व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या अपार कृपेमुळे तुम्ही मुक्त झाला आहात

देवाच्या अपार कृपेमुळे तुम्ही मुक्त झाला आहात

“तुम्ही नियमशास्त्राधीन नाही, तर अपार कृपेच्या अधीन आहा, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही.”—रोम. ६:१४, NW.

गीत क्रमांक: २, २९

१, २. रोमकर ५:१२ हे वचन आपल्याला कसं मदत करतं?

रोमकर ५:१२ मध्ये म्हटलं आहे: “एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.” हे वचन आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. शिवाय प्रचारकार्यात व बायबल अभ्यास चालवताना आपण या वचनाचा सहसा वापर करतो.

बायबल नेमके काय शिकवते? आणि बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं? या पुस्तकांत हे वचन बऱ्याच वेळा वापरण्यात आलं आहे. आपल्या मुलांसोबत किंवा इतरांसोबत या पुस्तकांतील अध्याय ३ आणि यांचा अभ्यास करताना, आपण हे वचन नक्कीच वाचलं असेल. या वचनाचा वापर करून आपण त्यांना हे समजण्यास मदत केली असेल की, पृथ्वी आज एक नंदनवन का नाही, आपल्याला खंडणीची गरज का पडली किंवा आपण का मरतो? पण या सर्वांसोबतच हे वचन आपल्याला यहोवासोबत असलेल्या आपल्या नातेसंबंधाबद्दल कृतज्ञता बाळगण्यास मदत करतं. शिवाय यहोवाचं मन आनंदी करण्याचा आपला निश्चय अधिक दृढ करण्यास आणि यहोवा आपल्यासाठी भविष्यात देणार असलेल्या आशीर्वादांवर मनन करण्यासही हे वचन आपल्याला मदत करतं.

३. आपण कोणती गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे?

आपण सर्व जण पापी आहोत. आणि दररोज बऱ्याच चुका करतो. पण यहोवा देव हा दयाळू आणि क्षमाशील आहे. मनुष्य अपरिपूर्ण आहे हे त्याला माहीत आहे, आणि म्हणून तो आपल्याला क्षमा करण्यास नेहमी तयार असतो. (स्तो. १०३:१३, १४) येशू ख्रिस्ताने आपल्याला शिकवलं की आपण देवाकडे आपल्या पापांची क्षमा मागितली पाहिजे. (लूक ११:२-४) आणि जेव्हा आपल्याकडून झालेल्या पापांची यहोवा क्षमा करतो, तेव्हा आपण त्यावर पुन्हापुन्हा विचार करू नये. यहोवा आपल्याला कोणत्या आधारावर क्षमा करतो, ते आपण आता पाहूयात.

यहोवा आपल्याला कोणत्या आधारावर क्षमा करतो?

४, ५. (क) रोमकर ५:१२ समजण्यास आपल्याला कशामुळे मदत होते? (ख) “अपार कृपा” याचा काय अर्थ होतो?

बायबलमधील रोमकरांस पत्र आणि खासकरून त्यातील व्या अध्यायातून आपल्याला हे समजण्यास मदत होते की, यहोवा आपल्याला कोणत्या आधारावर क्षमा करण्यास तयार असतो. रोमकर अध्याय ३ मधून आपण शिकलो की आपण “सर्वांनी पाप केले आहे.” पण त्याच अध्यायात पौल पुढे सांगतो की, “देवाच्या [“अपार,” NW] कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात.” (रोम. ३:२३, २४) या वचनांत “अपार कृपेने” यासाठी मूळ ग्रीक भाषेत जो शब्द आहे त्याचा अर्थ: एखाद्या व्यक्तीने कमावलेलं नसतानाही किंवा ती त्यासाठी पात्र नसतानाही, कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता तिच्यासाठी एखादी चांगली गोष्ट करणं.

