विभाजित जगात आपली तटस्थ भूमिका टिकवून ठेवा
“देवाचे ते देवाला भरा.”—मत्त. २२:२१.
१. आपण कशा प्रकारे देवाच्या आणि त्याच वेळी मानवी सरकारांच्या आज्ञेत राहू शकतो?
बायबल आपल्याला मानवी अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहण्यास सांगतं. पण त्यासोबतच आपण नेहमी देवाच्या आज्ञेत राहिलं पाहिजे, असंही ते सांगतं. (प्रे. कृत्ये ५:२९; तीत ३:१) म्हणून या गोष्टी एकमेकांविरुद्ध आहेत, असं आपण म्हणावं का? नक्कीच नाही! उलट या दोन्ही गोष्टींना योग्य प्रकारे समजून घेण्यासाठी येशूनं एक तत्त्व आपल्याला दिलं. त्यानं म्हटलं: “कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरा.” [1] (मत्त. २२:२१) त्यामुळे, जेव्हा सरकारी कायद्याचं आपण पालन करतो, अधिकाऱ्यांचा आदर करतो आणि न चुकता कर भरतो, तेव्हा आपण “कैसराचे ते कैसराला” देत असतो. (रोम. १३:७) पण तेच, जेव्हा यहोवाच्या तत्त्वांविरुद्ध असणारी एखादी गोष्ट करण्यास मानवी सरकार आपल्याला सांगतं, तेव्हा अतिशय आदरपूर्वकपणे आपण तसं करण्याचं नाकारतो.
२. जगाच्या राजकीय घडामोडींमध्ये आपण तटस्थ भूमिका कशी घेतो?
२ जगाच्या राजकीय घडामोडींमध्ये कोणाचीही बाजू न घेण्याद्वारे आपण एका मार्गाने “देवाचे ते देवाला” देत असतो. (यश. २:४) यहोवानं मानवी सरकारांना शासन करण्याची अनुमती दिल्यामुळे आपण त्यांचा विरोध करत नाही. तसंच, कोणत्याही राष्ट्रीय किंवा देशभक्तीपर कार्यहालचालींमध्ये आपण सहभाग घेत नाही. (रोम. १३:१, २) शिवाय, राजकीय चढाओढीत राजकर्त्यांचं समर्थन करण्याचं, निवडणुकीत मतदान करण्याचं, एखादं सरकार पाडण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांत सहभाग घेण्याचं किंवा राजकारणात स्वतः उभं राहण्याचं आपण टाळतो. थोडक्यात, याबाबतीत आपण तटस्थ भूमिका घेत असतो.
३. आपण तटस्थ भूमिका का घेतली पाहिजे?
योहा. ६:१५; १७:१६) आणखी एक कारण म्हणजे, आपण देवाच्या राज्याला पाठिंबा देतो. त्यामुळे, मानवजातीच्या सर्व समस्यांना केवळ देवाचं राज्यच काढू शकेल, असा प्रचार करताना शुद्ध विवेक बाळगणं आपल्याला शक्य होतं. आज जगातल्या खोट्या धर्मांचा या ना त्या मार्गानं राजकारणाशी संबंध आहे. त्यामुळे लोकांमध्ये फुटी निर्माण होतात. पण याउलट, जगभरातील आपल्या बंधुभगिनींमध्ये ऐक्य आहे. आणि हे ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी आपण तटस्थ भूमिका घेतो.—१ पेत्र २:१७.
३ यहोवा आपल्याकडून तटस्थ भूमिकेची अपेक्षा का करतो, याची बरीच कारणं आपल्याला बायबलमध्ये मिळतात. उदाहरणार्थ, याचं एक कारण म्हणजे आपण येशूचं अनुकरण करतो. येशूनं कोणत्याही राजकारणात आणि सामाजिक किंवा राजकीय झगड्यांमध्ये सहभाग न घेण्याद्वारे “जगाचा भाग” नसल्याचं दाखवून दिलं. (४. (क) तटस्थ भूमिका टिकवून ठेवणं कठीण होत जाईल, अशी अपेक्षा आपण का करू शकतो? (ख) तटस्थ राहण्याकरता आपण आत्ताच तयारी करण्याची का गरज आहे?
