व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“देवाचे वचन सजीव . . . आहे”

वाचकांचे प्रश्न

वाचकांचे प्रश्न

इब्री लोकांस ४:१२ मध्ये म्हटलं आहे की “देवाचे वचन सजीव, सक्रिय . . . असे आहे.” या ठिकाणी “देवाचे वचन” असं जे म्हटलं आहे ते काय आहे?

या वचनाचा मागचा पुढचा संदर्भ पाहिल्यास असं दिसून येतं, की या ठिकाणी प्रेषित पौल देवाने आपल्या उद्देशाबद्दल जो संदेश सांगितला त्याबद्दल बोलत होता. तो संदेश आज आपल्याला बायबलमध्ये पाहायला मिळतो.

बायबलमध्ये लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची जी ताकद आहे, त्याबद्दल आपल्या प्रकाशनांत सांगताना सहसा इब्री लोकांस ४:१२ या वचनाचा वापर केला जातो. आणि अशा प्रकारे त्याचा अर्थ लावणं अगदी योग्यच आहे. तरीदेखील, इब्री लोकांस ४:१२ या वचनाच्या इतरही पैलूंचा विचार केल्यास आपल्याला मदत होईल. पौल इब्री ख्रिश्चनांना देवाच्या उद्देशांच्या अनुषंगाने कार्य करण्यास आर्जवत होता. यांपैकी बरेच उद्देश पवित्र लिखानांत देण्यात आले होते. इजिप्तच्या दास्यातून सोडवण्यात आलेल्या इस्राएली लोकांच्या उदाहरणाचा या ठिकाणी पौलाने वापर केला. त्यांच्यासमोर “दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशांत,” जाण्याची आशा होती. तिथं ते खऱ्या अर्थानं जीवनाचा आनंद घेऊ शकणार होते, म्हणजेच ते ‘विसावा’ मिळवू शकणार होते.—निर्ग. ३:८; अनु. १२:९, १०.

इस्राएली लोकांकरता हा देवाचा उद्देश होता. पण, इस्राएली लोकांनी आपली मने कठीण केली आणि विश्वास दाखवला नाही. त्यामुळे, त्यांच्यापैकी बरेच इस्राएली वचन दिलेल्या देशात जाऊ शकले नाहीत. (गण. १४:३०; यहो. १४:६-१०) असं असलं तरीही “त्याच्या [देवाच्या] विसाव्यात येण्याविषयीचे वचन” अजूनही आहे असं पौलाने म्हटलं. (इब्री ३:१६-१९; ४:१) हे “वचन” देवाच्या उद्देशाचाच एक भाग आहे, असं म्हणता येईल. इब्री मधील ख्रिश्चनांप्रमाणे आपणसुद्धा या उद्देशाबद्दल जाणून घेऊ शकतो आणि त्याच्या अनुषंगाने चालू शकतो. या अभिवचनावर जोर देण्यासाठी पौलाने उत्पत्ति २:२ आणि स्तोत्र ९५:११ या वचनांतील काही भागांचा उल्लेख केला.

“त्याच्या [देवाच्या] विसाव्यात येण्याविषयीचे वचन अद्यापि देऊन ठेवलेले आहे,” म्हणजेच ते अजूनही आहे. ही गोष्ट खरंच आपल्याला दिलासा देते. बायबलमध्ये देवाच्या विसाव्यात प्रवेश करण्याविषयची जी आशा आहे, ती खरी असल्याची आपल्याला पूर्ण खात्री आहे. आणि त्यामुळेच त्यात प्रवेश करण्यासाठी आपण पाऊलंदेखील उचलली आहेत. मोशेच्या नियमशास्त्राचं पालन करून किंवा इतर कामांद्वारे देवाची स्वीकृती मिळवण्याचा आपण प्रयत्न केला नाही, तर विश्वास दाखवून आनंदाने देवाच्या उद्देशांच्या अनुषंगाने आपण चालत आलो आहोत. आणि पुढेही चालत राहण्याचा आपला निर्धार पक्का आहे. तसंच, जगभरात हजारो लोक बायबलचा अभ्यास करत आहेत आणि त्यात देवाच्या उद्देशांबद्दल जे सांगितलं आहे ते शिकत आहेत. यामुळे, अनेकांना आपल्या जीवनात बदल करण्याची, देवावर विश्वास ठेवण्याची आणि बाप्तिस्मा घेऊन यहोवाचा साक्षीदार बनण्याची प्रेरणा मिळाली आहे. या सर्व गोष्टी याचा पुरावा देतात की “देवाचे वचन सजीव, सक्रिय . . . असे आहे.” बायबलमध्ये देवाच्या उद्देशांबद्दल जे सांगितलं आहे, त्यामुळे आपल्या जीवनात अनेक परिवर्तन घडून आले आहेत. आणि पुढेही ‘देवाचे वचन’ आपल्या जीवनात सक्रियपणे कार्य करत राहील.