात्मिक मनोवृत्तीचा मनुष्य देवासोबत असलेल्या त्याच्या नातेसंबंधाला नेहमी जपण्याचा प्रयत्न करतो. तो देवाच्या आत्म्याचं मार्गदर्शन स्वीकारतो आणि यहोवाचं अनुकरण करण्याचा होईल तितका प्रयत्न करतो. (इफिस. ५:१) यहोवाचे विचार समजून घेण्याचा आणि यहोवा कशा प्रकारे कार्य करतो हे पाहण्याचा तो मनुष्य प्रयत्न करतो. देव त्याच्यासाठी एक खरीखुरी व्यक्ती असते. शारीरिक मनुष्याच्या अगदी उलट, आध्यात्मिक मनोवृत्तीचा मनुष्य जीवनातील प्रत्येक पैलूंमध्ये यहोवाच्या स्तरांचा आदर करून ते पाळतो. (स्तो. ११९:३३; १४३:१०) तो “शरीराची कामे” करत नाही, तर “आत्म्याचे फळ” उत्पन्न करण्याचा नेहमी प्रयत्न करतो. (गलती. ५:२२, २३) आध्यात्मिक मनोवृत्तीचा मनुष्य कसा असतो हे आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी पुढील तुलनेचा विचार करा: एखादा मनुष्य जर नेहमी आपल्या व्यवसायाबद्दल विचार करत असेल तर आपण त्याला व्यावसायिक म्हणतो. तसंच, जो मनुष्य देवाच्या उपासनेबद्दल मनापासून कदर बाळगतो आणि त्याबद्दल नेहमी विचार करतो त्याला आपण आध्यात्मिक मनुष्य म्हणतो.
७. आध्यात्मिक मनोवृत्तीच्या मनुष्याबद्दल बायबलमध्ये काय सांगितलं आहे?
७ येशूने म्हटलं की आध्यात्मिक मनोवृत्तीचा मनुष्य आनंदी असतो. मत्तय ५:३ मध्ये त्याने म्हटलं: “जे आपली आध्यात्मिक गरज ओळखतात ते सुखी आहेत, कारण स्वर्गाचं राज्य अशाच लोकांचं आहे.” रोमकर ८:६ सांगतं की यहोवासारखा विचार करण्यावर आपलं जीवन अवलंबून आहे. त्यात म्हटलं आहे की, “शरीराकडे मन लावल्याने मरण येते, पण पवित्र आत्म्याकडे मन लावल्याने जीवन व शांती मिळते.” यामुळे आपण जर आध्यात्मिक मनोवृत्ती बाळगली तर देवासोबत आपला नातेसंबंध शांतीपूर्ण असेल. तसंच, आपल्याला मनःशांती मिळेल आणि सार्वकालिक जीवनाची आशादेखील मिळेल.
८. आध्यात्मिक मनोवृत्ती बाळगणं आणि ती टिकवून ठेवणं इतकं सोपं का नाही?
८ पण आजचं जग फार वाईट आहे. आपल्या अवतीभोवती असे लोक आहेत जे देवासारखा विचार करत नाही. त्यांचा प्रभाव आपल्यावर पडू नये म्हणून आपल्याला खूप मेहनत घेण्याची गरज आहे. आपण जर आध्यात्मिक गोष्टी आपल्या मनात साठवल्या नाहीत, तर सैतानाचं जग आपलं मन शारीरिक इच्छांनी आणि त्याच्या विचारसरणीने भरून टाकेल. मग हे टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? आपण आध्यात्मिक रीत्या प्रगती कशी करू शकतो?
चांगल्या उदाहरणांवरून शिका
९. (क) आध्यात्मिक रीत्या प्रगती होण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत होईल? (ख) आपण कोणत्या उदाहरणांचं परीक्षण करणार आहोत?
९ मुलांनी आपल्या आईवडिलांपासून शिकावं आणि त्यांच्या चांगल्या उदाहरणाचं अनुकरण करावं, अशी त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते. त्याच प्रकारे आपणसुद्धा यहोवाकडून शिकलं पाहिजे आणि त्याच्यासोबत घनिष्ठ नातं असलेल्या लोकांचं अनुकरण केलं पाहिजे. यामुळे आध्यात्मिक मनोवृत्ती कशी बाळगावी हे आपल्याला शिकता येईल. दुसरीकडे पाहता, आपण शारीरिक मनोवृत्तीचे लोक कसे असतात हे जाणून घेतलं पाहिजे. यामुळे आपल्याला त्यांच्यासारखं बनण्याचं टाळता येईल. (१ करिंथ. ३:१-४) बायबलमध्ये चांगली आणि वाईट अशी दोन्ही उदाहरणं दिली आहेत. आता आपण याकोब, मरीया, आणि येशू यांच्या चांगल्या उदाहरणाचं परीक्षण करू या. त्यांच्याकडून आपण काय शिकू शकतो हे आता आपण पाहू.
