वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सुवार्तेचं समर्थन करणं
“परराष्ट्रीय, राजे व इस्राएलाची संतती यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे.” (प्रे. कृत्ये ९:१५) येशू ख्रिस्त या ठिकाणी प्रेषित पौलाबद्दल बोलत होता. तो एक यहुदी होता आणि नुकताच ख्रिस्ती बनला होता.
या वचनात “राजे” असं जे म्हटलं आहे त्यांपैकी रोमन सम्राट नीरो हादेखील एक होता. अशा वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर सत्याचं समर्थन करण्याची वेळ तुमच्यापुढे आली, तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही घाबरून जाल का? बायबल आपल्याला उत्तेजन देतं की आपण पौलाच्या उदाहरणाचं अनुकरण केलं पाहिजे. (१ करिंथ. ११:१) असं करण्याचा एक मार्ग म्हणजे, कायदा आणि न्यायव्यवस्थेच्या बाबतीत पौलाला जो अनुभव आला त्याचं परीक्षण करून त्याबाबतीत त्याचं अनुकरण करणं.
इस्राएल राष्ट्रात मोशेच्या नियमशास्त्राचं पालन केलं जायचं. आणि यहुद्यांना, मग ते कुठंही राहणारे असले तरी या नियमशास्त्रातील नैतिक दर्जांचं पालन करणं गरजेचं होतं. पण, इ.स. ३३ सालच्या पेन्टकॉस्टनंतर ख्रिश्चनांना मोशेचं नियमशास्त्र पाळण्याची गरज नव्हती. (प्रे. कृत्ये १५:२८, २९; गलती. ४:९-११) असं असलं, तरी पौलाने आणि इतर ख्रिश्चनांनी नियमशास्त्राची निंदा केली नाही. यामुळे, कुठलाही अडथळा न येता त्यांना बऱ्याच यहुदी लोकांना साक्ष देण्यास मदत झाली. (१ करिंथ. ९:२०) खरंतर, बऱ्याच वेळा पौल यहुद्यांच्या सभास्थानात जायचा आणि जे लोक अब्राहामाच्या देवाविषयी जाणून होते त्यांना साक्ष द्यायचा. त्यांच्यासोबत तो इब्री शास्त्रवचनांच्या आधारावर तर्कदेखील करायचा.—प्रे. कृत्ये ९:१९, २०; १३:५, १४-१६; १४:१; १७:१, २.
प्रेषितांनी यरुशलेममधूनच प्रचारकार्याची देखरेख करण्यास सुरवात केली. तसंच, ते नियमित रीत्या मंदिरात जाऊन लोकांना शिकवायचे. (प्रे. कृत्ये १:४; २:४६; ५:२०) एका प्रसंगी जेव्हा सुवार्ता घोषित करण्यासाठी पौल यरुशलेममध्ये गेला, तेव्हा त्याला कैद करण्यात आलं आणि त्याच्यावर न्यायिक कारवाई सुरू झाली. शेवटी त्याच कारणामुळे तो रोममध्ये पोचला.
पौल आणि रोमी कायदा
पौल ख्रिस्ती विश्वासाबद्दल जो प्रचार करत होता त्याबद्दल रोमी अधिकाऱ्यांचा कसा दृष्टिकोन असावा? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याआधी प्रथम आपण हे समजून घेतलं पाहिजे की रोमी लोकांचा धर्माबद्दल काय दृष्टिकोन होता. जोपर्यंत एखादा धर्म रोमी साम्राज्यासाठी किंवा नैतिक दर्जांसाठी धोका ठरत नव्हता, तोपर्यंत रोमी साम्राज्य कोणावरही तो धर्म सोडण्याचा दबाव आणत नव्हतं. प्रत्येकाला आपापला धर्म पाळण्याची मोकळीक होती.
धार्मिक कार्यांच्या बाबतीत यहुदी लोकांना रोमी साम्राज्यात बरीच मोकळीक दिली गेली होती. बॅग्राउंड्स ऑफ अर्ली ख्रिश्चीयानिटी या * रोमी कायद्यामुळे यहुद्यांना जे अधिकार मिळत होते त्यांचा उपयोग करून पौलाने रोमी अधिकाऱ्यांपुढे ख्रिस्ती विश्वासाचं समर्थन केलं.
