जीवन कथा
यहोवाने माझ्या प्रार्थना ऐकल्या
मला आठवतंय, मी दहा वर्षांचा होतो तेव्हा रात्रीच्या लुकलुकणाऱ्या ताऱ्यांकडे बघत होतो. त्या वेळी मी गुडघे टेकून प्रार्थना केली होती. मी यहोवाबद्दल नुकतंच ऐकलं होतं, पण तरी माझ्या मनातली चलबिचल मी त्याला सांगितली. तिथून “प्रार्थना ऐकणाऱ्या” यहोवा देवाबरोबर माझा मैत्रीचा प्रवास सुरू झाला. (स्तो. ६५:२) नुकत्याच माहीत झालेल्या देवाला मी प्रार्थना का केली असेल, ते मी आता तुम्हाला सांगतो.
आयुष्य बदलून टाकणारी भेट
माझा जन्म २२ डिसेंबर १९२९ ला नोवेल या छोट्याशा गावात झाला. हे बेल्जियमच्या आर्डेन्यमध्ये बॅस्टॉनच्या जवळच वसलेलं एक छोटंसं गाव होतं. लहानपणी माझ्या आईवडिलांबरोबर शेतावर घालवलेल्या बऱ्याच आठवणी माझ्याकडे आहेत. मला आठवतं माझा मोठा भाऊ रेमंड आणि मी दर दिवशी गायींचं दूध काढायचो. आणि पीक गोळा करायलासुद्धा मदत करायचो. आमच्या या छोट्याशा गावात लोकांमध्ये खूप एकी होती. एकमेकांच्या गरजेला सगळे धावून यायचे.
माझे आईवडील एमिल आणि ॲलीस हे खूप धार्मिक होते. ते कॅथलीक होते. आणि दर रविवारी न चुकता चर्चला जायचे. पण १९३९ च्या काळात इंग्लंडवरून आमच्या गावात काही पायनियर आले. आणि त्यांच्याकडे माझ्या वडिलांनी कन्सोलेशन मासिकाची (आता सावध राहा! असं म्हणतात) वर्गणी भरली. माझा वडिलांना लगेच कळलं की हेच सत्य आहे आणि त्यांनी बायबल वाचायला सुरुवात केली. जेव्हा त्यांनी चर्चला जायचं थांबवलं तेव्हा जीवाभावाचे असणारे आमचे शेजारी आमचे कट्टर विरोधक बनले. माझ्या वडिलांनी कॅथलिक धर्मातच राहावं म्हणून त्यांनी त्यांच्यावर खूप दबाव टाकला. यामुळे त्यांच्यात खूप वादावादसुद्धा झाली.
माझ्या वडिलांना एवढ्या दबावाखाली पाहून मला खूप वाईट वाटायचं. म्हणून लेखाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी देवाला मनापासून मदतीसाठी प्रार्थना केली. जेव्हा आमच्या शेजाऱ्यांकडून विरोध कमी झाला तेव्हा मला खूप आनंद झाला. आणि मला या गोष्टीची खातरी पटली की यहोवा ‘प्रार्थना ऐकणारा’ देव आहे.
युद्धातल्या काळातली आमची परिस्थिती
१० मे १९४० ला नात्झी जर्मनीने बेल्जियमवर हल्ला केला. यामुळे बरेच लोक देश सोडून पळून गेले. आणि आम्हीसुद्धा फ्रांन्सच्या दक्षिणेकडे गेलो. या प्रवासात आम्ही काही वेळा जर्मनी आणि फ्रांन्सच्या सैनिकांच्या लढाईतसुद्धा सापडलो.
जेव्हा आम्ही घरी परत आलो तेव्हा आम्ही पाहिलं की आमच्या बऱ्याच गोष्टी लुटल्या होत्या. पण बॉबी नावाचं आमचं कुत्र तेव्हढं राहिलं होतं. हे बघून ‘युद्ध आणि वाईट गोष्टी का आहेत?’ असा प्रश्न माझ्या मनात यायचा.
a नावाचे विश्वासू पायनियर वडील आम्हाला भेटायला यायचे. आणि त्यामुळे आम्हाला खूप मदत झाली. इतकं दुःखं का आहे हे त्यांनी बायबलमधून आम्हाला सांगितलं आणि जीवनाबद्दल माझ्या प्रश्नांची उत्तरंही दिली. यामुळे यहोवासोबतचं माझं नातं मजबूत होऊ लागलं. आणि यहोवा प्रेमळ देव आहे याची मला खातरी पटली.