एक बायबल तज्ञ याबाबतीत असं म्हणतो की, जेव्हा-जेव्हा बायबल देवाच्या आणि ख्रिस्ताच्या अपार कृपेबद्दल बोलतं, तेव्हा ते सहसा मानवजातीला पाप आणि मृत्यूच्या दास्यातून मुक्त करण्यासाठी त्यांनी जे केलं त्याबद्दल बोलतं. त्यामुळे ग्रीक भाषेत यासाठी असलेल्या शब्दाचं भांषांतर न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनमध्ये “अपार कृपा” असं करण्यात आलं आहे. तेव्हा चला पाहूयात की, देवाने आपल्यासाठी काय केलं आहे आणि त्याच्या अपार कृपेमुळे आपल्याला कसा फायदा होतो. तसंच यामुळे आपल्याला भविष्यासाठी कोणती आशा मिळते.

६. देवाच्या अपार कृपेचा कोणाला फायदा होतो, आणि कसा?

आदामाने पाप केलं, आणि त्यामुळे पाप आणि मृत्यू सर्व मानवजातीत पसरला. याविषयी बायबल म्हणतं: “त्या एकाच इसमाच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले.” पण यहोवा देवाने मानवजातीवर त्याची अपार कृपा दाखवून “एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे” त्यांना यातून मुक्त करण्याचा मार्ग तयार केला. (रोम. ५:१२, १५, १७) “या एकाच मनुष्याच्या आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील.” आणि या एकाच मनुष्याद्वारे म्हणजे येशू ख्रिस्ताद्वारे ते ‘सार्वकालिक जीवनाची’ आशा धरू शकतील.—रोम. ५:१९, २१.

७. यहोवा देवाने आपल्यासाठी खंडणीची जी तरतूद केली ती त्याची अपार कृपा आहे असं का म्हणता येईल?

यावर विचार करा: मानवजातीसाठी यहोवाला स्वतःच्या पुत्राची खंडणी देण्याची गरज होती का? नाही. पण तरीही आपल्याला पाप आणि मृत्यूपासून सोडवण्यासाठी त्याने ही खंडणी दिली आणि आपल्यावर अपार कृपा दाखवली. यहोवा आणि येशू ख्रिस्ताने केलेल्या तरतुदीच्या आधारावर आपण आपल्या पापांची क्षमा मिळवू शकतो आणि सदासर्वकाळ जगू शकतो. यहोवा देवाने आणि येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी जे केलं त्यासाठी खरंतर आपल्यापैकी कोणीही योग्यतेचा नाही. मग ही गोष्ट त्यांचे आभार मानण्यास आपल्याला प्रेरित करत नाही का? हो नक्कीच करते. त्यामुळे आपण ज्या प्रकारे जीवन जगतो त्याद्वारे आपण कृतज्ञ आहोत हे दाखवून देऊ या.

यहोवाच्या अपार कृपेबद्दल आपण कृतज्ञ आहोत

८. आपण कोणत्या प्रकारची मनोवृत्ती टाळली पाहिजे?

यहोवा आपल्या पापांची क्षमा करण्यास तयार आहे, हे आपल्याला माहीत आहे. अगदी आपण केलेल्या गंभीर पापांचीदेखील तो क्षमा करतो. पण यहोवा दाखवत असलेल्या अपार कृपेचा आपण कधीही गैरफायदा घेऊ नये. म्हणजे आपण जाणूनबुजून एखादं पाप केलं तरी यहोवा आपल्याला माफ करेल, असा विचार आपण करू नये. पहिल्या शतकात, काही प्रेषित जिवंत होते अगदी तेव्हाही, ख्रिश्चनांपैकी काहींनी अशीच चुकीची मनोवृत्ती बाळगली होती. (यहूदा ४ वाचा.) आज कदाचित इतरांच्या प्रभावामुळे आपणही हळूहळू अशीच मनोवृत्ती बाळगायला लागू. त्यामुळे आपल्याला सावध राहिलं पाहिजे.

९, १०. पौल आणि इतर ख्रिश्चनांना पाप आणि मृत्यूपासून कशा प्रकारे मुक्त करण्यात आलं?

