व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आत्मसंयम विकसित करा

आत्मसंयम विकसित करा

“आत्म्याचे फळ म्हणजे . . . आत्मसंयम.”—गलती. ५:२२, २३.

गीत क्रमांक: ५२, २६

१, २. (क) आत्मसंयम नसल्याचे काय परिणाम होऊ शकतात? (ख) आत्मसंयम या गुणावर चर्चा करणं का गरजेचं आहे?

आत्मसंयम हा गुण विकसित करण्यास यहोवा देव आपल्याला मदत करू शकतो. (गलती. ५:२२, २३) यहोवा पूर्णार्थाने आत्मसंयम दाखवतो. पण, आपण मात्र अपरिपूर्ण असल्यामुळे आत्मसंयम दाखवण्यात कमी पडतो. खरंतर, मानवांच्या बहुतेक समस्यांसाठी त्यांचा असंयमीपणाच जबाबदार आहे. आत्मसंयम नसल्यामुळे, एखादी व्यक्ती महत्त्वाचं काम करण्यास उशीर लावते किंवा शाळेत अथवा कामात तिचं लक्ष लागत नाही. संयम सोडून वागल्यामुळे शिवीगाळ, दारूबाजी, हिंसाचार, घटस्फोट, कर्जबाजारीपणा, व्यसन, तुरुंगवास, भावनिक दुःख, अनैतिक लैंगिक कृत्यांमुळे होणारे रोग आणि नको असलेली गर्भधारणा यांसारख्या गोष्टी घडू शकतात.—स्तो. ३४:११-१४.

आत्मसंयम न दाखवणारे लोक सहसा स्वतःवर आणि इतरांवरही संकट ओढवून घेतात. आज लोकांमधला संयम दिवसेंदिवस कमी होत चालल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. अर्थात, या गोष्टीचं आपल्याला नवल वाटू नये. कारण, संयमाचा अभाव हा आपण “शेवटल्या दिवसांत” जगत असल्याचाच एक पुरावा असेल, असं बायबलमध्ये आधीच सांगण्यात आलं होतं.—२ तीम. ३:१-३.

३. आपल्याला आत्मसंयम दाखवण्याची गरज का आहे?

आपल्याला आत्मसंयम दाखवण्याची गरज का आहे? याची दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे, जे लोक आपल्या भावनांवर ताबा मिळवू शकतात त्यांना सहसा कमी समस्यांना तोंड द्यावं लागतं. तसंच, इतरांसोबत चांगले नातेसंबंध राखणं आणि राग, चिंता व निराशा यांसारख्या भावना टाळणंही त्यांना सोपं जातं. दुसरं कारण म्हणजे, मोहांचा प्रतिकार केल्यामुळे आणि चुकीच्या इच्छांवर ताबा मिळवल्यामुळे आपल्याला देवासोबतची मैत्री टिकवून ठेवणं शक्य होतं. आदाम आणि हव्वा नेमकं हेच करण्यात कमी पडले होते. (उत्प. ३:६) त्यांच्याप्रमाणेच, आत्मसंयम न दाखवल्यामुळे आज अनेक जण गंभीर समस्यांना तोंड देत आहेत.

४. चुकीच्या इच्छांवर ताबा मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या व्यक्तीला कशामुळे धीर मिळू शकतो?

आपण अपरिपूर्ण आहोत आणि त्यामुळे आत्मसंयम दाखवण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो या गोष्टीची यहोवाला पुरेपूर जाणीव आहे. म्हणूनच, चुकीच्या इच्छांवर ताबा मिळवण्यासाठी आपल्याला मदत करण्याची त्याची इच्छा आहे. (१ राजे ८:४६-५०) काही वेळा आपल्या भावनांवर आणि इच्छांवर ताबा मिळवणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. अशा वेळी, एका जिवलग मित्राप्रमाणे यहोवा प्रेमळपणे आपल्याला धीर देतो. या लेखात आपण, आत्मसंयम दाखवण्याच्या बाबतीत यहोवाच्या सर्वोत्तम उदाहरणाचं परीक्षण करणार आहोत. तसंच, बायबलमधल्या काही चांगल्या आणि वाईट उदाहरणांवरही आपण चर्चा करणार आहेत. आणि शेवटी, आत्मसंयम बाळगण्यास कोणत्या व्यावहारिक गोष्टी आपल्याला मदत करू शकतात याचंही आपण परीक्षण करणार आहोत.