त्या काळात एमिल श्रॅन्झयुद्ध संपायच्या आधीपासूनच आम्ही भाऊबहिणींना नेहमी भेटत राहायचो. ऑगस्ट १९४३ मध्ये जोस निकोलस मिनेट हे भाऊ आम्हाला भेटायला आले. त्यांनी एक भाषण दिलं आणि आमच्यापैकी कोणाला बाप्तिस्मा घ्यायला आवडेल असं विचारलं. माझ्या वडिलांनी हात वर केला आणि मीपण केला. मग आमच्या शेताच्या जवळ असलेल्या एक छोट्याशा नदीत आमचा बाप्तिस्मा झाला.
डिसेंबर १९४४ ला जर्मन सैन्याने पश्चिम युरोपवर शेवटचा हल्ला केला. त्यालाच बल्जची लढाई म्हणून ओळखलं जातं. जिथे युद्ध होत होतं त्याच्या जवळपासच आम्ही राहत होतो. म्हणून आम्ही जवळजवळ महिनाभर तळ घरातच बंदिस्त होतो. एकदा मी आमच्या जनावरांना चारा टाकायला बाहेर आलो तेव्हा एका बॉम्ब स्फोटामुळे धान्याच्या कोठाराचं छत उडालं. तेव्हा गोठ्यात लपून बसलेला एक अमेरिकी सैनिक मला मोठ्याने ओरडून म्हणाला: “खाली बस!” मी लगेच त्याच्याकडे धावत गेलो आणि खाली बसलो. तेव्हा त्याने मला वाचवण्यासाठी त्याचं हेलमेट माझ्या डोक्यावर ठेवलं.
माझी आध्यात्मिक प्रगती
युद्धानंतर आम्ही लिज मंडळीच्या भाऊबहिणींना भेटत राहिलो. ती मंडळी आमच्यापासून उत्तरेकडे जवळपास ९० किलोमीटर अंतरावर होती. काही काळानंतर आम्ही बॅस्टॉन इथे एक छोटासा अभ्यास गट सुरू केला. मी आयकर खात्यात काम करू लागलो. आणि कायद्याचं शिक्षण घेण्याची संधीही मला मिळाली. मग मी नोटरी क्लर्क म्हणून काम करू लागलो. १९५१ मध्ये आम्ही बॅस्टॉनला विभागीय संमेलन भरवलं. याला जवळपास १०० लोक उपस्थित राहिले होते. आणि त्यात ५० किलोमीटर सायकलीचा प्रवास करून आलेली एक आवेशी पायनियर बहीण एली रूटरपण होती. त्यानंतर आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि आमचं लग्न ठरलं. एलीला गिलियड प्रशालेचं आमंत्रण आलं होतं. तिने जागतिक मुख्यालयाला, प्रशालेला उपस्थित न राहण्याचं कारण सांगितलं. त्या वेळी यहोवाच्या लोकांचं नेतृत्व करणाऱ्या ब्रदर नॉर यांनी प्रेमळ शब्दांत तिच्या पत्राचं उत्तर दिलं आणि म्हटलं की कदाचित
एक दिवशी तिला तिच्या पतीसोबत गिलियडला उपस्थित राहायची संधी मिळेल. त्यानंतर फेब्रुवारी १९५३ ला आमचं लग्न झालं.त्याच वर्षी, एली आणि मी न्यू वर्ल्ड सोसायटी संमेलनाला उपस्थित राहिलो. ते न्यू यॉर्कमधल्या यांकी स्टेडियममध्ये होतं. तिथे एका भावाने मला अमेरिकेला सेटल व्हायची आणि एका चांगल्या नोकरीची ऑफर दिली. त्यानंतर यहोवाला प्रार्थना केल्यावर एली आणि मी, ती ऑफर नाकारून बेल्जियमला परत जायचं ठरवलं. आणि तिथे बॅस्टॉनमधल्या दहा प्रचारक असलेल्या एका लहानशा गटाला मदत करायचं ठरवलं. त्याच्या पुढच्या वर्षी आम्हाला एक बाळ झालं. त्याचं नाव आम्ही सर्ज ठेवलं. पण दुःखाची गोष्ट म्हणजे सात महिन्यांनी ते आजारी पडलं आणि आम्ही त्याला गमावलं. आमचं हे दुःख आम्ही यहोवाला प्रार्थनेत सांगितलं. पुनरुत्थानाच्या आशेमुळे आम्हाला ताकद मिळाली.
