व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनापासून लाभ मिळवा

यहोवाकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनापासून लाभ मिळवा

मी घेतलेला योग्य निर्णय—पोलंडमधील एक अनुभव

“माझा बाप्तिस्मा झाला तेव्हा मी १५ वर्षांची होते. सहा महिन्यांनंतर मी लगेचच सहायक पायनियरिंग करायला सुरवात केली. मग एका वर्षानंतर मी पायनियर बनण्यासाठी फॉर्म भरला. जेव्हा माझं माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं तेव्हा राज्य प्रचारकांची जिथं जास्त गरज आहे अशा ठिकाणी जाऊन प्रचारकार्य करण्यासाठी मी अर्ज दिला. मी जिथं लहानाची मोठी झाले त्या छोट्याशा शहरापासून आणि जिच्यासोबत मी राहात होते त्या माझ्या आजीपासून मला दूर कुठंतरी जायचं होतं. माझी आजी यहोवाची साक्षीदार नव्हती. पण जेव्हा आमच्या विभागीय पर्यवेक्षकांनी मला सांगितलं की माझी नेमणूक त्याच शहरात करण्यात आली आहे ज्या ठिकाणी माझा जन्म झाला होता, तेव्हा मी फार निराश झाले. हे मी त्यांना जाणवू दिलं नाही. खाली मान घालून मी तिथून निघून गेले आणि विभागीय पर्यवेक्षकांनी सांगितलेल्या गोष्टीवर विचार करत राहिले. प्रचारकार्यात माझ्याबरोबर असलेल्या बहिणीला मी म्हटलं: ‘मला वाटतं मी योना संदेष्ट्यासारखं वागत आहे. पण शेवटी योना हा निनवेला गेला होता. म्हणून मीसुद्धा तिथंच जाऊन प्रचारकार्य करेन जिथं माझी नेमणूक करण्यात आली आहे.’”

“या शहरात मी मागील चार वर्षांपासून पायनियर सेवा करत आहे. इथं येऊन सेवाकार्य करण्याचा सल्ला मी लागू केला आणि मिळणारं मार्गदर्शन स्वीकारलं हे खरंच खूप शहाणपणाचं होतं हे आता मला जाणवतंय. इथं येण्यापूर्वी मी नकारात्मक विचार करत होते आणि तीच एक मोठी समस्या होती. पण आता मी आनंदी आहे. एका महिन्यात मी २४ बायबल अभ्यास चालवते! आणि पूर्वी मला विरोध करणाऱ्या माझ्या आजीसोबतही मी बायबल अभ्यास सुरू केला आहे. खरंच मी यहोवाची खूप-खूप आभारी आहे.”

घेतलेल्या निर्णयाचा चांगला परिणाम—फिजीमधील एक अनुभव

यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करणाऱ्या एका स्त्रीवर, अधिवेशनासाठी उपस्थित राहावं की आपल्या पतीसोबत नातेवाइकाच्या वाढदिवसाला जावं यांमध्ये निवड करण्याची वेळ आली. पत्नीने अधिवेशनाला जाण्यास आपली काही हरकत नाही असं पतीने सांगितलं. तिनेदेखील त्याला सांगितलं की ती अधिवेशन संपल्यानंतर वाढदिवसाच्या कार्यक्रमाला येईल. पण अधिवेशन संपल्यानंतर ती पुन्हा घरी आली. आणि विचार केला की तिच्या आध्यात्मिकतेला धोका निर्माण करतील अशा प्रकारच्या कार्यक्रमांना टाळणंच योग्य ठरेल. तिच्याबाबतीत तिथं न जाणंच योग्य राहील असा विचार करून ती त्या कार्यक्रमाला गेली नाही.

कार्यक्रमाच्या ठिकाणी तिच्या पतीने आपल्या नातेवाइकांना सांगितलं की त्याची पत्नी साक्षीदारांच्या अधिवेशनाला गेली आहे, आणि त्याच्या विनंतीवरून ती अधिवेशन संपल्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित राहील. तेव्हा त्यांनी त्याला म्हटलं, “ती येणार नाही; यहोवाचे साक्षीदार वाढदिवस साजरा करत नाहीत.” *

आपली पत्नी ती शिकत असलेल्या गोष्टींना, तिच्या विवेकाला आणि विश्वासाला धरून राहिली, त्यामुळे त्या पतीला तिचा खूप अभिमान वाटला. झाल्या प्रकारामुळे आपल्या पतीला आणि इतरांनादेखील त्या स्त्रीला साक्ष देता आली. याचा चांगला परिणाम म्हणजे त्या स्त्रीचा पती आता यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करतो आणि आपल्या पत्नीसोबत सभांनादेखील हजर राहतो.

^ परि. 7 १५ डिसेंबर २००१ च्या टेहळणी बुरूज अंकातील “वाचकांचे प्रश्न” पहा.