यहोवा सर्वोत्तम उदाहरण मांडतो

५, ६. आत्मसंयम दाखवण्याच्या बाबतीत यहोवाने आपल्यासमोर कोणतं उदाहरण मांडलं आहे?

यहोवा पूर्णार्थाने आत्मसंयम दाखवतो, कारण तो प्रत्येक बाबतीत परिपूर्ण आहे. (अनु. ३२:४) आपण मात्र अपरिपूर्ण आहोत. असं असलं, तरी आत्मसंयम दाखवण्याच्या बाबतीत यहोवाचं जवळून अनुकरण करता यावं म्हणून त्याच्या उदाहरणाचं परीक्षण करणं गरजेचं आहे. असं केल्यास, आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडतात तेव्हा योग्य प्रकारे कसं वागावं हे आपल्याला समजेल. यहोवाने आत्मसंयम कसा दाखवला याची काही उदाहरणं आता आपण पाहू.

सैतानाने एदेन बागेत यहोवाविरुद्ध बंड केलं तेव्हा यहोवाने कशी प्रतिक्रिया दाखवली त्यावर विचार करा. सैतानाने लावलेल्या आरोपांमुळे देवाच्या स्वर्गातील विश्वासू सेवकांना नक्कीच धक्का बसला असेल आणि त्यांना भयंकर राग व तिरस्कारही वाटला असेल. सैतानामुळे किती दुःखद परिणाम घडून आले याचा विचार केल्यावर तुम्हालाही कदाचित तसंच वाटत असेल. पण, यहोवाने मात्र उतावीळपणे प्रतिक्रिया दाखवली नाही. त्याने अगदी योग्य असं उत्तर दिलं. यहोवा मंदक्रोध आहे आणि सैतानाने केलेल्या बंडाच्या बाबतीत तो न्यायीपणे वागत आला आहे. (निर्ग. ३४:६; ईयो. २:२-६) यहोवा असं का वागला? कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर “सगळ्यांनी पश्‍चात्ताप करावा असे त्याला वाटते” आणि म्हणूनच त्याने वेळ जाऊ दिला आहे.—२ पेत्र ३:९.

७. यहोवाच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

आत्मसंयमाच्या बाबतीत, यहोवाच्या उदाहरणावरून आपण हे शिकतो, की कोणतीही गोष्ट बोलण्याआधी आपण काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. तसंच, आपण कधीही उतावीळपणे प्रतिक्रिया देऊ नये. एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागतो, तेव्हा विचार करण्यासाठी स्वतःला पुरेसा वेळ द्या. योग्य ते बोलण्यासाठी आणि करण्यासाठी आपल्याला बुद्धी द्यावी अशी यहोवाला विनंती करा. (स्तो. १४१:३) आपल्याला राग येतो किंवा कोणी आपलं मन दुखावतं तेव्हा सहसा आपण लगेच प्रतिक्रिया देतो. आणि म्हणूनच आपल्यापैकी अनेकांना, विचार न करता बोलून गेलेल्या किंवा केलेल्या गोष्टींचा नंतर पस्तावा झाला आहे.—नीति. १४:२९; १५:२८; १९:२.

देवाच्या सेवकांची काही चांगली आणि वाईट उदाहरणं

८. (क) आत्मसंयम दाखवलेल्यांची चांगली उदाहरणं आपल्याला कुठे वाचायला मिळू शकतात? (ख) कोणत्या गोष्टीने योसेफला मोहाचा प्रतिकार करण्यास मदत केली? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

