आईवडिलांनो, मुलांचा विश्वास वाढवण्यासाठी तुम्ही मेहनत घेत आहात का?
“कुमार व कुमारी . . . ही सगळी परमेश्वराच्या नावाचे स्तवन करोत.”—स्तो. १४८:१२, १३.
१, २. (क) पालकांना कोणत्या आव्हानाचा सामना करावा लागतो, आणि कोणत्या एकमेव मार्गामुळे त्यांना मदत होऊ शकते? (ख) आपण कोणत्या चार गोष्टींवर चर्चा करणार आहोत?
फ्रान्समध्ये राहणाऱ्या एका जोडप्यानं असं म्हटलं: “आमचा यहोवावर विश्वास आहे. पण, गरजेचं नाही की यामुळे आमची मुलंही यहोवावर विश्वास ठेवतील. कारण, विश्वास हा वारशाने देता येत नाही. मुलांच्या मनात तो हळूहळू वाढतो.” ऑस्ट्रेलियामध्ये राहणारे एक बांधव असं म्हणतात: “मला वाटतं पालकांच्या जीवनातील सर्वात मोठं आव्हान म्हणजे आपल्या मुलांना त्यांचा विश्वास वाढवण्यास मदत करणं.” ते पुढे असं म्हणतात: “मुलांच्या मनातील एखाद्या प्रश्नाचं तुम्ही समाधानकारक उत्तर दिलं आहे असं कदाचित तुम्हाला वाटेल. पण, काही काळाने ते पुन्हा तोच प्रश्न तुम्हाला विचारतील. आज ज्या उत्तराने तुमच्या मुलांचं समाधान झालं आहे, गरजेचं नाही की पुढेही ते तेवढ्या माहितीवरच समाधानी होतील.” अनेक पालकांच्या लक्षात आलं आहे की मुलं जसजशी मोठी होतात, तसतसं एखाद्या विषयावर त्यांना आणखी खोलवर माहिती देण्याची गरज पडते. तसंच, आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करण्याचं शिकवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करणं गरजेचं आहे हेदेखील त्यांनी ओळखलं आहे.
२ आपल्या मुलांनी यहोवावर प्रेम करावं आणि मोठे झाल्यावरही त्याची सेवा करत राहावी, अशी इच्छा प्रत्येक आईवडिलांची असते. पण, त्यांना मदत करणं आपल्याला जमेल की नाही ही चिंता त्यांना सतावत असते? खरंतर, स्वतःच्या बुद्धीवर निर्भर राहून असं यिर्म. १०:२३) त्यामुळे, आपल्या सर्वांनाच यहोवावर निर्भर राहण्याची गरज आहे. आज यहोवाने बायबलमध्ये आईवडिलांसाठी बरंच मार्गदर्शन दिलं आहे. तर मग तुम्ही मुलांना मदत कशी करू शकता? यासाठी पुढील चार गोष्टींचा तुम्हाला फायदा होऊ शकतो: (१) मुलांच्या मनात काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा, (२) यहोवाबद्दल त्यांना मनापासून शिकवा, (३) उदाहरणांचा वापर करा, (४) धीर दाखवा आणि पवित्र आत्म्याच्या मदतीसाठी प्रार्थना करा.
करणं कोणालाही शक्य नाही. (मुलांच्या मनात काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा
३. येशूने आपल्या शिष्यांना ज्या प्रकारे शिकवलं त्यावरून आईवडील काय शिकू शकतात?
३ शिष्यांच्या मनात काय आहे ते जाणून घेण्यासाठी येशू सहसा त्यांना प्रश्न विचारायचा. (मत्त. १६:१३-१५) तुम्हीही त्याच्या उदाहरणाचं अनुकरण करू शकता. तुम्ही जेव्हा तुमच्या मुलांसोबत गप्पा मारत असता किंवा सोबत मिळून काही काम करत असता, तेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल ते काय विचार करतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या मनात काही प्रश्न आहेत का हे त्यांना विचारा. ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या एका १५ वर्षांच्या बांधवाने असं म्हटलं: “पप्पा नेहमी माझ्या विश्वासाबद्दल माझ्यासोबत बोलतात आणि त्याबद्दल तर्क करण्यास मला मदत करतात. ते सहसा मला विचारतात: ‘बायबल याबद्दल काय म्हणतं?’ ‘त्यात जे म्हटलं आहे त्यावर तू खरंच विश्वास ठेवतो का?’ ‘कोणत्या कारणामुळे तू त्याच्यावर विश्वास ठेवतो?’ या प्रश्नांची उत्तरं मी माझ्या शब्दांत द्यावी अशी ते अपेक्षा करतात. आणि मी जसजसा मोठा होत गेलो तसतसं मी आणखी तर्क करून या प्रश्नांची उत्तरं देऊ लागलो.”