४ आज आपण अशा ठिकाणी राहत असू, जिथं राजकारणात सहभाग घेण्याची अपेक्षा कदाचित आपल्याकडून केली जात नसेल. पण जसजसा सैतानाच्या व्यवस्थीकरणाचा अंत जवळ येत आहे, तसतसं तटस्थ राहणं आपल्यासाठी कठीण होत जाईल. शिवाय, लोकदेखील आज पूर्वीपेक्षा जास्त “शांतताद्वेषी” व “हूड” म्हणजे उतावीळ किंवा अविचारी बनले आहेत आणि त्यांच्यातले मतभेद पुढे आणखीनच वाढत जातील. (२ तीम. ३:३, ४) आपल्यातील काही बांधवांना त्यांच्या देशातील अचानक बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे आपली तटस्थ भूमिका टिकवून ठेवणं कठीण झालं आहे. त्यामुळे, कठीण परिस्थितीतही आपली भूमिका टिकवून ठेवणं शक्य व्हावं म्हणून आत्ताच तयारी करणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. म्हणूनच, आता आपण अशा चार गोष्टींचा विचार करू या ज्यांमुळे हे करणं आपल्याला शक्य होईल.
मानवी सरकारांबद्दल यहोवासारखाच दृष्टिकोन बाळगा
५. मानवी सरकारांबद्दल देवाचा दृष्टिकोन काय आहे?
५ आपली तटस्थ भूमिका टिकवून ठेवण्याचा एक मार्ग म्हणजे, मानवी सरकारांबद्दल यहोवासारखाच दृष्टिकोन बाळगणं. मानवांनी एकमेकांवर राज्य करावं, अशा उद्देशानं यहोवानं त्यांना कधीच निर्माण केलं नव्हतं. (यिर्म. १०:२३) उलट, तो संपूर्ण मानवजातीला एक कुटुंब या नात्यानं पाहतो. पण मानवनिर्मित सरकार राष्ट्रप्रेमाच्या भावनेला खतपाणी घालत असल्यामुळे, लोकांमध्ये फुटी निर्माण झाल्या आहेत. आज चांगली वाटणारी सरकारंदेखील मानवजातीच्या सर्व समस्यांना मिटवू शकत नाहीत. शिवाय, १९१४ पासून ही सरकारं देवाच्या राज्याची विरोधक बनली आहेत. लवकरच देवाचं राज्य या सर्व मानवी सरकारांचा अंत करेल.—स्तोत्र २:२, ७-९ वाचा.
६. सरकारी अधिकाऱ्यांप्रती आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे?
६ देवानं आज मानवी सरकारांना राज्य करण्याची अनुमती दिली आहे. कारण काही प्रमाणात का होईना, शांती आणि सुव्यवस्था टिकवून ठेवणं त्यांच्यामुळे शक्य झालं आहे. शिवाय त्यामुळे देवाच्या राज्याची सुवार्ता घोषित करण्यास आपल्याला मदत होते. (रोम. १३:३, ४) आपल्याला शांतीनं देवाची उपासना करता यावी म्हणून या राजकीय अधिकाऱ्यांसाठी प्रार्थना करण्यासही देवानं आपल्याला सांगितलं आहे. (१ तीम. २:१, २) यासोबतच, जेव्हा आपल्याला योग्य वागणूक दिली जात नाही, तेव्हा याच राजकीय अधिकाऱ्यांकडे आपण दाद मागू शकतो. आणि हेच तर पौलानं केलं होतं. (प्रे. कृत्ये २५:११) हे खरं आहे, की या सर्व मानवी सरकारांवर सैतानाचं वर्चस्व असल्याचं बायबल आपल्याला सांगतं. पण म्हणून, प्रत्येक सरकारी अधिकाऱ्यावर त्याचं नियंत्रण आहे असा त्याचा मुळीच अर्थ होत नाही. (लूक ४:५, ६) त्यामुळे अमुक एखाद्या सरकारी अधिकाऱ्यावर सैतानाचं वर्चस्व आहे, असं सुचवण्याचा आपण प्रयत्न करत नाही. कारण इतरांची निंदा करू नये, असं बायबल आपल्याला सांगतं.—तीत ३:१, २.
