व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३८

“कष्ट करणाऱ्‍या . . . लोकांनो, माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन”

“कष्ट करणाऱ्‍या . . . लोकांनो, माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन”

“कष्ट करणाऱ्‍या व ओझ्याने दबलेल्या सर्व लोकांनो, माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन.”—मत्त. ११:२८.

गीत २५ ख्रिस्ताच्या शिष्यांचे ओळखचिन्ह

सारांश *

१. मत्तय ११:२८-३० या वचनांनुसार येशूने कोणतं अभिवचन दिलं?

येशूने जमावाला एक सुंदर अभिवचन दिलं. त्याने म्हटलं: “माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन.” (मत्तय ११:२८-३० वाचा.) हे काही पोकळ आश्‍वासन नव्हतं. उदाहरणार्थ, गंभीर आजाराने पीडित असलेल्या एका स्त्रीसोबत येशू कसा वागला याचा जरा विचार करा.

२. येशूने एका आजारी स्त्रीसाठी काय केलं?

त्या स्त्रीला मदतीची खूप गरज होती. तिचा आजार बरा व्हावा या आशेने ती बऱ्‍याच वैद्यांकडे गेली. पण बारा वर्षं सर्व उपाय करूनही तिचा आजार काही बरा झाला नव्हता. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे ती अशुद्ध होती. (लेवी. १५:२५) एकदा तिने ऐकलं की येशू आजाऱ्‍यांना बरं करू शकतो म्हणून ती त्याला शोधू लागली. तिने जेव्हा येशूला पाहिलं तेव्हा तिने त्याच्या कपड्यांच्या काठाला हात लावला आणि ती लगेच बरी झाली. येशूने फक्‍त तिला बरं केली नाही पण तिच्याशी वागताना त्याने तिचा स्वाभिमानही जपला. उदाहरणार्थ, तिच्याशी बोलताना त्याने प्रेमळपणे आणि आदराने तिला “मुली” असं संबोधलं. त्या स्त्रीला खरंच किती तजेला आणि बळ मिळालं असेल!—लूक ८:४३-४८.

३. आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

ती स्त्री स्वतः येशूकडे गेली हे लक्षात घ्या. येशूला भेटण्यासाठी तिने पुढाकार घेतला. ही गोष्ट आपल्याबाबतीतही खरी असली पाहिजे. आपणसुद्धा “माझ्याकडे या” या येशूच्या आमंत्रणाचा स्वीकार करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. आज येशू चमत्कार करून त्याच्याकडे ‘येणाऱ्‍या’ लोकांचे आजार बरे करणार नाही. पण असं असलं तरी तो आपल्याला “माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन” असं आमंत्रण देतो. या लेखात आपण पाच प्रश्‍नांची उत्तरं पाहणार आहोत: “माझ्याकडे या” हे येशूचं आमंत्रण स्वीकारण्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे? येशूने जेव्हा “माझं जू आपल्या खांद्यावर घ्या” असं म्हटलं तेव्हा त्याच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? आपण येशूकडून काय शिकू शकतो? येशूने आपल्यावर सोपवलेलं काम विश्रांती किंवा तजेला देणारं का आहे? आणि येशूचं जू वाहत असताना आपल्याला नेहमी तजेला कसा मिळू शकतो?

“माझ्याकडे या”

४-५. येशूकडे ‘येण्याचे’ आणखी काही मार्ग कोणते आहेत?

येशूकडे ‘येण्याचा’ एक मार्ग म्हणजे त्याने जे म्हटलं आणि जे केलं त्याबद्दल जास्तीत जास्त शिकणं. (लूक १:१-४) ही गोष्ट कोणी दुसरं आपल्यासाठी करू शकत नाही तर आपल्याला स्वतः या अहवालांचा अभ्यास करावा लागेल. बाप्तिस्मा घेण्याचा आणि येशूचे शिष्य बनण्याचा निर्णय घेऊनही आपण येशूकडे ‘येऊ’ शकतो.

