अभ्यास लेख १५
तुमच्या क्षेत्रातल्या लोकांबद्दल तुम्ही काय विचार करता?
“आपले डोळे वर करून शेतं पाहा, ती पांढरी झाली आहेत आणि कापणीसाठी तयार आहेत.”—योहा. ४:३५.
गीत ४४ कापणीत आनंदाने सहभागी व्हा!
सारांश *
१-२. योहान ४:३५, ३६ या वचनांत दिलेल्या येशूच्या शब्दांचा काय अर्थ होतो?
गालीलला जात असताना येशू शेतांमधून चालत होता. त्या वेळी पीक कापणीसाठी तयार नव्हतं. (योहा. ४:३-६) कापणीसाठी जवळपास चार महिने बाकी होते. येशूने त्या वेळी जे म्हटलं ते ऐकणाऱ्यांना फार वेगळं वाटलं असेल. त्याने म्हटलं: “आपले डोळे वर करून शेतं पाहा, ती पांढरी झाली आहेत आणि कापणीसाठी तयार आहेत.” (योहान ४:३५, ३६ वाचा.) येशूला नेमकं काय म्हणायचं होतं?
२ येशू खरंतर एका लाक्षणिक कापणीबद्दल बोलत होता. म्हणजेच, तो पिकांबद्दल नाही तर लोकांबद्दल बोलत होता. तेव्हा नेमकं काय घडलं याचा जरा विचार करा. यहुदी लोक शोमरोनी लोकांसोबत काही घेणं-देणं ठेवत नव्हते. पण तरीसुद्धा येशूने एका शोमरोनी स्त्रीला प्रचार केला आणि तिने त्याचं ऐकलं. येशू जेव्हा शेतांबद्दल बोलत होता तेव्हा तो शोमरोनी लोकांच्या जमावाबद्दल बोलत होता. येशूने ज्या स्त्रीला प्रचार केला, तिने बऱ्याच शोमरोनी लोकांना त्याच्याबद्दल सांगितलं. आणि ते आता शिकून घ्यायला त्याच्याकडे येत होते. येशूच्या म्हणण्याप्रमाणे ते लोक जणू कापणीसाठी तयार असलेल्या शेतांप्रमाणे होते. (योहा. ४:९, ३९-४२) एका बायबल विद्वानाने या अहवालाबद्दल असं म्हटलं: “येशूचं ऐकून घेण्यासाठी लोक खूप उत्सुकतेने त्याच्याकडे येत होते . . . त्यावरून हे दिसून येतं की ते कापणीसाठी तयार असलेल्या शेतांप्रमाणे होते.”
३. क्षेत्रातल्या लोकांबद्दल जर आपण येशूसारखा विचार केला तर आपण चांगले प्रचारक कसे बनू शकतो?
३ ज्या लोकांना तुम्ही आनंदाचा संदेश सांगता त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही त्यांना कापणीसाठी तयार असलेल्या पिकांप्रमाणे समजता का? जर समजत असाल तर तुम्ही पुढे दिलेल्या तीन गोष्टी कराल. पहिली, तुम्ही तातडीने प्रचारकार्य कराल. कापणीसाठी कमी वेळ उरला आहे, त्यामुळे तुम्ही वेळ वाया घालवणार नाही. दुसरी, लोक संदेशाला चांगला प्रतिसाद देत आहेत, हे पाहून तुम्हाला आनंद होईल. बायबल म्हणतं की “हंगामाच्या उत्सवसमयी” लोक आनंदी असतात. (यश. ९:३) आणि तिसरी, तुम्ही प्रत्येक व्यक्तीबद्दल विचार कराल की तो पुढे जाऊन येशूचा शिष्य होऊ शकतो आणि म्हणून, तुम्ही लोकांना संदेशात आवड निर्माण होईल अशा प्रकारे आपली प्रस्तावना मांडाल.
४. या लेखात आपण प्रेषित पौलकडून काय शिकू शकतो?