७. आपण कोणत्या प्रकारची विचारसरणी टाळली पाहिजे?
७ कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला, गटाला किंवा त्यांच्या राजकीय धोरणाला, मग ते आपल्याकरता फायद्याचं असलं तरी, पाठिंबा देण्याचं आपण टाळतो. असं केल्यामुळे आपण देवाच्या आज्ञेचं पालन करत असतो. पण प्रत्येक वेळी हे करण सोपं असेलच असं नाही. उदाहरणार्थ, त्रासदायक बनलेल्या शासनाविरुद्ध काही जण आंदोलन करत आहेत, असा विचार करा. हे आंदोलन मग कदाचित यहोवाच्या इफिस. २:२) जर आपल्याला आपली तटस्थ भूमिका टिकवून ठेवायची असेल, तर या जगातील एक बाजू दुसऱ्यापेक्षा योग्य आहे असं म्हणणंदेखील आपण टाळलं पाहिजे. कारण असं केल्यामुळे फक्त वागण्या-बोलण्यातच नव्हे तर अंतःकरणातही आपण तटस्थ भूमिका राखून आहोत, हे स्पष्ट होईल.
साक्षीदारांकरताही असेल. पण म्हणून तुम्ही जाऊन त्यांना साथ द्याल का? नक्कीच नाही. किंवा मग, त्यांचा निषेध व्यक्त करणं बरोबरच आहे आणि या प्रयत्नात त्यांना यश मिळावं अशी आशा तुम्ही कराल का? (“चतूर” तरीही “निरुपद्रवी” असा
८. तटस्थ भूमिका टिकवून ठेवणं कठीण असतं, तेव्हादेखील आपण “चतुर” तरीही “निरुपद्रवी” कसं राहू शकतो?
८ आपली तटस्थ भूमिका टिकवून ठेवण्याचा दुसरा महत्त्वपूर्ण मार्ग म्हणजे, आव्हानांना तोंड देताना “सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी” असणं. (मत्तय १०:१६, १७ वाचा.) पुढे येणाऱ्या धोक्यांचा आधीच अंदाज घेण्याद्वारे आपण चतुर किंवा सावध असल्याचं दाखवतो. आणि अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारे तडजोड न करण्याद्वारे आपण “निरुपद्रवी” असल्याचं दाखवत असतो. चला, मग अशा काही परिस्थितींचा आता आपण विचार करू या. आणि या परिस्थितींमध्ये आपल्याला कशा प्रकारे तटस्थ राहता येईल ते पाहू या.
९. लोकांशी बोलताना आपण कोणत्या बाबतीत दक्षता बाळगली पाहिजे?