येशूकडे ‘येण्याचा’ आणखी एक मार्ग म्हणजे मदतीची गरज असताना मंडळीतल्या वडिलांकडे जाणं. येशू त्याच्या मेंढरांची काळजी घेण्यासाठी “माणसांच्या रूपात” असलेल्या या देणग्यांचा उपयोग करतो. (इफिस. ४:७, ८, ११; योहा. २१:१६; १ पेत्र ५:१-३) आपण मदत मागायला पुढाकार घेतला पाहिजे. वडील आपल्या मनातलं ओळखतील किंवा आपल्याला कशा प्रकारच्या मदतीची गरज आहे हे त्यांना आपोआपच समजेल अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. जुलियन नावाच्या बांधवाचा विचार करा. तो म्हणतो: “माझी तब्येत बरी नसल्यामुळे मला बेथेल सोडावं लागलं. माझ्या एका मित्राने मला सुचवलं की या परिस्थितीत प्रोत्साहन मिळण्यासाठी मी वडिलांकडे मदत मागावी. सुरुवातीला मला वाटलं, मला मेंढपाळ भेटीची काहीच गरज नाही. पण नंतर मी वडिलांकडे मदत मागितली तेव्हा मला कळलं की ही मदत मला मिळालेली सर्वात उत्तम भेट होती.” जुलियनला दोन वडिलांनी मदत केली. आपल्या मंडळीतले वडीलही आपल्याला “ख्रिस्ताचे मन” जाणून घेण्यासाठी, म्हणजे त्याच्या विचारांचं आणि मनोवृत्तीचं अनुकरण करण्यासाठी मदत करू शकतात. (१ करिंथ. २:१६; १ पेत्र २:२१) वडील जेव्हा अशा रीतीने मदत करतात तेव्हा ती आपल्यासाठी सर्वात चांगली भेट ठरू शकते.

“माझं जू आपल्या खांद्यावर घ्या”

६. “माझं जू आपल्या खांद्यावर घ्या” असं येशूने म्हटलं तेव्हा त्याला काय म्हणायचं होतं?

येशूने जेव्हा म्हटलं की “माझं जू आपल्या खांद्यावर घ्या” तेव्हा कदाचित त्याचा अर्थ, ‘माझा अधिकार स्वीकारा’ असा होता. त्याला कदाचित असंही म्हणायचं होतं, की ‘तुम्ही माझ्यासोबत माझं जू आपल्या खांद्यावर घ्या आणि आपण सोबत मिळून यहोवासाठी काम करू.’ या दोन्ही वाक्यांशांतून कळतं की जू घेणं यामध्ये काम करणं सामील आहे.

७. मत्तय २८:१८-२० या वचनांनुसार आपल्यावर कोणतं काम सोपवलं आहे आणि आपण कशाची खातरी बाळगू शकतो?

आपण यहोवाला आपलं जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतो तेव्हा आपण येशूचं आमंत्रण स्वीकारत असतो. येशूने सर्वांना त्याच्याकडे येण्याचं आमंत्रण दिलं आहे आणि देवाची मनापासून सेवा करण्याची इच्छा बाळगणाऱ्‍या व्यक्‍तीला तो कधीही नाकारणार नाही. (योहा. ६:३७, ३८) यहोवाने येशूवर जे काम सोपवलं आहे त्या कामात सहभाग घेण्याचा बहुमान सर्व ख्रिश्‍चनांना मिळाला आहे. आपण खातरी बाळगू शकतो की येशू हे काम पूर्ण करण्यासाठी आपली मदत करायला नेहमी तयार असेल.—मत्तय २८:१८-२० वाचा.

“माझ्याकडून शिका”

येशूसारखं तुम्हीही इतरांना तजेला द्या (परिच्छेद ८-११ पाहा) *

८-९. नम्र मनाचे लोक येशूकडे का आकर्षित व्हायचे आणि आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारले पाहिजे?

फक्‍त नम्र लोक येशूकडे आकर्षित झाले. (मत्त. १९:१३, १४; लूक ७:३७, ३८) असं का? परूशी आणि येशू यांच्यात किती फरक होता याचा जरा विचार करा. ते धर्मपुढारी खूप कठोर आणि गर्विष्ठ होते. (मत्त. १२:९-१४) पण याच्या अगदी उलट, येशू प्रेमळ आणि नम्र होता. परूश्‍यांना वाटायचं की समाजात आपलं मोठं नाव असावं. तसंच, त्यांना आपल्या श्रेष्ठ पदव्यांचा खूप गर्वही होता. पण येशूने अशा वृत्तीचा विरोध केला. त्याच्या शिष्यांनी नम्र असावं आणि इतरांना मदत करावी असं त्याने सांगितलं. (मत्त. २३:२, ६-११) परूशी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून लोकांना धाकात ठेवायचे. (योहा. ९:१३, २२) पण येशूने लोकांना मदत करून आणि सौम्य शब्दांचा वापर करून तजेला दिला.

