व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

यहोवाच्या साक्षीदारांची प्रकाशने वैयक्‍तिक वेबसाईट किंवा सोशल मिडियावर पोस्ट करायला परवानगी का नाही?

आपण आपली बायबल आधारित प्रकाशने विनामूल्य देत असल्यामुळे काहींना वाटतं, की इतर वेबसाईट किंवा सोशल मिडियावर ती पोस्ट करणं चुकीचं नाही. (सोशल मिडिया म्हणजे अशी एखादी वेबसाईट किंवा अॅप ज्यावरून लोक त्या वेबसाईट किंवा अॅपचा वापर करणाऱ्‍या इतर लोकांसोबत संपर्क साधू शकतात.) पण असं केल्यामुळे आपल्या वेबसाईटच्या वापरण्याच्या अटींचं * उल्लंघन होतं. कारण या अटींमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की या वेबसाईटवरून चित्रं, इलेक्ट्रॉनिक साहित्य, ट्रेडमार्क, संगीत, फोटो, व्हिडिओ किंवा लेख, इंटरनेटवर (कोणत्याही वेबसाईटवर, फाईल-शेरींग साईटवर, व्हिडिओ-शेरींग साईटवर किंवा सोशल नेटवर्कवर) पोस्ट करायला कोणालाच परवानगी नाही. पण अशी बंदी आवश्‍यक का आहे?

कॉपीराईट असलेली आपली प्रकाशने कोणीही इतर वेबसाईटवर पोस्ट करू नयेत

आपल्या वेबसाईटवरचं सर्व साहित्य कॉपीराईट असलेलं म्हणजेच मालकी हक्क असलेलं आहे. धर्मत्यागी आणि विरोधक आपल्या प्रकाशनांचा वापर त्यांच्या वेबसाईटवर करून यहोवाचे साक्षीदार आणि इतरांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. पण अशा साईटवर असलेली माहिती वाचकांच्या मनात शंकेचं बीज पेरण्यासाठी तयार केलेली असते. (स्तो. २६:४; नीति. २२:५) इतरांनी आपल्या साहित्याचा किंवा jw.org च्या लोगोचा वापर जाहिरातींसाठी, त्यांच्या वस्तू विकण्यासाठी आणि मोबाईल अॅपमध्ये केला आहे. आपला कॉपीराईट आणि ट्रेडमार्क हे सुरक्षित करून ठेवल्यामुळे अशा प्रकारचा गैरवापर रोखण्यासाठी आपल्याकडे कायदेशीर आधार आहे. (नीति. २७:१२) पण संघटनेने जर जाणूनबुजून इतरांना किंवा बांधवांना आपलं इलेक्ट्रॉनिक साहित्य इतर वेबसाईटवर पोस्ट करू दिलं किंवा jw.org च्या ट्रेडमार्कचा वापर वस्तूंच्या विक्रीसाठी करू दिला, तर विरोधकांना आणि व्यावसायिक कंपनींना प्रतिबंध करण्याचा आपण जो प्रयत्न करतो त्याला कोर्ट कदाचित सहकार्य करणार नाही.

आपली प्रकाशने jw.org वरून डाउनलोड न करता इतर वेबसाईटवरून डाउनलोड करणं धोक्याचं ठरू शकतं. आध्यात्मिक अन्‍न पुरवण्याची जबाबदारी यहोवाने फक्‍त “विश्‍वासू आणि बुद्धिमान दास” यालाच सोपवली आहे. (मत्त. २४:४५) आध्यात्मिक अन्‍न प्रकाशित करण्यासाठी हा “दास” फक्‍त www.pr418.com, tv.pr418.com आणि wol.pr418.com या त्यांच्या अधिकृत वेबसाईटचा वापर करतो. तसंच आपल्याकडे फक्‍त JW Language®, JW Library® आणि JW Library Sign Language® हे तीन अधिकृत मोबाईल अॅप आहेत. यांमध्ये कोणतीही जाहिरात नाही. तसंच, हे सैतानाच्या जगाने दूषित झालेलं नाही असा विश्‍वास आपण बाळगू शकतो. जर आध्यात्मिक अन्‍न इतर कोणत्या माध्यमाने मिळत असेल तर ते फेरफार केलेलं किंवा दूषित झालेलं असू शकतं.—स्तो. १८:२६; १९:८.

तसंच, प्रतिक्रिया नोंदवता येण्याची व्यवस्था असलेल्या वेबसाईटवर जर आपलं साहित्य पोस्ट करण्यात आलं तर धर्मत्यागी आणि इतर टीका करणाऱ्‍यांना यहोवाच्या संघटनेच्या विरुद्ध अविश्‍वासाची बीजं पेरण्याची संधी मिळते. आपले काही बांधव ऑनलाईन वाद-विवादात सहभागी झाले आहेत आणि यामुळे यहोवाच्या नावाला कलंक लागला आहे. ऑनलाईन चर्चा करणं हे “योग्य मनोवृत्ती” नसलेल्यांना शिकवण्याचं उचित माध्यम नाही. (२ तीम. २:२३-२५; १ तीम. ६:३-५) असंही दिसून आलं आहे की संघटनेच्या, नियमन मंडळाच्या आणि त्याच्या सदस्यांच्या नावाने खोटी सोशल मिडिया अकाउंट आणि वेबसाईट बनवण्यात आल्या आहेत. पण नियमन मंडळाचा कोणताही सदस्य वैयक्‍तिक वेबपेजचा किंवा सोशल मिडिया साईटचा वापर करत नाही.

लोकांना jw.org वेबसाईटबद्दल सांगितल्यामुळे आनंदाच्या संदेशाचा प्रसार व्हायला मदत होते. (मत्त. २४:१४) आपण प्रचार करताना ज्या इलेक्ट्रॉनिक साहित्यांचा वापर करतो त्यात सतत सुधार केला जात आहे. आमची इच्छा आहे की सर्वांना यांपासून फायदा व्हावा. त्यामुळे वापरण्याच्या अटींमध्ये सांगितल्याप्रमाणे, आपण आपल्या प्रकाशनाची इलेक्ट्रॉनिक कॉपी इ-मेलद्वारे पाठवू शकतो किंवा jw.org वरील साहित्याची लिंक आवड असणाऱ्‍यांना पाठवू शकतो. सत्याप्रती आवड असणाऱ्‍या व्यक्‍तींना आपल्या अधिकृत वेबसाईटबद्दल सांगितल्यामुळे आपण त्यांना आध्यात्मिक अन्‍नाचा मूळ स्रोत “विश्‍वासू आणि बुद्धिमान दास” यांच्याकडे नेतो.

^ परि. 1 वापरण्याच्या अटींची (टर्म्स ऑफ यूजची) लिंक jw.org च्या मुखपृष्ठाच्या शेवटी दिलेली आहे. तसंच, आपल्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या सर्व माहितीसाठीही या अटी लागू होतात.