टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) सप्टेंबर २०१७

या अंकात, २३ ऑक्टोबर-२६ नोव्हेंबर २०१७ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

आत्मसंयम विकसित करा

बायबलमधली उदाहरणं आपल्याला आत्मसंयम विकसित करण्यास आणि आपल्या जीवनात तो गुण दाखवण्यास कशी मदत करू शकतात? ख्रिश्चनांनी हा गुण विकसित का केला पाहिजे?

यहोवाच्या कनवाळूपणाचं अनुकरण करा

एका प्रसंगी, मोशेला स्वतःची ओळख करून देताना यहोवाने आपलं नाव आणि आपले काही गुण सांगितले. त्या वेळी, सगळ्यात आधी त्याने ज्या गुणाचा उल्लेख केला तो म्हणजे कनवाळूपणा. कनवाळूपणा म्हणजे का? आणि त्याबद्दल तुम्ही अधिक जाणून का घेतलं पाहिजे?

जीवन कथा

मला आध्यात्मिक बांधवांसोबत काम करण्याची सुसंधी लाभली

ब्रुकलीन बेथेलमध्ये ६१ वर्षं विश्वासू बंधुभगिनींसोबत सेवा करताना डेव्हिड सिंक्लेअर यांनी अनुभवलेल्या काही आनंददायक क्षणांच्या आठवणींना उजाळा देतात.

“आपल्या देवाचे वचन सर्वकाळ कायम राहते”

बायबलचं लिखाण होऊन कित्येक शतके उलटली असतानाही, भाषेत व राजकीय क्षेत्रात बदल झाला असतानाही आणि बायबलच्या भाषांतराला विरोध झाला असतानाही आजसुद्धा बायबलला सर्वाधिक मागणी आहे.

“देवाचे वचन जिवंत व प्रभावशाली” आहे

देवाच्या वचनाचा अभ्यास केल्यामुळे अनेकांनी आपल्या जीवनात अनेक मोठे बदल केले आहेत. देवाच्या वचनाचा आपल्या जीवनावर प्रभाव व्हावा असं वाटत असल्यास काय करण्याची गरज आहे?

“हिंमत बांध, धैर्य धर आणि हे कार्य कर”

आपल्याला धैर्याची गरज का आहे, आणि हा गुण आपण कसा विकसित करू शकतो?