तुम्ही येशूकडून पुढे दिलेले धडे शिकला आहात का? स्वतःला विचारा: ‘इतर जण मला एक सौम्य आणि नम्र व्यक्‍ती म्हणून ओळखतात का? मी इतरांना मदत करण्यासाठी लहानसहान कामं करायला तयार असतो का? मी इतरांशी दयाळूपणे वागतो का?’

१०. येशूने त्याच्यासोबत काम करणाऱ्‍यांसाठी कशा प्रकारचं वातावरण तयार केलं?

१० येशूच्या शिष्यांना त्याच्यासोबत काम करताना आनंद मिळावा म्हणून येशूने एक शांतीपूर्ण वातावरण तयार केलं आणि त्याच्या शिष्यांना प्रशिक्षण देताना त्याला खूप आनंद व्हायचा. (लूक १०:१, १९-२१) येशूने त्याच्या शिष्यांना प्रश्‍न विचारण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि तो त्यांचं मत ऐकून घेण्यासाठी तयार असायचा. (मत्त. १६:१३-१६) ज्या प्रकारे, नर्सरित किंवा बागेत ठेवलेल्या रोपांचं, ऊन आणि वाऱ्‍यापासून संरक्षण होण्यासाठी त्यांची काळजी घेतली जाते आणि यामुळे त्यांच्या वाढीसाठी मदत होते, त्याच प्रकारे येशूच्या सहवासात राहून शिष्यांची एका अर्थी वाढ होत होती. येशूने शिकवलेल्या गोष्टी ते चांगल्या प्रकारे शिकू शकले आणि त्यामुळे त्यांनी चांगली फळं दिली म्हणजे ते चांगली कामं करू शकले.

इतरांना आपल्याशी मनमोकळेपणे बोलता यावं असा स्वभाव ठेवा आणि मैत्रीपूर्ण असा

उत्साही आणि आवेशी असा

नम्र आणि मेहनती असा *

११. आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारले पाहिजेत?

११ तुम्हालाही काही प्रमाणात अधिकार देण्यात आले आहेत का? असं असेल तर स्वतःला पुढील प्रश्‍न विचारा: ‘मी घरात किंवा कामाच्या ठिकाणी इतरांशी कसं वागतो? मी शांती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो का? मी इतरांना प्रश्‍न विचारण्याचं प्रोत्साहन देतो का? मी इतरांचं मत ऐकून घ्यायला तयार असतो का’ आपल्याला परूश्‍यांसारखं बनण्याची अजिबात इच्छा नाही. प्रश्‍न विचारणाऱ्‍या लोकांचा ते तिरस्कार करायचे आणि त्यांच्यापेक्षा वेगळं मत असलेल्या लोकांचा ते छळ करायचे.—मार्क ३:१-६; योहा. ९:२९-३४.

“तुमच्या जिवाला विश्रांती मिळेल”

१२-१४. येशूने आपल्याला दिलेलं काम तजेला देणारं का आहे?

१२ येशूने आपल्याला सोपवलेलं काम विश्रांती किंवा तजेला देणारं का आहे? याची बरीचशी कारणं आहेत, पण आता आपण काही कारणांवर चर्चा करू या.

१३ आपल्याकडे सर्वोत्तम देखरेख करणारे आहेत. यहोवा हा सर्वोच्च अधिकारी आहे, असं असलं तरी तो निर्दयी किंवा क्रूरपणे वागत नाही. तर याउलट तो आपल्या कामाची कदर करतो. (इब्री ६:१०) तसंच, आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तो आपल्याला शक्‍तीही देतो. (२ करिंथ. ४:७; गलती. ६:५, तळटीप) आपण इतरांसोबत कसं वागलं पाहिजे याबाबतीत आपला राजा, येशू याचं आपल्यासमोर सर्वात चांगलं उदाहरण आहे. (योहा. १३:१५) आणि आपली काळजी करणारे वडील, “महान मेंढपाळ” येशू याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. (इब्री १३:२०; १ पेत्र ५:२) ते आपल्याला मार्गदर्शन देताना आणि आपलं संरक्षण करताना आपल्याशी सौम्यतेने वागतात, आपल्याला प्रोत्साहन देतात आणि धैर्य दाखवतात.

