व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १८

मंडळीच्या सभांमध्ये एकमेकांना प्रोत्साहन द्या

मंडळीच्या सभांमध्ये एकमेकांना प्रोत्साहन द्या

“एकमेकांचा विचार करून . . . एकमेकांना प्रोत्साहन देत राहावं.”​—इब्री १०:२४, २५.

गीत ८८ तुझे मार्ग मला शिकव

सारांश a

१. आपण सभेत उत्तरं का देतो?

 आपण सभांना का जातो? सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला यहोवाची स्तुती करायची असते म्हणून. (स्तो. २६:१२; १११:१) तसंच, या कठीण काळात एकमेकांना उत्तेजन देण्यासाठीसुद्धा आपण सभेला जातो. (१ थेस्सलनी. ५:११) जेव्हा आपण आपला हात वर करून उत्तर देतो तेव्हा आपण या दोन्ही गोष्टी करत असतो.

२. आपल्याला सभेत उत्तरं द्यायची संधी केव्हा असते?

दर आठवडी आपल्याला सभांमध्ये उत्तरं द्यायची संधी असते. उदाहरणार्थ, आठवड्याच्या शेवटी आपण टेहळणी बुरूज  अभ्यासादरम्यान सभेत उत्तरं देऊ शकतो. तसंच, आठवड्यादरम्यान होणाऱ्‍या सभेत आपण आध्यात्मिक रत्नं, मंडळीचा बायबल अभ्यास आणि चर्चेच्या इतर भागांमध्ये उत्तरं देऊ शकतो.

३. उत्तर देताना आपल्याला कोणत्या अडचणी येऊ शकतात, आणि इब्री लोकांना १०:२४, २५ हे वचन आपल्याला कशी मदत करू शकतं?

यहोवाची स्तुती करावी आणि आपल्या भाऊबहिणींना प्रोत्साहन द्यावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. पण दोन गोष्टींमुळे आपल्याला हे करणं कठीण जाऊ शकतं. कदाचित आपल्याला उत्तर द्यायला भीती वाटत असेल, किंवा उत्तर द्यायची आपली खूप इच्छा असेल, पण आपल्याला जेव्हा-जेव्हा उत्तर द्यायचं असतं तेव्हा कदाचित संधी मिळत नसेल. मग अशा वेळी आपण काय करू शकतो? प्रेषित पौलने इब्री लोकांना जे पत्र लिहिलं त्याच्यामध्ये आपल्याला या बाबतीत एक महत्त्वाचा मुद्दा शिकायला मिळतो. सभांना येणं का महत्त्वाचं आहे याबद्दल चर्चा करताना त्याने म्हटलं, की आपण ‘एकमेकांना प्रोत्साहन देण्याकडे’ लक्ष दिलं पाहिजे. (इब्री लोकांना १०:२४, २५ वाचा.) आपल्या साध्याशा उत्तरानेसुद्धा आपल्या भाऊबहिणींना प्रोत्साहन मिळू शकतं हे समजून घेतल्यामुळे आपल्याला उत्तरं द्यायला जास्त भीती वाटणार नाही. आणि आपल्याला उत्तरं द्यायची जरी पुन्हा पुन्हा संधी मिळत नसेल, तरी मंडळीतल्या इतर भाऊबहिणींना ती संधी मिळत आहे याबद्दल आपण आनंद मानू शकतो.​—१ पेत्र ३:८.

४. या लेखात आपण कोणत्या तीन मुद्द्‌यांवर चर्चा करणार आहोत?

या लेखात आपण सगळ्यात आधी हे पाहू या, की मंडळी लहान  असते आणि सभेत उत्तरं देणारे कमी असतात, तेव्हा आपण एकमेकांना कसं उत्तेजन देऊ शकतो. आणि मग आपण पाहू या, की मंडळी मोठी  असते आणि उत्तर देण्यासाठी बरेच जण हात वर करतात तेव्हासुद्धा आपण एकमेकांना कसं प्रोत्साहन देऊ शकतो? आणि शेवटी, इतरांना प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारे  आपण उत्तरं कशी देऊ शकतो हेही पाहू या.

छोट्या मंडळीत एकमेकांना प्रोत्साहन द्या

५. सभेत जास्त लोक नसतात तेव्हासुद्धा आपण एकमेकांना कसं प्रोत्साहन देऊ शकतो?