४. मुलं जेव्हा एखादा प्रश्न विचारतात तेव्हा धीर दाखवण्याची आणि योग्य प्रकारे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याची गरज का आहे? एक उदाहरण द्या.
४ बायबलच्या एखाद्या शिकवणीवर जर तुमच्या मुलांचा लगेच विश्वास बसत नसेल, तर त्यांच्यावर चिडू नका. अशा वेळी धीर दाखवा. त्यांच्या मनात जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. एका पित्याचं असं म्हणणं आहे: “तुमच्या मुलाने विचारलेल्या प्रश्नांना गंभीरतेनं घ्या. त्यांना अगदी क्षुल्लक लेखून त्याकडे दुर्लक्ष करू नका. तसंच, एखाद्या विषयावर बोलायला तुम्हाला संकोच वाटत असेल तरी त्याबद्दल बोलायचं टाळू नका.” तुमची मुलं तुम्हाला प्रश्न विचारतात ही खरंतर खूप चांगली गोष्ट आहे. कारण, यावरून दिसून येतं की गोष्टींना समजून घेण्याची त्यांची इच्छा आहे. येशू ख्रिस्तानेदेखील लहान असताना बरेच प्रश्न विचारले. (लूक २:४६ वाचा.) डेन्मार्कमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने असं म्हटलं: “एकदा मी माझ्या आईवडिलांना म्हटलं की आपला धर्म हाच खरा धर्म आहे का, अशी शंका कधीकधी माझ्या मनात येते. तेव्हा त्यांनी लगेच प्रतिक्रिया दिली नाही. या गोष्टीची त्यांना नक्कीच खूप काळजी वाटली असावी, पण तरी त्यांनी अगदी शांतपणे माझं ऐकलं. त्यांनी माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बायबलमधून दिली.”
५. आपल्या मुलांचा यहोवावर विश्वास आहे असं वाटत असलं, तरी आईवडिलांनी काय करण्याची गरज आहे?
५ आपल्या मुलांच्या मनात काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ते नियमित रीत्या प्रचाराला आणि सभांना जातात याचा अर्थ त्यांचाही यहोवावर विश्वास असेल असं गृहित धरू नका. त्यांना यहोवाबद्दल मनापासून कसं वाटतं, बायबलबद्दल त्यांचं काय मत आहे, हे जाणून घ्या. अशी एखादी गोष्ट आहे का ज्यामुळे त्यांना यहोवाला विश्वासू राहणं कठीण जात आहे, हे माहीत करून घेण्याचा प्रयत्न करा. दररोज जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत मिळून काही काम करता तेव्हा यहोवाबद्दल त्यांच्याशी बोला. आपल्या मुलांसोबत असताना आणि एकटे असताना त्यांच्यासाठी यहोवाकडे प्रार्थना करा.
यहोवाबद्दल मुलांना मनापासून शिकवा
६. यहोवाबद्दल आणि बायबलबद्दल शिकत राहिल्यामुळे आईवडिलांना आपल्या मुलांना शिकवताना कशी मदत होऊ शकते?