१४ आपल्याकडे सर्वात चांगले मित्र आहेत. जिवापाड प्रेम करणारे मित्र आणि आपल्याला मिळालेलं अर्थपूर्ण काम हे जगात इतर कोणाकडे नाही. जरा विचार करा, आपण अशा लोकांसोबत काम करतो ज्यांचे नैतिक स्तर उच्च दर्जाचे आहेत, तरीपण ते स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत नाहीत. त्यांच्याकडे बरीचशी कौशल्यं आहेत तरीही ते त्याविषयी बढाई मारत नाहीत, तर इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजतात. ते आपल्याला फक्‍त त्यांच्यासोबत काम करणारे म्हणून नाही तर त्यांचे मित्रही समजतात. त्यांचं आपल्यावर इतकं प्रेम आहे की ते आपल्यासाठी त्यांचा जीवसुद्धा द्यायला तयार असतात.

१५. आपण करत असलेल्या कामाबद्दल आपल्याला कसं वाटलं पाहिजे?

१५ आपल्याला मिळालेलं काम सर्वात उत्तम आहे. आपण लोकांना यहोवाबद्दलचं सत्य शिकवतो आणि सैतानाने पसरवलेलं खोटं उघडकीस आणतो. (योहा. ८:४४) सैतान आज लोकांवर अशी ओझी लादतो जी ते उचलू शकत नाहीत. उदाहरणार्थ, यहोवा आपलं पाप कधीच माफ करणार नाही आणि आपण त्याच्या प्रेमाच्या लायकीचे नाही, असा लोकांनी विश्‍वास करावा ही सैतानाची इच्छा आहे. अशा खोट्या शिकवणींच्या ओझ्यांमुळे लोक दबून जातात आणि हताश होतात. आपण जेव्हा येशूकडे ‘येतो’ तेव्हा आपल्या पापांची क्षमा होते. खरंतर, यहोवा आपल्या सर्वांवर मनापासून प्रेम करतो. (रोम. ८:३२, ३८, ३९) आपण करत असलेल्या कामामुळे लोकांना यहोवावर भरवसा ठेवायला आणि त्यांचं जीवन सुधारायला मदत होते. आणि यामुळे आपल्याला खूप आनंद होतो.

येशूचं जू आपल्या खांद्यावर घेऊन तजेला मिळवत राहा

१६. आज आपण जे ओझं वाहत आहोत ते येशूने सांगितलेल्या ओझ्यापेक्षा कसं वेगळं आहे?

१६ आज आपल्याला जीवनात जे ओझं वाहायला लागतं ते येशूने आपल्याला वाहायला सांगितलेल्या ओझ्यापेक्षा वेगळं आहे. उदाहरणार्थ, काम करून थकूनभागून घरी आल्यावर आपण फक्‍त दमूनच जात नाही, तर आपल्याला समाधानही वाटत नाही. पण याच्या अगदी उलट, यहोवाची आणि येशूची सेवा केल्यामुळे आपल्याला खूप समाधान वाटतं. दिवसभर काम करून आपण थकून जातो आणि त्या दिवशी संध्याकाळी मंडळीची सभा असेल तेव्हा कधीकधी आपल्याला सभेला जाण्यासाठी स्वतःवरच सक्‍ती करावी लागते. पण सभेनंतर घरी परतल्यावर बऱ्‍याचदा आपल्याला ताजंतवानं आणि उत्साहित वाटतं. आपण प्रचार करतो आणि वैयक्‍तिक बायबल अभ्यास करतो त्याबाबतीतही ही गोष्ट तितकीच खरी आहे. आपण या गोष्टी करण्यासाठी मेहनत घेतो तेव्हा आपल्याला तजेला आणि नवीन स्फूर्ती मिळते.

१७. आपल्या परिस्थितीबद्दल आपल्याला कोणती जाणीव असली पाहिजे आणि आपण कशाबद्दल काळजीपूर्वक विचार केला पाहिजे?