पूर्णवेळची सेवा
ऑक्टोबर १९६१ ला मला पायनियर सेवा करता येईल अशी पार्ट-टाईम नोकरी मिळाली. त्याच दिवशी बेल्जियममधल्या शाखा सेवकाकडून मला फोन आला. त्यांनी मला विभागीय सेवक (आता त्यांना विभागीय पर्यवेक्षक असं म्हणतात) म्हणून काम करता येईल का, असं विचारलं. मग मी त्यांना म्हटलं: “त्या आधी आम्ही पायनियर म्हणून सेवा करायला हवी ना?” म्हणून मग आम्ही पायनियर सेवा सुरू केली. आणि आठ महिने पायनियर सेवा केल्यानंतर सप्टेंबर १९६२ ला आम्ही विभागीय कार्य सुरू केलं.
विभागीय सेवेत दोन वर्षं घालवल्यानंतर आम्हाला ब्रुसेल्स बेथेलमध्ये सेवा करायला बोलवण्यात आलं. ऑक्टोबर १९६४ पासून आम्ही तिथे सेवा करू लागलो. या नवीन नेमणुकीमुळे आम्हाला खूप आशीर्वाद मिळाले. आणि त्यानंतर १९६५ मध्ये ब्रदर नॉरने आमच्या बेथेलला भेट दिली, तेव्हा थोड्या काळातच मला शाखा सेवक म्हणून नेमण्यात आलं. यामुळे मला आश्चर्याचा धक्काच बसला! त्यानंतर एली आणि मला गिलियड प्रशालेच्या ४१ व्या वर्गाचं आमंत्रण मिळालं. १३ वर्षांआधी ब्रदर नॉरने म्हटलेले शब्द आता खरे ठरले होते! पदवीधर झाल्यानंतर आम्ही बेल्जियम बेथेलला परत गेलो.
कायदेशीर हक्कांचं समर्थन करताना
पुढच्या काळात, कायद्याच्या शिक्षणामुळे मला युरोप आणि इतर ठिकाणी उपासनेच्या स्वातंत्र्याचं समर्थन करायची संधी मिळाली. (फिलिप्पै. १:७) यामुळे मी काही प्रमाणात किंवा पूर्णपणे निर्बंध असलेल्या ५५ पेक्षा जास्त देशांतल्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलो. मला कायद्याचं किती ज्ञान आहे किंवा किती अनुभव आहे याऐवजी “देवाचा माणूस” म्हणून मी स्वतःची ओळख करून द्यायचो. मला माहीत होतं की “राजाचं [न्यायाधीशाचं] मन यहोवाच्या हातात पाटांच्या पाण्यासारखं असतं. त्याला वाटेल तिकडे तो ते वळवतो.” म्हणून मी नेहमी मार्गदर्शनासाठी यहोवाला प्रार्थना करायचो.—नीति. २१:१.
एकदा मला खूप जबरदस्त अनुभव आला. तो मी कधीच विसरणार नाही. युरोपीयन संसदेच्या सदस्याबरोबर मला बोलायचं होतं. त्यासाठी मी त्याला बऱ्याचदा विनंती केली होती. शेवटी तो तयार झाला. पण तो म्हणाला: “मी तुम्हाला जास्तीत जास्त ५ मिनिटं देऊ शकतो. त्यापेक्षा एकही मिनिट जास्त नाही.” त्यानंतर मी मान खाली घालून प्रार्थना करू लागलो. तेव्हा हे सगळं बघून तो गोंधळला. त्याने मला विचारलं: “हे काय करतोय?” तेव्हा मान वर करून मी त्याला म्हणालो: “मी रोमकर १३:४ दाखवलं. तो एक प्रोटॅसटेंट असल्यामुळे त्या वचनाचा त्याच्यावर जबरदस्त प्रभाव पडला. त्यानंतर तो चक्क अर्धा तास माझ्याशी बोलला. आणि आम्हाला छान चर्चा करता आली. त्याने असंही म्हटलं की त्याला आपल्या कामाबद्दल खूप आदर आहे.