६ येशूचं यहोवावर मनापासून प्रेम होतं आणि त्याला शास्त्रवचनांची चांगली समज होती. त्यामुळे जेव्हा तो लोकांना शिकवायचा तेव्हा त्यांना ते खूप आवडायचं. तसंच, येशूचं आपल्यावर प्रेम आहे याची जाणीवही लोकांना व्हायची. म्हणून ते त्याचं अगदी लक्षपूर्वक ऐकायचे. (लूक २४:३२; योहा. ७:४६) त्याच प्रकारे, जेव्हा तुमची मुलं पाहतात की तुमचं यहोवावर मनापासून प्रेम आहे, तेव्हा त्यांनाही यहोवावर प्रेम करण्याचं उत्तेजन मिळतं. (अनुवाद ६:५-८; लूक ६:४५ वाचा.) त्यामुळे, बायबलचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि आपली प्रकाशनं नियमित रीत्या वाचा. यहोवाने निर्माण केलेल्या गोष्टींबद्दल आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. (मत्त. ६:२६, २८) यहोवाबद्दल तुम्ही जितकं जास्त शिकाल, तितकीच जास्त माहिती तुमच्याजवळ असेल. आणि या माहितीचा वापर तुम्ही तुमच्या मुलांना शिकवताना करू शकाल.—लूक ६:४०.
७, ८. तुम्हाला यहोवाबद्दल एखादी नवीन गोष्ट शिकायला मिळाल्यावर तुम्ही काय करू शकता? काही पालकांनी हे कशा प्रकारे केलं आहे?
७ यहोवाबद्दल जेव्हा तुम्हाला काही नवीन माहिती शिकायला मिळते, तेव्हा ती आपल्या मुलांनाही सांगा. ही माहिती तुम्ही त्यांना केव्हाही सांगू शकता. ती फक्त सभांची तयारी करताना किंवा
कौटुंबिक उपासना करतानाच त्यांना सांगितली पाहिजे असा विचार करू नका. अमेरिकेतील एक जोडपं याच पद्धतीचा वापर करतं. निसर्गातील एखादी सुंदर गोष्ट पाहताना किंवा चविष्ट जेवणाचा आस्वाद घेताना ते आपल्या मुलांसोबत यहोवाबद्दल बोलतात. त्यांनी असं म्हटलं: “आम्ही आमच्या मुलांना सांगतो की यहोवाचं आपल्यावर प्रेम असल्यामुळे, तो आपल्याला सर्व चांगल्या गोष्टी पुरवतो आणि आपल्याला या गोष्टी मिळाव्यात म्हणून त्याने आधीच व्यवस्था करून ठेवली आहे.” दक्षिण आफ्रिकेमधील एका जोडप्याचं उदाहरण घ्या. आपल्या मुलींसोबत बागेत काम करताना ते सहसा निर्मितीबद्दल बोलतात. उदाहरणार्थ, ते आपल्या मुलींना सांगतात की आपण जमिनीत बी पेरतो आणि काही काळानं त्यातून झाड उगवतं. ही खरंच किती अद्भुत गोष्ट आहे. ते म्हणतात: “आम्ही आमच्या मुलींच्या मनात जीवसृष्टी आणि त्यात दिसून येणारी जटीलता यांबद्दल आदर निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.”८ ऑस्ट्रेलियामध्ये राहणारे एक बांधव आपल्या दहा वर्षांच्या मुलाला घेऊन एकदा एका म्युझियममध्ये गेले. आपल्या मुलाचा विश्वास वाढवण्यासाठी आणि यहोवाच निर्माणकर्ता आहे, याचे पुरावे त्याला दाखवण्यासाठी त्यांनी या संधीचा फायदा उचलण्याचं ठरवलं. त्या ठिकाणी त्यांनी पाण्यात राहणाऱ्या पुरातन काळातील प्राण्यांचं प्रदर्शन पाहिलं. त्या प्राण्यांना अॅमोनॉइड्स आणि ट्रिलोबाइट्स म्हटलं जातं. ते म्हणतात: “लुप्त झालेले हे प्राणी खूप सुंदर आणि जटील होते. आजच्या प्राण्यांप्रमाणेच त्यांच्या रचनेत कोणतीही कमी नव्हती. ही गोष्ट आम्हाला खूप विशेष वाटली. असं म्हटलं जातं की सुरवातीला असलेले जीव अगदी साधे होते आणि नंतर त्यांची उत्क्रांती होऊन ते जटील होत गेले. तर मग या पुरातन काळातील प्राण्यांची रचना इतकी जटील कशी होती? मी जे शिकलो ते मला खूप आवडलं आणि मी माझ्या मुलाला ते समजावण्याचा प्रयत्न केला.”