१७ आपल्याकडे असलेली शक्‍ती मर्यादित आहे याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. त्यामुळे आपण कोणत्या गोष्टींसाठी आपली शक्‍ती वापरतो याबद्दल आपण काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ, धनसंपत्ती मिळवण्यासाठी कदाचित आपण आपली बरीचशी शक्‍ती घालवत असू. येशूने याबाबतीत एका तरुण श्रीमंत माणसाला काय म्हटलं त्याकडे लक्ष द्या. त्या श्रीमंत माणसाने येशूला विचारलं: “सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी मी काय केलं पाहिजे?” देवाच्या नियमशास्त्राचं पालन करत असल्यामुळे तो एक चांगला माणूस होता. असं का म्हणता येईल? कारण मार्कच्या शुभवर्तमानात त्याच्याबद्दल असा विशिष्ट उल्लेख करण्यात आला आहे की येशूने “प्रेमाने त्याच्याकडे पाहिले”. येशूने त्या तरुण अधिकाऱ्‍याला आपल्या मागे येण्याचं निमंत्रण देत म्हटलं की “जा आणि जे काही तुझ्या मालकीचं आहे ते विकून . . . दे, आणि ये, माझा शिष्य हो.” हे ऐकून तो माणूस खूप दुःखी झाला. असं दिसून येतं की एकीकडे त्या माणसाला येशूचा शिष्य बनण्याची इच्छा होती पण दुसरीकडे त्याला त्याची “बरीच मालमत्ता” सोडून द्यायची इच्छा नव्हती. (मार्क १०:१७-२२) यामुळे त्याने येशूचं जू स्वीकारलं नाही आणि तो त्याच्याजवळ असलेल्या “धनाची” गुलामी करत राहिला. (मत्त. ६:२४) तुम्ही अशा परिस्थितीत असता तर तुम्ही कोणती निवड केली असती?

१८. आपण वेळोवेळी काय केलं पाहिजे आणि का?

१८ आपण आपल्या जीवनात कोणत्या गोष्टींना प्राधान्य देतो त्याचं वेळोवेळी परीक्षण करणं गरजेचं आहे. असं का? आपण आपल्या शक्‍तीचा वापर सुज्ञपणे करत आहोत, याची खातरी करून घेण्यासाठी. मार्क नावाच्या एका तरुण बांधवाचा विचार करा. तो म्हणतो, “मला बरीच वर्षं वाटत होतं की माझी जीवनशैली खूप साधी आहे. मी पायनियरिंग करत होतो पण माझं मन सतत पैशांबद्दल आणि आरामदायी जीवन कसं जगता येईल याबद्दल विचार करण्याकडे लागलेलं होतं. मी सतत विचार करायचो की मला समाधान का वाटत नाही? मी खूश का नाही? मग शेवटी मला जाणवलं, की मी फक्‍त स्वतःच्या इच्छा पूर्ण करत होतो आणि उरलेला वेळ आणि शक्‍ती यहोवाला देत होतो.” मग मार्कने त्याच्या विचारांमध्ये आणि जीवनशैलीमध्ये बदल केले आणि त्याने यहोवाची सेवा जास्तीत जास्त करण्यासाठी पुढाकार घेतला. तो म्हणतो, “कधीकधी मला पैशांबद्दल चिंता वाटते, पण यहोवाच्या मदतीने आणि येशूच्या साहाय्याने मी अनेक आव्हानांवर मात करू शकलोय.”

१९. योग्य दृष्टिकोन ठेवणं इतकं महत्त्वाचं का आहे?

१९ येशूचं जू आपल्या खांद्यावर असताना तीन गोष्टी केल्यामुळे आपल्याला तजेला मिळत राहील. पहिली गोष्ट म्हणजे, योग्य दृष्टिकोन ठेवणं. आपण यहोवाचं काम करत आहोत त्यामुळे यहोवा सांगेल त्या पद्धतीनेच ते करणं गरजेचं आहे. आपण कामकरी आहोत आणि यहोवा आपला मालक आहे. (लूक १७:१०) आपण जर त्याचं काम आपल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला येशूचं जू वाहणं कठीण जाईल. जर एक धष्टपुष्ट बैल त्याच्या मालकाने त्याच्यावर ठेवललं जू याचा विरोध करत असेल आणि आपल्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो थकून जाईल आणि त्याला इजा होईल. पण आपण जर यहोवाचं काम त्याच्या पद्धतीने केलं तर आपल्या अवाक्याबाहेर असलेल्या गोष्टीही करणं आपल्याला शक्य होईल. तसंच, आपण यहोवाच्या मार्गदर्शनांचं पालन केलं तर आपण कुठल्याही समस्येवर मात करू शकू. हे लक्षात असू द्या की यहोवाची इच्छा पूर्ण होण्यापासून कोणीही त्याला थांबवू शकत नाही!—रोम. ८:३१; १ योहा. ४:४.