४ शोमरोनी कधीच येशूचे शिष्य बनू शकत नाहीत असा येशूच्या काही अनुयायांनी विचार केला असावा. पण येशूने तसा विचार केली नाही. आपणही आपल्या क्षेत्रातल्या लोकांबद्दल असा विचार केला पाहिजे की ते पुढे जाऊन येशूचे शिष्य बनू शकतात. या बाबतीत प्रेषित पौलने आपल्यासाठी चांगलं उदाहरण मांडलं आहे. आपण त्याच्याकडून काय शिकू शकतो? या लेखात आपण त्याच्याकडून तीन गोष्टी शिकणार आहोत: (१) त्याने लोकांच्या विश्वासाबद्दल कसं जाणून घेतलं, (२) त्यांची आवड काय आहे हे त्याने कसं समजून घेतलं, आणि (३) ते पुढे जाऊन येशूचे शिष्य बनू शकतात असा तो त्यांच्याबद्दल का विचार करू शकला.
त्यांचे विश्वास काय आहेत?
५. सभास्थानातल्या लोकांना पौल का समजून घेऊ शकला?
५ पौल सहसा यहुदी सभास्थानात जाऊन प्रचार करायचा. उदाहरणार्थ, थेस्सलनीका इथल्या सभास्थानात असताना “तीन शब्बाथ तो [यहुदी लोकांशी] शास्त्रवचनांतून तर्क करत राहिला.” (प्रे. कार्ये १७:१, २) पौल आत्मविश्वासाने सभास्थानात बोलायचा. तो स्वतः एक यहुदी होता. (प्रे. कार्ये २६:४, ५) आणि म्हणून तो यहुदी लोकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकत होता. त्यामुळे तो त्यांना आत्मविश्वासाने प्रचार करू शकला.—फिलिप्पै. ३:४, ५.
६. पौलने सभास्थानात प्रचार केलेल्या लोकांपेक्षा अथेन्सच्या बाजारात असलेले लोक कसे वेगळे होते?
६ छळ करणाऱ्यांच्या दबावामुळे पौलला आधी थेस्सलनीका आणि मग बिरुया ही ठिकाणं सोडावी लागली. नंतर तो अथेन्स इथे आला. मग तो परत “सभास्थानात यहुद्यांशी व देवाची उपासना करणाऱ्या इतर लोकांशी . . . तर्क करू लागला.” (प्रे. कार्ये १७:१७) पण नंतर बाजारात प्रचार करताना पौलला वेगळे लोक भेटले. हे लोक सभास्थानातल्या लोकांसारखे नव्हते. त्यांपैकी काही तत्त्वज्ञानी तर इतर काही विदेशी लोक होते. त्यांना पौलचा संदेश ही “नवीन शिकवण” वाटली. त्यांनी त्याला म्हटलं: “आम्ही कधीच ऐकल्या नव्हत्या अशा गोष्टी तू आम्हाला सांगत आहेस.”—प्रे. कार्ये १७:१८-२०.
७. प्रेषितांची कार्ये १७:२२, २३ या वचनांनुसार पौलने आपल्या प्रस्तावनेत कसा फेरबदल केला?