लहान मंडळीमध्ये किंवा एका छोट्याशा गटामध्ये जेव्हा संचालक प्रश्‍न विचारतो तेव्हा उत्तरं देण्यासाठी खूप कमी लोक असतात. त्यामुळे सभा खूप लांबली आहे असं आपल्याला वाटेल आणि कोणालाही प्रोत्साहन मिळणार नाही. मग अशा वेळेस आपण काय करू शकतो? अशा वेळी उत्तरं देण्यासाठी आपण बऱ्‍याचदा हात वर करू शकतो. असं केल्यामुळे तुम्ही इतरांनाही जास्तीत जास्त सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन देत असता.

६-७. सभेत उत्तरं द्यायला आपल्याला भीती वाटत असेल तर आपण काय करू शकतो?

पण जर उत्तर देण्याच्या विचारानेच तुम्हाला भीती वाटत असेल तर काय? बऱ्‍याच लोकांना असं वाटतं. मग यासाठी आपण काय करू शकतो? उत्तर देण्याची भीती कमी करण्यासाठी आणि भाऊबहिणींना प्रोत्साहन देण्यासाठी काय करता येईल याचा विचार करा. पण हे कसं करता येईल?

यासाठी टेहळणी बुरूज  मासिकाच्या आधीच्या काही अंकांमध्ये काही व्यावहारिक सल्ले दिले आहेत. त्यांची तुम्ही मदत घेऊ शकता. b उदाहरणार्थ, त्यात एक सल्ला असा दिला होता, की अभ्यासाची चांगली तयारी करा. (नीति. २१:५) तुम्ही जितकी चांगली तयारी कराल तितकं उत्तर देणं तुम्हाला सोपं जाईल. तसंच, थोडक्यात उत्तर द्या. (नीति. १५:२३; १७:२७) उत्तर छोटं असेल तर ते द्यायला भीतीही वाटणार नाही. बरेच मुद्दे असलेलं लांबलचक उत्तर देण्यापेक्षा, एकदोन वाक्यांत दिलेलं छोटंसं उत्तर भाऊबहिणींना सहज समजू शकतं. तुम्ही जर स्वतःच्या शब्दांत थोडक्यात उत्तर दिलं, तर त्यावरून दिसून येईल की तुम्ही अभ्यासाची चांगली तयारी केली आहे आणि ती माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली आहे.

८. सभेत उत्तर देण्यासाठी आपण जी मेहनत घेतो त्याबद्दल यहोवाला कसं वाटतं?

पण यांतले काही सल्ले लागू केल्यावरही तुम्हाला भीती वाटत असेल आणि जेमतेम एकदोनच उत्तरं देता येत असतील तर काय? तुम्ही याची खातरी ठेवू शकता, की सभेत उत्तर देण्यासाठी तुम्ही जी मेहनत घेता त्याची यहोवा मनापासून कदर करतो. (लूक २१:१-४) आपण जितकं करू शकतो, तितकीच तो आपल्याकडून अपेक्षा करतो. (फिलिप्पै. ४:५) म्हणून तुम्हाला किती जमेल हे ओळखा, त्यानुसार एक ध्येय ठेवा आणि मन शांत ठेवण्यासाठी यहोवाला प्रार्थना करा. सुरवातीला तुम्ही एकच छोटंसं उत्तर द्यायचं ध्येय ठेवू शकता.

मोठ्या मंडळीत एकमेकांना प्रोत्साहन द्या

९. मोठ्या मंडळीत कधीकधी काय होऊ शकतं?

तुमच्या मंडळीत जर बरेच प्रचारक असतील तर तुमच्यासमोर एक वेगळीच समस्या असू शकते. कदाचित उत्तरं देण्यासाठी इतके भाऊबहीण हात वर करत असतील, की बऱ्‍याचदा तुम्हाला उत्तर विचारलं जात नसेल. डॉर्थी नावाच्या बहिणीचंच उदाहरण घ्या. c तिला सभेत उत्तरं द्यायला फार आवडतं. उत्तरं देणं हा आपल्या उपासनेचा एक भाग आहे, तसंच एकमेकांना प्रोत्साहन देण्याचा आणि बायबलच्या शिकवणी आपल्या मनावर बिंबवण्याचा एक चांगला मार्ग आहे असं तिला वाटतं. पण ती जेव्हा एका मोठ्या मंडळीत जाऊ लागली तेव्हा तिला जास्त उत्तरं विचारली जात नव्हती. काही वेळा तर संपूर्ण सभेत तिला एकही उत्तर विचारलं जात नव्हतं. त्यामुळे ती म्हणते: “मला खूप राग यायचा. एक मोठी संधी माझ्या हातून चालली आहे असं मला वाटायचं. आणि असं पुन्हा पुन्हा होऊ लागतं तेव्हा तर असं वाटतं की आपल्यासोबत हे मुद्दाम तर होत नसेल?”