देवाचे आभार मानत होतो, कारण तुम्ही त्याच्या सेवकांपैकी एक आहात.” त्याने विचारलं: “काय म्हणायचंय तुला?” तेव्हा मी त्यालायहोवाचे साक्षीदार ख्रिस्ती तटस्थता, मुलांची जबाबदारी, कर आणि इतर गोष्टींबद्दल युरोपमध्ये बरेचसे न्यायिक खटले लढले आहेत. यांपैकी बऱ्याचशा खटल्यांमध्ये मदत करायची संधी मला मिळाली आहे. आणि या खटल्यांच्या बाबतीत यहोवाने कसं यश दिलंय आणि कसा विजय मिळवून दिलाय हे मी प्रत्यक्ष पाहू शकलोय. मानवी हक्काच्या युरोपीयन कोर्टात यहोवाच्या साक्षीदारांनी १४० पेक्षा जास्त खटले जिंकले आहेत.
क्युबामध्ये एक नवीन सुरुवात
क्युबामध्ये आपल्या भाऊबहिणींना धार्मिक स्वातंत्र्य नव्हतं. पण १९९० च्या काळात जागतिक मुख्यालयातल्या ब्रदर फिलिप ब्रमली आणि इटलीतल्या ब्रदर वॉलटर फरनेटी यांच्यासोबत मिळून आपल्या लोकांना हे स्वातंत्र्य मिळवून द्यायला मदत केली. मग मी बेल्जियममधल्या क्युबाच्या दूतावासाला पत्र लिहिलं. आणि मग आमचं काम हाताळणाऱ्या अधिकाऱ्याला भेटलो. ज्या गैरसमजुतींमुळे आपल्या कामावर बंदी होती त्या दूर करण्यासाठी आम्हाला पहिल्या भेटीत काही विशेष प्रगती करता आली नाही.
यहोवाला प्रार्थनेत मार्गदर्शन मागितल्यावर ५,००० बायबल क्युबाला पाठवण्यासाठी आम्ही परवानगी काढली आणि ती आम्हाला मिळाली. हे बायबल भाऊबहिणींपर्यंत सुरक्षित पोहोचले आणि त्यांना वाटण्यात आले. यामुळे आम्हाला समजलं की यहोवा आमच्या मेहनतीवर आशीर्वाद देतोय. म्हणून आम्ही आणखी २७,५०० बायबल पाठवण्याची परवानगी काढली आणि आम्हाला ती मिळालीही. क्युबामधल्या भाऊबहिणींना स्वतःची बायबल प्रत मिळवून द्यायला आम्ही जी मदत केली होती, त्यामुळे मला खूप आनंद झाला.
आपल्या कामाबद्दल असलेल्या कायद्याशी संबंधित परिस्थितीला सुधारण्यासाठी मी बऱ्याचदा क्युबाला गेलो. आणि त्यामुळे तिथल्या बऱ्याच सरकारी अधिकाऱ्यांसोबत माझे चांगले संबंध निर्माण झाले.
रवांडातल्या आपल्या भाऊबहिणींना मदत करणं
१९९४ ला रवांडामध्ये तुत्सी लोकांविरुद्ध जातीय कत्तल झाली होती. त्यामध्ये १० लाखपेक्षा जास्त लोक मारले गेले होते. दुःखाची गोष्ट म्हणजे त्यात आपले भाऊबहीणसुद्धा होते. म्हणून त्या ठिकाणी मदतकार्य पुरवण्यासाठी लगेच काही भावांच्या गटाला निवडण्यात आलं.
