व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

स्तोत्र १२:७ या वचनात “तू त्यांना  सांभाळशील” या शब्दांमध्ये त्यांना  ‘दीनदुबळ्यांना’ (वचन ५) सूचित करतं की ‘यहोवाच्या शब्दांना’ (वचन ६)?

मागचा-पुढचा संदर्भ लक्षात घेतला, तर असं दिसतं की हा शब्द लोकांना सूचित करतो.

स्तोत्र १२:१-४ मध्ये आपण वाचतो की “प्रामाणिक लोक नाहीसे झाले आहेत.” आणि आता स्तोत्र १२:५-७ वचनांचा विचार करा.

“‘दीनदुबळ्यांवर जुलूम होत आहेत;

गोरगरीब उसासे टाकत आहेत;

म्हणून, मी उठून कारवाई करीन.

त्यांना तुच्छ लेखणाऱ्‍यांपासून, मी त्यांचा बचाव करीन,’ असं यहोवा म्हणतो.

यहोवाचे शब्द शुद्ध आहेत;

ते मातीच्या भट्टीत, सात वेळा शुद्ध केलेल्या चांदीसारखे आहेत.

हे यहोवा तू त्यांना सांभाळशील;

या पिढीपासून सर्वकाळापर्यंत, तू त्यांच्यापैकी प्रत्येकाचं रक्षण करशील.”

वचन ५ मध्ये देव ‘दीनदुबळ्यांबद्दल’ काय म्हणतो ते सांगितलंय. तिथे म्हटलंय की तो त्यांना बचावेल.

आणि वचन ६ मध्ये म्हटलंय “यहोवाचे शब्द शुद्ध आहेत.” ते “शुद्ध केलेल्या चांदीसारखे आहेत.” आपल्यालाही देवाच्या शब्दांबद्दल अगदी असंच वाटतं.—स्तो. १८:३०; ११९:१४०.

आता पुढच्या वचनात म्हणजे स्तोत्र १२:७ मध्ये काय म्हटलंय पाहा: “हे यहोवा तू त्यांना  सांभाळशील; या पिढीपासून सर्वकाळापर्यंत, तू त्यांच्यापैकी  प्रत्येकाचं रक्षण करशील.” मग इथे “त्यांना” किंवा ‘त्यांच्या’ कोणाला सूचित करतं?

७ व्या वचनाआधी ‘यहोवाच्या शब्दांचा’ उल्लेख आहे, त्यामुळे कदाचित काही लोकांना असं वाटेल की “त्यांना” किंवा ‘त्यांच्या’ देवाच्या शब्दांना सूचित करतं. आणि आपल्याला माहीत आहे की बऱ्‍याच विरोधकांनी देवाच्या वचनावर बंदी घालण्याचा आणि ते नष्ट करायचा प्रयत्न केलाय. तरी देवाने त्याच्या वचनाचं रक्षण केलंय.—यश. ४०:८; १ पेत्र १:२५.

पण ५ व्या वचनात जे म्हटलंय तेसुद्धा तितकंच खरंय. यहोवा ‘दीनदुबळ्यांना’ आणि “जुलूम” सहन करणाऱ्‍यांना आज आणि पुढेही मदत करत राहील आणि त्यांना वाचवेल.—ईयो. ३६:१५; स्तो. ६:४; ३१:१, २; ५४:७; १४५:२०.

तर मग ७ व्या वचनात “त्यांना” आणि ‘त्यांच्या’ असं जे म्हटलंय ते कोणाला सूचित करतं?

या स्तोत्राचा संदर्भ लक्षात घेतला, तर ते लोकांना सूचित करतं.

१२ व्या स्तोत्राच्या सुरुवातीला म्हटलंय की ‘प्रामाणिक लोकांना’ खोटं सांगितलं जातं. आणि नंतर म्हटलंय की जे त्यांच्या जीभेचा गैरवापर करतात त्यांच्याविरुद्ध यहोवा कार्य करेल. या स्तोत्रामुळे आपण देवावर भरवसा ठेवू शकतो की तो त्याच्या लोकांच्या वतीने कार्य करेल. कारण त्याचे शब्द शुद्ध आहेत.

त्यामुळे ७ व्या वचनात म्हटलंय की “त्यांना” म्हणजे दुष्ट लोक ज्या दीनदुबळ्यांवर अत्याचार करत आहेत त्यांना यहोवा सांभाळेल आणि त्यांचं रक्षण करेल.

हिब्रू शास्त्रवचनांच्या भरवशालायक हस्तलिखित प्रतींमध्ये म्हणजे मॅसोरेटीक लिखाणांमध्ये “त्यांना” हा शब्द या वचनात वापरण्यात आलाय. ग्रीक सेप्टुअजिंटमध्ये ७ व्या वचनात दोनदा “आम्हाला” म्हटलंय. आणि हे शब्दसुद्धा जुलूम आणि अत्याचार सहन करणाऱ्‍या प्रामाणिक लोकांना सूचित करतात. आणि शेवटी ७ व्या वचनात म्हटलंय की नीच कामांना प्रोत्साहन देणाऱ्‍या “पिढीपासून” यहोवा प्रामाणिक लोकांपैकी “प्रत्येकाचं” रक्षण करेल. (स्तो. १२:७, ८) अरामी टारगम्समध्ये ७ व्या वचनात म्हटलंय: “हे प्रभू, तू नीतिमानाला सांभाळशील; या पिढीपासून सर्वकाळापर्यंत, तू त्यांचं रक्षण करशील.” यावरूनसुद्धा हे स्पष्ट होतं की स्तोत्र १२:७ मध्ये “त्यांना” देवाच्या शब्दांना सूचित करत नाही.

पण या वचनामुळे ‘प्रामाणिक लोकांना’ एक आशा मिळते की देव नक्की कार्य करेल.