पौलाने ख्रिश्चनांना सांगितलं की, आपण पाप करत राहिलो तरी यहोवा क्षमा करत राहील असा विचार आपण करू नये. त्यांनी अशा प्रकारचे विचार आपल्यातून काढून टाकावेत, कारण “आपण पापाला मेलो” आहोत असं पौलाने त्यांना म्हटलं. (रोमकर ६:१, २ वाचा.) पौलाच्या या बोलण्याचा काय अर्थ होता?

१० पहिल्या शतकात, यहोवा देवाने खंडणी बलिदानाच्या आधारावर पौलाच्या व इतर ख्रिश्चनांच्या पापांची क्षमा केली. तसंच यहोवाने त्यांना त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्त केलं आणि स्वतःची मुलं बनण्याचा बहुमान दिला. जर ते शेवटपर्यंत विश्वासू राहिले तर त्यांना स्वर्गात येशू ख्रिस्तासोबत राहणं आणि राज्य करणं शक्य होणार होतं. पण पृथ्वीवर जिवंत असतानाच “आपण पापाला मेलो” आहोत असं पौलाने का म्हटलं? हे समजण्यासाठी पौलाने ज्या तुलनात्मक उदाहरणाचा वापर केला त्याकडे लक्ष द्या. तो म्हणाला की येशू ख्रिस्त जेव्हा मरणातून उठला, तेव्हा तो एका अविनाशी आत्मिक शरीरात जिवंत झाला. त्यामुळे “त्याच्यावर यापुढे मरणाची सत्ता” उरली नाही. अगदी याच प्रकारे तेदेखील ‘पापाला मेले’. त्यांनी पापी प्रवृत्तीला स्वतःवर ताबा मिळवू दिला नाही आणि त्यामुळे त्यांचं जीवन संपूर्णपणे बदललं. तेव्हापासून ते स्वतःचं जीवन अशा प्रकारे जगण्याचा प्रयत्न करू लागले, ज्यामुळे यहोवाचं मन आनंदित होईल. ते “पापाला मेलेले पण ख्रिस्त येशूमध्ये व देवासाठी जिवंत” असे झालेले होते.—रोम. ६:९, ११, ईझी-टू-रीड व्हर्शन.

११. आज ख्रिस्ती कोणत्या अर्थी पापाला मेले आहेत?

११ आज आपल्याबद्दल काय? आपणही “पापाला मेलो” आहोत असं म्हणता येईल का? सत्यात येण्याआधी कदाचित आपण अशा काही गोष्टी केल्या असतील ज्या यहोवाच्या नजरेत चुकीच्या व वाईट आहेत. आपण “अमंगळपण व स्वैराचार यांस गुलाम असे समर्पण” केलेले होतो. म्हणजेच आपण “पापाचे गुलाम” होतो. (रोम. ६:१९, २०) पण नंतर बायबलमधून आपल्याला हे शिकायला मिळालं की, यहोवा देवाची इच्छा काय आहे आणि आपण कशा प्रकारचं जीवन जगलं पाहिजे. आणि त्यानुसार आपण आपल्या जीवनात बदलही केले. त्यानंतर आपण यहोवाला आपलं जीवन समर्पित केलं आणि बाप्तिस्मा घेतला. तेव्हापासून यहोवा देवाच्या इच्छेनुसार जगण्याचा आणि त्याच्या आज्ञा पाळण्याचा आपला निश्चय दृढ आहे. त्यामुळे आपणही “पापापासून मुक्त होऊन . . . नीतिमत्त्वाचे गुलाम” झालो आहोत असं म्हणता येईल.—रोम. ६:१७, १८.

१२. आपल्या प्रत्येकाजवळ कोणतं स्वातंत्र्य आहे?