बायबलमधली कोणती उदाहरणं आत्मसंयम दाखवण्याच्या महत्त्वावर भर देतात? तुम्ही कदाचित याकोबचा मुलगा, योसेफ याचा विचार कराल. फारोच्या पहारेकऱ्यांचा प्रमुख, पोटीफर याच्या घरात काम करत असताना योसेफने मोहाचा प्रतिकार केला होता. “योसेफ हा बांधेसूद व देखणा” असल्यामुळे पोटीफरची बायको त्याच्याकडे आकर्षित झाली आणि त्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न करत राहिली. पण, कोणत्या गोष्टीने योसेफला त्या मोहाचा प्रतिकार करण्यास मदत केली? आपण मोहाला बळी पडलो, तर पुढे किती भयंकर परिणाम घडून येतील याचा कदाचित त्याने पुरेसा विचार केला असेल. त्यामुळे, नंतर पोटीफरच्या बायकोने त्याचे कपडे धरून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो तिच्यापासून पळून गेला. तो म्हणाला: “एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू?”—उत्प. ३९:६, ९; नीतिसूत्रे १:१० वाचा.

९. मोहाचा प्रतिकार करण्यासाठी तुम्ही पुरेशी तयारी कशी करू शकता?

योसेफच्या उदाहरणावरून आपल्याला काय शिकायला मिळतं? हेच, की आपल्याला कधी देवाच्या आज्ञा मोडण्याचा मोह झाला, तर आपण त्याचा प्रतिकार केला पाहिजे. काहींना यहोवाचे साक्षीदार होण्याआधी खादाडपणा, दारूबाजी, धूम्रपान, ड्रग्ज, अनैतिक लैंगिक कृत्यं किंवा यांसारख्या इतर समस्यांवर मात करण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. पण, बाप्तिस्मा झाल्यानंतरही या गोष्टी करण्याचा कधीकधी त्यांना मोह होऊ शकतो. तुमच्या बाबतीत असं झाल्यास, मोहाला बळी पडल्यामुळे यहोवासोबतच्या तुमच्या नातेसंबंधावर कसा परिणाम होईल, याचा पुरेसा विचार करा. तुम्हाला मोहात पाडू शकतील अशा परिस्थिती ओळखा आणि त्या कशा टाळता येतील याचा आधीच विचार करा. (स्तो. २६:४, ५; नीति. २२:३) तुमच्या विश्वासाची परीक्षा घेणारा असा एखादा प्रसंग तुमच्यासमोर आला, तर मोहाचा प्रतिकार करता यावा म्हणून बुद्धीसाठी आणि आत्मसंयमासाठी यहोवाला प्रार्थना करा.

१०, ११. (क) आज अनेक ख्रिस्ती तरुणांना शाळेत कशाचा सामना करावा लागतो? (ख) कोणती गोष्ट तरुणांना, देवाच्या आज्ञा मोडण्याच्या दबावाचा प्रतिकार करण्यास मदत करू शकते?

१० योसेफच्या बाबतीत घडलं तसंच आज अनेक ख्रिस्ती तरुणांसोबत घडतं. किम नावाच्या आपल्या एका बहिणीचंच उदाहरण घ्या. शनिवारी-रविवारी शाळेला सुट्टी असली, की तिचे बहुतेक वर्गसोबती सहसा लैंगिक संबंध ठेवायचे आणि त्याबद्दल शाळेत आल्यावर बढाईसुद्धा मारायचे. पण, किमकडे असं काहीच बोलण्यासारखं नसायचं. ती म्हणते, इतरांपेक्षा वेगळं वागल्यामुळे काही वेळा मला “एकटं पडल्यासारखं वाटायचं.” किम डेटिंग करत नसल्यामुळे तिचे वर्गसोबती तिला मूर्ख समजायचे. पण, किमने घेतलेला निर्णय सुज्ञच होता. कारण, तरुण असताना लैंगिक संबंध ठेवण्याचा मोह खूप प्रबळ असू शकतो, हे तिला चांगलं माहीत होतं. (२ तीम. २:२२) ‘तू अजूनही सेक्सचा अनुभव घेतला नाहीस!’ असं इतर विद्यार्थी तिला नेहमी विचारायचे. पण आपण असं का केलं नाही हे सांगण्याची संधी त्यामुळे किमला मिळायची. अनैतिक लैंगिक कृत्यं करण्याच्या दबावाचा ठामपणे प्रतिकार करणाऱ्या अशा तरुण ख्रिश्चनांचा आम्हाला तर अभिमान वाटतोच; पण, यहोवालासुद्धा त्यांचा खूप अभिमान वाटतो!