उदाहरणांचा वापर करा
९. उदाहरणांचा वापर करणं चांगलं का आहे, आणि एका आईने कोणत्या उदाहरणाचा वापर केला?
९ लोकांना शिकवताना येशू सहसा उदाहरणांचा वापर करायचा. एखादी गोष्ट किंवा दाखला सांगून तो लोकांना महत्त्वपूर्ण धडे शिकवायचा. (मत्त. १३:३४, ३५) मुलांना शिकवताना जेव्हा तुम्ही उदाहरणांचा वापर करता तेव्हा आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करण्यासाठी तुम्ही त्यांना मदत करत असता. यामुळे तुम्हाला त्यांना जे शिकवायचं आहे ते चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि नेहमी लक्षात ठेवण्यास त्यांना मदत होते. तसंच, उदाहरणांचा वापर केल्यामुळे तेही उत्सुकतेने शिकतात. जपानमध्ये राहणाऱ्या एका बहिणीचं उदाहरण घ्या. यहोवाने पृथ्वीच्या भोवती असलेलं वातावरण ज्या प्रकारे निर्माण केलं आहे त्यावरून आपल्याप्रती त्याला असलेली काळजी कशी दिसून येते, हे या बहिणीला आपल्या दोन मुलांना शिकवायचं होतं. तिचा एक मुलगा आठ वर्षांचा, तर दुसरा दहा वर्षांचा होता. त्यामुळे, तिने त्यांचं वय लक्षात घेऊन त्यांना समजेल अशा उदाहरणाचा वापर केला. तिने आपल्या मुलांना दूध, साखर आणि कॉफी दिली आणि त्या दोघांनी तिच्यासाठी कॉफी बनवावी असं सांगितलं. ती सांगते: “त्यांनी खूप काळजी घेऊन कॉफी बनवली. जेव्हा मी त्यांना त्याचं कारण विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की मला जशी कॉफी आवडते तशी कॉफी त्यांना बनवायची होती. मग मी त्यांना समजावून सांगितलं की यहोवा देवानेही पृथ्वीभोवती वातावरण निर्माण करताना अशीच काळजी घेतली. पृथ्वीच्या वातावरणात जे वायू आहेत ते त्याने अगदी योग्य प्रमाणात मिश्रित केले. मानवांना जीवन जगता यावं म्हणून त्याने हे केलं.” अशा प्रकारे मुलांना शिकवल्यामुळे त्यांनाही मजा वाटली आणि शिकायला मिळालेली गोष्ट त्यांच्या नेहमी लक्षात राहिली.
१०, ११. (क) आपला एक निर्माणकर्ता आहे हे आपल्या मुलांना समजावून सांगण्यासाठी तुम्ही कोणत्या उदाहरणाचा वापर करू शकता? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.) (ख) तुम्ही कोणत्या उदाहरणांचा वापर केला आहे?
१० आपला एक निर्माणकर्ता आहे हे मुलांना शिकवण्यासाठी तुम्ही कोणत्या उदाहरणाचा वापर करू शकता? तुम्ही आपल्या मुलांसोबत मिळून एखाद्या रेसिपी बुकमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारावर केक किंवा दुसरा एखादा खाद्यपदार्थ बनवू शकता. त्यात सांगितल्यानुसारच प्रत्येक गोष्ट करणं महत्त्वाचं का आहे जीवन की शुरूआत पाँच सवाल—जवाब पाना ज़रूरी या माहितीपत्रकातील पृष्ठं १० ते २० मध्ये दिलेल्या चित्रांचा आणि उदाहरणांचादेखील तुम्ही वापर करू शकता.