७ प्रेषितांची कार्ये १७:२२, २३ वाचा. पौलने सभास्थानातल्या यहुदी लोकांना ज्या प्रकारे संदेश सांगितला त्या प्रकारे त्याने अथेन्समधल्या विदेशी लोकांना संदेश सांगितला नाही. त्यांना संदेश सांगण्याआधी पौलने स्वतःला विचारलं असावं, ‘अथेन्सच्या लोकांचा विश्वास काय आहे?’ तसंच, त्याने आजूबाजूच्या परिस्थितीचं नीट निरीक्षण केलं असेल आणि त्यांच्या धार्मिक प्रथाही लक्षात घेतल्या असतील. त्यानंतर पौलने त्यांच्या उपासनेच्या पद्धती आणि शास्त्रवचनातली सत्यं यांमध्ये कोणते समान विषय असतील याचा विचार केला असेल. बायबलबद्दल टिप्पणी करणारी एक व्यक्ती या विषयी म्हणते, “यहुदी ख्रिस्ती या नात्याने पौलला जाणीव होती की मूर्तिपूजा करणारे ग्रीक लोक यहुदी आणि ख्रिश्चनांच्या ‘खऱ्या’ देवाची उपासना करत नव्हते. पण त्याने त्या लोकांना देवाबद्दल सांगितलं तेव्हा तो देव अथेन्सच्या लोकांसाठी अनोळखी आहे असं त्याने भासवलं नाही.” याचाच अर्थ, पौल आपल्या प्रस्तावनेत फेरबदल करायला तयार होता. त्याने अथेन्सच्या लोकांना म्हटलं की तो सांगत असलेला संदेश हा अशा एका ‘अज्ञात देवाकडून’ आहे ज्याची ते उपासना करण्याचा प्रयत्न करत आहेत. विदेशी लोकांना शास्त्रवचनाबद्दल जास्त काही माहीत नव्हतं. तरी पौलने असा विचार केला नाही की ते कधीच ख्रिस्ती बनणार नाहीत. याउलट, ते कापणीसाठी तयार असलेल्या पिकांसारखे आहेत असा त्याने त्यांच्याबद्दल विचार केला आणि आनंदाचा संदेश सांगण्याच्या आपल्या प्रस्तावनेत फेरबदल केला.
८. (क) तुमच्या क्षेत्रातल्या लोकांचा विश्वास काय आहे हे तुम्ही कसं जाणून घेऊ शकता? (ख) एखाद्या व्यक्तीने म्हटलं की तिला इतर धर्माबद्दल जाणून घेण्याची इच्छा नाही तेव्हा तुम्ही तिला कसं उत्तर देऊ शकता?
८ पौलसारखचं आजूबाजूच्या परिस्थितीचं निरीक्षण करा. तुमच्या क्षेत्रातल्या लोकांचा काय विश्वास आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. घरमालकाने आपलं घर कसं सजवलं आहे ते पाहण्याचा प्रयत्न करा. त्याचं नाव, पेहराव किंवा त्याची बोली यांवरून त्याचा धर्म कोणता, हे तुम्हाला कळेल. कदाचित घरमालक आपल्याला स्पष्टपणे सांगेल की त्याला इतर धर्माबद्दल जाणून घेण्याची इच्छा नाही. अशा वेळी एक खास पायनियर बहीण घरमालकाला म्हणते, “मी जे मानते ते तुम्ही मानायलाच हवं यासाठी मी आले नाही, तर मला तुमच्याशी एका विषयावर चर्चा करायची आहे. तो म्हणजे . . . ”
९. एका धार्मिक व्यक्तीशी चर्चा करताना कोणत्या समान विषयांवर तुम्ही बोलू शकता?
९ एका धार्मिक व्यक्तीशी तुम्ही कोणत्या विषयांवर चर्चा करू शकता? कोणते समान विषय आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ती कदाचित एकाच देवाची उपासना करत असेल, येशू हा मानवजातीचा तारणकर्ता आहे असा ती विश्वास करत असेल, किंवा आपण सर्व अशा वाईट काळात जगत आहोत ज्याचा लवकरच अंत होईल असं ती मानत असेल. बायबलचा संदेश तिला आवडेल अशा समान विषयांवर तिच्याशी बोला.
१०. आपण काय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि का?
१० आपण लक्षात ठेवलं पाहिजे की लोक, त्यांचा धर्म शिकवत असलेल्या सर्वच गोष्टी मानत असतील असं नाही. घरमालकाचा धर्म कोणता आहे हे तुम्हाला समजलं तरीही तो स्वतः कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ऑस्ट्रेलिया देशात खास पायनियर म्हणून सेवा करणारे डेविड म्हणतात, “आजकाल बरेच लोक धार्मिक विश्वासांमध्ये तत्त्वज्ञानही सामील करतात.” आल्बेनिया देशात राहणारी डोनाल्टा नावाची बहीण म्हणते, “प्रचारकार्यात भेटणाऱ्या काही लोकांचं म्हणणं असतं की त्यांचा आपला धर्म आहे. पण नंतर ते मान्य करतात की ते देवाला मानत नाही.” अर्जेंटिना या देशात सेवा करणारा एक मिशनरी बांधव म्हणतो की काही लोकांचा त्रैक्य शिकवणीवर विश्वास आहे असं ते मान्य करतात. पण पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे तिन्ही मिळून एकच देव आहे असं ते कदाचित मानत नाहीत. तो म्हणतो, “लोकांशी बोलताना मी हे लक्षात ठेवतो की एक व्यक्ती आपल्या धर्मातल्या सर्वच शिकवणी मानत असेल असं नाही. यामुळे १ करिंथ. ९:१९-२३.