११ बायबलमध्ये अशाही काही लोकांची उदाहरणं आहेत, ज्यांनी अनैतिक लैंगिक कृत्यं करण्याच्या मोहाचा प्रतिकार केला नाही. तसंच, आत्मसंयम न बाळगल्यामुळे किती वाईट परिणाम घडू शकतात हेसुद्धा बायबलमध्ये सांगितलं आहे. आधी उल्लेख केलेली आपली बहीण किम ज्या परिस्थितीत होती, तशी परिस्थिती कधी तुमच्यासमोर आली, तर नीतिसूत्रे अध्याय ७ मध्ये उल्लेख केलेल्या मूर्ख तरुण मनुष्याच्या उदाहरणाचा विचार करा. तसंच, अम्नोनचा आणि त्याच्या वाईट वर्तनामुळे घडून आलेल्या भयंकर परिणामांचाही विचार करा. (२ शमु. १३:१, २, १०-१५, २८-३२) बायबलमधल्या अशा उदाहरणांची कौटुंबिक उपासनेत चर्चा करून आईवडील आपल्या मुलांना प्रेमसंबंधांच्या बाबतीत आत्मसंयम आणि सुज्ञपणा विकसित करण्यास मदत करू शकतात.

१२. (क) आपल्या भावांना भेटताना योसेफने आपल्या भावना कशा आवरल्या? (ख) आपण कोणत्या परिस्थितींत आपल्या भावनांवर ताबा ठेवला पाहिजे?

१२ आत्मसंयम दाखवण्याच्या बाबतीत योसेफने आणखी एका प्रसंगी चांगलं उदाहरण मांडलं. त्याचे भाऊ अन्नधान्य विकत घेण्यासाठी मिसर देशात आले तेव्हाचा तो प्रसंग होता. आपल्या भावांच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी योसेफने सुरुवातीला त्यांना आपली ओळख दाखवली नाही. आणि जेव्हा त्याला आपल्या भावना अनावर झाल्या, तेव्हा त्या लपवण्यासाठी तो त्यांच्यापासून दूर गेला आणि रडला. (उत्प. ४३:३०, ३१; ४५:१) आज मंडळीतल्या एखाद्या भावाने किंवा बहिणीने तुमचं मन दुखावलं, तर आत्मसंयम दाखण्याच्या बाबतीत योसेफच्या उदाहरणाचं अनुकरण करा. त्यामुळे, नंतर पस्तावा होईल असं काहीही न बोलण्यास किंवा करण्यास तुम्हाला मदत होईल. (नीति. १६:३२; १७:२७) किंवा मग, तुमच्या नातेवाइकांपैकी एखादी व्यक्ती बहिष्कृत झालेली असेल. अशा वेळी, तिच्यासोबत अनावश्यक संपर्क टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या भावनांवर ताबा ठेवावा लागेल. अर्थात, असं करणं सोपं नाही. पण, आपण यहोवाच्या उदाहरणाचं अनुकरण करत आहोत आणि त्याच्या आज्ञांचं पालन करत आहोत, हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला ते कठीण वाटणार नाही.

१३. दावीद राजाच्या उदाहरणावरून आपल्याला कोणते धडे शिकायला मिळतात?

