व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास करण्यासाठी एक टीप

अभ्यास करण्यासाठी एक टीप

यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक यात दिलेल्या बायबल वचनांच्या स्पष्टीकरणाचा तुम्ही फायदा करून घेत आहात का?

बायबल वचनांबद्दल दिलेल्या स्पष्टीकरणामुळे तुम्हाला देवाचं वचन आणखी चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. एखाद्या वचनात सांगितलेली घटना घडली तेव्हा परिस्थिती कशी होती त्याबद्दलचं स्पष्टीकरण त्यात दिलेलं असतं. तसंच, ती घटना कोणाबद्दल आणि का लिहिण्यात आली होती किंवा त्या वचनातल्या विशिष्ट शब्दांचा किंवा वाक्यांशांचा काय अर्थ होतो ते समजावून सांगितलं असतं.

वॉचटावर ऑनलाईन लायब्ररी  आणि JW लायब्ररी  यांवर थेट बायबलच्या वचनांतूनच तुम्ही संशोधन मार्गदर्शक  उघडू शकता. तुम्ही वापरत असलेल्या बायबल भाषांतरात एखाद्या वचनावर टॅप केल्यावर, जर त्या वचनासाठी संदर्भ उपलब्ध असतील तर वर दिसणाऱ्‍या मेनूमध्ये तुम्हाला संशोधन मार्गदर्शकाचं चिन्ह दिसेल. मग या चिन्हावर टॅप केल्यावर स्क्रीनच्या उजव्या बाजूला संदर्भ दिसतील.

लक्षात घ्या, की संदर्भ पाहताना सगळ्यात नवीन लेख वर दिसतील आणि त्याच्या खाली जुने लेख असतील, ज्यांतली समज कदाचित जुनी असेल.

  • संशोधन मार्गदर्शक यात दिलेले संदर्भ वॉचटावर ऑनलाईन लायब्ररीमध्ये  आपोआप उपलब्ध होतात.

  • हे संदर्भ JW लायब्ररीमध्ये पाहायचे असतील तर संशोधन मार्गदर्शक  डाऊनलोड करा आणि ते वेळोवेळी अपडेट करा. त्यासाठी तुम्ही बायबलचा कोणताही अध्याय पाहत असताना, स्क्रीनच्या उजवीकडे वरती दिलेल्या अपडेट बटनावर टॅप करा.