सैतानाच्या एका पाशापासून संरक्षण कसं मिळवाल?
प्राचीन इस्राएली लोक यार्देन नदी पार करून वचन दिलेल्या देशात जाण्यासाठी तयार होते. पण त्या वेळी काही जण त्यांना भेटायला आले. त्या विदेशी स्त्रिया होत्या आणि त्यांनी त्यांना एका मोठ्या मेजवानीचं आमंत्रण दिलं. हे आमंत्रण त्यांना खूप खास वाटलं असावं. नवीन मित्र बनवणं, खाणं-पिणं आणि नृत्य करणं या सर्व गोष्टी हव्याहव्याशा वाटल्या असतील. पण त्या स्त्रियांच्या चालीरीती आणि नैतिक स्तर देवाने इस्राएली लोकांना दिलेल्या नियमांनुसार नव्हते. असं असलं तरी काही इस्राएली पुरुषांनी असा विचार केला असावा: ‘आमच्यावर त्या लोकांचा काहीएक परिणाम होणार नाही, आम्ही सावधगिरी बाळगू.’
पण नंतर काय झालं? बायबलचा अहवाल सांगतो: “इस्राएली लोक . . . मवाबी कन्यांशी व्यभिचार करू लागले.” पण खरं पाहता त्या स्त्रियांची अशी इच्छा होती की इस्राएली पुरुषांनी खोट्या दैवतांची उपासना करावी. आणि त्या पुरुषांनी तेच केलं! म्हणूनच “परमेश्वराचा कोप त्यांच्यावर भडकला.”—इस्राएली लोकांनी दोन गोष्टी करून देवाचे नियम मोडले. त्यांनी मूर्तिपूजा आणि लैंगिक अनैतिक कार्यं केली. देवाच्या आज्ञांचं उल्लंघन केल्यामुळे हजारो इस्राएली लोकांचा मृत्यू झाला. (निर्ग. २०:४, ५, १४; अनु. १३:६-९) पण या दुःखदायक घटनेत आणखी कशामुळे भर पडली? इस्राएली लवकरच वचन दिलेल्या देशात पाऊल ठेवणार होते पण त्याच वेळी त्यांनी देवाची आज्ञा मोडली. इस्राएली पुरुषांनी जर असं केलं नसतं, तर हजारो इस्राएली लोक यार्देन पार करून वचन दिलेल्या देशात गेले असते.—गण. २५:५, ९.
या घटनेबद्दल प्रेषित पौलने म्हटलं: “त्यांच्या बाबतीत घडलेल्या या गोष्टी आपल्यासाठी उदाहरण असून, आपण जे जगाच्या व्यवस्थेच्या शेवटी पोचलो आहोत त्या आपल्याला इशारा देण्यासाठी लिहिण्यात आल्या होत्या.” (१ करिंथ. १०:७-११) काही इस्राएली लोक एका गंभीर पापात फसले. आणि त्यांना वचन दिलेल्या देशात जाता आलं नाही याचा सैतानाला नक्कीच आनंद झाला. म्हणून आपण इस्राएली लोकांनी केलेल्या चुकांतून शिकलं पाहिजे, कारण आपल्याला माहीत आहे की आपल्याला नवीन जगात जाण्यापासून रोखण्यात सैतान यशस्वी झाला तर त्याला खूप आनंद होईल.
एक भयंकर पाश
सैतान आज ख्रिश्चनांना पाशात अडकवण्याचा प्रयत्न करतो आणि हे करण्यासाठी तो वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर करतो; अशा युक्त्या ज्या आधी यशस्वी ठरल्या आहेत. आधी उल्लेख केल्यानुसार, इस्राएली लोकांना फसवण्यासाठी त्याने लैंगिक अनैतिकतेचा वापर केला. आज आपल्या काळातही लैंगिक अनैतिकता हा एक भयंकर पाश आहे. आणि या पाशात अडकवण्याचा सैतानाचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे पोर्नोग्राफी.