१०. याकोबने कसं दाखवलं की तो आध्यात्मिक मनोवृत्तीचा आहे?
१० आपल्यापैकी बऱ्याच जणांसारखं याकोबलाही अनेक उत्प. २८:१०-१५) याकोबच्या अवतीभोवती शारीरिक मनोवृत्ती असलेले लोक होते. पण त्याने त्या लोकांच्या वाईट प्रवृत्तीचा स्वतःवर प्रभाव पडू दिला नाही. यहोवाने दिलेलं अभिवचन त्याने नेहमी आठवणीत ठेवलं. उदाहरणार्थ, आपला भाऊ आपल्यावर हल्ला करेल असं जेव्हा याकोबला वाटलं, तेव्हा त्याने मदतीसाठी यहोवाला कळकळून प्रार्थना केली आणि म्हटलं: “तू मला वचन दिले आहे की, मी तुझे निश्चित कल्याण करेन, आणि तुझी संतती समुद्राच्या वाळूसारखी संख्येने अगणित करेन.” (उत्प. ३२:६-१२) यहोवाच्या अभिवचनांवर याकोबचा भक्कम विश्वास होता आणि त्याने ते आपल्या जीवनातून दाखवून दिलं.
समस्यांचा सामना करावा लागला होता. त्याचा सख्खा भाऊ एसाव, त्याच्या जीवावर उठला होता. तसंच, याकोबच्या सासऱ्याने बऱ्याच वेळा त्याला फसवण्याचा प्रयत्न केला. पण यहोवाने अब्राहामला दिलेल्या अभिवचनावर याकोबचा पूर्ण विश्वास होता. त्याला माहीत होतं की या अभिवचनाच्या पूर्णतेत त्याच्या कुटुंबाची महत्त्वाची भूमिका असणार होती. त्यामुळे त्याने आपल्या कुटुंबाची चांगली काळजी घेतली. (११. मरीया आध्यात्मिक मनोवृत्तीची स्त्री होती हे आपण का म्हणू शकतो?
११ आता मरीयाचं उदाहरण लक्षात घ्या. ती आध्यात्मिक मनोवृत्तीची असल्यामुळे यहोवाने येशूची आई होण्यासाठी तिची निवड केली. मरीया जेव्हा जखऱ्या आणि अलीशिबाला भेटायला गेली तेव्हा ती जे बोलली त्याकडे लक्ष द्या. (लूक १:४६-५५ वाचा.) तिच्या शब्दांवरून स्पष्ट होतं की तिचं देवाच्या वचनांवर खूप प्रेम होतं आणि इब्री शास्त्रवचनांचं तिला चांगलं ज्ञान होतं. (उत्प. ३०:१३; १ शमु. २:१-१०; मला. ३:१२) योसेफ आणि मरीया यांचं लग्न झाल्यानंतरही त्यांनी येशूचा जन्म होईपर्यंत शारीरिक संबंध ठेवले नाहीत. यावरून दिसून येतं की त्यांच्यासाठी स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यापेक्षा, देवाकडून मिळालेली नेमणूक ही जास्त महत्त्वाची होती. (मत्त. १:२५) तसंच, येशू वयाने वाढत असताना घडणाऱ्या सर्व गोष्टी लक्षपूर्वक पाहिल्या व त्याने शिकवलेल्या गोष्टी मरीयाने ऐकल्या आणि “या सर्व गोष्टी आपल्या मनात जपून ठेवल्या.” (लूक २:५१) यावरून आपल्याला हे स्पष्टपणे कळतं की देवाने मसीहाबद्दल दिलेलं अभिवचन पूर्ण होताना पाहण्यासाठी ती खूप उत्सुक होती. तर मग आपण मरीयाचं अनुकरण करून देवाच्या इच्छेनुसार कार्य करण्याचा नेहमी प्रयत्न करू का?