हे त्यांना समजावून सांगा. मग आपल्या मुलाला सफरचंद किंवा दुसरं एखादं फळ द्या आणि त्याला सांगा: “तुला माहीत आहे का, की या फळाचीसुद्धा एक रेसिपी आहे.” मग ते फळ कापा आणि त्यातील बी त्याला दाखवा. त्याला समजावून सांगा की ती बी एका रेसिपीप्रमाणेच आहे. त्या बीमध्ये ते फळ कसं तयार करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती साठवून ठेवलेली आहे. पण, केकसारख्या खाद्य पदार्थांसाठी असलेल्या रेसिपीच्या तुलनेत ही माहिती खूप जास्त जटील आहे. मग तुम्ही त्याला विचारू शकता: “केक कसा बनवायचा हे कोणीतरी या पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे. मग फळ कसं तयार होणार ही माहिती त्या बीमध्ये कोणी साठवून ठेवली?” तुमची मुलं जर मोठी असतील तर तुम्ही त्यांना समजावून सांगू शकता, की झाड आणि त्या झाडावरील फळ तयार करण्यासाठी लागणाऱ्या सूचना डी.एन.ए, म्हणजेच माहिती साठवून ठेवणारा रासायनिक पदार्थ, यात दिलेल्या असतात. तसंच,११ बरेच आईवडील आपल्या मुलांसोबत मिळून सावध राहा! या नियतकालिकातील “उत्क्रांती की निर्मिती?” ही लेखमाला वाचतात. जर मुलं खूप लहान असतील तर आईवडील त्यातील माहिती सोप्या शब्दांत त्यांना सांगू शकतात. उदाहरणार्थ, डेन्मार्कमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याने विमानांची तुलना पक्ष्यांसोबत केली. त्यांनी आपल्या मुलांना सांगितलं: “विमानं पक्ष्यांसारखे दिसतात. पण विमानंही पक्ष्यांसारखी अंडी देऊन आणखी विमानं तयार करू शकतात का? विमानाला जमिनीवर उतरताना जसं धावपट्टीची गरज पडते तशी पक्ष्यांना पडते का? पक्ष्यांचा आवाज ज्या प्रकारे सुंदर आणि मधुर असतो तसा विमानांचा असतो का? तर मग कोण जास्त बुद्धिमान आहे, विमान बनवणारा की पक्ष्यांची निर्मिती करणारा?” जेव्हा तुम्ही आपल्या मुलांसोबत तर्क करता आणि त्यांना प्रश्न विचारता, तेव्हा त्यांना आपल्या समजबुद्धीचा वापर करून यहोवावर असलेला त्यांचा विश्वास आणखी मजबूत करण्यास मदत होते.—नीति. २:१०-१२.
१२. बायबलमध्ये सांगितलेली प्रत्येक गोष्ट अचूक आहे, हे आपल्या मुलांना शिकवण्यासाठीही तुम्ही उदाहरणांचा वापर कसा करू शकता?
१२ बायबलमध्ये सांगितलेली प्रत्येक गोष्ट अचूक आहे, हे आपल्या मुलांना शिकवण्यासाठीही तुम्ही उदाहरणांचा वापर करू शकता. तुम्ही ईयोब २६:७ (वाचा.) हे वचन वाचू शकता. वचन वाचल्यानंतर ही माहिती यहोवाकडूनच आली आहे, फक्त इतकंच आपल्या मुलांना सांगू नका. याउलट, कल्पनाशक्तीचा वापर करण्यास त्यांना मदत करा. कदाचित तुम्ही ईयोबाच्या काळातील चित्र त्यांच्यापुढे उभं करू शकता. आणि मग पुढील गोष्टींवर त्यांच्यासोबत तर्क करू शकता. तुम्ही त्यांना सांगू शकता की पृथ्वी ही अंतराळात तरंगत आहे, ती निराधार आहे. पण, ईयोबाच्या काळात लोक असा विश्वास करत नव्हते. त्यांना हे माहीत होतं की कोणतीही वस्तू ही कशावरतरी आधारलेली असते. तसंच, त्या काळात कोणत्याही शास्त्रज्ञाने हे सिद्ध केलं नव्हतं की पृथ्वी अंतराळात तरंगत आहे. कारण, तेव्हा दुर्बीण किंवा अंतराळात जाण्यासाठी कोणतंही यान नव्हतं. पण, तरीसुद्धा बायबलमध्ये ही माहिती अगदी अचूक रीत्या देण्यात आली होती. यावरून हेच सिद्ध होतं की बायबल बऱ्याच काळाआधी लिहिण्यात आलं असलं, तरी ते अचूक आहे. कारण ते यहोवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आलं आहे.—नहे. ९:६.