आज एक व्यक्ती पोर्नोग्राफी बघते तेव्हा हे कदाचित कोणालाही कळणार नाही. पण बऱ्याच वर्षांआधी परिस्थिती वेगळी होती. एखाद्याला अश्लील चित्रं बघायची असतील तर त्याला चित्रपटगृहात जावं लागायचं किंवा अश्लील साहित्य विकणाऱ्या दुकानांतून पुस्तकं विकत घ्यावी लागायची. बरेचसे लोक अशा ठिकाणी जाण्याचं टाळायचे कारण त्यांना कोणी बघितलं तर लोक त्यांना नावं ठेवतील अशी भीती त्यांच्या मनात असायची. पण आता एका व्यक्तीकडे इंटरनेट असेल तर ती सहजपणे तिच्या कामाच्या ठिकाणी किंवा गाडीत पोर्नोग्राफी बघू शकते. आणि बऱ्याचशा देशांमध्ये असं पाहण्यात आलं आहे की लोक त्यांच्या घरीच पोर्नोग्राफी बघतात.
इतकंच काय तर मोबाईलमुळे आज पोर्नोग्राफी बघणं खूपच सोपं झालं आहे. रस्त्याने चालताना अथवा बस किंवा ट्रेनने प्रवास करताना एक व्यक्ती आपल्या मोबाईलवर सहजच अश्लील चित्र पाहू शकते.
पोर्नोग्राफी बघणं आणि इतरांपासून ते लपवणं आज खूपच सोपं झालं आहे आणि यामुळे बऱ्याच लोकांचं कधी नव्हे इतकं जास्त नुकसान होत आहे. आज अगणित लोक पोर्नोग्राफी बघतात आणि यामुळे त्यांच्या विवाहाला, आत्मसन्मानाला आणि विवेकाला खूप नुकसान पोहोचलं आहे. पण यापेक्षाही वाईट गोष्ट म्हणजे देवासोबतचा त्यांचा नातेसंबंध धोक्यात आला आहे. यामुळे असा निष्कर्ष काढणं योग्य आहे की पोर्नोग्राफी बघितल्यामुळे लोकांचं नुकसानच होतं. बऱ्याच लोकांच्या बाबतीत तर यामुळे त्यांच्या मनावर तीव्र जखमा झाल्याचं पाहण्यात आलं आहे. त्या जखमा हळूहळू बऱ्या झाल्या असल्या तरी त्यांचे डाग बऱ्याच काळापर्यंत राहतात.
पण सैतानाच्या या पाशातून आपलं संरक्षण करण्यासाठी यहोवाने बरेचसे मार्ग दिले आहेत, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आपल्याला यहोवाचं संरक्षण हवं असेल तर आपण अशी एक गोष्ट केली पाहिजे जी प्राचीन इस्राएली लोकांनी केली नाही. ती म्हणजे आपण यहोवाचं ‘खरोखर ऐकलं’ पाहिजे. (निर्ग. १९:५) आपण हे ओळखलं पाहिजे की यहोवाला पोर्नोग्राफीचा तिटकारा आहे. आपण असं का म्हणू शकतो?
यहोवासारखाच पोर्नोग्राफीचा द्वेष करा
देवाने इस्राएली लोकांना दिलेल्या नियमांचा विचार करा. त्या काळी ते नियम इतर देशांतल्या नियमांपेक्षा खूप वेगळे होते. ते नियम एका भिंतीप्रमाणे त्यांचं संरक्षण अनु. ४:६-८) या नियमांमुळे यहोवाला लैंगिक अनैतिकतेचा वीट आहे हे अगदी स्पष्ट झालं.
करायचे. त्यामुळे इस्राएली लोकांचं आजूबाजूच्या देशांतल्या लोकांपासून आणि त्यांच्या वाईट चालीरीतींपासून संरक्षण होऊ शकत होतं. (इस्राएलच्या आजूबाजूची राष्ट्रं ज्या अनैतिक गोष्टी करत होती त्याचा उल्लेख करत यहोवाने म्हटलं: “ज्या कनान देशात मी तुम्हाला घेऊन जात आहे, तेथील चालीरीतींना अनुसरून चालू नका . . . त्यांचा देशही भ्रष्ट झाला आहे, म्हणून त्यांच्या दुष्टतेमुळे मी त्यांचा समाचार घेत आहे.” पवित्र देवाच्या, यहोवाच्या नजरेत कनानमध्ये राहणारे लोक इतके दुष्ट आणि अनैतिक होते, की त्याच्या मते तो देश अतिशय भ्रष्ट आणि दूषित झाला होता.—लेवी. १८:३, २५.