मला त्यांच्याशी समान विषयांवर बोलायला मदत होते.” तेव्हा लोकांचा नेमका विश्वास काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. असं केल्याने आपण प्रेषित पौलप्रमाणे “सर्व लोकांसाठी सर्वकाही” बनू शकतो.—लोकांची आवड लक्षात घ्या
११. प्रेषितांची कार्ये १४:१४-१७ यांत दिल्याप्रमाणे पौलने लुस्त्रमध्ये राहणाऱ्या लोकांची आवड लक्षात घेऊन संदेश कसा सांगितला?
११ प्रेषितांची कार्ये १४:१४-१७ वाचा. लोकांना कोणत्या विषयांमध्ये आवड आहे हे आधी पौलने समजून घेतलं आणि त्यानुसार त्याने त्याच्या प्रस्तावनेत फेरबदल केला. उदाहरणार्थ, लुस्त्रमध्ये प्रचार करताना पौलला जाणवलं की तिथल्या लोकांना शास्त्रवचनांचं कमी किंवा काहीच ज्ञान नाही. म्हणून त्यांच्यासोबत बोलताना त्यांना समजेल अशा प्रकारे पौलने तर्क केला. फलदायी ऋतू, अन्नधान्य आणि आनंदी जीवन या विषयांबद्दल तो त्यांच्याशी बोलला. ऐकणारे सहजपणे समजू शकतील अशा शब्दांचा आणि उदाहरणांचा त्याने वापर केला.
१२. तुम्ही एका व्यक्तीची आवड समजून त्यानुसार तुमच्या प्रस्तावनेत फेरबदल कसा करू शकता?
१२ तुमच्या क्षेत्रातल्या लोकांची काय आवड आहे हे चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि त्यानुसार आपल्या प्रस्तावनेत फेरबदल करा. एखाद्या व्यक्तीला भेटल्यावर तिला कोणत्या गोष्टींमध्ये आवड आहे हे तुम्ही कसं जाणून घेऊ शकता? आधी चर्चा केल्याप्रमाणे परिस्थितीचं निरीक्षण करा. कदाचित ती व्यक्ती बागेत काम करत असेल, पुस्तक वाचत असेल, गाडी दुरुस्त करत असेल किंवा दुसरं एखादं काम करत असेल. अशा वेळी योग्य वाटत असल्यास तुम्ही त्या कामाबद्दल बोलून चर्चा सुरू करू शकता. (योहा. ४:७) तसंच व्यक्तीच्या कपड्यांवरूनही तिच्याबद्दल काही गोष्टी तुम्हाला समजतील. जसं की, ती कोणत्या देशातली आहे, काय काम करते किंवा तिला कोणता खेळ आवडतो. गुस्तावो नावाचे बांधव म्हणतात, “मी एका १९ वर्षांच्या मुलाला प्रचारात भेटलो. त्याच्या टी-शर्टवर एका प्रसिद्ध गायकाचं चित्र होतं. त्याबद्दल विचारून मी संभाषण सुरू केलं. त्या मुलाने मला सांगितलं की त्याला तो गायक का आवडतो. त्या संभाषणामुळे बायबल अभ्यास सुरू झाला आणि आता तो एक यहोवाचा साक्षीदार आहे.”
१३. अभ्यास करायला आवडेल अशा पद्धतीने तुम्ही त्याबद्दल कसं सांगू शकता?
