व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला आठवतं का?

तुम्हाला आठवतं का?

टेहळणी बुरूज  नियतकालिकातले अलीकडचे अंक तुम्ही काळजीपूर्वक वाचले आहेत का? तर मग, पुढील प्रश्‍नांची उत्तरं द्यायला तुम्हाला जमतं का ते पाहा:

शास्त्रवचनांतून कसं कळतं की देवाला आपल्याबद्दल सहानुभूती आहे?

इस्राएली लोक जेव्हा इजिप्तच्या गुलामगिरीत होते, तेव्हा देवाला त्यांच्या दु:खांची आणि त्यांना होणाऱ्‍या त्रासाची जाणीव होती. तसंच तो त्यांचं दुःख समजूही शकत होता. (निर्ग. ३:७; यश. ६३:९) देवाने आपल्याला त्याच्या प्रतिरूपात बनवलं आहे, म्हणून आपणसुद्धा सहानुभूती दाखवू शकतो. आपल्याला वाटू शकतं की आपण देवाच्या प्रेमाच्या लायक नाही. पण तरीही देव आपल्याला सहानुभूती दाखवतो.​—टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१८.३, पृ. ८-९.

येशूच्या शिकवणींमुळे लोकांना पक्षपातावर मात करण्यासाठी कशी मदत होते?

येशूच्या काळात बरेच यहुदी भेदभाव करायचे. येशूने नम्रता विकसित करण्यावर आणि जातीबद्दल अभिमान न बाळगण्यावर जोर दिला. शिष्यांनी एकमेकांना बंधुभगिनी समजलं पाहिजे असं येशूने आर्जवलं.​—टेहळणी बुरूज१८.०६,  पृ. ९-१०.

यहोवाने मोशेला वचनयुक्‍त देशात ज्या कारणामुळे जाऊ दिलं नाही त्यावरून आपण काय शिकू शकतो?

मोशेचं यहोवाशी घनिष्ठ नातं होतं. (अनु. ३४:१०) अरण्यात ४० वर्षांच्या शेवटी लोकांनी दुसऱ्‍यांदा पाण्यासाठी तक्रार केली. देवाने मोशेला खडकाशी बोलायला सांगितलं. पण याउलट, मोशेने खडकावर काठी मारली. यहोवा मोशेवर कदाचित रागवला असेल कारण त्याने त्याच्या निर्देशनांच पालन केलं नव्हतं. किंवा जो चमत्कार घडला होता त्याचं श्रेय त्याने देवाला दिलं नव्हतं. (गण. २०:६-१२) यातून आपण शिकतो की यहोवाच्या आज्ञांचं पालन करणं आणि त्याच्या नावाचा गौरव करणं खूप महत्त्वाचं आहे.​—टेहळणी बुरूज१८.०७,  पृ. १३-१४.

आपण सहजपणे इतरांचं बाह्‍यस्वरूप पाहून न्याय करण्याची चूक कशी करू शकतो?

असे तीन क्षेत्र आहेत ज्यांमध्ये अनेक जण इतरांच्या बाह्‍यस्वरूपावरून त्यांचा न्याय करण्याची चूक करू शकतात. जसं की एका व्यक्‍तीचा देश किंवा समाज, तिच्याजवळ असलेली संपत्ती किंवा पैसा आणि तिचं वय. त्यामुळे आपण यहोवाच्या दृष्टिकोनातून लोकांना पाहण्याचा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. (प्रे. कार्ये १०:३४, ३५)​—टेहळणी बुरूज१८.०८,  पृ. ८-१२.

वयस्क ख्रिस्ती कोणत्या मार्गांनी इतरांना मदत करू शकतात?

नेमणूक बदलण्यात आली तरी यहोवा वयस्क ख्रिश्‍चनांना आजही मौल्यवान लेखतो आणि ते इतरांना मदत करण्यासाठी आजही बरंच काही करू शकतात. ते प्रचारकांच्या सत्यात नसलेल्या जोडीदारांना मदत करू शकतात, निष्क्रिय झालेल्यांना मदत करू शकतात, बायबल अभ्यास चालवू शकतात आणि आपली सेवा वाढवू शकतात.​—टेहळणी बुरूज१८.०९,  पृ. ८-११.

ख्रिश्‍चनांकडे शिकवण्याची कोणकोणती साधनं आहेत?

आपल्याकडे संपर्क कार्ड आणि आमंत्रणपत्रिका आहेत. तसंच वापरायला सोप्या असणाऱ्‍या आठ पत्रिका आहेत. त्याचबरोबर, टेहळणी बुरूज  आणि सावध राहा!  ही नियतकालिकंदेखील आहेत. शिकवण्याच्या साधनांमध्ये काही माहितीपत्रकं, बायबल अभ्यासासाठी असलेली दोन पुस्तकं आणि चार उपयुक्‍त व्हिडिओही आहेत. यांमध्ये बायबल अभ्यास का करावा?  हा व्हिडिओदेखील सामील आहे.​—टेहळणी बुरूज१८.१०,  पृ. १६.

नीतिसूत्रे २३:२३ यात सांगितल्याप्रमाणे ख्रिश्‍चन कशा प्रकारे सत्य विकत घेऊ शकतात?

आपण सत्य विकत घेण्यासाठी पैसे देत नाही. पण आपल्याला सत्य मिळवण्यासाठी वेळ देण्याची आणि मेहनत घेण्याची गरज आहे.​—टेहळणी बुरूज१८.११,  पृ. ४.

होशेय गोमरसोबत ज्या प्रकारे वागला त्यावरून आपण काय शिकू शकतो?

गोमरने वारंवार व्यभिचार केला. पण होशेयने तिला क्षमा केली आणि तिच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. जोडीदारापैकी एकाने जरी अनैतिक लैंगिक कृत्य  केलं तरी निर्दोष जोडीदार तिला क्षमा करू शकतो. जर निर्दोष सोबत्याने दोषी जोडीदारासोबत पुन्हा लैंगिक संबंध ठेवले तर घटस्फोट घेण्याचा शास्त्रीय आधार उरणार नाही.​—टेहळणी बुरूज१८.१२,  पृ. १३.