यहोवाने कनानी लोकांना शिक्षा केली असली तरी इतर राष्ट्रांतल्या लोकांनी लैंगिक अनैतिकता करण्याचं सोडलं नव्हतं. याच्या १,५०० वर्षांनंतर, ख्रिस्ती राहत असलेल्या राष्ट्रांबद्दल पौलने म्हटलं की ते “नैतिकतेच्या सर्व मर्यादा ओलांडून” गेले आहेत आणि “सर्व प्रकारची अशुद्ध कामे करत राहण्यासाठी निर्लज्ज वर्तनाच्या आहारी गेले आहेत.” (इफिस. ४:१७-१९) आजही बरेच लोक अनैतिक जीवन जगतात आणि त्यांना या गोष्टींची जराही लाज वाटत नाही. म्हणून खऱ्या उपासकांनी या जगातल्या अनैतिक गोष्टी पाहण्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे.
पोर्नोग्राफी पाहिल्यामुळे देवाचा अनादर होतो. देवाने मानवांना त्याच्या प्रतिरूपात बनवलं आहे. त्याने आपल्यात सभ्यतेची, शालीनतेची जाणीव टाकली आहे. देवाने लैंगिक संबंधाच्या बाबतीत मानवांना मर्यादा किंवा नियम घालून दिले आहेत. आणि हे सुज्ञपणाचंच आहे. लैंगिक संबंधामुळे विवाहित जोडप्यांना आनंद मिळावा अशी त्याची इच्छा होती. (उत्प. १:२६-२८; नीति. ५:१८, १९) पण जे लोक पोर्नोग्राफीशी संबंधित साहित्यं बनवतात किंवा या गोष्टीला बढावा देतात त्यांच्याबद्दल काय? ते देवाच्या नैतिक नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. खरंच, पोर्नोग्राफीला बढावा देणारे लोक यहोवाच्या नावावर कलंक लावतात. यहोवाच्या स्तरांकडे दुर्लक्ष करून अनैतिक साहित्यं बनवणाऱ्या किंवा अशा गोष्टींना बढावा देणाऱ्या लोकांचा तो न्याय करेल.—रोम. १:२४-२७.
पण अशा लोकांबद्दल काय जे जाणूनबुजून पोर्नोग्राफीशी संबंधित गोष्टी वाचतात किंवा बघतात? काहींना वाटतं की पोर्नोग्राफी बघण्यात काहीच धोका नाही. पण खरं पाहता ते अशा लोकांना पाठिंबा देत असतात जे यहोवाच्या स्तरांना नाकारतात. पोर्नोग्राफी पाहायला त्यांनी सुरुवात केली होती तेव्हा त्यांच्या मनात हा उद्देश नसेल, पण ही गोष्ट स्पष्टच आहे की खऱ्या उपासकांना पोर्नोग्राफीचा मनापासून तिटकारा असला पाहिजे. बायबल आपल्याला आर्जवतं: “अहो स्तो. ९७:१०.
परमेश्वरावर प्रीती करणाऱ्यांनो, वाइटाचा द्वेष करा.”—पोर्नोग्राफीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांनासुद्धा तसं करणं कठीण जाऊ शकतं. आपण अपरिपूर्ण असल्यामुळे आपल्याला अशुद्ध लैंगिक इच्छांचा प्रतिकार करावा लागू शकतो. तसंच, आपलं अपरिपूर्ण मन आपल्याला असा तर्क करायला लावू शकतं की पोर्नोग्राफी बघणं चुकीचं नाही. (यिर्म. १७:९) पण बरेच जण जे ख्रिस्ती बनले आहेत त्यांनी हे युद्ध जिंकलं आहे. या गोष्टीमुळे आपली खातरी पटते की आपणही पोर्नोग्राफीचा प्रतिकार करू शकतो. देवाचं वचन आपल्याला सैतानाचा पाश म्हणजेच पोर्नोग्राफीचा प्रतिकार करण्यासाठी कशी मदत करू शकतं याकडे लक्ष द्या.
