अभ्यास लेख ३९
पाहा! मोठा लोकसमुदाय
“पाहा! . . . कोणत्याही मनुष्याला मोजता आला नाही असा एक मोठा लोकसमुदाय . . . राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा असलेला मला दिसला.”—प्रकटी. ७:९.
गीत १० “हा मी आहे, मला पाठीव!”
सारांश *
१. प्रेषित योहानची परिस्थिती कशी होती?
इ. स. ९५ च्या आसपास योहानला खूप कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. त्याचं खूप वय झालं होतं आणि त्याला पात्म बेटावर कैदेत ठेवण्यात आलं होतं. सर्व प्रेषितांपैकी कदाचित फक्त तोच जिवंत होता. (प्रकटी. १:९) त्याला माहीत होतं की धर्मत्यागी लोक चुकीच्या शिकवणी शिकवून मंडळ्यांची दिशाभूल करत आहेत आणि भाऊबहिणींमध्ये फूट पाडत आहेत. असं वाटत होतं की खऱ्या ख्रिश्चनांच्या अस्तित्वाची ही लहानशी ज्योत आता विजण्याच्या बेतावर आहे.—यहू. ४; प्रकटी. २:१५, २०; ३:१, १७.
२. प्रकटीकरण ७:९-१४ या वचनांनुसार देवाने योहानला कोणता रोमांचक दृष्टान्त दाखवला? (मुखपृष्ठावरचं चित्र पाहा.)
२ या कठीण परिस्थितीत असताना देवाने योहानला भविष्याबद्दल एक रोमांचक दृष्टान्त दाखवला. त्यात देवाच्या अभिषिक्त दासांवर शेवटचा शिक्का मारेपर्यंत, देवदूतांना मोठ्या संकटाचे विनाशकारी वारे अडवून धरायला सांगितलं होतं. (प्रकटी. ७:१-३) अभिषिक्तांच्या या गटात १,४४,००० जण असतील आणि ते येशूसोबत स्वर्गात राज्य करतील. (लूक १२:३२; प्रकटी. ७:४) मग योहानने आणखी एका गटाचा उल्लेख केला. तो इतका मोठा होता की योहानने “पाहा!” असं म्हटलं. त्याने जे पाहिलं त्यामुळे त्याला खूप आश्चर्य झालं आणि म्हणून त्याने असा शब्द वापरला. त्याने नेमकं काय पाहिलं? त्याने म्हटलं: “सर्व राष्ट्रे, वंश, लोक आणि भाषा यांतून आलेला आणि कोणत्याही मनुष्याला मोजता आला नाही असा एक मोठा लोकसमुदाय . . . राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा असलेला मला दिसला.” (प्रकटीकरण ७:९-१४ वाचा.) योहानला हे जाणून नक्कीच आनंद झाला असेल की भविष्यात देवाची योग्य पद्धतीने उपासना करणारे लाखो लोक असतील!
३. (क) योहानच्या दृष्टान्तामुळे आपला विश्वास का मजबूत व्हायला हवा? (ख) या लेखात आपण काय शिकणार आहोत?
३ या दृष्टान्तामुळे योहानचा विश्वास मजबूत झाला असेलच. पण आपण या शेवटच्या दिवसांत जगत आहोत म्हणून या दृष्टान्तामुळे आपला विश्वास तर आणखीनच मजबूत व्हायला हवा. आपल्या काळात लाखो लोक यहोवाची उपासना करत आहेत आणि त्यांना मोठं संकट पार करून या पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची आशा आहे. या लेखात आपण शिकू की ८० पेक्षा जास्त वर्षांपूर्वी यहोवाने मोठ्या लोकसमुदायाची ओळख कशा प्रकारे करून दिली. त्यानंतर आपण या लोकसमुदायाच्या दोन पैलूंवर चर्चा करू या: (१) हा किती मोठा आहे आणि (२) याचे सदस्य पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या भागातून आहेत. या मुद्यांमुळे या आशीर्वादित समूहाचे भाग होण्याची आशा असणाऱ्या लोकांचा विश्वास मजबूत होईल.
मोठा लोकसमुदाय कुठे राहणार?
४. ख्रिस्ती धर्मजगताला बायबलमध्ये दिलेलं कोणतं सत्य समजलं नाही आणि बायबल विद्यार्थ्यांनी कसा वेगळा विचार केला?
