व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला आठवतं का?

तुम्हाला आठवतं का?

या वर्षाचे टेहळणी बुरूज  अंक तुम्ही लक्ष देऊन वाचले आहेत का? तर मग, पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं तुम्हाला देता येतात का ते पाहा:

आपण जर यहोवाशी बोलण्यासाठी, त्याचं ऐकण्यासाठी आणि त्याच्याबद्दल विचार करण्यासाठी वेळ काढला, तर आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?

आपल्याला चांगला शिक्षक बनता येईल, चांगले निर्णय घेता येतील, आपला विश्‍वास आणखी मजबूत होईल आणि यहोवावरचं आपलं प्रेम वाढेल.​—टेहळणी बुरूज२२.०१, पान ३०-३१.

यहोवावर आणि त्याच्या संघटनेत त्याने ज्यांना अधिकार दिला आहे त्यांच्यावर भरवसा ठेवल्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?

यहोवाच्या काम करायच्या पद्धतीवर आपण आत्ताच भरवसा ठेवायला शिकलं पाहिजे. त्यासाठी वडील जे निर्णय घेतात किंवा जे मार्गदर्शन देतात, ते खरंच यहोवाकडून आहे का, की ते स्वतःच्या मनाप्रमाणे वागत आहेत, अशी शंका आपण घेऊ नये. मोठ्या संकटाच्या वेळी आपल्याला कदाचित अशा सूचना मिळतील ज्या अगदीच विचित्र आणि तर्काला न पटणाऱ्‍या वाटतील. पण संघटनेकडून मिळणारं मार्गदर्शन स्वीकारून त्यावर लगेच काम करायची तयारी आपण दाखवली पाहिजे.​—टेहळणी बुरूज२२.०२, पान ४-६.

स्वर्गदूताने म्हटलं, की यहुद्यांचा राज्यपाल असलेल्या “जरूब्बाबेलच्या हातात ओळंबा पाहून त्यांना खूप आनंद होईल.” त्याच्या या शब्दांचा काय अर्थ होता? (जख. ४:८-१०)

या दृष्टान्तातून देवाच्या लोकांना याची खातरी पटली, की जुन्या मंदिराच्या तुलनेत हे नवीन मंदिर जरी सर्वसाधारण वाटत असलं तरी त्याचं बांधकाम नक्की पूर्ण होईल, आणि ते यहोवाच्या स्तरांप्रमाणे असेल.​—टेहळणी बुरूज२२.०३, पान १६-१७.

‘बोलण्याच्या बाबतीत’ आपण एक चांगलं उदाहरण कसं ठेवू शकतो? (१ तीम. ४:१२)

प्रचारकार्यात जेव्हा आपण लोकांशी प्रेमळपणे आणि आदराने बोलतो, सभेत मनापासून आणि उत्साहाने गीत गातो, उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो, तसंच इतरांना प्रोत्साहन मिळेल असं बोलतो आणि असभ्य व वाईट बोलायचं टाळतो तेव्हा आपण बोलण्याच्या बाबतीत एक चांगलं उदाहरण मांडत असतो.​—टेहळणी बुरूज२२.०४, पान ६-९.

दानीएलच्या ७ व्या अध्यायात सांगितलेल्या प्राण्यांची (राज्यांची) सगळी वैशिष्ट्यं प्रकटीकरण १३:१, २ मध्ये सांगितलेल्या जंगली पशूमध्ये का पाहायला मिळतात?

कारण, प्रकटीकरणाच्या १३ व्या अध्यायातला जंगली पशू कोणत्याही एका सरकारला किंवा जागतिक साम्राज्याला, जसं की रोमच्या साम्राज्याला सूचित करत नाही, तर हा जंगली पशू आजपर्यंतच्या इतिहासात मानवजातीवर अधिकार गाजवलेल्या सगळ्या राजकीय सत्तांना सूचित करतो.​—टेहळणी बुरूज२२.०५, पान ९.

यहोवा नेहमी योग्य न्याय करतो असा भरवसा असल्याचं आपण कोणत्या एका मुख्य मार्गाने दाखवू शकतो?