पुस्तकात असं म्हटलं आहे: “रोमी साम्राज्यात यहुदी लोकांना बरेच विशेषाधिकार होते. यहुदी लोकांना आपला धर्म पाळण्याची पूर्णपणे मोकळीक होती. रोमी दैवतांची उपासना करण्याचा दबावही त्यांच्यावर नव्हता. यहुदी समाजात ते आपल्या स्वतःच्या धार्मिक नियमशास्त्रानुसार जीवन जगू शकत होते.” तसंच, त्यांना लष्करी सेवा करण्यापासूनही सूट मिळाली होती.पौलाच्या विरोधकांनी वेगवेगळ्या मार्गांचा उपयोग करून सामान्य लोकांना आणि अधिकाऱ्यांना पौलाच्या विरोधात उभं करण्याचा प्रयत्न केला. (प्रे. कृत्ये १३:५०; १४:२, १९; १८:१२, १३) पुढील एका घटनेचा विचार करा. पौलाविषयी यहुद्यांमध्ये अफवा पसरत आहे, हे यरुशलेममधील ख्रिस्ती वडिलांना समजलं. पौल लोकांना “मोशेचा त्याग करावयास शिकवत” आहे अशी अफवा यहुदी लोकांमध्ये पसरत चालली होती. यामुळे, जे यहुदी नवीनच ख्रिस्ती बनले होते त्यांच्यापैकी काहींना असा गैरसमज होऊ शकत होता, की पौल हा देवाच्या व्यवस्थेचा आदर करत नाही. तसंच, यहुद्यांच्या न्यायसभेत ख्रिस्ती धर्माला त्यांच्या धर्मातून निघालेला एक धर्मत्यागी गट म्हणून ठरवलं जाऊ शकत होतं. असं जर झालं असतं तर जे यहुदी लोक ख्रिस्ती लोकांसोबत सहवास राखत होते त्यांना शिक्षा झाली असती. त्यांना समाजातून बहिष्कृत करण्यात आलं असतं आणि मंदिरात किंवा सभास्थानात प्रचार करण्यापासून त्यांना रोखण्यात आलं असतं. याच कारणांमुळे, मंडळीतील वडिलांनी पौलाला सांगितलं की त्याने मंदिरात जावं आणि त्याच्याविरुद्ध पसरवण्यात आलेली अफवा खोटी आहे हे सिद्ध करावं. यासाठी त्यांनी पौलाला असं काहीतरी करण्यास सांगितलं जे करण्याची खरंतर ख्रिश्चनांना गरज नव्हती; पण असं करणं देवाच्या तत्त्वांच्या विरोधातही नव्हतं.—प्रे. कृत्ये २१:१८-२७.
मंडळीतील वडिलांच्या म्हणण्यानुसार पौलाने केलं. त्यामुळे, ‘सुवार्तेचं समर्थन करण्यासाठी आणि तिला कायदेशीर मान्यता मिळावी’ यासाठी पौलाला अनेक संधी मिळाल्या. (फिलिप्पै. १:७) यरुशलेममधील मंदिरात यहुदी लोकांनी मोठा दंगा केला. पौलाला जिवे मारण्याची त्यांची इच्छा होती, पण रोमी सेनापतीने पौलाला कैद केलं आणि आपल्या ताब्यात घेतलं. जेव्हा पौलाला चाबकाने फटके मारण्यासाठी नेण्यात येत होतं, तेव्हा आपण एक रोमी नागरिक असल्याचं पौलाने सांगितलं. त्यामुळे, त्याला कैसरीयामध्ये नेण्यात आलं. तिथूनच रोमी लोक यहूदाचा राज्यकारभार चालवत होते. त्या ठिकाणी त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर देखील ठामपणे साक्ष देण्याची संधी मिळणार होती. त्यामुळे, ख्रिस्ती धर्माबद्दल जास्त माहिती नसलेल्यांनाही साक्ष मिळणार होती.