२०. कोणत्या हेतूने आपण येशूचं जू आपल्या खांद्यावर घेतलं पाहिजे?

२० दुसरी गोष्ट म्हणजे, योग्य हेतूने कार्य करणं. आपला प्रेमळ पिता यहोवा याच्या नावाचा गौरव करणं हाच आपला उद्देश आहे. पहिल्या शतकात जे लोक लोभी व स्वार्थी होते ते आपला आनंद जास्त काळापर्यंत टिकवून ठेवू शकले नाहीत आणि त्यांनी येशूचं जू वाहण्याचं सोडून दिलं. (योहा. ६:२५-२७, ५१, ६०, ६६; फिलिप्पै. ३:१८, १९) याच्या अगदी उलट, जे लोक देवावर आणि शेजाऱ्‍यावर निःस्वार्थ प्रेम करत होते त्यांनी पृथ्वीवर असताना आयुष्यभर आनंदाने येशूचं जू वाहिलं आणि त्यांना स्वर्गात येशूसोबत राज्य करण्याची आशा होती. त्या लोकांसारखंच आपणही योग्य हेतू बाळगून येशूचं जू वाहिलं तर आपल्यालाही आनंदी राहता येईल.

२१. मत्तय ६:३१-३३ या वचनांनुसार आपण यहोवाकडून काय अपेक्षा करू शकतो?

२१ तिसरी गोष्ट म्हणजे, योग्य अपेक्षा ठेवणं. आपण असं जीवन निवडलं आहे ज्यात त्याग आणि मेहनत करणं सामील आहे. येशूने आपल्याला इशारा दिला होता की आपला छळ केला जाईल. असं असलं तरी यहोवा आपल्याला कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी बळ देईल अशी अपेक्षा आपण करू शकतो. आपण जितका जास्त धीर धरू तितकं जास्त आपण ताकदवान होऊ. (याको. १:२-४) आपण अशीही अपेक्षा बाळगू शकतो की यहोवा आपल्या गरजा पूर्ण करेल, येशू आपली काळजी घेईल आणि आपले भाऊबहीण आपल्याला प्रोत्साहन देतील. (मत्तय ६:३१-३३ वाचा; योहा. १०:१४; १ थेस्सलनी. ५:११) खरंच, यहोवाने आपल्या अपेक्षेपलीकडे आपल्याला मदत पुरवली आहे!

२२. आपण कशाबद्दल आनंदी असू?

२२ येशूने त्या आजारी स्त्रीला ज्या दिवशी बरं केलं त्याच दिवशी तिला तजेला मिळाला. पण येशूची विश्‍वासू शिष्या बनल्यावरच तिला सर्वकाळ टिकणारा तजेला मिळणार होता. तुम्हाला काय वाटतं तिने काय केलं असेल? तिने जर येशूचं जू स्वीकारलं असेल तर तिला स्वर्गात येशूसोबत राज्य करण्याचा बहुमान मिळाला असेल. खरंच हा किती मोठा आशीर्वाद आहे! तिने येशूच्या मागे जाण्यासाठी केलेले कोणतेही त्याग या आशीर्वादापुढे काहीच नव्हते. आपली आशा स्वर्गात राहण्याची असो अथवा पृथ्वीवरची, आपल्याला या गोष्टीचा खूप आनंद असेल की आपण “माझ्याकडे या!” हे येशूचं आमंत्रण स्वीकारलं.

गीत ५ ख्रिस्ताचा आदर्श

^ परि. 5 येशू आपल्याला त्याच्याकडे येण्याचं आमंत्रण देतो. येशूचं आमंत्रण स्वीकारण्यासाठी आपल्याला काय करण्याची गरज आहे? या लेखात या प्रश्‍नाचं उत्तर दिलं जाईल आणि ख्रिस्तासोबत काम केल्यामुळे आपल्याला कसा तजेला किंवा विश्रांती मिळू शकते हेही सांगितलं जाईल.

^ परि. 60 चित्रांचं वर्णन: येशूने अनेक मार्गांनी इतरांना तजेला दिला.

^ परि. 66 चित्रांचं वर्णन: येशूसारखंच एक बांधव बऱ्‍याच मार्गांनी इतरांना तजेला देत आहे.