अभ्यास करण्यासाठी एक टीप
आपल्या भाऊबहिणींच्या जीवन कथा वाचायला तुम्हाला आवडतं का?
एक जोडपं दररोज सकाळी एक जीवन कथा वाचतं. ते म्हणतात: “या कथा वाचून आम्हाला खूप छान वाटतं आणि प्रोत्साहनही मिळतं. ते वाचल्यावर असं वाटतं, की जर ते भाऊबहीण शेवटपर्यंत विश्वासू राहिले तर आपणही कोणत्याही परिस्थितीत यहोवाला विश्वासू राहू शकतो.” आणखी एका बहिणीनेही असंच काहीसं म्हटलं: “मला या जीवन कथा वाचल्यावर मनाला खूप दिलासा मिळतो, प्रेरणा मिळते आणि खूप छान वाटतं. आपल्या भाऊबहिणींचं आयुष्य खरंच किती अर्थपूर्ण आहे, त्यांच्या आयुष्याला दिशा आहे, हे मला कळतं. या कथा वाचल्यावर मला सेवाकार्यात स्वतःला झोकून द्यावसं वाटतं. शिवाय, माझ्या मुलांनीही पुढे पूर्ण-वेळची सेवा करावी असं मला वाटतं.”
जीवन कथा तुम्हाला आयुष्यात चांगली ध्येयं ठेवायला, आपल्या कमतरतांवर मात करायला आणि खचून न जाता कठीण परीक्षांचा धीराने सामना करायला मदत करतात. या जीवन कथा तुम्हाला कुठे वाचायला मिळतील?
वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी, वॉचटावर लायब्ररी किंवा jw.org/mr वर “जीवन कथा” हे शब्द टाकून शोधा.