प्रेषितांची कृत्ये याच्या २४ व्या अध्यायात फेलिक्स नावाच्या अधिकाऱ्यासमोर पौलावर जी न्यायिक कारवाई चालवण्यात आली, तिचा उल्लेख करण्यात आला आहे. यहूदाच्या या रोमी सुभेदाराने ख्रिस्ती विश्वासाबद्दल आधीच थोडंफार ऐकलं होतं. पौलाने कमीतकमी तीन पद्धतींनी कायद्याचा भंग केला आहे, असा आरोप यहुद्यांनी त्याच्यावर लावला. त्यांचं म्हणणं होतं की पौल रोमी साम्राज्यातील सर्व यहुदी लोकांमध्ये बंडखोरीची वृत्ती पसरवत आहे; तो समाजासाठी आणि साम्राज्यासाठी घातक ठरेल अशा एका पंथाचं नेतृत्व करत आहे आणि त्याने मंदिराला अपवित्र करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या वेळी यरुशलेमचं मंदिर रोमी साम्राज्याच्या आधिकाराखाली होतं. (प्रे. कृत्ये २४:५, ६) हे आरोप इतके गंभीर होते की ते सिद्ध झाल्यास पौलाला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली जाऊ शकत होती.
पौलाने त्याच्यावर लावलेल्या या खोट्या आरोपांविरुद्ध ज्या प्रकारे न्यायिक लढा दिला, त्यावरून आजचे ख्रिस्ती बरंच काही शिकू शकतात. पौलाने नेहमी शांत रितीने परिस्थिती हाताळली आणि इतरांशी बोलताना तो आदरानं बोलला. त्याने नियमशास्त्राचा आणि संदेष्ट्यांच्या लिखाणांचा उल्लेख केला. तसंच ‘त्याच्या पूर्वजांच्या देवाची’ सेवा करण्याचा त्याला अधिकार असल्याचंही तो म्हणाला. हा अधिकार रोमी साम्राज्यात असलेल्या सर्व यहुद्यांना होता. (प्रे. कृत्ये २४:१४) कालांतराने, फेलिक्सनंतर झालेला राज्यपाल पुर्क्य फेस्त आणि राजा हेरोद अग्रिप्पा यांच्यासमोर देखील पौलाला आपल्या विश्वासाचं समर्थन करण्याची आणि सुवार्ता गाजवण्याची संधी मिळाली.
शेवटी, आपल्याला योग्य न्याय मिळावा यासाठी त्या काळातील सर्वात शक्तिशाली रोमी शासकाकडे, कैसराकडे आपला खटला चालवला जावा अशी पौलाने मागणी केली. तो म्हणाला: “मी कैसराजवळ न्याय मागतो.”—प्रे. कृत्ये २५:११.
पौलाचा खटला कैसरासमोर चालवला जातो
एका देवदूताने नंतर पौलाला सांगितलं, “तुला कैसरापुढे उभे राहिले पाहिजे.” (प्रे. कृत्ये २७:२४) रोमी शासक नीरो याने आपल्या कारकिर्दीच्या सुरवातीलाच हे स्पष्ट केलं होतं, की सर्वच न्यायिक खटले तो स्वतः वैयक्तिक रीत्या हाताळणार नाही. म्हणून आपल्या शासन काळाच्या सुरवातीच्या आठ वर्षांमध्ये त्याने न्याय करण्यासाठी बरेच खटले इतरांवर सोपवून दिले. द लाईफ अॅन्ड एपिस्टल्स ऑफ सेंट पौल या पुस्तकात असं म्हटलं आहे, की जेव्हा नीरोने न्याय करण्यासाठी खटला त्याच्याकडे घेतला, तेव्हा त्याने तो खटला स्वतःच्या राजवाड्यात चालवला. खटल्याच्या सुनावणीदरम्यान त्याच्यासोबत इतरांवर मोठा प्रभाव असलेले व अनुभवी असे त्याचे सल्लागारदेखील होते.
रोम. १३:१-७; तीत ३:१, २) पौलाने वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सुवार्तेचं केलेलं समर्थन आणि युक्तीवाद यशस्वी ठरला असं म्हणता येईल. कारण, कैसराच्या न्यायसभेनं पौलाला निर्दोष घोषित केलं आणि त्याला कैदेतून मुक्त केलं.—फिलिप्पै. २:२४; फिले. २२.