१३ दावीद राजाच्या उदाहरणातूनही आपण बरंच काही शिकू शकतो. शौल आणि शिमी यांनी दावीदला चिथवलं तेव्हा तो रागाने पेटून उठला नाही किंवा त्यांच्याविरुद्ध त्याने आपल्या अधिकाराचा वापर केला नाही. (१ शमु. २६:९-११; २ शमु. १६:५-१०) पण, दावीदने नेहमीच आत्मसंयम दाखवला असं नाही. ही गोष्ट, त्याने बथशेबासोबत केलेल्या अनैतिक कृत्यावरून आणि लोभी नाबालच्या बाबतीत दाखवलेल्या प्रतिक्रियेवरून दिसून येते. (१ शमु. २५:१०-१३; २ शमु. ११:२-४) दावीदच्या उदाहरणावरून आपण काही महत्त्वपूर्ण धडे शिकू शकतो. पहिला म्हणजे, देवाच्या लोकांमध्ये देखरेखीचं काम करणाऱ्या बांधवांकडून त्यांच्या अधिकाराचा गैरवापर होऊ नये म्हणून त्यांनी आत्मसंयम दाखवण्याची विशेष गरज आहे. दुसरा धडा म्हणजे, आपण कधीच कुठल्या मोहाला बळी पडणार नाही असा फाजील आत्मविश्वास बाळगू नये.—१ करिंथ. १०:१२.

आपण करू शकतो अशा व्यावहारिक गोष्टी

१४. एका बांधवाला कोणता अनुभव आला? आणि अशा प्रसंगी आपण दाखवत असलेली प्रतिक्रिया महत्त्वाची का आहे?

१४ आत्मसंयम वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? एक खरा प्रसंग विचारात घ्या. लुईजे नावाच्या एका बांधवाच्या कारला एका गाडीने मागून धडक दिली. हा अपघात खरंतर दुसऱ्या वाहनचालकामुळे झाला होता. पण, तो वाहनचालक उलट लुईजेवरच ओरडू लागला आणि त्याच्याशी भांडण करू लागला. लुईजेने मात्र शांत राहण्यासाठी यहोवाला प्रार्थना केली आणि त्या वाहनचालकालाही शांत करण्याचा प्रयत्न केला. पण, तरी तो मनुष्य ओरडतच राहिला. त्यामुळे मग, लुईजेने इन्शुअरन्ससाठी त्या मनुष्याच्या गाडीचा नंबर लिहून घेतला आणि तो ओरडत असताना तिथून निघून गेला. एका आठवड्यानंतर, लुईजे एका स्त्रीची पुनर्भेट घेत असताना त्याला समजलं, की तो वाहनचालक त्या स्त्रीचा पती आहे. त्या मनुष्याला आपल्या वाईट वागणुकीची खूप लाज वाटली आणि त्याने लुईजेची माफी मागितली. लुईजेला लवकरात लवकर त्याची कार दुरुस्त करता यावी, म्हणून आपण स्वतः लुईजेच्या इन्शुअरन्स कंपनीशी संपर्क साधू असं तो म्हणाला. तसंच तो बायबलच्या चर्चेतही सहभागी झाला आणि त्याला ती चर्चा खूप आवडली. या अनुभवामुळे लुईजेच्या लक्षात आलं, की अपघात झाला तेव्हा आपण शांत राहिलो हे खरंच किती बरं झालं; याउलट, आपण रागावलो असतो तर परिणाम किती वाईट झाले असते हेही त्याच्या लक्षात आलं.२ करिंथकर ६:३, ४ वाचा.

आपल्या प्रतिक्रियेचा आपल्या सेवाकार्यावर परिणाम होतो (परिच्छेद १४ पाहा)

१५, १६. बायबलच्या अभ्यासामुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आत्मसंयम वाढवण्यास कशी मदत होऊ शकते?

१५ बायबलचा नियमित आणि सखोल अभ्यास केल्याने आपल्याला आत्मसंयम विकसित करण्यास मदत होऊ शकते. यहोवा देव यहोशवाला काय म्हणाला ते लक्षात घ्या. तो म्हणाला: “नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे; त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशःप्राप्ती घडेल.” (यहो. १:८) पण, बायबलच्या अभ्यासामुळे तुम्हाला आत्मसंयम वाढवण्यास किंवा विकसित करण्यास कशी मदत होऊ शकते?