बायबलच्या मार्गदर्शनानुसार जगणं फायद्याचं का आहे हे मुलांना शिकवा
१३, १४. आईवडील आपल्या मुलांना बायबलमधील मार्गदर्शनाचं पालन करण्याचं कसं शिकवू शकतात?
१३ बायबलच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगल्यामुळे आपण जीवनात खऱ्या अर्थाने आनंदी होतो, हे आपल्या मुलांना शिकवणंही महत्त्वाचं आहे. (स्तोत्र १:१-३ वाचा.) उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या मुलांना अशी कल्पना करायला सांगू शकता की ते एका बेटावर जाऊन राहणार आहेत. आणि आपल्यासोबत राहण्यासाठी काही लोकांची त्यांना निवड करायची आहे. मग तुम्ही त्यांना विचारू शकता: “जर तुम्हाला असं वाटतं की त्या बेटावर राहणाऱ्यांनी प्रेमानं आणि एकतेनं राहावं, तर तुम्ही कशा प्रकारच्या लोकांना आपल्यासोबत घेऊन जाल?” त्यानंतर तुम्ही गलतीकर ५:१९-२३ ही वचनं वाचू शकता. यहोवाला नवीन जगात कशा प्रकारच्या लोकांना नेण्याची इच्छा आहे, हे त्या वचनात सांगितलं आहे.
१४ असं केल्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना दोन महत्त्वाचे धडे शिकवू शकाल. पहिला हा, की यहोवा आपल्याला आज एक आनंदी जीवन जगण्यासाठी आणि लोकांसोबत शांतीने राहण्यासाठी शिकवत आहे. आणि दुसरा म्हणजे, नवीन जगातील जीवनासाठी तो आपल्याला तयार करत आहे. (यश. ५४:१३; योहा. १७:३) यासोबतच, बायबलमुळे आपल्या बांधवांना कशा प्रकारे मदत मिळाली आहे हेसुद्धा तुम्ही आपल्या मुलांना दाखवू शकता. यासाठी, तुम्ही आपल्या प्रकाशनांत येणाऱ्या जीवन कथांचा उपयोग करू शकता. आपल्या टेहळणी बुरूजमध्ये “बायबलनं बदललं जीवन!” ही लेखमाला येते, त्यातील उदाहरणंही तुम्ही सांगू शकता. कदाचित तुमच्या मंडळीत असे बंधुभगिनी असतील ज्यांनी बायबलच्या मदतीनं यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी जीवनात मोठमोठे बदल केले आहेत. अशा बंधुभगिनींना आपला अनुभव सांगण्यासाठी तुम्ही विचारू शकता.
१५. आपल्या मुलांना शिकवण्यासाठी कोणती गोष्ट तुम्हाला मदत करेल?
१५ मुलांना शिकवताना आपल्या कल्पनाशक्तीचा चांगला वापर करा. यामुळे, तुमची शिकवण्याची पद्धत त्यांना कंटाळवाणी वाटणार नाही. मुलांना यहोवाबद्दल शिकताना आनंद मिळाला पाहिजे आणि त्यांना त्याच्या जवळ येण्यास मदत झाली पाहिजे. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून त्यांना शिकवा. ते मोठे झाले तरी त्यांना शिकवण्याचं सोडू नका. एका पित्याचं असं म्हणणं आहे, की तुम्ही जरी एका विषयावर पूर्वी चर्चा केली असेल, तरी त्या विषयाला एखाद्या वेगळ्या पद्धतीने शिकवण्याचा तुम्ही प्रयत्न करत राहिला पाहिजे.
यहोवाच्या पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करा आणि धीर दाखवा
१६. मुलांना शिकवताना धीर दाखवणं इतकं महत्त्वाचं का आहे? उदाहरण द्या.