९ लोकांशी बोलताना. लोक जेव्हा राजकीय विषयांवर चर्चा करत असतात, तेव्हा आपण खूप सावध असलं पाहिजे. उदाहरणार्थ, देवाच्या राज्याबद्दल जेव्हा आपण एखाद्याशी बोलत असतो, तेव्हा अमुक एका राजकीय गटाचं किंवा राजकीय पुढाऱ्याचं मत किंवा विचार, योग्य आहेत किंवा अयोग्य आहेत असं आपण कधीच म्हणणार नाही. एखादी समस्या सोडवण्यासाठी केल्या जाणाऱ्या मानवी प्रयत्नांवर बोलण्याऐवजी, देवाचं राज्य या समस्यांना कशा प्रकारे कायमचं काढून टाकेल हे बायबलमधून दाखवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. शिवाय, लोक जेव्हा समलिंगी विवाह किंवा गर्भपातासारख्या वादग्रस्त विषयांवर बोलत असतात, तेव्हा देवाचं वचन त्याबद्दल काय म्हणतं आणि आपण आपल्या जीवनात ते कशा प्रकारे लागू करतो हे सांगण्याचा प्रयत्न करा. तसंच, विशिष्ट कायदे रद्द केले पाहिजेत किंवा बदलले पाहिजेत, असं जर कोणी म्हणत असेल, तर अशा वेळी कोणाचीही बाजू आपण घेणार नाही. शिवाय, इतरांनी आपलं मत बदलावं असा अट्टहासदेखील आपण करणार नाही.
१०. प्रसारमाध्यमांद्वारे सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींच्या बाबतीत आपण तटस्थ आहोत याची खात्री बाळगण्यासाठी आपण काय करू शकतो?
१० प्रसारमाध्यम. कधीकधी प्रसारमाध्यमं बातमी अशा प्रकारे मांडतात, ज्यामुळे एखाद्या विषयावर असणाऱ्या एकतर्फी माहितीलाच जास्त ठळकपणे समोर आणलं जातं. ज्या देशांमध्ये प्रसारमाध्यमांवर खासकरून राजकीय शक्तींचं वर्चस्व असतं, त्या ठिकाणी असं घडण्याची शक्यता जास्त असते. अशा प्रकारे जेव्हा एखादी वृत्तसंस्था किंवा रिपोर्टर झालेल्या घटनेची एकच बाजू मांडतात, तेव्हा त्यांच्यासारखाच विचार करण्याचं टाळण्यासाठी आपण सावध असलं पाहिजे. म्हणून स्वतःला असं विचारा: ‘एखादा रिपोर्टर राजकारणाविषयी जे काही सांगत आहे, त्याच्याशी मी सहमत असल्यामुळे मला केवळ त्याच्याच बातम्या ऐकायला आवडतात का?’ अशा वेळी आपली तटस्थ भूमिका टिकवून ठेवण्यासाठी, राजकीय विषयांबद्दल कोणाची तरी बाजू घेणाऱ्या बातम्या ऐकण्याचं किंवा वाचण्याचं आपण टाळलं पाहिजे. याउलट, चाललेल्या घडामोडींचा निःपक्षपणे अहवाल देणाऱ्या बातम्या शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. याशिवाय, आपण जे ऐकतो त्याची पडताळणी बायबलमध्ये देण्यात आलेल्या ‘सुवचनांच्या नमुन्यासोबत’ करण्याचंही आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे.—२ तीम. १:१३.
११. आपल्याजवळ असणाऱ्या भौतिक गोष्टी आपल्याकरता जास्त महत्त्वाच्या बनतात, तेव्हा तटस्थ राहणं कशा प्रकारे कठीण जाऊ शकतं?
११ भौतिकवाद. आपल्याजवळ असणारी मालमत्ता जर आपल्यासाठी जास्त महत्त्वाची असेल, तर तटस्थ राहणं आपल्यासाठी कठीण जाऊ शकतं. १९७० सालानंतर, राजकीय गटात सामील होण्यास नकार दिल्यामुळे, मलावीमधील बऱ्याच साक्षीदारांना आपल्या संपत्तीला मुकावं लागलं. पण दुःखाची गोष्ट म्हणजे, काही जणांना आपलं ऐशआरामाचं जीवन सोडून देणं कठीण गेलं. रूथ नावाची एक बहीण म्हणते: “आमच्यासोबत हद्दपार केलेले पुष्कळ जण होते. पण छावणीतलं विस्कळीत जीवन जगण्यापेक्षा राजकीय गटात सामील होऊन घरी परतण्याचा निर्णय काही जणांनी घेतला.” पण आनंदाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत इब्री १०:३४.