१६ आत्मसंयम बाळगल्यामुळे कसा फायदा होतो आणि तो न बाळगल्यामुळे किती नुकसान होतं हे आपण बायबलमधल्या काही उदाहरणांवरून पाहिलं. यहोवाने ही उदाहरणं एका खास उद्देशानेच बायबलमध्ये नमूद केली आहेत. (रोम. १५:४) त्यामुळे ती वाचणं, त्यांचा अभ्यास करणं आणि त्यांवर सखोल विचार करणं सुज्ञतेचं ठरेल. असं करताना, ही उदाहरणं तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कशी लागू होऊ शकतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. बायबलचा सल्ला लागू करता यावा म्हणून मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करा. जीवनाच्या एखाद्या क्षेत्रात आत्मसंयम दाखवण्यात आपण कमी पडत आहोत असं जर तुमच्या लक्षात आलं, तर ते मान्य करा. मग त्याबद्दल यहोवाला प्रार्थना करा आणि त्या बाबतीत स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा कसोशीने प्रयत्न करा. (याको. १:५) तसंच, व्यावहारिक सल्ला मिळवण्यासाठी आपल्या प्रकाशनांमध्ये संशोधनही करा.

१७. पालक कोणकोणत्या मार्गांनी आपल्या मुलांना आत्मसंयम विकसित करण्यास मदत करू शकतात?

१७ तुम्ही तुमच्या मुलांना आत्मसंयम विकसित करण्यास कशी मदत करू शकता? पालकांना चांगल्या प्रकारे माहीत असतं, की आत्मसंयम हा गुण मुलांना जन्मतःच मिळत नाही. त्यामुळे, असे चांगले गुण पालकांनी स्वतःच्या उदाहरणातून मुलांना शिकवले पाहिजेत. (इफिस. ६:४) तुमची मुलं आत्मसंयम दाखवण्यात कमी पडत आहेत असं दिसून आल्यास स्वतःला विचारा, की या बाबतीत आपण स्वतः त्यांच्यासमोर चांगलं उदाहरण मांडत आहोत का? नियमितपणे सेवाकार्यात सहभाग घेण्याद्वारे, सभांना उपस्थित राहण्याद्वारे आणि कौटुंबिक अभ्यास चालवण्याद्वारे तुम्ही त्यांच्यासमोर चांगलं उदाहरण मांडू शकता. गरज पडल्यास, एखाद्या गोष्टीसाठी मुलांना ‘नाही’ म्हणायला मागेपुढे पाहू नका! यहोवाने आदाम आणि हव्वा यांना काही मर्यादा घालून दिल्या होत्या. त्या मर्यादांमध्ये राहण्याद्वारे आदाम आणि हव्वा यहोवाच्या अधिकाराचा आदर करायला शिकले असते. त्याचप्रमाणे, पालक मुलांना शिस्त लावतात आणि त्यांच्यासमोर चांगलं उदाहरण मांडतात, तेव्हा मुलं आत्मसंयम विकसित करायला शिकतात. देवाच्या अधिकारावर प्रेम करणं आणि त्याच्या स्तरांचा आदर करणं यांसारख्या अत्यंत मौल्यवान गोष्टी शिकण्यास तुम्ही तुमच्या मुलांना मदत करू शकता.नीतिसूत्रे १:५, ७, ८ वाचा.

१८. आपण मित्रांची सुज्ञपणे निवड का केली पाहिजे?

१८ आपण पालक असलो किंवा नसलो, तरी आपल्यापैकी प्रत्येकानेच मित्रांची सुज्ञपणे निवड केली पाहिजे. तुमचे मित्र यहोवावर प्रेम करणारे असतील, तर ते तुम्हाला जीवनात अर्थपूर्ण ध्येय ठेवण्याचं आणि समस्यांपासून दूर राहण्याचं प्रोत्साहन देतील. (नीति. १३:२०) त्यांच्या चांगल्या उदाहरणावरून तुम्हालाही त्यांच्याप्रमाणेच आत्मसंयम दाखवण्याची प्रेरणा मिळेल. तसंच, तुमच्या चांगल्या वागण्या-बोलण्यामुळे त्यांनासुद्धा नक्कीच उत्तेजन मिळेल. आणि जो आत्मसंयम आपण विकसित करू त्यामुळे आपल्याला देवाची स्वीकृती आणि जीवनाचा आनंद तर मिळेलच; शिवाय, एकमेकांसोबत चांगले नातेसंबंधही जोपासता येतील.