व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला आठवतं का?

तुम्हाला आठवतं का?

टेहळणी बुरूज नियतकालिकातील अलीकडील अंक तुम्ही काळजीपूर्वक वाचले आहेत का? तर मग, पुढील प्रश्नांची उत्तरं देण्यास जमतं का ते पाहा:

सुज्ञ निर्णय घेण्यासाठी प्रार्थनेमुळे मदत होऊ शकते का?

आपण घेतलेल्या काही निर्णयांचा आपल्यावर आणि आपल्या जवळच्या लोकांवर कायमचा परिणाम होऊ शकतो. महत्त्वाचे निर्णय घेताना येशूलासुद्धा आपल्या पित्याला, म्हणजेच यहोवा देवाला मदत मागायची गरज भासली. आपण बुद्धीसाठी प्रार्थना केली तर यहोवा त्याच्या पवित्र आत्म्याच्या मदतीनं आपल्याला सुज्ञ निर्णय घेण्यास मार्गदर्शन देईल. (याको. १:५)—टेहळणी बुरूज१६ क्र. १, पृष्ठ ८.

आपल्या तरुण मुलांना यहोवाची सेवा करण्याचं प्रशिक्षण देण्यासाठी पालकांनी काय करणं गरजेचं आहे?

पालकांचं आपल्या मुलांवर प्रेम असणं खूप गरजेचं आहे आणि त्यांनी ते आपल्या कार्यांतून दाखवलं पाहिजे. तसंच, पालकांनी समजबुद्धी दाखवून आपल्या मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.—टेहळणी बुरूज१५ ११/१५, पृष्ठे ९-११.

देवाला आपली खरंच काळजी आहे का?

बायबल म्हणतं की आकाशात उडणाऱ्या प्रत्येक चिमणीची देवाला काळजी आहे. तर मग तो कधी इतका व्यस्त होईल का, की तुमच्या प्रार्थनांचं उत्तर देऊ शकणार नाही? नाही, असं मुळीच होणार नाही. (मत्त. १०:२९, ३१)—टेहळणी बुरूज१६ क्र. १, पृष्ठ १३.

बोलण्याआधी आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?

आपल्या बोलण्याच्या क्षमतेचा आपल्याला योग्य वापर करायचा असेल, तर आपण पुढील तीन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत: (१) केव्हा बोलावं (उप. ३:७), (२) काय बोलावं (नीति. १२:१८), आणि (३) कसं बोलावं. (नीति. २५:१५)—टेहळणी बुरूज१५ १२/१५, पृष्ठे १९-२२.

स्मारकविधीच्या प्रतीकांचं सेवन करणाऱ्यांसोबत व्यवहार करताना आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे?

ख्रिस्ती लोक, स्मारकविधीच्या प्रतीकांचं सेवन करणाऱ्यांची स्तुती करत बसत नाहीत. तसंच, जे खरोखरच अभिषिक्त आहेत तेदेखील स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत नाहीत. (मत्त. २३:८-१२) शिवाय, अभिषिक्त व्यक्ती तिला मिळालेल्या स्वर्गातील आशेबद्दल इतरांना सांगत बसणार नाही.—टेहळणी बुरूज१६.०१, पृष्ठे २३-२४.

अब्राहाम ज्या प्रकारे यहोवाचा मित्र बनला त्यावरून आपण काय शिकू शकतो?

अब्राहामाने यहोवाबद्दलचं ज्ञान प्राप्त केलं. त्याला कदाचित शेमकडून यहोवाबद्दल शिकायला मिळालं असावं. तसंच, यहोवा त्याच्यासोबत आणि त्याच्या कुटुंबासोबत जसा वागला त्यावरून तो बरंच काही शिकू शकला. आपणही याबाबतीत त्याचं अनुकरण करू शकतो.—टेहळणी बुरूज१६.०२, पृष्ठे ९-१०.

येशूची परीक्षा घेण्यासाठी सैतानाने त्याला खरंच मंदिराकडे नेलं होतं का?

आपण हे खात्रीनं म्हणू शकत नाही. मत्तय ४:५ आणि लूक ४:९ या वचनांत ज्या परीक्षेचा उल्लेख केला आहे, तो एकतर दृष्टांत असू शकतो किंवा मग सैतानानं येशूला खरोखरच मंदिराच्या शिरोभागी नेलं असावं.—टेहळणी बुरूज१६.०३, पृष्ठ ३१-३२.

आपलं सेवाकार्य दहिवराप्रमाणे कसं असू शकतं?

दवबिंदू अगदी हळूवारपणे तयार होतात आणि ते मनाला तजेला देणारे व जीवनदायी असतात. खरंतर दहिवर देवाकडून येणारा एक आशीर्वादच आहे. (अनु. ३३:१३) सेवाकार्यात देवाचे लोक एकत्र मिळून जे श्रम घेतात त्याची तुलना दहिवराशी करता येईल.—टेहळणी बुरूज१६.०४, पृष्ठ ४.

आपल्या पार्श्वभूमीमुळे आपण चांगले किंवा वाईट बनतो असं म्हणता येईल का?

हिज्कीयाचा पिता यहुदाचा सर्वात वाईट राजा होता, पण हिज्कीया मात्र सर्वात चांगल्या राजांपैकी एक झाला. सुटकेसाठी तो यहोवावर अवलंबून राहिला आणि त्याने आपल्या शब्दांनी व कार्यांनी लोकांचं धैर्यदेखील वाढवलं. त्याच्या पार्श्वभूमीमुळे, त्याने त्याचं जीवन वाया जाऊ दिलं नाही.—टेहळणी बुरूज१६.०२, पृष्ठ १५.

यरीहो शहर अगदी कमी कालावधीत काबीज करण्यात आलं, याचा काही पुरावा आहे का?

प्राचीन काळात, शहराच्या भोवती दिलेला वेढा कितीही काळासाठी असला, तरी शेवटी जेव्हा शत्रू सैनिक त्या शहरावर चढाई करून जायचे, तेव्हा ते तिथल्या इतर सर्व मौल्यवान गोष्टींसोबतच उरलेलं अन्नधान्यही लुटायचे. पण यरीहोच्या अवशेषांमध्ये पुरातत्व शास्त्रज्ञांना असं दिसून आलं की, यरीहो शहराचा नाश झाला तेव्हा तिथं मोठ्या प्रमाणात अन्नाचा साठा होता. यावरून हे स्पष्ट होतं की, बायबलमध्ये सांगितल्यानुसार यरीहो शहराभोवती देण्यात आलेला वेढा अत्यंत कमी कालावधीचा होता.—टेहळणी बुरूज१५ ११/१५, पृष्ठ १३.