देवाच्या बऱ्याच सेवकांनी असं केलेलं नाही. हलाखीच्या परिस्थितीला तोंड द्यावं लागलं किंवा आपल्या संपूर्ण मालमत्तेला मुकावं लागलं, तरी आपली तटस्थ भूमिका त्यांनी सोडली नाही.—१२, १३. (क) मानवजातीबद्दल देवाचा दृष्टिकोन कसा आहे? (ख) आपल्या देशाबद्दल, आपल्या मनात अवास्तव गर्व आहे की नाही हे आपण कसं ओळखू शकतो?
१२ अवास्तव गर्व. आपल्या वंशाबद्दल, जातीबद्दल, संस्कृतीबद्दल, शहराबद्दल किंवा देशाबद्दल गर्व बाळगणं किंवा बढाई मारणं आज सर्वसामान्य गोष्ट बनली आहे. पण यहोवा एखाद्या व्यक्तीला किंवा विशिष्ट समाजाला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत नाही. त्याच्याकरता आपण सर्व जण समान आहोत. हे खरं आहे, की यहोवानं आपल्या प्रत्येकाला एकमेकांपेक्षा वेगळं असं बनवलं आहे आणि ही विविधता आपल्यालाही आवडते. म्हणून, आपण आपल्या संस्कृतीचा त्याग करावा अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करत नाही. पण त्यासोबतच, आपण इतरांपेक्षा कोणत्याही बाबतीत श्रेष्ठ आहोत असा विचारही आपण करू नये अशी त्याची इच्छा आहे.—रोम. १०:१२.
१३ आपल्या देशाबद्दल आपण इतका अभिमान बाळगू नये की इतर देशांपेक्षा आपला देश चांगला आहे असं आपल्याला वाटू लागेल. कारण यामुळे तटस्थ भूमिका टिकवून ठेवणं आपल्यासाठी खूप कठीण जाईल. पहिल्या शतकातील काही लोकांनीदेखील असंच केलं होतं. त्या काळातील काही इब्री बांधवांनी मंडळीतील ग्रीक विधवांकडे दुर्लक्ष केलं. (प्रे. कृत्ये ६:१) मग आपल्या मनात अशा प्रकारचा गर्व मूळ धरत आहे का, ते आपण कसं ओळखू शकतो? दुसऱ्या देशातील एका बांधवानं किंवा बहिणीनं आपल्याला एखादी गोष्ट सुचवली असेल, तर ‘त्यापेक्षा आमचीच पद्धत चांगली आहे’ असा विचार करून आपण ती गोष्ट लगेच नाकारतो का? असं जर होत असेल, तर “लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना,” हा सल्ला आपण नेहमी लक्षात ठेवला पाहिजे.—फिलिप्पै. २:३
यहोवाकडे मदत मागा
१४. प्रार्थना केल्यामुळे आपल्याला कशी मदत होईल, आणि बायबलमधील कोणत्या उदाहरणावरून हे स्पष्ट होतं?
१४ तटस्थ भूमिका टिकवून ठेवण्याचा तिसरा मार्ग म्हणजे यहोवावर अवलंबून राहणं. म्हणून पवित्र आत्म्यासाठी यहोवाकडे प्रार्थना करा म्हणजे धीर आणि आत्मसंयम बाळगण्यास तुम्हाला मदत होईल. भ्रष्ट आणि अन्यायी शासनाला तोंड देताना या गुणांची तुम्हाला नक्कीच मदत होईल. यासोबतच, ज्या परिस्थितींमध्ये तटस्थ भूमिका टिकवून ठेवणं कठीण होईल अशा परिस्थितींना आधीच ओळखता यावं आणि अशा वेळी योग्य ते करता यावं म्हणून यहोवाकडे बुद्धीसाठी प्रार्थना करा. (याको. १:५) यहोवाप्रती असणाऱ्या आपल्या एकनिष्ठेमुळे कदाचित आपल्याला तुरुंगात टाकलं जाईल किंवा दुसरी एखादी शिक्षा दिली जाईल. अशा वेळी आपल्या विश्वासाचं समर्थन करता यावं म्हणून धैर्यासाठी प्रार्थना करा. आणि याची खात्री बाळगा, की या सर्व गोष्टींना सहन करण्याची शक्ती यहोवा तुम्हाला नक्की देईल.—प्रेषितांची कृत्ये ४:२७-३१ वाचा.