जेव्हा आमचा गट किगाली या राजधानी शहरात पोचला, तेव्हा तिथल्या भाषांतर कार्यालयाची आणि जिथे पुस्तकं ठेवली जायची त्या भागाची बंदुकीच्या गोळ्यांनी अक्षरशः चाळण झाली होती. मोठ्या सुऱ्याने भाऊबहिणींना कसं मारण्यात आलं, याच्या
बऱ्याच भयानक घटनांबद्दल आम्हाला ऐकायला मिळालं. पण या दरम्यान भाऊबहिणींनी ख्रिस्ती प्रेम कसं दाखवलं हेसुद्धा आम्ही ऐकलं. उदाहरणार्थ, एका तुत्सी भावाला एका हूतू साक्षीदार कुटुंबाने जमिनीतल्या एका खड्यात जवळजवळ २८ दिवस लपवून ठेवलं होतं. किगाली इथे झालेल्या एका सभेत ९०० पेक्षा जास्त भाऊबहिणींना आम्ही सांत्वन देऊ शकलो.गोमा शहराजवळ असलेल्या शरणार्थी शिबीरात रवांडाच्या बऱ्याच साक्षीदारांनी आसरा घेतला होता. त्यांना शोधण्यासाठी आम्ही सीमा पार करून झैरला (आता काँगो प्रजासत्ताक) गेलो. पण आम्हाला ते सापडले नाहीत. म्हणून आम्ही यहोवाने त्यांना शोधायला मदत करावी अशी प्रार्थना केली. मग कोणीतरी समोरून येताना दिसलं. ‘इथे कोणी यहोवाचा साक्षीदार आहे का?’ असं आम्ही त्याला विचारलं. आणि तो म्हणाला “हो, मीच साक्षीदार आहे. मी मदतकार्य समितीशी तुमची भेट घालून देऊ का?” मदतकार्य समितीला भेटून त्यांच्यासोबत एक प्रोत्साहनदायक सभा झाल्यानंतर आम्ही जवळजवळ १,६०० शरणार्थी भाऊबहिणींना भेटलो आणि त्यांना आध्यात्मिक रितीने सांत्वन आणि प्रोत्साहन देऊ शकलो. आम्ही नियमन मंडळाकडून मिळालेल्या पत्रातला संदेशही त्यांना सांगितला. त्यात म्हटलं होतं: “आम्ही नेहमी तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि यहोवा तुम्हाला कधीच सोडणार नाही हे आम्हाला चांगलं माहीत आहे.” हे शब्द भाऊबहिणींना खूप उत्तेजन देणारे होते. शिवाय, नियमन मंडळाचे हे शब्द अगदी खरे ठरले. कारण आज रवांडामध्ये साक्षीदारांची भरभराट होऊन ३०,००० पेक्षा जास्त साक्षीदार आहेत!
यहोवाला विश्वासू राहायचा निर्धार
एलीसोबत ५८ वर्षं संसार केल्यानंतर २०११ मध्ये तिचा मृत्यू झाला आणि मी माझ्या एलीला गमावलं. मी प्रार्थनेत यहोवासमोर माझं दुःख व्यक्त केलं आणि या दुःखातून त्याने मला सावरलं. तसंच, मी लोकांना जेव्हा राज्याचा आनंदाचा संदेश सांगतो तेव्हासुद्धा मला सांत्वन मिळतं.
आज मी वयाच्या नव्वदीत आहे. तरीसुद्धा मी दर आठवडी प्रचारकार्यात भाग घेतो. आणि बेल्जियम शाखेच्या कायदे विभागात काम करायला, माझा अनुभव इतरांना सांगायला आणि बेथेल कुटुंबातल्या तरुण भाऊबहिणींना मेंढपाळ भेटी द्यायला मला खूप छान वाटतं.
जवळपास ८४ वर्षांआधी मी यहोवाला पहिल्यांदा प्रार्थना केली होती. आणि तेव्हापासून यहोवाच्या जवळ जायचा माझा सुंदर प्रवास सुरू झाला होता. यहोवाने संपूर्ण आयुष्यभर माझ्या प्रार्थनांकडे लक्ष दिलं, यासाठी मी खरंच त्याचा खूप आभारी आहे!—स्तो. ६६:१९. b