१३ एखाद्या व्यक्तीला तुम्ही बायबल अभ्यासाबद्दल सांगता तेव्हा ती व्यक्ती अभ्यास करायला तयार होईल अशा पद्धतीने त्याबद्दल सांगा. म्हणजेच, बायबल योहा. ४:१३-१५) उदाहरणार्थ, एका बहिणीने एका स्त्रीला प्रचार केला आणि तिने बहिणीला आपल्या घरात बोलवलं. घराच्या भिंतीवर एक सर्टिफीकेट लावलं होतं आणि त्यावरून बहिणीला कळलं की ती प्राध्यापिका आहे. बहीण तिला म्हणाली की, आम्हीसुद्धा बायबल अभ्यासाच्या कार्यक्रमाद्वारे आणि सभांद्वारे लोकांना शिकवतो. ती स्त्री बायबल अभ्यास करायला तयार झाली, दुसऱ्या दिवशी सभेलाही आली आणि नंतर विभागीय संमेलनालासुद्धा उपस्थित राहिली. एका वर्षानंतर तिचा बाप्तिस्मा झाला. म्हणून स्वतःला विचारा: ‘मी ज्यांची पुनर्भेट घेणार आहे त्यांना कोणत्या विषयांबद्दल आवड आहे? अभ्यास करायला त्यांना आवडेल अशा पद्धतीने मी बायबल अभ्यासाच्या कार्यक्रमाबद्दल कसं सांगू शकतो?
अभ्यासामुळे तिला कशी मदत होईल हे सांगा. (१४. प्रत्येक विद्यार्थ्यासोबत बायबल अभ्यास करताना तुम्ही तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीत कसा फेरबदल करू शकता?
१४ बायबल अभ्यास सुरू झाल्यानंतर प्रत्येक वेळी विद्यार्थ्यासोबत अभ्यास करण्याआधी चांगली तयारी करा. विद्यार्थ्याच्या कुटुंबाबद्दल, त्याच्या शिक्षणाबद्दल, त्याला जीवनात आलेल्या अनुभवांबद्दल आणि त्याच्या आवडीनिवडींबद्दल विचार करा. तुम्ही बायबल सत्यं समजवण्यासाठी कोणती वचनं वाचणार, कोणते व्हिडिओ दाखवणार आणि कोणत्या उदाहरणाचा वापर करणार हे तयारी करतानाच ठरवा. स्वतःला विचारा, “या विद्यार्थ्याला खासकरून कोणती गोष्ट आवडेल आणि त्याच्या मनापर्यंत पोहचेल?” (नीति. १६:२३) आल्बेनिया देशात राहणारी फ्लोरा नावाची पायनियर बहीण एका स्त्रीसोबत बायबल अभ्यास करत होती. त्या स्त्रीने बहिणीला स्पष्टपणे सांगितलं होतं की “मला पुनरुत्थानाची शिकवण पटत नाही आणि ती मी कधीच स्वीकारू शकत नाही.” ही शिकवण त्या स्त्रीने लगेच स्वीकारावी अशी अपेक्षा फ्लोराने केली नाही. त्याबद्दल ती म्हणते, “मी विचार केला की पुनरुत्थानाची शिकवण स्वीकारण्याआधी तिने पुनरुत्थानाचं अभिवचन देणाऱ्या देवाला ओळखणं गरजेचं आहे.” तेव्हापासून प्रत्येक अभ्यासादरम्यान फ्लोराने यहोवाचं प्रेम, बुद्धि आणि शक्ती या गुणांवर जोर दिला. नंतर त्या स्त्रीने पुनरुत्थानाच्या शिकवणीवर विश्वास ठेवला आणि ती आता एक आवेशी प्रचारक आहे.
लोक पुढे जाऊन येशूचे शिष्य बनू शकतात असा विचार करा
१५. प्रेषितांची कार्ये १७:१६-१८ या वचनांत सांगितल्याप्रमाणे पौलला अथेन्सच्या लोकांबद्दल कोणत्या गोष्टी आवडल्या नाहीत, तरीपण तो त्यांना का प्रचार करत राहिला?