१५. आपली तटस्थ भूमिका टिकवून ठेवण्यास बायबल आपल्याला कशी मदत करतं? (“देवाच्या वचनामुळे तटस्थ राहण्यास त्यांना मदत झाली” असं शीर्षक असलेली चौकट पाहा.)
१५ आपला विश्वास मजबूत करण्यासाठी यहोवानं आपल्याला बायबल दिलं आहे. म्हणून तटस्थ राहण्यासाठी मदत करतील अशा वचनांवर मनन करा. ही वचनं तोंडपाठ करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे बायबल नसेल तेव्हा ती तुम्हाला आठवतील आणि तुम्हाला मदत होईल. शिवाय, भविष्याबद्दल देवानं दिलेल्या अभिवचनांवरील आपली आशा आणखी मजबूत करण्यासही बायबलमुळे आपल्याला मदत होते. या आशेमुळेच छळाचा सामना करताना तग धरून राहण्यास आपल्याला मदत होईल. (रोम. ८:२५) नवीन जगात ज्या आशीर्वादांना अनुभवण्यास तुम्ही आतुर आहात त्याबद्दल सांगणारी वचनं निवडा. आणि ते आशीर्वाद तुम्ही तिथं प्रत्यक्ष अनुभवत आहात अशी कल्पना करण्याचा प्रयत्न करा.
यहोवाच्या विश्वासू सेवकांचं अनुकरण करा
१६, १७. देवाच्या विश्वासू सेवकांच्या उदाहरणातून तटस्थ राहण्याच्या बाबतीत आपण काय शिकू शकतो? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)
१६ तटस्थ भूमिका टिकवून ठेवण्यास मदत करणारी चौथी गोष्ट म्हणजे, यहोवाच्या विश्वासू सेवकांच्या उदाहरणावर मनन करणं. बायबलमध्ये अशा बऱ्याच विश्वासू सेवकांची उदाहरणं आहेत, ज्यांनी धैर्य दाखवलं आणि योग्य निर्णय दानीएल ३:१६-१८ वाचा.) बायबलमध्ये असणाऱ्या त्यांच्या अहवालातून आज बऱ्याच साक्षीदारांना प्रोत्साहन मिळत आहे. आणि त्यामुळे त्यांच्या देशातील राष्ट्रध्वजाला वंदन करण्यास धैर्यानं नकार देण्यासाठी त्यांना मदत झाली आहे. येशूनं लोकांना विभाजित करणाऱ्या राजनैतिक गोष्टींमध्ये किंवा इतर कोणत्याही गोष्टींमध्ये सहभाग घेतला नाही. त्याच्या या चांगल्या उदाहरणाचा पुढे त्याच्या शिष्यांना फायदा होईल हे त्याला माहीत होतं. म्हणूनच त्यानं म्हटलं: “धीर धरा; मी जगाला जिंकले आहे.”—योहा. १६:३३.
