व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यासासाठी टीप

चित्र काढा, गोष्टी लक्षात ठेवा

चित्र काढा, गोष्टी लक्षात ठेवा

कदाचित आपल्यापैकी बऱ्‍याच जणांना, अभ्यास केलेल्या गोष्टी लक्षात ठेवायला कठीण जात असेल. पण येशूने शिकवलेल्या गोष्टी लक्षात ठेवायला आपल्याला सोपं जातं. कारण त्याने बऱ्‍याचदा उदाहरणांचा किंवा शब्दचित्रांचा वापर केला. त्यांची कल्पना केल्यामुळे आपल्याला त्या लक्षात ठेवायला मदत होते. त्याच प्रकारे, अभ्यास केलेल्या गोष्टींचं चित्र डोळ्यांपुढे उभं केल्यामुळे त्या गोष्टी लक्षात ठेवायला आपल्याला मदत होऊ शकते. मग यासाठी आपण नेमकं काय करू शकतो? अभ्यास करताना आपण चित्रं काढू शकतो.

जे लोक शिकलेल्या नवीन गोष्टींची चित्रं काढतात त्यांना सहसा त्या गोष्टी चांगल्या लक्षात राहतात. या पद्धतीमुळे त्यांना फक्‍त शब्दच नाही तर शिकलेल्या गोष्टींमधले मुख्य मुद्देही लक्षात ठेवायला मदत होते. ही चित्रं काढायला त्यांना चित्रकार असण्याची गरज नसते. अगदी साध्या-सोप्या पद्धतीने काढलेल्या चित्रांमुळेही त्यांना मदत होते. संशोधनावरून असं दिसून आलंय, की वृद्ध लोकांना खासकरून या पद्धतीमुळे फायदा होऊ शकतो.

तर मग पुढच्या वेळी तुम्ही अभ्यासाला बसाल तेव्हा तुम्ही शिकलेल्या गोष्टींची चित्रं काढू शकता. त्यामुळे किती गोष्टी तुमच्या लक्षात राहतात हे पाहून तुम्हालाच आश्‍चर्य वाटेल!