१५ प्रेषितांची कार्ये १७:१६-१८ वाचा. अथेन्स शहर हे मूर्तिपूजा, लैंगिक अनैतिकता आणि खोटे धार्मिक तत्त्वज्ञान या गोष्टींनी भरलेलं होतं. तरीही पौलने असा विचार केला नाही की तिथले लोक कधीच येशूचे शिष्य बनू शकत नाहीत. तसंच त्यांनी त्याचा अपमान केला तरी त्याने त्यांना प्रचार करणं थांबवलं नाही. पौल आधी “देवाची निंदा करणारा, त्याच्या लोकांचा छळ करणारा आणि एक उद्धट मनुष्य” होता तरीही तो येशूचा शिष्य बनला. (१ तीम. १:१३) जसा येशूने पौलबद्दल विचार केला की तो त्याचा शिष्य बनू शकतो, तसा पौलनेही अथेन्सच्या लोकांबद्दल विचार केला की तेसुद्धा पुढे जाऊन येशूचे शिष्य बनू शकतात. आणि पौलच्या अपेक्षेप्रमाणे अथेन्सचे काही लोक येशूचे शिष्य बनले.—प्रे. कार्ये ९:१३-१५; १७:३४.
१६-१७. सर्व प्रकारचे लोक येशूचे शिष्य बनू शकतात हे कशावरून दिसून येतं? एक उदाहरण द्या.
१६ पहिल्या शतकात सर्व प्रकारचे लोक येशूचे शिष्य बनले. पौलने ग्रीसमधल्या करिंथ शहरातल्या लोकांना पत्र लिहिलं तेव्हा त्याने म्हटलं की त्या मंडळीतले काही सदस्य एके काळी गुन्हेगार होते किंवा खूपच वाईट अनैतिक जीवनशैली जगत होते. त्याने पुढे असंही म्हटलं: “तुमच्यापैकी काही जण पूर्वी असे होते. पण तुम्हाला धुऊन शुद्ध करण्यात आले आहे.” (१ करिंथ. ६:९-११) असे लोक पुढे जाऊन आपल्या जीवनात बदल करू शकतात आणि येशूचे शिष्य बनू शकतात असा विचार तुम्ही त्यांच्याबद्दल केला असता का?
१७ येशूचे शिष्य बनण्यासाठी आज बरेच लोक आपल्या जीवनात बदल करायला तयार आहेत. उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलियामध्ये खास पायनियर म्हणून सेवा करणाऱ्या युकिना नावाच्या बहिणीला जाणवलं की सर्व प्रकारचे लोक बायबलच्या संदेशाला चांगला प्रतिसाद देऊ शकतात. एकदा तिने एका ऑफिसमध्ये एका तरुण मुलीला पाहिलं. त्या मुलीच्या शरीरावर टॅटू गोंदवलेले होते आणि तिने ढगळ कपडे घातले होते. युकिना म्हणते, “काही क्षणांसाठी मला तिच्याशी बोलायला संकोच *
वाटला. पण मग मी तिच्याशी बोलायला सुरुवात केली. तिच्याशी बोलताना मला जाणवलं की तिला बायबलमध्ये आवड आहे. इतकी की तिने शरीरावर गोंदवलेले काही टॅटू हे स्तोत्र पुस्तकातली काही वचनं होती!” नंतर त्या मुलीने बायबल अभ्यास सुरू केला आणि ती सभांनाही येऊ लागली.१८. आपण लोकांबद्दल मत का बनवू नये?