१०. सभेत उत्तर देण्यासाठी तुम्ही आणखी काय करू शकता?

१० तुम्हालाही कधी डॉर्थीसारखं वाटलंय का? अशा वेळी उत्तर न देता नुसतंच शांत बसून ऐकलेलं बरं असा विचार कदाचित तुमच्या मनात येईल. पण असं मुळीच करू नका. त्याऐवजी प्रत्येक सभेसाठी बरीच उत्तरं तयार करा. त्यामुळे लेखाच्या सुरवातीला जरी तुम्हाला उत्तर द्यायची संधी मिळाली नाही, तरी अभ्यास जसजसा पुढे जाईल तसतशा तुम्हाला अनेक संधी मिळतील. टेहळणी बुरूज  अभ्यासासाठी तयारी करताना प्रत्येक परिच्छेदाचा, लेखाच्या मुख्य विषयाशी कसा संबंध आहे यावर विचार करा. त्यामुळे सबंध लेखाच्या चर्चेदरम्यान उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे काही ना काही नक्कीच असेल. याशिवाय, असेही काही परिच्छेद असतात ज्यांमध्ये बायबलच्या काही गहन शिकवणींबद्दल सांगितलेलं असतं, आणि ते समजावून सांगणं कठीण असू शकतं. (१ करिंथ. २:१०) त्यामुळे अशा परिच्छेदांवर चर्चा करताना सहसा खूप कमी हात वर असतात. म्हणून अशा परिच्छेदांवरसुद्धा उत्तरं द्यायची तुम्ही तयारी करू शकता. पण हे सगळे सल्ले लागू केल्यावरही बऱ्‍याचदा तुम्हाला सभांमध्ये तुम्हाला उत्तर द्यायची संधीच मिळत नसेल तर काय? अशा वेळी सभेआधी तुम्ही अभ्यास संचालकाला भेटू शकता आणि कोणत्या प्रश्‍नाचं उत्तर तुम्हाला द्यायला आवडेल ते त्याला सांगू शकता.

११. फिलिप्पैकर २:४ मध्ये आपल्याला काय करायचं उत्तेजन देण्यात आलं आहे?

११ फिलिप्पैकर २:४ वाचा. प्रेषित पौलने देवाच्या प्रेरणेने ख्रिश्‍चनांना असं प्रोत्साहन दिलं, की त्यांनी स्वतःचाच नाही तर इतरांचाही विचार करावा. सभेदरम्यान आपण हा सल्ला कसा लागू करू शकतो? सभेत आपल्याप्रमाणेच इतरांनाही उत्तरं द्यायची इच्छा असते हे आपण नेहमी लक्षात ठेवू शकतो.

इतरांशी गप्पा मारताना जसं आपण त्यांना बोलू देतो, तसंच सभांमध्येही इतरांना उत्तरं द्यायची संधी द्या (परिच्छेद १२ पाहा)

१२. सभेत इतरांना प्रोत्साहन देण्याचा एक चांगला मार्ग कोणता आहे? (चित्रसुद्धा पाहा.)

१२ विचार करा, आपण आपल्या मित्रांशी बोलत असतो तेव्हा आपण स्वतःच इतकं बोलत राहतो का, की त्यांना बोलायची संधीच मिळत नाही? मुळीच नाही, आपण त्यांनाही बोलू देतो. अगदी तसंच, सभेमध्ये आपण जास्तीत जास्त लोकांना उत्तरं द्यायची संधी दिली पाहिजे. खरंतर आपल्या भाऊबहिणींना त्यांचा विश्‍वास व्यक्‍त करायची संधी देणं हा त्यांना प्रोत्साहन देण्याचा खूप चांगला मार्ग आहे. (१ करिंथ. १०:२४) आपल्याला हे कसं करता येईल ते आता पाहू या.

