अभ्यास करण्यासाठी एक टीप
व्यक्तिगत आणि कौटुंबिक उपासनेसाठी काही पर्याय
आपण यहोवाची उपासना फक्त मोठ्या गटांमध्ये, म्हणजे सभांमध्ये, संमेलनांमध्ये आणि अधिवेशनांमध्येच करत नाही तर व्यक्तिगतपणे आणि कुटुंबातसुद्धा करतो. इथे सुचवलेल्या काही पर्यायांचा वापर तुम्ही तुमच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक उपासनेत करू शकता:
-
मंडळीच्या सभेसाठी तयारी करा. तुम्ही कदाचित गीतांचा सराव करू शकता आणि आपल्या कुटुंबातल्या सगळ्यांना उत्तर तयार करायला मदत करू शकता.
-
बायबलमधला एखादा अहवाला वाचा. आणि त्यानंतर त्या अहवालातल्या एखाद्या घटनेचं चित्र काढा आणि तुम्हाला काय शिकायला मिळालं ते लिहा.
-
बायबलमध्ये असलेल्या एखाद्या प्रार्थनेचा अभ्यास करा, आणि तुम्हाला तुमच्या प्रार्थना आणखी कशा सुधारता येतील यावर चर्चा करा.
-
आपल्या संघटनेने प्रकाशित केलेला एखादा व्हिडिओ बघा आणि मग इतरांसोबत त्यावर चर्चा करा किंवा त्याबद्दल थोडक्यात लिहा.
-
प्रचारकार्यासाठी तयारी करा, आणि तुम्ही क्षेत्रात कसं बोलणार आहात त्याचा सराव करा.
-
सृष्टीचं निरीक्षण करून त्यावर मनन करा किंवा त्यातून यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं यावर चर्चा करा. a
a मार्च २०२३ च्या टेहळणी बुरूज अंकातला “यहोवाबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी सृष्टीचं निरीक्षण करा” हा लेख पाहा.