१८ येशूने म्हटलं की पीक कापणीसाठी तयार आहे. याचा अर्थ खूप लोक त्याचे शिष्य बनतील अशी अपेक्षा तो करत होता का? मुळीच नाही. शास्त्रवचनात आधीच सांगितलं होतं की कमी लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील. (योहा. १२:३७, ३८) लोकांच्या मनात काय आहे हे जाणण्याची क्षमता येशूकडे होती. (मत्त. ९:४) त्याने त्या कमी लोकांवर लक्ष केंद्रित केलं असलं, तरी आवेशाने त्याने सर्वांना प्रचार केला. पण आपण लोकांच्या मनात काय आहे हे जाणू शकत नाही. म्हणून, आपण एखाद्या क्षेत्राबद्दल किंवा व्यक्तीबद्दल आधीच मत बनवण्याचं टाळलं पाहिजे! याउलट, लोक येशूचे शिष्य बनू शकतात असा दृष्टिकोन ठेवा. बुर्किना फासो या ठिकाणी मिशनरी म्हणून सेवा करणारा मार्क म्हणतो: “ज्यांच्याबद्दल मी विचार करतो की ते प्रगती करतील ते सहसा अभ्यास थांबवतात, पण ज्यांच्याबद्दल मला वाटतं की ते प्रगती करणार नाहीत ते खरंतर प्रगती करतात. यावरून मला शिकायला मिळालं, की आपण लोकांबद्दल मत बनवण्यापेक्षा यहोवाच्या पवित्र आत्म्याला आपलं मार्गदर्शन करू द्यावं.”
१९. आपल्या क्षेत्रातल्या लोकांबद्दल आपण कसा विचार केला पाहिजे?
१९ कापणीसाठी तयार असलेल्या पिकांप्रमाणे, आपल्या क्षेत्रात जास्त लोक नाहीत असं आपल्याला सुरुवातीला वाटू शकतं. पण येशूने आपल्या शिष्यांना काय सांगितलं हे लक्षात ठेवा. त्याने म्हटलं की शेतं पांढरी झाली आहेत आणि कापणीसाठी तयार आहेत. लोकांमध्ये बदल होऊ शकतो आणि ते येशूचे शिष्य बनू शकतात. अशा शिष्यांना यहोवा “मोलवान” समजतो. (हाग्ग. २:७, पं.र.भा.) आपण जर यहोवा आणि येशू यांच्यासारखा लोकांबद्दल विचार केला तर आपण त्यांची पार्श्वभूमी आणि आवड जाणून घेण्याचा प्रयत्न करू. असं केल्यामुळे आपण त्यांना अनोळखी समजणार नाही, तर पुढे जाऊन ते आपले भाऊबहीण बनतील असा आपण त्यांच्याबद्दल विचार करू.
गीत १८ देवाचे खरे प्रेम
^ परि. 5 आपल्या क्षेत्रातल्या लोकांबद्दल आपण जसा विचार करतो त्याचा आपल्या सेवाकार्यावर कसा प्रभाव पडतो? या लेखात आपण पाहणार आहोत की येशूने आणि प्रेषित पौलने क्षेत्रातल्या लोकांबद्दल कसा विचार केला. तसंच, त्यांचं अनुकरण करून आपण लोकांचे विश्वास व आवड लक्षात का घेतली पाहिजे आणि ते पुढे जाऊन ख्रिस्ती बनू शकतात असाही आपण त्यांच्याबद्दल विचार का केला पाहिजे हेही आपण पाहू.
^ परि. 17 लोकांचं जीवन कसं बदलू शकतं याची आणखी उदाहरणं पाहण्यासाठी “बायबलने बदललं जीवन” ही शृंखला पाहा. हे लेख टेहळणी बुरूज २०१७ पर्यंतच्या अंकात यायचे. आता ते jw.org/hi या वेबसाईटवर प्रकाशित होतात. हमारे बारे में > अनुभव इथे पाहा.
^ परि. 57 चित्रांचं वर्णन: एक जोडपं घरोघरचं प्रचारकार्य करत असताना निरीक्षण करतं की (१) एक घर नीटनेटकं आहे आणि बाहेर सुंदर फुलं आहेत. (२) एक घरात लहान मुलं आहेत. (३) एक घर आत आणि बाहेर अस्वच्छ आहे. (४) एक घर जिथे धार्मिक लोक राहतात. तुम्हाला काय वाटतं यांपैकी कोण येशूचे शिष्य बनू शकतात?