व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४९

गीत १४७ सर्वकाळाच्या जीवनाचं वचन

तुम्ही सर्वकाळ जगू शकता—ते कसं?

तुम्ही सर्वकाळ जगू शकता—ते कसं?

“जो मुलाला ओळखून त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याला सर्वकाळाचं जीवन [मिळेल].”योहा. ६:४०.

या लेखात:

येशूच्या खंडणी बलिदानामुळे अभिषिक्‍तांना आणि दुसऱ्‍या मेंढरांना काय फायदा होतो ते पाहा.

१. आपण सर्वकाळाचं जीवन जगू शकत नाही असं बऱ्‍याच जणांना का वाटतं?

 आज बरेच लोक सुदृढ राहायला आपल्या खाण्या-पिण्याकडे लक्ष देतात आणि नियमितपणे व्यायाम करतात. पण हे सगळं करूनसुद्धा त्यांना माहीत असतं, की ते म्हातारपण आणि मरण टाळू शकत नाहीत. तसंच, म्हातारपणात ज्या समस्या येतात त्यांचा विचार करून त्यांना कायमचं जीवन नकोसं वाटतं आणि असं वाटतं की ते त्यांना मिळूच शकत नाही. असं असलं तरी, येशूने योहान ३:१६ आणि ५:२४ या वचनांमध्ये सांगितलं, की आपण “सर्वकाळाचं जीवन” जगू शकतो.

२. योहानच्या सहाव्या अध्यायात सर्वकाळाच्या जीवनाबद्दल काय म्हटलंय? (योहान ६:३९, ४०)

मागच्या लेखात आपण पाहिलं होतं, की येशूने चमत्कार करून हजारो लोकांना खायला भाकरी आणि मासे दिले होते. a ही खरोखरंच एक आश्‍चर्य करण्यासारखी घटना होती. पण याच्या दुसऱ्‍या दिवशी येशू जे बोलला ते त्यापेक्षा जास्त आश्‍चर्यकारक होतं. लोक त्याच्या मागेमागे गालीलच्या किनाऱ्‍याजवळ असलेल्या कफर्णहूमला गेले. आणि तिथे त्याने त्यांना सांगितलं की मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत केलं जाईल आणि त्यांना सर्वकाळाचं जीवन मिळेल. (योहान ६:३९, ४० वाचा.) येशूच्या या शब्दांचा विचार केल्यावर कदाचित आपल्याला मरण पावलेल्या आपल्या जवळच्या लोकांची आणि मित्रांची आठवण होईल. येशूच्या शब्दांमुळे आपल्याला कळतं, की मेलेल्या असंख्य लोकांना पुन्हा जिवंत केलं जाईल. तसंच, आपल्याला आपल्या प्रियजनांसोबत आनंदाने सर्वकाळाचं जीवन जगता येईल. पण येशूने, योहानच्या सहाव्या अध्यायात यानंतर जे म्हटलं ते समजणं बऱ्‍याच जणांना कठीण गेलं आणि आजही जातं. चला, येशू याबद्दल काय म्हणाला त्यावर आणखी चर्चा करू या.

३. योहान ६:५१ प्रमाणे येशूने स्वतःबद्दल काय म्हटलं?

येशूने चमत्कार करून लोकांना जेवण दिल्यानंतर त्यांना इस्राएली लोकांची आठवण झाली असेल. यहोवाने इस्राएली लोकांना ओसाड रानात चमत्कार करून मान्‍ना पुरवला होता. खरंतर, शास्त्रवचनांत मान्‍नाला “आकाशातली भाकर” किंवा “स्वर्गातली भाकर” असं म्हटलंय. (स्तो. १०५:४०; योहा. ६:३१) येशूने याच मान्‍नाचं उदाहरण देऊन यहुद्यांना एक महत्त्वाची गोष्ट शिकवली. देवाने चमत्कार करून जरी इस्राएली लोकांना मान्‍ना पुरवला असला, तरी काही काळाने त्यांचा मृत्यू झाला. (योहा. ६:४९) याउलट, येशूने स्वतःला “स्वर्गातली खरी भाकर,” “देवाची भाकर” आणि “जीवनाची भाकर” असं म्हटलं. (योहा. ६:३२, ३३, ३५) येशूने त्याच्यामध्ये आणि मान्‍नामध्ये काय फरक आहे हे सांगितलं. त्याने म्हटलं: “स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. ही भाकर खाणारा प्रत्येक जण सर्वकाळ जगेल.” (योहान ६:५१ वाचा.) हे ऐकून यहुदी गोंधळून गेले. येशू स्वतःला स्वर्गातून उतरलेली “भाकर” का म्हणतोय आणि ती भाकर देवाने त्यांच्या पूर्वजांना पुरवलेल्या मान्‍नापेक्षा श्रेष्ठ कशी आहे, हे त्यांना समजत नव्हतं. येशूने पुढे त्यांना म्हटलं: “मी देत असलेली भाकर म्हणजे माझं शरीर आहे.” मग याचा काय अर्थ होता? आपण याचा अर्थ समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण त्यामुळेच आपल्याला कळेल की आपल्याला आपल्या प्रियजनांसोबत सर्वकाळाचं जीवन कसं जगता येईल. चला तर मग पाहू या, की येशूला नेमकं काय म्हणायचं होतं.

