व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अनुभव

अनुभव

सगळ्यांशी दयेने वागा

एक दिवशी न्यूझीलंडमधल्या एका बहिणीने jw.org वर एक व्हिडिओ पाहिला. त्यात सांगितलं होतं की यहोवाला इतरांबद्दल फक्‍त दया वाटत नाही, तर तो दयेने वागतोसुद्धा. (यश. ६३:७-९) मग इतरांना व्यावहारिक मदत पुरवून तिने ही गोष्ट लागू करायचं ठरवलं. त्या दिवशी दुकानात सामान घेताना तिला एक खूप गरीब बाई दिसली. मग तिने तिला सांगितलं की ‘मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते.’ आणि तीही तयार झाली. आपली बहीण जेवण घेऊन परत आली, आणि तिने दुःख कधी संपेल का?  ही पत्रिका वापरून त्या बाईला साक्ष दिली.

हे ऐकून ती गरीब स्त्री रडू लागली. आणि तिने सांगितलं की ती साक्षीदार कुटुंबातच वाढली होती, पण बऱ्‍याच वर्षांआधी तिने सत्य सोडून दिलं होतं. अलीकडेच, यहोवाने तिला परत सत्यात यायला मदत करावी अशी प्रार्थना ती करत होती. मग आपल्या त्या बहिणीने तिला बायबल दिलं आणि तिच्यासाठी बायबल अभ्यासाची व्यवस्था केली. a

आपणसुद्धा यहोवाचं अनुकरण करून इतरांना दया दाखवू शकतो. जसं की, आपले नातेवाईक आणि मंडळीतले भाऊबहीण. तसंच, इतरांना साक्ष देण्याच्या संधी शोधूनसुद्धा आपण दया दाखवू शकतो.

a अक्रियाशील भाऊबहिणींना कशी मदत करता येईल हे जाणून घ्यायला जून २०२० च्या टेहळणी बुरूज  अंकातला “माझ्याकडे परत या” हा लेख पाहा.