१३. सभेत जास्तीत जास्त लोकांना उत्तरं देता यावीत म्हणून तुम्ही काय करू शकता?

१३ एक म्हणजे, थोडक्यात उत्तर द्या.  त्यामुळे बऱ्‍याच लोकांना उत्तर द्यायची संधी मिळेल. मंडळीतले वडील आणि अनुभवी प्रचारक या गोष्टीकडे विशेष लक्ष देऊ शकतात, म्हणजे इतरांना त्यांच्याकडून शिकायला मिळेल. आणि थोडक्यात उत्तर देतानाही सगळेच मुद्दे सांगू नका.  नाहीतर इतरांना सांगण्यासाठी काहीच उरणार नाही. उदाहरणार्थ, याच परिच्छेदात दोन सल्ले दिले आहेत. एक म्हणजे, थोडक्यात उत्तर द्या. आणि दुसरं म्हणजे, सगळेच मुद्दे सांगू नका. या परिच्छेदावर उत्तर द्यायची पहिली संधी तुम्हाला मिळाली, तर या दोन मुद्द्‌यांपैकी एकच मुद्दा सांगा.

सभेत आपण केव्हा हात वर करायचं टाळू शकतो? (परिच्छेद १४ पाहा) f

१४. उत्तर देण्यासाठी किती वेळा हात वर करायचा हे ठरवताना आपण काय केलं पाहिजे? (चित्रसुद्धा पाहा.)

१४ सभेत उत्तर देण्यासाठी किती वेळा हात वर करायचा हे ठरवताना समंजसपणा दाखवा. तुम्ही जर सारखा-सारखा हात वर केला, तर इतरांना अजून संधी मिळाली नसली तरी संचालकावर तुम्हालाच उत्तर विचारायचा दबाव येईल. त्यामुळे इतर जण कदाचित निराश होतील आणि त्यांना हात वर करावासा वाटणार नाही.​—उप. ३:७.

१५. (क) आपल्याला उत्तर द्यायची संधी मिळत नाही तेव्हा आपण काय केलं पाहिजे? (ख) चर्चेचे भाग हाताळणाऱ्‍या बांधवांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? (“ तुम्ही सभेत एखादा भाग हाताळत असाल तर . . .” ही चौकट पाहा.)

१५ अभ्यासदरम्यान उत्तर देण्यासाठी बरेच जण हात वर करतात तेव्हा आपल्याला पाहिजे तितक्या वेळा संधी मिळेलच असं नाही. आणि कधीकधी तर आपल्याला एकही संधी मिळणार नाही. अशा वेळी वाईट वाटणं साहजिक आहे, पण आपण जास्त मनाला लावून घेऊ नये.​—उप. ७:९.

१६. सभेत उत्तरं देणाऱ्‍यांना आपण प्रोत्साहन कसं देऊ शकतो?

१६ सभेत तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा उत्तरं देता आली नाहीत, तर इतरांची उत्तरं तुम्ही लक्ष देऊन ऐकू शकता का? आणि सभेनंतर त्यांबद्दल त्यांची प्रशंसा करू शकता का? तुमच्या उत्तरांमुळे भाऊबहिणींना जितकं प्रोत्साहन मिळालं असतं, तितकंच त्यांची प्रशंसा केल्यामुळे त्यांना मिळू शकतं. (नीति. १०:२१) खरंच, इतरांची प्रशंसा करणं हासुद्धा एकमेकांना प्रोत्साहन देण्याचा एक चांगला मार्ग आहे.

प्रोत्साहन देण्याचे आणखी काही मार्ग

१७. (क) मुलांना देता येतील अशी उत्तरं तयार करायला आईवडील त्यांना कशी मदत करू शकतात? (ख) व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कोणत्या चार गोष्टी आपल्याला उत्तर तयार करायला मदत करतील? (तळटीपसुद्धा पाहा.)