१२. (क) येशूने आपल्या पित्याचं अनुकरण कसं केलं? (ख) आपण येशूचं अनुकरण कसं करू शकतो? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)
१२ आध्यात्मिक मनोवृत्ती ठेवण्याच्या बाबतीत आजपर्यंत होऊन गेलेल्या सर्व लोकांपैकी येशू हा सर्वोत्तम उदाहरण होता. पृथ्वीवरील जीवनात आणि सेवाकार्यात त्याने दाखवलं की त्याच्या पित्याचं अनुकरण करण्याची त्याची मनापासून इच्छा आहे. येशूचे विचार, भावना आणि कार्यं यहोवासारखीच होती. त्याने देवाची इच्छा पूर्ण केली आणि त्याचे स्तर पाळले. (योहा. ८:२९; १४:९; १५:१०) उदाहरणार्थ, यशया संदेष्ट्याने यहोवाच्या दयेबद्दल असं म्हटलं: “त्यांच्या सर्व दुःखाने तो दुःखी झाला, त्याची प्रत्यक्षता दर्शवणाऱ्या दिव्यदूताने त्यांचे तारण केले, त्याने आपल्या प्रीतीने व आपल्या करुणेने त्यांस उद्धारले; पूर्वीचे सर्व दिवस त्याने त्याचे लालनपालन केले.” (यश. ६३:९) आता याची तुलना मार्कने येशूच्या भावनांबद्दल जे म्हटलं त्याच्याशी करून पाहा. (मार्क ६:३४ वाचा.) गरजू लोकांना दया दाखवण्यासाठी नेहमी तयार राहण्याद्वारे आपण येशूचं अनुकरण करतो का? येशूसारखंच आपणही आनंदाच्या संदेशाचा प्रचार करण्यावर आणि लोकांना शिकवण्यावर आपलं लक्ष केंद्रित करतो का? (लूक ४:४३) आध्यात्मिक मनोवृत्तीचे लोक दयाळू असतात आणि ते इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करतात.
१३, १४. (क) आज आपण आध्यात्मिक मनोवृत्ती ठेवणाऱ्या बंधुभगिनींकडून काय शिकू शकतो? (ख) दिलेला अनुभव सांगा.
१३ आज बरेच असे आध्यात्मिक मनोवृत्तीचे बंधुभगिनी आहेत जे ख्रिस्ताचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. असे बंधुभगिनी सहसा सेवाकार्यात आवेशी असतात, पाहुणचार करण्यात पुढाकार घेतात आणि इतरांशी करुणेने वागतात. ते परिपूर्ण नसले तरी चांगले गुण विकसित करण्यासाठी आणि यहोवाच्या इच्छेनुसार कार्य करण्यासाठी खूप मेहनत घेतात. ब्राझीलमध्ये राहणारी रेचल नावाची बहीण म्हणते: “मला आधी जगातील फॅशननुसार कपडे घालायला खूप आवडायचं. यामुळे माझा पेहराव शालीन नसायचा. पण नंतर सत्य शिकल्यामुळे मला आध्यात्मिक व्यक्ती बनण्यासाठी काही बदल करावे
लागले. हे बदल करणं सोपं नव्हतं, पण ते केल्यामुळे मी आता आनंदी आहे. आणि माझ्या जीवनाला खरा अर्थ लाभला आहे.”१४ फिलिपीन्झमध्ये राहणारी रेयलिनी नावाच्या बहिणीला एका वेगळ्याच समस्येला तोंड द्यावं लागलं. ती सत्यात असली तरी तिच्या जीवनात उच्च शिक्षणाला आणि चांगल्या नोकरीला जास्त महत्त्व होतं. यामुळे हळूहळू आध्यात्मिक ध्येयांकडे तिचं दुर्लक्ष होऊ लागलं. ती म्हणते: “मला जीवनात कशाचीतरी कमी जाणवू लागली, अशा गोष्टीची जी माझ्या नोकरीपेक्षा खूप जास्त महत्त्वाची आहे.” या बहिणीने आपल्या विचारसरणीत बदल केला आणि यहोवाच्या सेवेला आपल्या जीवनात सर्वात जास्त महत्त्व दिलं. मत्तय ६:३३, ३४ मध्ये दिलेल्या यहोवाच्या अभिवचनावर आता तिचा पूर्ण भरवसा आहे. ती म्हणते: “मला पूर्ण खात्री आहे की यहोवा माझी काळजी घेईल.” तुमच्या मंडळीतही असे काही बंधुभगिनी असतील जे यहोवाच्या सेवेला जीवनात सर्वात जास्त महत्त्व देत आहेत. ख्रिस्ताचं अनुकरण करण्याबाबतीत त्यांचं चांगलं उदाहरण पाहून, आपणही त्यांचं अनुकरण केलं पाहिजे.—१ करिंथ. ११:१; २ थेस्सलनी. ३:७.
