व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

येशूच्या जन्मानंतर योसेफ आणि मरीया आपल्या घरी नासरेथला जाण्याऐवजी बेथलेहेममध्येच का राहिले?

बायबल याबद्दल काहीच सांगत नाही. पण त्यांनी असं का केलं असावं याबद्दलची काही महत्त्वपूर्ण माहिती बायबलमध्ये पाहायला मिळते.

एका स्वर्गदूताने मरीयाला सांगितलं होतं, की ती गर्भवती होईल आणि तिला एक मूल होईल. स्वर्गदूताने हे सांगितलं तेव्हा योसेफ आणि मरीया गालीलमधल्या योसेफच्या गावी, म्हणजे नासरेथमध्ये राहत होते. (लूक १:२६-३१; २:४) आणि नंतर ते इजिप्तमधून परतल्यावर पुन्हा नासरेथला गेले. येशू तिथेच वाढला आणि लोक त्याला नासरेथकर म्हणू लागले. (मत्त. २:१९-२३) त्यामुळे येशू, योसेफ आणि मरीया यांचा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा आपल्याला नासरेथचीही आठवण होते.

मरीयाला अलीशिबा नावाची एक नातेवाईक होती. ती यहूदामध्ये राहायची. ती जखऱ्‍या याजकाची बायको होती आणि नंतर ती बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानची आई बनली. (लूक १:५, ९, १३, ३६) मरीया अलीशिबाला भेटायला यहूदाला गेली आणि तीन महिने तिच्यासोबत राहिली. मग ती नासरेथला परत आली. (लूक १:३९, ४०, ५६) त्यामुळे मरीयाला यहूदाचा प्रदेश चांगला माहीत होता.

दरम्यान, राजाच्या आज्ञेप्रमाणे योसेफने “नावनोंदणी” करायचं ठरवलं. आणि त्यासाठी तो नासरेथहून ‘दावीदच्या शहरात,’ बेथलेहेमला गेला. याच जागी मसीहाचा जन्म होईल असं भविष्यावाणीत सांगितलं होतं. (लूक २:३, ४; १ शमु. १७:१५; २०:६; मीखा ५:२) तिथेच मरीयाने येशूला जन्म दिला. त्यामुळे नुकत्याच जन्मलेल्या बाळाला घेऊन योसफेने नासरेथपर्यंचा लांबचा प्रवास केला नाही. उलट ते बेथलेहेममध्येच राहिले. ते यरुशलेमपासून ९ कि.मी. अंतरावर होतं. बेथलेहेममध्ये असल्यामुळे त्यांना लहान बाळासोबत मंदिरात जाऊन अर्पण द्यायला सोपं गेलं असेल.​—लेवी. १२:२, ६-८; लूक २:२२-२४.

देवाच्या स्वर्गदूताने मरीयाला आधीच सांगितलं होतं, की तिला होणाऱ्‍या मुलाला “दावीदचं राजासन” मिळेल आणि तो राजा म्हणून “राज्य करेल.” म्हणून कदाचित योसेफ आणि मरीयाला येशूचा जन्म दावीदच्या शहरात होणं गरजेचं आहे, असं वाटलं असावं. (लूक १:३२, ३३; २:११, १७) त्यामुळे ते कदाचित तिथेच राहून पुढे देवाकडून काय मार्गदर्शन मिळतं याची वाट पाहत असावेत.

जेव्हा काही ज्योतिषी त्यांच्याकडे आले तेव्हा बेथलेहेममध्ये राहून त्यांना किती काळ गेला होता, हे आपल्याला माहीत नाही. पण तोपर्यंत, ते आता एका घरात राहत होते आणि त्यांचा “लहान मुलगा” आता मोठा झाला होता. (मत्त. २:११) असं दिसतं, की नाससेथला परत जाण्याऐवजी ते बेथलेहेममध्येच स्थायिक झाले होते.

हेरोदने असं फर्मान काढलं होतं, की ‘बेथलेहेम आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशांतल्या दोन वर्षांच्या आणि त्याहून कमी वयाच्या सर्व मुलांना ठार मारलं जावं.’ (मत्त. २:१६) हेरोदच्या या फर्मानाबद्दल योसेफ आणि मरीयाला आधीच एका स्वर्गदूताकडून कळल्यामुळे, ते इजिप्तला पळून गेले आणि हेरोदचा मृत्यू होईपर्यंत तिथेच राहिले. पुढे योसेफने त्याच्या कुटुंबाला पुन्हा नासरेथला आणलं. पण मग ते पुन्हा बेथलेहेमला का गेले नाहीत? कारण त्या वेळी हेरोदचा मुलगा अर्खेलाव यहूदावर राज्य करू लागला होता आणि तो खूप दुष्ट होता. तसंच स्वर्गदूतानेही त्यांना असा इशारा दिला होता, की त्यांनी तिथे जाऊ नये. याउलट, नासरेथमध्ये येशूला काहीच धोका नव्हता आणि योसेफ येशूला तिथे देवाच्या शिक्षणात वाढवू शकत होता.​—मत्त. २:१९-२२; १३:५५; लूक २:३९, ५२.

असं दिसतं, की येशूने आपल्या जीवनाचं बलिदान दिलं आणि स्वर्गात जायचा मार्ग मोकळा केला, त्याआधीच योसेफचा मृत्यू झाला होता. त्यामुळे योसेफचं पृथ्वीवर पुनरुत्थान होईल. तेव्हा बरेच लोक त्याला भेटू शकतील आणि येशूच्या जन्मानंतर तो आणि मरीया बेथलेहेममध्येच का राहिले हे जाणून घेऊ शकतील.