टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) जून २०१६

या अंकात १-२८ ऑगस्ट २०१६ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

यहोवा “तुमची काळजी घेतो”

देवाला तुमच्यामध्ये व्यक्तिगत आस्था आहे हे तुम्ही खात्रीने कसं म्हणू शकता? याचे काही पुरावे पाहा.

महान कुंभाराला तुम्हाला आकार देऊ द्या

यहोवा आकार देण्यासाठी लोकांची निवड कशी करतो? तो त्यांना आकार का देतो? आणि तो हे कसं करतो?

महान कुंभाराकडून आकार मिळवण्यास तुम्ही तयार का?

देवाच्या हातात मऊ मातीप्रमाणे बनण्यास कोणत्या गुणांमुळे तुम्हाला मदत होईल?

वाचकांचे प्रश्न

यहेज्केलच्या दृष्टांतात कारकुनाची दऊत बाळगणारी व्यक्ती आणि हातात विध्वंसक हत्यारे बाळगणारे सहा लोक कोणाला सूचित करतात?

“यहोवा आमचा देव एकच यहोवा आहे”

कोणत्या अर्थाने यहोवा “एकच” आहे, आणि आपण एकतेनं केवळ त्याचीच उपासना कशी करू शकतो?

इतरांच्या चुकांमुळे यहोवावर नाराज होऊ नका

बायबलमध्ये आपल्याला देवाच्या अशा काही सेवकांबद्दल वाचायला मिळतं ज्यांनी आपल्या वागण्या-बोलण्यातून इतरांचं मन दुखावलं. त्यांच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

ईश्वरीय गुण हिऱ्यांपेक्षाही अधिक मौल्यवान

ईश्वरीय गुण विकसित करणं हे कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त मौल्यवान आहे.

तुम्हाला आठवतं का?

टेहळणी बुरूज नियतकालिकातील अलीकडील अंक तुम्ही काळजीपूर्वक वाचले आहेत का? त्यातील कोणत्या गोष्टी तुम्हाला आठवतात ते पाहा.