४ आज्ञाधारक मानव एक दिवस या पृथ्वीवर सर्वकाळ जगतील असं बायबलमध्ये दिलेलं सत्य, ख्रिस्ती धर्मजगत सहसा शिकवत नाहीत. (२ करिंथ. ४:३, ४) आज ख्रिस्ती धर्मजगतातले अनेक पंथ हेच शिकवतात की चांगल्या लोकांचा मृत्यू झाल्यावर ते स्वर्गात जातात. पण ही गोष्ट बायबल विद्यार्थ्यांचा एक लहान गट मानत नव्हता. त्यांनी १८७९ पासून वॉचटॉवर प्रकाशित करायला सुरुवात केली. त्यांना शास्त्रातून समजलं की देव या पृथ्वीला पुन्हा एकदा नंदनवन बनवेल आणि लाखो आज्ञाधारक लोक स्वर्गात नाही, तर याच पृथ्वीवर राहतील. पण हे खरं आहे की ते आज्ञाधारक लोक कोण असतील हे समजायला त्यांना वेळ लागला.—मत्त. ६:१०.
५. बायबल विद्यार्थी १,४४,००० जणांबद्दल काय मानायचे?
५ पण हेही खरं आहे, की काही लोकांना “पृथ्वीवरून विकत” घेतलं जाईल आणि ते स्वर्गात येशूसोबत राज्य करतील, असं बायबल विद्यार्थ्यांना शास्त्रवचनांतून समजलं होतं. (प्रकटी. १४:३) या लोकांचा समूह १,४४,००० आवेशी आणि समर्पित ख्रिश्चनांनी मिळून बनलेला आहे. पृथ्वीवर असताना त्यांनी विश्वासूपणे देवाची सेवा केली. मग बायबल विद्यार्थी मोठ्या लोकसमुदायाबद्दल काय मानायचे?
६. बायबल विद्यार्थी मोठ्या लोकसमुदायाबद्दल काय मानायचे?
६ योहानने पाहिलेल्या दृष्टान्तात त्याला एक समूह “राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा असलेला” दिसला. (प्रकटी. ७:९) या शब्दांवरून बायबल विद्यार्थी या निष्कर्षावर पोहोचले, की १,४४,००० जणांप्रमाणेच मोठा लोकसमुदायही स्वर्गात राहील. जर १,४४,००० जण आणि मोठा लोकसमुदाय हे दोन्ही समूह स्वर्गात राहणार असतील तर ते एकमेकांपासून वेगळे कसे आहेत? बायबल विद्यार्थ्यांना वाटलं होतं, की मोठा लोकसमुदाय अशा ख्रिश्चनांनी मिळून बनला आहे जे पृथ्वीवर असताना पूर्णपणे देवाला आज्ञाधारक राहिले नाहीत. असे ख्रिश्चन बायबल तत्त्वानुसार जगत तर होते, पण काही जणांनी ख्रिस्ती धर्मजगताशी संबंध तोडला नव्हता. यावरून बायबल विद्यार्थ्यांनी निष्कर्ष काढला, की अशा लोकांचं काही प्रमाणात देवावर प्रेम होतं पण त्यांना येशूसोबत राज्य करायला मिळेल इतपत नव्हतं. मोठ्या लोकसमुदायाचं देवावर अपुरं प्रेम असल्यामुळे त्यांची स्वर्गात राजासनासमोर ‘उभं’ राहण्याची योग्यता होती, पण राजासनावर बसण्याची नव्हती.
७. बायबल विद्यार्थ्यांनुसार हजार वर्षांच्या काळादरम्यान कोण पृथ्वीवर राहणार होते आणि येशूच्या आधी मरण पावलेल्या विश्वासू पुरुषांबद्दल बायबल विद्यार्थी काय मानायचे?
७ मग या पृथ्वीवर कोण राहतील? बायबल विद्यार्थी मानायचे की १,४४,००० जण आणि मोठा लोकसमुदाय यांना स्वर्गात एकत्रित केल्यानंतर, लाखो लोकांना पृथ्वीवर जीवन दिलं जाईल. त्यांना ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्यामुळे अनेक आशीर्वाद अनुभवता येतील. बायबल विद्यार्थ्यांच्या मते ख्रिस्ताचं हजार वर्षांचं राज्य सुरू व्हायच्या आधी हे लाखो लोक यहोवाची उपासना सुरू करणार नव्हते. तर हजार वर्षांच्या राज्यादरम्यान या समूहाला यहोवाबद्दल शिकवलं जाणार होतं. त्यानंतर जे लोक यहोवाच्या स्तरांनुसार जीवन जगण्याचा निर्णय घेतील, त्यांना पृथ्वीवर सर्वकाळाचं जीवन दिलं जाणार होतं. पण जे लोक बंड करतील त्यांचा नाश केला जाणार होता. बायबल विद्यार्थी असाही विचार करायचे की पृथ्वीवर काही जण जे “अधिपती” किंवा प्रधान या नात्याने सेवा करतील, स्तो. ४५:१६.