१२ असं असलं तरी आपल्याजवळ निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे. ते कोणतं? पौलाने म्हटलं: “तुम्ही आपल्या शरीरवासनांच्या अधीन न व्हावे म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये.” (रोम. ६:१२) आपण स्वतःला पापी विचारांच्या आणि इच्छांच्या हवाली करू शकतो किंवा आपण त्यांच्यावर ताबा मिळवू शकतो. तुम्ही स्वतःला विचारू शकता: ‘मी माझ्या चुकीच्या विचारांना व इच्छांना स्वतःवर इतकं प्रबळ होऊ देतो का, की मी ती वाईट गोष्ट करतो? का मी वाईट विचारांना लगेचच मनातून काढून टाकतो?’ यहोवाने आपल्याप्रती दाखवलेल्या अपार कृपेची जर आपण मनापासून कदर करत असलो, तर आपण यहोवाचं मन नेहमी आनंदित करण्याचा आटोकाट प्रयत्न करू.

तुम्ही पापी वृत्तींशी यशस्वी रीत्या लढा देऊ शकता

१३. जीवनात चांगलं ते करत राहणं आपल्याला शक्य आहे हे आपण कशावरून म्हणू शकतो?

१३ पहिल्या शतकात करिंथमधील काही लोक चोर, समलिंगी, व्यभिचारी, मूर्तिपूजक आणि मद्यपी होते. पण जेव्हा त्यांना यहोवाची ओळख झाली तेव्हा त्यांना जाणवलं की, ते ज्या प्रकारचं जीवन जगत आहेत ते यहोवाला मान्य नाही. त्यामुळे त्यांना स्वतःची लाज वाटू लागली. आणि यहोवावर प्रेम असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या जीवनात मोठमोठे बदल केले. (रोम. ६:२१; १ करिंथ. ६:९-११) रोममधील ख्रिश्चनांनाही स्वतःच्या जीवनात अशाच प्रकारचे बदल करण्याची गरज होती. पौलाने त्यांना सांगितलं: “तुम्ही आपले अवयव अनीतिची साधने होण्याकरता पापाला समर्पण करत राहू नका; तर मेलेल्यांतून जिवंत झालेले असे स्वतःस देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरता देवाला समर्पण करा.” (रोम. ६:१३) रोममधील ख्रिस्ती आवश्यक ते बदल करून चांगलं ते करत राहतील आणि देवाच्या अपार कृपेपासून लाभ मिळवत राहतील, याची पौलाला पूर्ण खात्री होती.

१४, १५. आपण स्वतःला कोणता प्रश्न विचारला पाहिजे?

१४ आज आपल्या मंडळ्यांमध्येही असे काही बंधुभगिनी आहेत ज्यांचं पूर्वीचं जीवन करिंथमधल्या बांधवांप्रमाणेच होतं. पण यहोवाची ओळख झाल्यानंतर त्यांनी स्वतःच्या जीवनात बरेच चांगले बदल केले आणि “देवाच्या आत्म्यात धुतलेले” असे ते झाले. यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी आपण सर्वांनीच जीवनात बरेच बदल केले आहेत. आणि आजही यहोवाच्या अपार कृपेसाठी आपण त्याचे किती कृतज्ञ आहोत, हे आपण दाखवून देत आहोत. आपल्या चुकीच्या आणि पापी वृत्तीशी लढा देण्याचा आणि यहोवाची सेवा करत राहण्याचा आपला निश्चय दृढ आहे.

१५ हे खरं आहे की करिंथमधील बंधुभगिनी पूर्वी ज्या प्रकारचं जीवन जगत होते, अशा गंभीर स्वरूपाच्या पापांपासून आपण दूर राहिलं पाहिजे. अशा प्रकारची गंभीर पापं आपण करत राहू आणि यहोवा आपल्यावर त्याची अपार कृपा दाखवत राहील, अशी अपेक्षा आपण नक्कीच करू शकत नाही. पण जे पाप गंभीर स्वरूपाचं नाही त्याबद्दल काय? त्या बाबतीतही यहोवाच्या आज्ञेनुसार जगण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करू का?—रोम. ६:१४, १७.

१६. पहिले करिंथकर ६:९-११ मध्ये उल्लेखण्यात न आलेल्या गोष्टींपासूनही आपण दूर राहिलं पाहिजे हे आपल्याला कशावरून समजतं?

