व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला आठवतं का?

तुम्हाला आठवतं का?

टेहळणी बुरूज नियतकालिकातील अलीकडील अंक तुम्ही काळजीपूर्वक वाचले आहेत का? तर मग, पुढील प्रश्नांची उत्तरं देण्यास जमतं का ते पाहा:

मत्तय १८:१५-१७ या वचनांत येशू कोणत्या प्रकारच्या अपराधाबद्दल बोलत होता?

येशूने या वचनांत “अपराध” असा जो शब्द वापरला तो बांधवांमधील लहानसहान मतभेदांना सूचित करत नव्हता. या ठिकाणी तो अशा एका गंभीर अपराधाबद्दल बोलत होता, जो मतभेद झालेले बांधव आपसात तर सोडवू शकत होते. पण झालेले मतभेद किंवा भांडण जर ते आपसात सोडवू शकले नाहीत, तर ज्याने अपराध केला आहे त्याला मंडळीतून बहिष्कृत करण्याचा निर्णयही घेता येऊ शकत होता. उदाहरणार्थ, इतरांची फसवणूक किंवा इतरांचं नाव खराब करण्यासाठी केलेली निंदा.—टेहळणी बुरूज१६.०५, पृ. ७.

बायबल वाचनातून अधिक फायदा मिळवण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

तुम्ही पुढील गोष्टी करू शकता: पूर्वग्रह न बाळगता वाचन करा आणि त्यातून आपण काय शिकू शकतो याकडे लक्ष द्या; स्वतःला काही प्रश्न विचारा, जसं की ‘इतरांना मदत करण्यासाठी मी या माहितीचा वापर कसा करू शकतो?’; आणि तुम्ही जी माहिती वाचता त्याबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या संशोधन साधनांचा वापर करा.—टेहळणी बुरूज१६.०५, पृ. २४-२६.

आपल्याला पुनरुत्थानाची आशा असली तरी, आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूचा शोक करणं चुकीचं आहे का?

पुनरुत्थानाच्या आशेवर विश्वास असल्याने प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे होणारं दुःख नाहीसं होत नाही. अब्राहामानेही आपली पत्नी सारा हिच्या मृत्यूचा शोक केला. (उत्प. २३:२) काळासोबत आपल्याला होणारं दुःख हे हळूहळू कमी होऊ शकतं.—टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६.३, पृ. ४

यहेज्केल अध्याय ९ मध्ये कारकुनाची दऊत बाळगणारी व्यक्ती आणि हातात विध्वंसक हत्यारे बाळगणारे सहा लोक कोणाला सूचित करतात?

ते स्वर्गातील त्या शक्तींना सूचित करतात ज्यांनी यरुशलेमचा नाश करण्यात सहभाग घेतला होता. तसंच, ते लवकरच हर्मगिदोनात सैतानाच्या दुष्ट जगाचा नाश करण्यातही सहभाग घेतील. या भविष्यवाणीच्या आपल्या काळातील पूर्ततेत, कारकुनाची दऊत बाळगणारी व्यक्ती येशूला सूचित करते. आणि तो मोठ्या कळपातील लोकांचा मेंढरं म्हणून न्याय झालेल्यांवर लाक्षणिक अर्थानं चिन्ह लावेल.—टेहळणी बुरूज१६.०६, पृ. १६-१७.

कोणते काही मार्ग आहेत ज्यांद्वारे एक ख्रिस्ती व्यक्ती आपलं राहणीमान साधं करू शकते?

तुम्हाला खरोखर कोणत्या गोष्टींची गरज आहे ते ओळखा आणि अनावश्यक गोष्टींवर खर्च करण्याचं टाळा. चांगला बजेट बनवा. ज्या गोष्टींची तुम्हाला गरज नाही त्या काढून टाका आणि सर्व कर्ज फेडा. अर्ध्यावेळेची नोकरी शोधा आणि आपलं सेवाकार्य कसं वाढवता येईल ते पाहा.—टेहळणी बुरूज१६.०७, पृ. १०.

बायबल कोणत्या गोष्टीला सोन्यापेक्षाही मौल्यवान म्हणते?

ईयोब २८:१२, १५ या वचनांत देवाकडून मिळणाऱ्या ज्ञानाला सोन्यापेक्षाही उत्तम असं म्हटलं आहे. हे ज्ञान शोधताना नम्रता दाखवा आणि विश्वासात मजबूत राहण्याचा प्रयत्न करा.—टेहळणी बुरूज१६.०८, पृ.१८-१९.

बांधवांनी दाढी ठेवणं योग्य आहे का?

काही संस्कृतींमध्ये व्यवस्थित रीत्या ठेवलेली दाढी सर्वमान्य असते. लोक अशा व्यक्तीचा आदर करतात आणि कदाचित सुवार्ता सांगताना लोकांचं लक्ष त्यामुळे विचलितदेखील होत नाही. पण काही बांधव कदाचित दाढी न ठेवण्याचंच ठरवतील. (१ करिंथ. ८:९) इतर काही संस्कृतींमध्ये किंवा काही देशांत लोक सहसा दाढी ठेवत नाहीत. आणि त्यामुळे साक्षीदार बांधवांनी जर दाढी ठेवली असेल तर ते इतरांना खटकू शकतं.—टेहळणी बुरूज१६.०९, पृ. २१.

दावीद विरुद्ध गल्याथ हे खरोखर घडलं होतं यावर आपण का विश्वास ठेवू शकतो?

आधुनिक काळात सर्वात उंच असलेल्या माणसाची जी नोंद करण्यात आली आहे, त्याच्यापेक्षा गल्याथ हा फक्त १५ सेंटीमीटर उंच होता. दावीद हादेखील खरोखर अस्तित्वात होता. पुरातत्व शास्त्रज्ञांना जुन्या काळातील काही लिखाणं सापडली आहेत, ज्यांवर “दाविदाचं घराणं” असा उल्लेख आहे. येशू ख्रिस्तानेदेखील दाविदाचा उल्लेख केला. तसंच, बायबलमधील या अहवालात ज्या ठिकाणांचा उल्लेख करण्यात आला आहे, तीदेखील खरोखर अस्तित्वात होती याचे पुरावेही पाहायला मिळतात.—टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१६.५, पृ. १३.

माहिती, समज आणि व्यावहारिक ज्ञान या तिन्ही गोष्टी एकमेकांपासून कशा प्रकारे वेगळ्या आहेत?

एखादी माहीतगार व्यक्ती विषयाची फक्त माहिती मिळवते आणि वस्तुस्थिती जाणून घेते. आणि ज्या व्यक्तीला विषयाची खोल समज आहे, ती त्या गोष्टी एकमेकांशी कशा निगडित आहेत व त्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे हे स्पष्टपणे समजते. पण ज्या व्यक्तीला व्यावहारिक ज्ञान आहे ती व्यक्ती या दोन्ही गोष्टींचा योग्य मेळ घालते. ती माहितीचा आणि समंजसपणाचा उपयोग करून कार्य करते.—टेहळणी बुरूज१६.१०, पृ. १८.