त्यांमध्ये पुनरुत्थान झालेले असे प्राचीन काळातले विश्वासू पुरुषही असतील ज्यांचा मृत्यू येशूच्या आधी झाला आहे. या लोकांनाही हजार वर्षांनंतर स्वर्गात जीवन दिलं जाईल.—८. यहोवाच्या उद्देशात कोणत्या तीन समूहांचा समावेश आहे असा समज होता?
८ याचा अर्थ, बायबल विद्यार्थ्यांना वाटायचं की एकूण तीन समूह आहेत: (१) १,४४,००० जण जे स्वर्गात येशूसोबत राज्य करतील; (२) कमी प्रमाणात आवेशी असलेला मोठा लोकसमुदाय जो स्वर्गात येशूच्या राजासनासमोर उभा राहील; आणि (३) ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्यादरम्यान पृथ्वीवर यहोवाबद्दल ज्यांना शिकवलं जाईल असा लाखो लोकांचा एक समूह. * पण यहोवाने आपल्या ठरवलेल्या वेळी या विषयावर आणखी प्रकाश टाकला.—नीति. ४:१८.
सत्याचा प्रकाश आणखी चमकत जातो
९. (क) मोठा लोकसमुदाय पृथ्वीवर कोणत्या अर्थाने “राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा” राहील? (ख) प्रकटीकरण ७:९ या वचनाची ही समज तर्कशुद्ध का वाटते?
९ १९३५ या वर्षी योहानच्या दृष्टान्तात उल्लेख केलेल्या मोठ्या लोकसमुदायाची ओळख यहोवाच्या साक्षीदारांना स्पष्टपणे पटली. यहोवाच्या साक्षीदारांना जाणीव झाली की मोठ्या लोकसमुदायाला खरोखर स्वर्गात “राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा” असण्याची गरज नाही. तर या समूहाच्या लोकांना लाक्षणिक अर्थाने तसं करावं लागणार होतं. मोठ्या लोकसमुदायाचे लोक पृथ्वीवर जगले तरी ते “राजासनासमोर” उभे राहू शकतात. हे ते कसं करू शकतात? यहोवा हाच सर्व विश्वाचा शासक आहे हे मान्य करण्याद्वारे आणि त्याचे आज्ञाधारक राहण्याद्वारे ते दाखवू शकतात की त्यांना त्याचा अधिकार मान्य आहे. (यश. ६६:१) ते येशूने दिलेल्या खंडणी बलिदानावर विश्वास ठेवण्याद्वारेही “कोकऱ्यासमोर” उभं राहू शकतात. हे अगदी त्याच प्रकारे आहे, जसं मत्तय २५:३१, ३२ या वचनांत सांगितलं आहे. त्यात म्हटलं आहे की “सर्व राष्ट्रांना” ज्यात दुष्ट लोकांचाही समावेश होतो त्यांना येशूच्या वैभवी राजासनासमोर “जमवलं जाईल.” आणि हे स्पष्टच आहे, की सर्व राष्ट्रं ही स्वर्गात नसून पृथ्वीवर आहेत. ही सुधारित समज तर्कशुद्ध वाटते. यावरून आपल्याला समजायला मदत होते की बायबलमध्ये मोठ्या लोकसमुदायाला स्वर्गात नेलं जाईल असा उल्लेख का नाही. फक्त एकाच समूहाला स्वर्गात अनंतकाळाचं जीवन मिळेल असं अभिवचन त्यात दिलं आहे. तो म्हणजे येशूसोबत “राजे या नात्याने पृथ्वीवर राज्य” करणारा १,४४,००० जणांनी मिळून बनलेला समूह.—प्रकटी. ५:१०.
१०. मोठ्या लोकसमुदायाला ख्रिस्ताचं हजार वर्षांचं राज्य सुरू होण्याआधी यहोवाबद्दल का शिकून घ्यावं लागेल?
