व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बंधू केनेथ इ. कुक, जुनियर आणि त्यांची पत्नी जेमी

नियमन मंडळाचे एक नवीन सदस्य

नियमन मंडळाचे एक नवीन सदस्य

२४ जानेवारी, २०१८ ला म्हणजे बुधवारी सकाळी, अमेरिका आणि कॅनेडा इथे असलेल्या बेथेल कुटुंबामध्ये एक खास घोषणा करण्यात आली. बंधू केनेथ कुक, जुनियर यांना यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्‍त करण्यात आलं.

बंधू कुक यांचा जन्म अमेरिकेच्या दक्षिण-मध्य पेन्सिल्वेनिया या शहरात झाला आणि तिथेच ते लहानाचे मोठे झाले. शाळा संपण्याच्या आधी त्यांच्या वर्गसोबत्याकडून त्यांना सत्य मिळालं. मग ७ जून, १९८० रोजी त्यांचा बाप्तिस्मा झाला. त्यानंतर त्यांनी १ सप्टेंबर, १९८२ पासून रेग्युलर पायनियर या नात्याने पूर्ण वेळेची सेवा सुरू केली. पायनियर सेवा सुरू करण्याच्या दोन वर्षांनंतर त्यांना १२ ऑक्टोबर, १९८४ ला न्यूयॉर्क शहरातल्या वॉलकिल इथल्या बेथेलमध्ये बोलवण्यात आलं.

त्यानंतर २५ वर्षं बंधू कुक यांनी प्रिंटरी आणि बेथेल कार्यालयाच्या विभागात वेगवेगळ्या प्रकारच्या नेमणुकी हाताळल्या. १९९६ साली त्यांचं लग्न जेमी नावाच्या बहीणीशी झालं. त्यानंतर जेमी आपल्या पतीसोबत वॉलकिल बेथलमध्ये सेवा करू लागली. मग २००९ च्या डिसेंबर महिन्यात त्यांना न्यू यॉर्कमधल्या पॅटरसन इथल्या वॉचटावर शैक्षणिक केंद्रात (वॉचटावर एज्यूकेशनल सेंटर) पाठवण्यात आलं. तिथे बंधू कुक यांना लेखन पत्रव्यवहार विभागात नेमण्यात आलं. वॉलकिलला परत येण्याच्या काही काळातच त्यांना एप्रिल २०१६ मध्ये न्यूयॉर्कमधल्या ब्रुकलिन बेथलमध्ये पाठवण्यात आलं. याच्या पाच महिन्यानंतर त्यांची बदली न्यूयॉर्कमधल्या वॉरविक इथल्या जागतिक मुख्यालयात करण्यात आली. मग बंधू कुक यांना जानेवारी २०१७ मध्ये नियमन मंडळाच्या लेखन समितीचे सहायक म्हणून नेमण्यात आलं.