“ख्रिस्ताचे मन” विकसित करा
१५, १६. (क) ख्रिस्तासारखं बनण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? (ख) ख्रिस्ताच्या मनाचा आपल्यावर प्रभाव पडावा यासाठी आपण काय करू शकतो?
१५ आपण ख्रिस्ताचं अनुकरण कसं करू शकतो? १ करिंथकर २:१६ मध्ये सांगितलं आहे की आपण ‘ख्रिस्ताचं मन’ जाणलं पाहिजे. रोमकर १५:५ आपल्याला सांगतं की आपण “ख्रिस्त येशूसारखी मनोवृत्ती” विकसित केली पाहिजे. ख्रिस्तासारखं बनण्यासाठी त्याचे विचार, त्याच्या भावना आणि त्याच्या कार्यांचं परीक्षण करणं खूप गरजेचं आहे. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा येशूसाठी देवासोबतचा त्याचा नातेसंबंध हा सर्वात महत्त्वाचा होता. यामुळे आपण जेव्हा येशूसारखं बनण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा खरंतर आपण यहोवासारखं बनत असतो. म्हणून येशूसारखा विचार करायला शिकणं हे खूप गरजेचं आहे.
१६ मग आपण येशूसारखा विचार करायला कसं शिकू शकतो? येशूच्या शिष्यांनी त्याला चमत्कार करताना, मोठ्या जमावाला शिकवताना, लोकांशी वागताना अगदी जवळून पाहिलं होतं. तसंच त्यांनी येशूला यहोवाच्या विचारसरणीनुसार कार्य करतानादेखील पाहिलं. शिष्यांनी म्हटलं: “सर्व गोष्टींचे आम्ही साक्षीदार आहोत.” (प्रे. कार्ये १०:३९) आज आपण येशूला पाहू शकत नाही. पण त्याला जवळून ओळखण्यासाठी आपल्याजवळ शुभवर्तमानाची पुस्तकं आहेत. आपण जेव्हा मत्तय, मार्क, लूक आणि योहान ही पुस्तकं वाचून त्यावर मनन करतो, तेव्हा येशू कसा विचार करायचा हे आपण शिकत असतो. यामुळे आपल्याला “त्याच्या पावलांचे जवळून अनुकरण” करण्यासाठी मदत होते. याचा परिणाम म्हणजे आपण “त्याच्यासारखीच मनोवृत्ती” विकसित करू.—१ पेत्र २:२१; ४:१.
१७. ख्रिस्तासारखा विचार केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?
१७ ख्रिस्तासारखा विचार केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो? जसं पौष्टिक अन्न खाल्ल्यामुळे आपलं शरीर सुदृढ होतं, तसंच ख्रिस्ताची मनोवृत्ती विकसित करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आपण आध्यात्मिक रीत्या सुदृढ होतो. एखाद्या परिस्थितीत येशूने काय केलं असतं हे हळूहळू आपण शिकू लागतो. यामुळे देवाला खुश करणारे सुज्ञ निर्णय घ्यायला आपल्याला मदत होते आणि आपला विवेकही शुद्ध राहतो. ही सर्व “येशू ख्रिस्ताला परिधान” करण्याची चांगली कारणं आहेत असं तुम्हाला वाटत नाही का?—रोम. १३:१४.
१८. आध्यात्मिक मनोवृत्ती बाळगण्याच्या बाबतीत तुम्ही या लेखातून काय शिकलात?
१८ आध्यात्मिक मनोवृत्ती बाळगण्याचा काय अर्थ होतो हे समजून घ्यायला आपल्याला या लेखामुळे मदत झाली आहे. देवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालणाऱ्या लोकांचं चांगलं उदाहरण आपण पाहिलं. आपण हेदेखील शिकलो की “ख्रिस्ताचे मन” विकसित केल्यामुळे आपल्याला यहोवासारखा विचार करायला आणि त्याच्यासोबत जवळचा नातेसंबंध ठेवायला मदत होते. पण यासोबतच आणखी काही गोष्टी शिकणंही गरजेचं आहे. जसं की, आपण आध्यात्मिक रीत्या मजबूत आहोत याची खात्री आपण कशी करू शकतो? आध्यात्मिक रीत्या प्रगती करण्यासाठी आपण काय करू शकतो? आणि आध्यात्मिकतेचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो? या प्रश्नांची उत्तरं आपण पुढील लेखात पाहू या.