१७ आणखी कशा प्रकारे आपण सभेत एकमेकांना प्रोत्साहन देऊ शकतो? तुम्हाला जर मुलं असतील, तर त्यांच्या वयाप्रमाणे उत्तरं द्यायची तुम्ही त्यांच्याकडून तयारी करून घेऊ शकता. (मत्त. २१:१६) कधीकधी काही गंभीर विषयांवर, जसं की वैवाहिक समस्यांवर किंवा नैतिक विषयांवर चर्चा केली जाते. पण लेखात असे एकदोन परिच्छेद तर नक्कीच असतील ज्यांवर तुमची मुलं उत्तरं देऊ शकतील. यासोबतच मुलांना हे समजावून सांगा, की प्रत्येक वेळा त्यांनी हात वर केला म्हणजे त्यांना उत्तर विचारलंच जाईल असं नाही. काही वेळा कदाचित त्यांना विचारलं जाणार नाही. त्यामुळे जेव्हा त्यांच्याऐवजी इतरांना उत्तर विचारलं जातं तेव्हा मुलांना वाईट वाटणार नाही.​—१ तीम. ६:१८. d

१८. उत्तरं देताना स्वतःकडे लक्ष वेधायचं आपण कसं टाळू शकतो? (नीतिवचनं २७:२)

१८ यहोवाची स्तुती होईल आणि आपल्या भाऊबहिणींना प्रोत्साहन मिळेल अशी उत्तरं आपण सगळेच तयार करू शकतो. (नीति. २५:११) उत्तर देताना एखाद्या वेळी आपण स्वतःचा अनुभव थोडक्यात सांगू शकतो. पण स्वतःबद्दल खूप जास्त बोलायचं आपण टाळलं पाहिजे. (नीतिवचनं २७:२ वाचा; २ करिंथ. १०:१८) त्याऐवजी आपण यहोवा, त्याचं वचन आणि त्याचे लोक या गोष्टींवर भर दिला पाहिजे. (प्रकटी. ४:११) अर्थात, एखादा व्यक्‍तिगत प्रश्‍न विचारला जातो, तेव्हा तुम्हाला काय वाटतं ते जरूर सांगा. याचं एक उदाहरण पुढच्याच परिच्छेदात दिलं आहे.

१९. (क) मंडळीत उपस्थित असलेल्या सगळ्यांचाच आपण विचार करतो तेव्हा काय होतं? (रोमकर १:११, १२) (ख) सभेत उत्तरं देण्याच्या बाबतीत कोणती गोष्ट तुम्हाला आवडते?

१९ उत्तरं कशी द्यायची याबद्दल कोणतेही नियम नसले, तरी आपण सगळेच अशा प्रकारे उत्तरं देऊ शकतो ज्यांमुळे भाऊबहिणींना प्रोत्साहन मिळेल. काही वेळा कदाचित आपल्याला जास्त उत्तरं द्यावी लागतील. किंवा काही वेळा आपल्याला पाहिजे तितकी उत्तरं द्यायची संधी मिळणार नाही. पण जी काही संधी मिळेल त्यात आपण समाधानी राहू आणि इतरांनाही उत्तरं द्यायची संधी मिळते याचा आनंद मानू. अशा प्रकारे सभांमध्ये इतरांचा विचार केल्याने आपल्याला “एकमेकांना प्रोत्साहन देता येईल.”​—रोमकर १:११, १२ वाचा.

गीत ९३ आमच्या सभेवर आशीर्वाद दे!

a आपण सभेत उत्तरं देतो तेव्हा आपण एकमेकांना उत्तेजन देत असतो. काही जणांना उत्तर द्यायला भीती वाटते; तर असेही काही जण असतात ज्यांना उत्तरं द्यायला आवडतं, पण आणखी उत्तरं द्यायला मिळाली असती तर बरं झालं असतं असं त्यांना वाटतं. या दोन्ही परिस्थितींत सगळ्यांनाच प्रोत्साहन मिळावं म्हणून आपण एकमेकांचा विचार कसा करू शकतो? आणि आपल्या भाऊबहिणींना प्रेम आणि चांगली कामं करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल अशी उत्तरं आपल्याला कशी देता येतील? या लेखात आपण या गोष्टींवर चर्चा करणार आहोत.

c नाव बदलण्यात आलं आहे.

d jw.org वर असलेला यहोवाचे मित्र बना​—तुमचं उत्तर तयार करा  व्हिडिओ पाहा.

f चित्राचं वर्णन: मोठ्या मंडळीत एका भावाने आधीच उत्तर दिल्यामुळे आता तो इतरांनाही उत्तरं द्यायची संधी देत आहे.