१६ प्रेषित पौलाचा विचार करा. तो म्हणाला: “मी तर दैहिक, पापाला विकलेला असा आहे, कारण मी काय करतो ते माझे मलाच कळत नाही; म्हणजे जे मी इच्छितो ते करतो असे नाही, तर जे मला द्वेष्य वाटते तेच करतो.” (रोम. ७:१४, १५) पहिले करिंथकर ६:९-११ मध्ये उल्लेख करण्यात आलेल्या कृत्यांसारखी कृत्ये पौल करत नव्हता, हे खरं आहे. पण आपण अजूनही पाप करत आहोत हे पौलाने कबूल केलं. त्याला यहोवाचं मन आनंदित करायचं होतं. त्यामुळे, पापी इच्छांना स्वतःवर ताबा मिळवता येऊ नये म्हणून तो लढा देत राहिला. (रोमकर ७:२१-२३ वाचा.) पौलाने जे अप्रतिम उदाहरण आपल्यासमोर मांडलं त्याचं आपण अनुकरण करत राहू या, आणि यहोवाच्या आज्ञांचं पालन करण्याचा आपण नेहमी पुरेपूर प्रयत्न करत राहू या.

१७. आपण प्रामाणिक का असलं पाहिजे?

१७ एक उदाहरण घ्या. आपल्याला माहीत आहे की आपण नेहमी प्रामाणिक असलं पाहिजे. हा ख्रिस्ती जीवनाचा एक भागच आहे. (नीतिसूत्रे १४:५; इफिसकर ४:२५ वाचा.) आपण खोटं बोलत नाही. कारण लबाड व “लबाडीचा बाप” असलेल्या सैतानाप्रमाणे होण्याची आपल्याला मुळीच इच्छा नाही. आणि आपल्याला हेदेखील माहीत आहे की हनन्या व त्याची बायको सप्पीरा ही दोघंदेखील खोटं बोलल्यामुळे मरण पावली. (योहा. ८:४४; प्रे. कृत्ये ५:१-११) पण प्रामाणिकपणा म्हणजे फक्त खोटं न बोलणं इतकंच नाही, तर यात आणखीही काही सामावलेलं आहे. यहोवाच्या अपार कृपेबद्दल आपण खरंच मनापासून त्याचे कृतज्ञ असलो, तर आपण प्रत्येक बाबतीत प्रामाणिक राहू.

१८, १९. प्रामाणिकपणा म्हणजे काय?

१८ एखादी व्यक्ती खोटं न बोलताही अप्रामाणिक असू शकते. उदाहरणार्थ, यहोवाने इस्राएली लोकांना सांगितलं: “तुम्ही चोरी करू नये, एकमेकांशी कपटाने वागू नये व लबाडी करू नये.” इस्राएली लोकांना या गोष्टींचं पालन करण्याची गरज का होती? कारण यहोवाने म्हटलं होतं: “तुम्ही पवित्र असावे, कारण मी परमेश्वर तुमचा देव पवित्र आहे.” (लेवी. १९:२, ११) आपण कदाचित साफ खोटं बोलणार नाही. पण समजा आपण इतरांना अशा एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यास भाग पाडलं जी गोष्ट पूर्णपणे खरी नाही, तर काय? अशा वेळी आपण प्रामाणिक आहोत असं म्हणता येणार नाही.

आपण फक्त खोटं बोलण्याचंच नाही तर इतरांची फसवणूक करण्याचंही टाळण्याद्वारे पूर्णपणे प्रामाणिक राहतो का? (परिच्छेद १९ पाहा)