१० यामुळे १९३५ सालापासून यहोवाच्या साक्षीदारांची अशी समज आहे, की योहानच्या दृष्टान्तातला मोठा लोकसमुदाय हा विश्वासू ख्रिश्चनांनी मिळून बनलेला आहे आणि त्यांना पृथ्वीवर अनंतकाळ जगण्याची आशा आहे. मोठ्या संकटातून वाचण्यासाठी, या लोकसमुदायाला ख्रिस्ताचं हजार वर्षांचं राज्य सुरू होण्याआधी यहोवाबद्दल शिकून घ्यावं लागेल. हजार वर्षांचं राज्य सुरू होण्याआधी “घडणार असलेल्या या सगळ्या गोष्टींतून” त्यांना वाचण्यासाठी मजबूत विश्वास दाखवावा लागेल.—लूक २१:३४-३६.
११. काही बायबल विद्यार्थ्यांनी असा का विचार केला असावा की काही जणांना हजार वर्षांच्या राज्यानंतर स्वर्गात नेलं जाईल?
११ हजार वर्षांनंतर प्राचीन काळातल्या विश्वासू लोकांना स्वर्गात उठवलं जाईल, अशी काही बायबल विद्यार्थ्यांची समज होती त्याबद्दल काय? या शक्यतेबद्दल बऱ्याच वर्षांपूर्वी, म्हणजे द वॉचटॉवर १५ फेब्रुवारी, १९१३ या अंकात सांगितलं होतं. त्या वेळी एखाद्याच्या मनात असा प्रश्न आला असेल की, ‘जर कमी विश्वास दाखवलेल्या ख्रिश्चनांना स्वर्गात जीवन दिलं जाणार आहे, तर प्राचीन काळातल्या विश्वासू सेवकांना केवळ या पृथ्वीवर जीवन का दिलं जाईल?’ खरंतर, दोन चुकीच्या विचारांमुळे त्यांना असं वाटलं. ते म्हणजे: (१) मोठा लोकसमुदाय स्वर्गात राहील आणि (२) मोठा लोकसमुदाय हा कमी विश्वास असलेल्या लोकांनी बनलेला असेल.
१२-१३. अभिषिक्तजन आणि मोठा लोकसमुदाय या दोघांना मिळणाऱ्या प्रतिफळाबद्दल त्यांना कोणती जाणीव आहे?
१२ आपण आधी चर्चा केल्यानुसार १९३५ पासून यहोवाच्या साक्षीदारांना अगदी स्पष्टपणे समजलं, की हर्मगिदोनमधून प्रकटी. ७:१०, १४) तसंच, शास्त्रवचनांत असंही सांगण्यात आलं आहे की ज्यांना स्वर्गातल्या जीवनासाठी उठवलं जाईल, त्यांना प्राचीन काळातल्या विश्वासू सेवकांपेक्षा “अधिक चांगले असे काहीतरी” दिलं जाईल. (इब्री ११:४०) आपल्या बांधवांना १९३५ मध्ये नवीन समज मिळाल्यामुळे ते आवेशाने लोकांना यहोवाची सेवा करण्यासाठी आमंत्रित करू लागले आणि पृथ्वीवर जगण्याची आशा देऊ लागले.
वाचणारा समूह हाच योहानच्या दृष्टान्तातला मोठा लोकसमुदाय आहे. या समूहातले लोक याच पृथ्वीवर “मोठ्या संकटातून बाहेर” येतील आणि ते मोठ्याने अशी घोषणा करतील: “तारण हे राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून आणि कोकऱ्याकडून मिळते.” (१३ मोठ्या लोकसमुदायाच्या सदस्यांना आपल्या आशेबद्दल भरपूर आनंद आहे. त्यांना स्पष्टपणे समजलं आहे की आपल्या विश्वासू सेवकांनी स्वर्गात सेवा करायची की पृथ्वीवर हे फक्त यहोवाच ठरवू शकतो. अभिषिक्तजन आणि मोठा लोकसमुदाय या दोघांना ही जाणीव आहे की त्यांना मिळणारं प्रतिफळ हे यहोवाच्या अपार कृपेमुळे शक्य झालं आहे. ही अपार कृपा त्याने येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाची तरतूद करण्याद्वारे दाखवली आहे.—रोम. ३:२४.
