टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) जून २०२०

या अंकात ३-३० ऑगस्ट, २०२० पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत.

“तुझे नाव पवित्र मानले जावो”

अभ्यास लेख २३: ३-९ ऑगस्ट, २०२०. आज सर्व मानवांसमोर आणि देवदूतांसमोर कोणता महत्त्वाचा मुद्दा आहे? या महत्त्वाच्या मुद्द्‌यात कोणत्या गोष्टी सामील आहेत, आणि हा मुद्दा सोडवण्यात आपली भूमिका काय आहे? या आणि इतर संबंधित प्रश्‍नांची उत्तरं समजल्यामुळे आपलं यहोवासोबतचं नातं घनिष्ठ होईल.

तुझ्या नावाचं भय धरण्यासाठी माझं चित्त एकाग्र कर

अभ्यास लेख २४: १०-१६ ऑगस्ट, २०२०. स्तोत्र ८६:११, १२ यांत दावीद राजाच्या प्रार्थनेचा जो भाग नमूद करण्यात आला आहे त्यावर आपण या लेखात चर्चा करणार आहोत. यहोवाच्या नावाचं भय धरण्याचा काय अर्थ होतो? आपण त्या महान नावाचं भय का बाळगलं पाहिजे? आणि देवाबद्दलचं भय प्रलोभनांना बळी पडण्यापासून आपलं संरक्षण कसं करेल?

वाचकांचे प्रश्‍न

गलतीकर ५:२२, २३ यांत उल्लेख केलेलेच गुण ‘पवित्र आत्म्याच्या फळाचे’ पैलू आहेत का?

“मी स्वतः माझ्या मेंढरांना शोधीन”

अभ्यास लेख २५: १७-२३ ऑगस्ट, २०२०. अनेक वर्षं यहोवाची विश्‍वासूपणे सेवा केलेले भाऊबहीण मंडळीपासून दूर का जातात? यहोवाला त्यांच्याबद्दल कसं वाटतं? या लेखात वर दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं दिली जातील. तसंच, प्राचीन काळात यहोवापासून थोड्या काळासाठी दूर गेलेल्या त्याच्या काही सेवकांना त्याच्याकडे परत येण्यासाठी त्याने ज्या प्रकारे मदत केली त्यातून आपण काय शिकू शकतो, यावरही या लेखात चर्चा केली जाईल.

“माझ्याकडे परत या”

अभ्यास लेख २६: २४-३० ऑगस्ट, २०२०. मंडळीसोबत संगती करायचं सोडून दिलेल्या भाऊबहिणींनी यहोवाकडे परत यावं अशी त्याची इच्छा आहे. “माझ्याकडे परत या” या यहोवाच्या प्रेमळ आर्जवाला प्रतिसाद देण्याची इच्छा असणाऱ्‍या लोकांना आपण प्रोत्साहन देण्यासाठी खूप काही करू शकतो. या लेखात आपण पाहू या की आपण त्यांना असं करण्यासाठी कशी मदत करू शकतो.