घेऊन आपली तटस्थ भूमिका टिकवून ठेवली. शद्रख, मेशख आणि अबेद्नगो यांचं उदाहरण घ्या. त्यांनी बॅबिलोनच्या सत्तेला सूचित करणाऱ्या मूर्तीची उपासना करण्याचं नाकारलं. (१७ आज आपल्या काळातही बऱ्याच साक्षीदारांनी आपली तटस्थ भूमिका टिकवून ठेवली आहे. यहोवाला एकनिष्ठ राहिल्यामुळे, त्यांच्यापैकी काही जणांचा छळ करण्यात आला, त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं आणि एवढंच नव्हे तर काही जणांना ठारदेखील मारण्यात आलं. त्यांच्या उदाहरणामुळे आपल्यालाही धैर्य दाखवण्यास मदत होते. टर्की देशातील एक बांधव म्हणतो: “हिटलरच्या सैन्यात भरती होण्यास नकार दिल्यामुळे, फ्रान्झ राईटर नावाच्या एका तरुण बांधवाला ठार मारण्यात आलं. त्याच्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्यानं आपल्या आईला एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रातून त्याचा यहोवावर किती जबरदस्त विश्वास होता, ते दिसून येतं. अशा छळाचा जर मलाही सामना करावा लागला तर त्यानं जे केलं तेच मलाही करायला आवडेल!” [2]
१८, १९. (क) तटस्थ राहण्याकरता मंडळीतील सदस्य तुम्हाला कशी मदत करू शकतात? (ख) आपण कोणता निर्धार केला पाहिजे?
१८ तुमच्या मंडळीतील बंधुभगिनीसुद्धा तुम्हाला तटस्थ राहण्यास मदत करू शकतात. त्यामुळे जर तुम्ही कठीण परिस्थितीला तोंड देत असाल तर मंडळीतील वडिलांना त्याविषयी नक्की सांगा, म्हणजे बायबलमधून योग्य सल्ला ते तुम्हाला देतील. मंडळीतील बंधुभगिनींना जर तुमच्या परिस्थितीबद्दल माहीत असेल, तर तेसुद्धा तुम्हाला प्रोत्साहन देऊ शकतील. त्यांना आपल्यासाठी प्रार्थना करण्यास सांगा. पण त्यासोबतच, आपणदेखील आपल्या बांधवांना साथ दिली पाहिजे आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. (मत्त. ७:१२) jw.org या आपल्या वेबसाईटवर, न्यूजरूम > लिगल डेव्हलपमेंट्स या टॅबखाली “जेहोवाज विटनेसेस इंप्रीजन्ड फॉर देअर फेथ—बाय लोकेशन” (विविध देशांमध्ये, आपल्या विश्वासाकरता तुरुंगात असलेले यहोवाचे साक्षीदार) या मथळ्याखाली सध्या तुरुंगात असणाऱ्या बांधवांची नावं देण्यात आली आहेत. त्यातील काही बंधुभगिनींची नावं निवडून, एकनिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी लागणारं धैर्य त्यांना मिळावं म्हणून यहोवाला प्रार्थना करा.—इफिस. ६:१९, २०.
१९ जसजसं हे जग अंताच्या जवळ जात आहे तसतसं या जगातील सत्ता त्यांची बाजू घेण्यास आपल्यावर जास्तीतजास्त दबाव आणण्याचा प्रयत्न करतील. म्हणूनच या विभाजित जगात आपली तटस्थ भूमिका टिकवून ठेवण्यासाठी आत्ताच तयारी करणं खूप महत्त्वाचं आहे!
^ [१] (परिच्छेद १) येशूनं जेव्हा कैसराचा उल्लेख केला, तेव्हा तो त्या वेळच्या मानवी शासनाबद्दल बोलत होता. त्या वेळी कैसराचं राज्य होतं आणि तो सर्वोच्च मानवी अधिकारी होता.
^ [२] (परिच्छेद १७) जेहोवाज विटनेसेस—प्रोक्लेमर्स ऑफ गॉड्स किंगडम या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक ६६२ आणि गॉड्स किंगडम रूल्स! या पुस्तकातील अध्याय १४ मध्ये असलेली, “त्यानं देवाच्या गौरवासाठी मरण पत्करलं” ही चौकट पाहा.