१६ यहोवाच्या पवित्र आत्म्यामुळे तुमच्या मुलांना त्यांचा विश्वास मजबूत करण्यास मदत होईल. (गलती. ५:२२, २३) पण, यासाठी वेळ लागेल. त्यामुळे धीर दाखवा आणि आपल्या मुलांना शिकवत राहा. जपानमध्ये राहणारे एक पिता, ज्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे ते असं म्हणतात: “मी आणि माझ्या पत्नीनं मुलांवर खूप लक्ष दिलं. मुलं खूप लहान होती तेव्हापासूनच मी त्यांच्यासोबत दररोज १५ मिनिटं अभ्यास करायचो. फक्त सभांच्या दिवशी आम्ही अभ्यास करत नव्हतो. पंधरा मिनिटं काढणं आमच्यासाठी अवघड नव्हतं आणि मुलांनाही ते सहज जमायचं.” एका विभागीय पर्यवेक्षकाने असं लिहिलं: “तरुण असताना माझ्या मनात बरेच प्रश्न होते. त्यांपैकी काही मी विचारले पण काही मनातच ठेवले. काळासोबत मला माझ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळत गेली. कधी सभांमध्ये, कधी कौटुंबिक उपासनेत तर कधी वैयक्तिक अभ्यासादरम्यान. यामुळेच मला वाटतं की आईवडिलांनी आपल्या मुलांना नेहमी शिकवत राहणं खूप गरजेचं आहे.”
१७. आईवडिलांनी आपला स्वतःचा विश्वास मजबूत करत राहणं गरजेचं का आहे? एका जोडप्याने याबाबतीत चांगलं उदाहरण कसं मांडलं?
१७ तुमची मुलं जेव्हा पाहतात की तुमचा स्वतःचा यहोवावर भक्कम विश्वास आहे, तेव्हा त्यांनाही तुमच्या उदाहरणावरून बरंच काही शिकायला मिळतं. तुम्ही काय करता हे ते पाहत असतात. त्यामुळे, तुमचा विश्वास मजबूत करत राहा. यहोवासोबत तुमचं जवळचं नातं आहे आणि तुम्ही त्याला एक खरोखरची व्यक्ती मानता हे तुमच्या मुलांना दिसून आलं पाहिजे. बम्र्यूडा या ठिकाणी राहणाऱ्या एका जोडप्याचं याबाबतीत चांगलं उदाहरण आहे. जेव्हाही त्यांच्या जीवनात काही समस्या येतात किंवा त्यांना एखाद्या गोष्टीविषयी चिंता वाटते, तेव्हा ते आपल्या मुलींसोबत मिळून यहोवाला मार्गदर्शनासाठी प्रार्थना करतात. तसंच, ते त्यांच्या मुलींनाही प्रार्थना करण्याचं उत्तेजन देतात. त्यांनी असं म्हटलं: “आम्ही आमच्या मोठ्या मुलीला असं म्हणतो, ‘जास्त काळजी करू नकोस. यहोवावर पूर्ण भरवसा ठेव आणि त्याच्या सेवेवर आपलं लक्ष केंद्रित कर.’ आणि जेव्हा याचे चांगले परिणाम निघतात, तेव्हा तिची खात्री पटते की यहोवा नक्कीच आम्हाला साहाय्य करत आहे. ही एक खूप मोठी मदत ठरली आहे. कारण, यामुळे देवावर आणि बायबलवर तिचा विश्वास वाढला आहे.”
१८. आईवडिलांनी कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?
१८ आईवडिलांनो, हे नेहमी लक्षात असू द्या की तुम्ही आपल्या मुलांवर दबाव आणून त्यांचा विश्वास वाढवू शकत नाही. कारण, तुम्ही जरी रोप लावलं आणि त्याला पाणी घातलं, तरी फक्त यहोवाच आहे जो त्याला वाढवू शकतो. (१ करिंथ. ३:६) तेव्हा, तुम्हाला मिळालेल्या अमूल्य देणगीला अर्थात तुमच्या मुलांना, यहोवाबद्दल शिकवत राहण्यासाठी मेहनत घ्या. आणि यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या मदतीनं त्यांचा विश्वास मजबूत व्हावा म्हणून प्रार्थना करा. असं केल्यास तुम्ही खात्री बाळगू शकता की यहोवा नक्कीच तुमच्या प्रयत्नांवर आशीर्वाद देईल.—इफिस. ६:४.