अनैतिक गोष्टींविषयी विचार करत बसू नका
आधी उल्लेख केल्याप्रमाणे, बऱ्याच इस्राएली लोकांनी त्यांच्या मनात चुकीच्या इच्छा इतक्या वाढू दिल्या की त्याचे परिणाम खूप भयंकर झाले. ही गोष्ट आज आपल्याबाबतीतही खरी होऊ शकते. येशूचा भाऊ याकोब याने या धोक्याबद्दल सांगितलं. त्याने म्हटलं: “प्रत्येक जण स्वतःच्याच इच्छेमुळे ओढला जाऊन भुलवला जातो तेव्हा परीक्षेत पडतो. मग इच्छा गर्भवती होऊन पापाला जन्म देते; आणि पाप घडल्यावर मृत्यू ओढवतो.” (याको. १:१४, १५) एका व्यक्तीने जर अनैतिक इच्छा आपल्या मनात वाढू दिली तर कालांतराने तिच्या हातून पाप घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या मनात अनैतिक विचार असतील तर आपण ते पूर्णपणे काढून टाकले पाहिजेत; त्या गोष्टींवर सतत विचार करण्याचं सोडून दिलं पाहिजे.
तुमच्या मनात सतत अनैतिक इच्छा येत असल्याचं तुम्हाला जाणवतं तेव्हा लगेच पाऊल उचला. येशूने म्हटलं: “म्हणून, जर तुझा हात किंवा पाय तुला अडखळायला लावत असेल, तर तो कापून फेकून दे . . . तसंच, जर तुझा डोळा तुला अडखळायला लावत असेल तर तो उपटून फेकून दे.” (मत्त. १८:८, ९) आपण खरोखरच आपल्या शरीराला इजा करून घ्यावी असं येशूचं म्हणणं नव्हतं. या उदाहरणातून त्याला सांगायचं होतं की एखाद्या गोष्टीमुळे आपण अडखळू नये म्हणून लगेच पाऊल उचलणं गरजेचं आहे. पोर्नोग्राफीच्या बाबतीत आपण हा सल्ला कसा लागू करू शकतो?
तुमच्यासमोर जर पोर्नोग्राफी पाहण्याचं प्रलोभन आलं तर ‘मी यात फसणार नाही’ असं म्हणणं चुकीचं ठरेल. लगेच अशा गोष्टींपासून नजर फिरवा. त्वरित टीव्ही बंद करा. तातडीने कंप्युटर आणि मोबाईल बंद करा. शुद्ध आणि योग्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. असं केल्यामुळे चुकीच्या इच्छा तुमच्यावर ताबा मिळवू शकणार नाहीत तर तुम्हाला तुमच्या विचारांवर नियंत्रण मिळवणं शक्य होईल.
आधी पाहिलेली अनैतिक दृश्यं सतत आठवत असतील तर?
तुम्ही पोर्नोग्राफी बघण्याचं यशस्वीपणे थांबवलं असेल, पण आधी पाहिलेली दृश्यं तुम्हाला कधीकधी आठवत असतील तेव्हा काय? आधी पाहिलेली पोर्नोग्राफीशी संबंधित चित्रं आणि दृश्यं एका व्यक्तीच्या मनात बऱ्याच काळापर्यंत राहू शकतात आणि ते अचानक डोळ्यांसमोर येऊ शकतात. जर असं झालं तर आपल्याला अशुद्ध गोष्ट करण्याचा मोह होऊ शकतो जसं की, हस्तमैथुन. तेव्हा, हे लक्षात असू द्या की असे विचार कोणत्याही क्षणी तुमच्या मनात येऊ शकतात म्हणून सतर्क राहा आणि त्या विचारांना लढा द्यायला तयार असा.
देवाच्या इच्छेनुसार विचार आणि कार्य करण्याचा तुमचा निर्धार पक्का करा. प्रेषित पौलसारखीच मनोवृत्ती बाळगा जो स्वतःविषयी म्हणतो, की तो “आपल्या शरीराला बुक्के मारतो आणि त्याला दास करून ठेवतो.” (१ करिंथ. ९:२७) अशुद्ध विचारांना तुमच्यावर ताबा मिळवू देऊ नका. “आपली विचारसरणी बदलून स्वतःचे रूपांतर होऊ द्या; म्हणजे, देवाची उत्तम, स्वीकारयोग्य आणि परिपूर्ण इच्छा काय आहे याची तुम्हाला खातरी पटेल.” (रोम. १२:२) लक्षात असू द्या की अशुद्ध गोष्टी करून तुम्ही आनंदी होणार नाही तर देवाच्या इच्छेनुसार विचार आणि कार्य केल्याने तुम्ही आनंदी व्हाल.