जर कोणी आपला अपमान केलेला असेल, आपलं मन खूप दुखावलं असेल किंवा आपल्याविरूद्ध पाप केलं असेल तर त्या व्यक्‍तीबद्दल आपल्या मनात असलेला राग आपण काढून टाकायचा प्रयत्न केला पाहिजे आणि सगळं काही यहोवावर सोपवून दिलं पाहिजे. कारण यहोवा पापामुळे झालेलं सगळं नुकसान भरून काढू शकतो.​—टेहळणी बुरूज२२.०६, पान १०-११.

सभेत प्रार्थना करणाऱ्‍या भावाने कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

प्रार्थना मंडळीतल्या भाऊबहिणींना सल्ला देण्यासाठी किंवा एखादी घोषणा करण्यासाठी नसते. त्यामुळे प्रार्थना करणाऱ्‍या भावाने खासकरून सुरवातीच्या प्रार्थनेला जास्त बोलू नये.​ (मत्त. ६:७)​—टेहळणी बुरूज२२.०७, पान २४-२५.

‘वाईट कामं करणाऱ्‍यांचं’ पुनरुत्थान कोणत्या अर्थाने “न्यायाचं पुनरुत्थान” असेल? (योहा. ५:२९)

वाईट कामं करणाऱ्‍यांनी त्यांचा मृत्यू होण्याआधी आपल्या आयुष्यात जे काही केलं आहे त्याच्या आधारावर त्यांचा न्याय केला जाणार नाही. तर पुनरुत्थान झाल्यावर त्यांची मनोवृत्ती कशी आहे आणि ते कसं वागत आहेत हे पारखलं जाईल आणि त्या आधारावर त्यांचा न्याय केला जाईल.​—टेहळणी बुरूज२२.०९, पान १८.

सप्टेंबर १९२२ साली झालेल्या अधिवेशनात जे. एफ. रदरफर्ड यांनी लोकांना कोणती गोष्ट करण्याचं उत्तेजन दिलं?

अमेरिकेतल्या सिडर पॉईंट ओहायो इथे झालेल्या अधिवेशनात त्यांनी अशी घोषणा केली: “राजा राज्य करत आहे! तुम्ही लोकांसमोर त्याचे प्रतिनिधी आहात. म्हणून राजा व त्याच्या राज्याची घोषणा करा, घोषणा करा, घोषणा करा! (ॲडव्हरटाईज, ॲडव्हरटाईज, ॲडव्हरटाईज!)”​—टेहळणी बुरूज२२.१०, पान ३-५.

यशया अध्याय ३० मध्ये सांगितल्याप्रमाणे यहोवा कोणत्या तीन मार्गांनी आपल्याला त्याची सेवा करत राहायला मदत करतो?

या अध्यायात सांगितलं आहे, की (१) यहोवा आपल्या प्रार्थना ऐकतो आणि त्यांचं उत्तर देतो, (२) आपलं मार्गदर्शन करतो आणि (३) आपल्याला आज आशीर्वाद देतो आणि भविष्यातही देईल.​—टेहळणी बुरूज२२.११, पान ९.

स्तोत्र ३७:१०, ११, २९ मधल्या शब्दांची शलमोनच्या काळात पूर्णता झाली आणि भविष्यातही पूर्णता होईल असं आपण का म्हणू शकतो?

इस्राएली लोकांवर यहोवाचा आशीर्वाद होता तेव्हा किती चांगली परिस्थिती होती हे दावीदच्या शब्दांतून स्पष्ट होतं. जसं की शलमोन राजाच्या काळात इस्राएलमध्ये खूप शांती आणि भरभराट होती. शिवाय येशूनेसुद्धा ११ व्या वचनाचा संदर्भ घेऊन लोकांना भविष्यात येणाऱ्‍या नवीन जगाबद्दल सांगितलं. (मत्त. ५:५; लूक २३:४३)​—टेहळणी बुरूज२२.१२, पान ८-१०, १४.