मोठी संख्या असलेला
१४. मोठ्या लोकसमुदायाबद्दलची भविष्यवाणी कशी पूर्ण होईल याबद्दल १९३५ नंतर अनेकांना प्रश्न का पडला होता?
१४ १९३५ मध्ये यहोवाच्या साक्षीदारांना सुधारित समज मिळाल्यानंतरही अनेकांना प्रश्न पडला होता, की पृथ्वीवर राहण्याची आशा असणारा हा लोकसमुदाय संख्येने “मोठा” कसा होईल. उदाहरणार्थ रॉनाल्ड पार्कींग हे जेव्हा १२ वर्षांचे होते, तेव्हा मोठा लोकसमुदाय याबद्दलची ओळख अगदी स्पष्टपणे सांगण्यात आली होती. त्याबद्दल ते आठवून म्हणतात: “त्या वेळी जगभरात जवळपास ५६,००० प्रचारक होते आणि त्यांपैकी बरेच म्हणजे बहुतेक जण अभिषिक्त होते. म्हणून मग मोठा लोकसमुदाय हा इतका काही मोठा वाटत नव्हता.”
१५. मोठा लोकसमुदाय एकत्रित करण्यात प्रगती कशी झाली?
१५ त्यानंतरच्या काही दशकांत मिशनरींना अनेक देशात पाठवण्यात आलं आणि यामुळे यहोवाच्या साक्षीदारांची संख्या हळूहळू वाढत गेली. मग १९६८ मध्ये बायबल अभ्यासाचा कार्यक्रम द ट्रुथ दॅट लीड्स टू इटरनल लाईफ या पुस्तकातून सुरू करण्यात आला. त्यात बायबल सत्यांबद्दल अगदी सोप्या शब्दांत सांगितलं होतं आणि यामुळे कधी नव्हे इतक्या संख्येने, नम्र मनाचे लोक सत्याकडे आकर्षित झाले. फक्त चार वर्षांच्या कालावधित पाच लाखांपेक्षा जास्त लोकांनी बाप्तिस्मा घेतला. लॅटीन अमेरिका आणि इतर देशांत कॅथलिक चर्चचा दबदबा जसजसा कमी होत गेला आणि पूर्व युरोप व आफ्रिकेतल्या काही भागांमध्ये आपल्या कामावर लावण्यात आलेले प्रतिबंध काढण्यात आले तसतसं जास्तीत जास्त लोकांनी बाप्तिस्मा घेतला. (यश. ६०:२२) त्यानंतर अलीकडच्या काही वर्षांत यहोवाच्या संघटनेने, लोकांना बायबलबद्दल शिकण्यासाठी मदत व्हावी म्हणून अनेक प्रभावी साधनं प्रकाशित केली आहेत. म्हणून मग यात काहीच शंका नाही, की ८० लाखांपेक्षा जास्त संख्या असलेला मोठा लोकसमुदाय आज एकत्रित करण्यात आला आहे!
वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक असलेला मोठा लोकसमुदाय
१६. मोठा लोकसमुदाय कोणत्या लोकांनी मिळून बनला आहे?
१६ योहानने आपल्या दृष्टान्ताबद्दल लिहिलं तेव्हा त्याने म्हटलं की मोठा लोकसमुदाय हा “सर्व राष्ट्रे, वंश, लोक आणि भाषा” यांनी बनलेला असेल. जखऱ्या संदेष्ट्याने आधी काहीशी अशीच भविष्यवाणी केली होती. त्याने म्हटलं: “सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की, त्या दिवसांत सर्व भाषा बोलणाऱ्या राष्ट्रांपैकी दहा जण यहूदी माणसाचा पदर धरून म्हणतील, आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.”—जख. ८:२३.
१७. वेगवेगळ्या राष्ट्रांतल्या आणि भाषा बोलणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी काय केलं जात आहे?