१९ हे समजण्यासाठी एक उदाहरण घ्या. एक मनुष्य कामाच्या ठिकाणी त्याच्या मालकाला किंवा त्याच्यासोबत काम करणाऱ्यांना सांगतो की, डॉक्टरची अपॉइन्टमेंट असल्यामुळे त्याला आज लवकर घरी जायचं आहे. पण प्रत्यक्षात मात्र ते खरं कारण नाही. खरंतर तो आज बाहेरगावी सुटीवर चालला आहे आणि यासाठीच त्याला घरी लवकर जायचं आहे. डॉक्टरला भेटणं हा फक्त एक बहाणा आहे. कदाचित त्याला डॉक्टरचे फक्त उरलेले पैसे देणं बाकी आहे किंवा एखाद्या मेडिकलच्या दुकानातून औषधं खरेदी करायची आहेत. तुम्हाला काय वाटतं, हा मनुष्य खरोखरच प्रामाणिक आहे का, की तो इतरांची फसवणूक करत आहे? या व्यक्तीने इतरांना एका अशा गोष्टीवर विश्वास ठेवण्यास भाग पाडलं जी गोष्ट खरी नाही. बऱ्याच वेळा लोक स्वार्थासाठी किंवा होणारी शिक्षा टाळण्यासाठी इतरांना फसवतात. पण खरे ख्रिस्ती यहोवाच्या आज्ञेचं पालन करतात. यहोवाने आपल्याला आज्ञा दिली आहे की आपण कोणालाही फसवू नये. आपला पवित्र देव यहोवा आपल्याला जे सांगतो ते योग्य आहे, आणि त्याची आज्ञा पाळण्याची आपली मनापासून इच्छा आहे.—रोम. ६:१९.

२०, २१. यहोवाच्या अपार कृपेची कदर असल्यामुळे आपण कोणत्या गोष्टी टाळू?

२० आपण व्यभिचार, दारूबाजी आणि इतर गंभीर स्वरूपाच्या पापांपासून लांब राहू. पण यासोबतच आपण अशाही गोष्टी टाळू ज्यांमुळे यहोवाला दुःख होईल. उदाहरणार्थ, आपण फक्त लैंगिक अनैतिकतेपासून दूर राहणार नाही, तर अनैतिकतेला बढावा देणाऱ्या मनोरंजनापासूनही दूर राहू. तसंच आपण कदाचित दारू पिऊन पडणार तर नाहीच, पण आपण अतिमद्यपान किंवा नशा चढेपर्यंतदेखील दारू पिणार नाही. कदाचित अशा प्रकारच्या मोहांचा सामना करणं आपल्यासाठी कठीण असेल, पण आपण यशस्वी रीत्या त्यांना नक्कीच लढा देऊ शकतो.

२१ पौलाने सांगितल्याप्रमाणे आपण “आपल्या शरीरवासनांच्या अधीन” न होता त्यांना आपल्या “मर्त्य शरीरात राज्य” करू देऊ नये. (रोम. ६:१२; ७:१८-२०) आपल्या हातून कधीच पाप घडणार नाही, असं आपण म्हणू शकत नाही. पण जेव्हा आपण प्रत्येक प्रकारच्या पापी वृत्तीशी लढा देतो, तेव्हा आपण हे दाखवून देत असतो की, यहोवाने आणि येशू ख्रिस्ताने दाखवलेल्या अपार कृपेची आपल्याला कदर आहे.

२२. यहोवाच्या अपार कृपेबद्दल कृतज्ञ मनोवृत्ती बाळगल्यामुळे आपण कोणत्या आशीर्वादाची अपेक्षा करू शकतो?

२२ यहोवाने आपल्या पापांची क्षमा केली आहे, आणि भविष्यातही तो आपल्याला क्षमा करत राहील. तो दाखवत असलेल्या अपार कृपेसाठी खरंच आपण त्याचे किती आभारी आहोत! यहोवाने आपल्याला ज्या गोष्टी टाळण्यासाठी सांगितल्या आहेत त्यांपासून आपण दूर राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत राहू; मग इतरजण त्या गोष्टींना पाप समजत नसले तरीही. यामुळे आपल्याला कोणता आशीर्वाद मिळेल? पौलाने म्हटलं: “आता तुम्हाला पापापासून मुक्त केल्यावर तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे ज्याचा परिणाम पवित्रीकरण असे फळ तुम्हाला मिळत आहे.” आणि “त्याचा शेवट . . . सार्वकालिक जीवन आहे.”—रोम. ६:२२.