पौलाचा खटला नीरोने स्वतः ऐकून घेतला की यासाठी त्याने दुसऱ्या एखाद्याला नेमून खटल्याची माहिती पुरवण्यास सांगितलं, याविषयी बायबलमध्ये काहीही सांगण्यात आलेलं नाही. पण या दोन्हीही परिस्थितींत पौलाने आपली बाजू ठामपणे मांडली असेल याची खात्री आपण बाळगू शकतो. आपण यहुद्यांच्या देवाचीच उपासना करतो आणि रोमी शासनाला लोकांनी योग्य आदर दाखवावा यासाठी त्यांना आर्जवतो हे त्याने स्पष्ट केलं असेल. (सुवार्तेचं समर्थन करण्याची आपली जबाबदारी
येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं: “तुम्हाला माझ्यामुळे देशाधिकारी व राजे यांच्यापुढे नेण्यात येईल, आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल.” (मत्त. १०:१८) अशा प्रकारे येशूविषयी साक्ष देणं हादेखील एक बहुमानच आहे. सुवार्तेचं समर्थन करण्यासाठी आपण जी मेहनत घेतो त्यामुळे आपल्याला कायदेशीर गोष्टींमध्ये विजय मिळवणं शक्य होतं. हे खरं आहे, की अपरिपूर्ण मानवांनी केलेल्या न्यायामुळे राज्याची सुवार्ता पूर्णपणे कायदेशीर रीत्या स्थापित होतेच असं नाही. कारण फक्त देवाचं राज्यच दबावाला, होणाऱ्या विरोधाला आणि अन्यायाला पूर्णपणे काढून टाकू शकतं.—उप. ८:९; यिर्म. १०:२३.
तरी, जेव्हा आपण सुवार्तेचं समर्थन करतो तेव्हा यहोवाच्या नावाचा महिमा होतो. पौलाप्रमाणेच आपणदेखील प्रामाणिक असलं पाहिजे, परिस्थिती शांततेनं हाताळली पाहिजे आणि आपला विश्वास पटवून दिला पाहिजे. येशू ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना सांगून ठेवलं होतं की आपला बचाव कसा करावा याविषयी त्यांना आधीच काळजी करण्याची गरज नाही. कारण, तो त्यांना असे शब्द व अशी बुद्धी देईल की ज्यामुळे विरोधकांना त्यांचा विरोध करायला किंवा त्यांच्याविरुद्ध बोलायला मुळीच जमणार नाही.—लूक २१:१४, १५; २ तीम. ३:१२; १ पेत्र ३:१५.
जेव्हा खरे ख्रिस्ती राजांपुढे, राज्यपालांपुढे किंवा इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सुवार्तेचं आणि आपल्या ख्रिस्ती विश्वासाचं समर्थन करतात, तेव्हा अशा लोकांना सुवार्ता सांगण्याची खरंतर ती एक मौल्यवान संधीच असते. कारण अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून सुवार्ता सांगणं फार कठीण आहे. काही न्यायालयीन खटल्यांमध्ये मिळालेल्या यशामुळे, कायद्यातील काही तरतुदींचं पुन्हा परीक्षण करून त्यात फेरबदल केले गेले. त्यामुळे विचार व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्याचं आणि उपासना करण्याच्या अधिकाराचं संरक्षण झालं आहे. पण अशा प्रकारच्या न्यायालयीन लढ्यांचा निकाल काहीही लागला, तरी अशा कठीण प्रसंगातही देवाचे सेवक दाखवत असलेल्या धैर्यामुळे आणि विश्वासामुळे यहोवा देवाला नक्कीच आनंद होतो.
^ परि. 8 जेम्स पार्क्स नावाच्या एका लेखकानं असं लिहिलं: “यहुदी लोकांना त्यांच्या धार्मिक विधींचं पालन करण्याचा पूर्ण अधिकार होता. अशा प्रकारे अधिकार देणं रोमी लोकांसाठी काही वेगळं नव्हतं. कारण आपल्या साम्राज्यातील लोकांना होता होईल तितकं स्वातंत्र्य देण्याची रोमी लोकांची रीत होती.”