अशुद्ध गोष्टी करून तुम्ही आनंदी होणार नाही तर देवाच्या इच्छेनुसार विचार आणि कार्य केल्याने तुम्ही आनंदी व्हाल
बायबलची वचनं तोंडपाठ करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा चुकीचे विचार तुमच्या मनात येतात तेव्हा ही वचनं आठवण्याचा प्रयत्न करा. बायबलमधली काही वचनं, जसं की स्तोत्र ११९:३७; यशया ५२:११; मत्तय ५:२८; इफिसकर ५:३; कलस्सैकर ३:५ आणि १ थेस्सलनीकाकर ४:४-८ ही तुम्हाला पोर्नोग्राफीच्या बाबतीत यहोवासारखा दृष्टिकोन बाळगायला आणि त्याच्या इच्छेनुसार वागायला मदत करतील.
तुम्हाला अनैतिक गोष्टी बघण्याचा आणि त्यांवर विचार करण्याचा मोह अनावर होत असेल तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे? येशू ख्रिस्ताच्या उत्तम उदाहरणाचं जवळून अनुकरण करा. (१ पेत्र २:२१) येशूचा बाप्तिस्मा झाल्यानंतर सैतानाने त्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. पण त्या वेळी येशूने काय केलं? तो प्रतिकार करतच राहिला. त्याने बऱ्याच वचनांचा उल्लेख करून सैतानाच्या मोहाचा प्रतिकार केला. त्याने म्हटलं: “अरे सैताना! चालता हो!” आणि सैतान त्याला सोडून गेला. येशू सैतानाला विरोध करत राहिला आणि आपणही तसंच केलं पाहिजे. (मत्त. ४:१-११) सैतान आणि त्याचं जग तुम्हाला अनैतिक विचार करायला भाग पाडत राहील, पण हार मानू नका. पोर्नोग्राफीवर विजय मिळवणं शक्य आहे. यहोवाच्या मदतीने तुम्हाला तुमच्या शत्रूला हरवता येईल.
यहोवाला प्रार्थना करा आणि त्याच्या आज्ञा पाळा
यहोवाला सतत प्रार्थना करत राहा आणि त्याच्यावर अवलंबून राहा. पौलने म्हटलं: “आपल्या विनंत्या देवाला कळवा; म्हणजे, सर्व समजशक्तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती ख्रिस्त येशूद्वारे तुमच्या मनाचे व बुद्धीचे रक्षण करेल.” (फिलिप्पै. ४:६, ७) तुम्हाला चुकीच्या गोष्टींचा विरोध करणं शक्य व्हावं यासाठी देव तुम्हाला तुमच्या मनाची शांती टिकवून ठेवायला मदत करेल. तुम्ही देवाच्या जवळ गेला तर “तो तुमच्या जवळ येईल.”—याको. ४:८.
आपण या विश्वाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यासोबत एक घनिष्ठ नातं टिकवून ठेवलं तर सैतानाच्या पाशांपासून आपलं संरक्षण होईल. येशूने म्हटलं: “या जगाचा अधिकारी [सैतान] येत आहे, पण माझ्यावर त्याचा काही अधिकार नाही.” (योहा. १४:३०) येशू हे एवढं खातरीने का म्हणू शकला? त्याने एकदा म्हटलं: “आणि ज्याने मला पाठवलं तो माझ्यासोबत आहे; त्याने मला एकटं सोडलं नाही कारण मी नेहमी त्याला आवडणाऱ्या गोष्टी करतो.” (योहा. ८:२९) तुम्ही यहोवाचं मन आनंदित करण्याचा प्रयत्न केला तर यहोवा तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही. पोर्नोग्राफीच्या पाशापासून दूर राहा म्हणजे सैतान तुम्हाला त्या पाशात अडकवू शकणार नाही.