१७ यहोवाच्या साक्षीदारांना जाणीव झाली की पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या सर्व लोकांना जमवायचं असेल तर आनंदाचा संदेश अनेक भाषांमध्ये प्रचार करणं गरजेचं आहे. आपली संघटना १३० वर्षांपासून बायबल आधारित साहित्यांचं भाषांतर करत आहेत. पण इतिहासात घडलं नाही इतक्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे ९०० पेक्षा जास्त भाषांमध्ये आज भाषांतराचं काम आपली संघटना करत आहे. यावरून स्पष्टच होतं, की सर्व राष्ट्रांतून मोठ्या लोकसमुदायाला एकत्रित करणं हा यहोवा करत असलेला एक चमत्कारच आहे! बायबल आणि बायबल आधारित साहित्यं आज बऱ्याच भाषांमध्ये उपलब्ध असल्यामुळे या समूहाचे लोक ऐक्याने यहोवाची सेवा करत आहेत. ते सर्व जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणांचे असले तरीही त्यांच्यात एकी आहे. साक्षीदार आवेशाने करत असलेल्या प्रचारकार्यासाठी आणि भाऊबहिणींमध्ये असलेल्या प्रेमासाठी ओळखले जातात. खरंच, या गोष्टींमुळे मत्त. २४:१४; योहा. १३:३५.
आपला विश्वास आणखी वाढतो!—या दृष्टान्ताचा आपल्यावर कसा प्रभाव होतो?
१८. (क) यशया ४६:१०, ११ या वचनांनुसार यहोवाने मोठ्या लोकसमुदायाबद्दलची भविष्यवाणी पूर्ण केली आहे याचं आपल्याला का आश्चर्य वाटत नाही? (ख) आपल्याला कोणत्यातरी गोष्टीपासून वंचित ठेवलं आहे असा विचार पृथ्वीवर राहण्याची आशा असणारे का करत नाहीत?
१८ मोठ्या लोकसमुदायाच्या भविष्यवाणीबद्दल उत्साही वाटण्याची आपल्याकडे अनेक कारणं आहेत. यहोवाने या भविष्यवाणीची पूर्तता ज्या अनोख्या पद्धतीने केली आहे त्याचं आपल्याला आश्चर्य वाटत नाही. (यशया ४६:१०, ११ वाचा.) यहोवाने मोठ्या लोकसमुदायाला जी आशा दिली आहे त्याबद्दल ते त्याचे खूप आभारी आहेत. यहोवाने आपल्याला येशूसोबत राज्य करण्यासाठी अभिषिक्त केलं नाही, म्हणून ते असा विचार करत नाहीत की त्याने आपल्याला कोणत्यातरी गोष्टीपासून वंचित ठेवलं आहे. आपल्याला बायबलमध्ये अशा अनेक विश्वासू स्त्रीपुरुषांबद्दल वाचायला मिळतं ज्यांना पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मिळालं होतं, पण तरी ते १,४४,००० जणांचा भाग नाहीत. उदाहरणार्थ, बाप्तिस्मा देणारा योहान. (मत्त. ११:११) दावीदच्या बाबतीतही हीच गोष्ट खरी आहे. (प्रे. कार्ये २:३४) हे आणि यांच्यासारख्या असंख्य लोकांना नंदनवन झालेल्या पृथ्वीवर पुन्हा जिवंत केलं जाईल. यांच्याकडे आणि मोठ्या लोकसमुदायाकडे यहोवाला आणि त्याच्या अधिकाराला विश्वासू राहण्याची संधी असेल.
१९. मोठ्या लोकसमुदायाबद्दल मिळालेली समज आपल्याला काय करण्यासाठी प्रेरित करते?
१९ देवाने वेगवेगळ्या देशांतून लाखो लोकांना एकत्रित केलं आहे आणि मानव इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं आहे. आपली आशा स्वर्गातली असो किंवा पृथ्वीवरची आपल्याला जास्तीत जास्त लोकांना ‘दुसरी मेंढरं’ यांचा भाग बनण्यासाठी मदत करायची आहे. (योहा. १०:१६) लवकरच, यहोवाने भाकीत केल्याप्रमाणे तो मोठं संकट आणेल आणि मानवांचा छळ करणाऱ्या सरकारांचा आणि धर्मांचा नाश करेल. खरंच, मोठ्या लोकसमुदायाच्या सर्व सदस्यांना या पृथ्वीवर अनंतकाळासाठी यहोवाची सेवा करण्याचा खूप मोठा बहुमान मिळाला आहे!—प्रकटी. ७:१४.
गीत ५५ चिरकालाचे जीवन!
^ परि. 5 योहानने “मोठा लोकसमुदाय” याला एकत्रित केलं जाण्याबद्दल पाहिलेल्या दृष्टान्ताविषयी या लेखात चर्चा केली जाईल. या लोकसमुदायाचा भाग होण्याचा ज्यांना सन्मान मिळाला आहे त्यांचा विश्वास यामुळे नक्कीच मजबूत होईल.