जिवंत भाकर आणि येशूचं शरीर

४. येशूने जे म्हटलं त्यामुळे काही जणांना धक्का का बसला?

येशूने जेव्हा म्हटलं की ‘मी माझं शरीर जगाला जीवन मिळावं म्हणून देतोय,’ तेव्हा ऐकणाऱ्‍यांना धक्का बसला. त्यांना कदाचित असं वाटलं असेल, की येशू त्यांना त्याचं खरोखरचं मांस खायला सांगतोय. (योहा. ६:५२) पुढे येशूने जे म्हटलं ते ऐकून त्यांना आणखीनच धक्का बसला असेल. त्याने म्हटलं: “जोपर्यंत तुम्ही मनुष्याच्या मुलाचं मांस खात नाही आणि त्याचं रक्‍त पीत नाही तोपर्यंत तुम्हाला जीवन मिळणार नाही.”—योहा. ६:५३.

५. येशू लोकांना आपलं खरोखरचं रक्‍त प्यायला सांगत नव्हता असं आपण खातरीने का म्हणू शकतो?

नोहाच्या काळात, देवाने मानवांना अशी आज्ञा दिली होती की त्यांनी रक्‍त खाऊ नये. (उत्प. ९:३, ४) इस्राएली लोकांना जेव्हा त्याने नियमशास्त्र दिलं तेव्हा त्याने हीच आज्ञा त्यांना परत सांगितली. नियमशास्त्रात सांगण्यात आलं होतं की जो कोणी रक्‍त खाईल त्याला “ठार मारलं जावं.” (लेवी. ७:२७) नियमशास्त्रात सांगितलेल्या सगळ्या आज्ञा यहुद्यांनी पाळल्या पाहिजेत असं येशूने शिकवलं. (मत्त. ५:१७-१९) त्यामुळे येशू लोकांना त्याचं खरोखरचं मांस खायला आणि रक्‍त प्यायला सांगेल ही गोष्ट तर्काला पटत नाही. पण असं बोलून येशू खरंतर त्यांना हे शिकवायचा प्रयत्न करत होता की ते “सर्वकाळाचं जीवन” कसं मिळवू शकतात.—योहा. ६:५४.

६. येशू त्याचं मांस खाण्याबद्दल आणि रक्‍त पिण्याबद्दल जे बोलला ते लाक्षणिक रूपाने बोलला असं आपण का म्हणू शकतो?

मग येशूचा मुद्दा काय होता? ही गोष्ट स्पष्ट आहे की येशू इथे लाक्षणिक अर्थाने बोलत होता. तो याआधी त्याला विहिरीजवळ भेटलेल्या शोमरोनी स्त्रीसोबत याच प्रकारे बोलला होता. त्याने म्हटलं: “मी दिलेलं पाणी जो पिईल त्याला पुन्हा कधीही तहान लागणार नाही. तर, ते पाणी त्याच्यामध्ये, सर्वकाळाचं जीवन देणाऱ्‍या एखाद्या खळखळत्या झऱ्‍यासारखं होईल.” (योहा. ४:७, १४) b येशू त्या शोमरोनी स्त्रीला असं सांगत नव्हता की एखाद्या विहिरीचं पाणी प्यायल्यामुळे तिला सर्वकाळाचं जीवन मिळेल. त्याच प्रकारे, कफर्णहूम इथे जमलेल्या लोकांनासुद्धा तो सर्वकाळाचं जीवन मिळण्यासाठी त्याचं खरोखरचं मांस खायला आणि रक्‍त प्यायला सांगत नव्हता.

दोन घटनांमधले फरक

७. येशू योहान ६:५३ मध्ये जे बोलला त्याबद्दल काही लोक काय दावा करतात?

काही जण असा दावा करतात, की योहान ६:५३ मध्ये प्रभूच्या सांजभोजनाच्या वेळी काय करायचं हे येशू सांगत होता. कारण सांजभोजनाच्या वेळीसुद्धा त्याने अशाच प्रकारचे शब्द वापरले. (मत्त. २६:२६-२८) ते असा दावा करतात, की प्रभूच्या सांजभोजनाला हजर असलेल्या सगळ्यांनी, तिथे फिरवली जाणारी भाकर खाल्ली पाहिजे आणि द्राक्षारस प्यायला पाहिजे. पण ही गोष्ट बरोबर आहे का? यात खरं काय आणि खोटं काय हे आपण तपासून पाहिलं पाहिजे. कारण दरवर्षी प्रभूच्या सांजभोजनासाठी लाखो लोक आपल्यासोबत हजर राहतात. तर आता योहान ६:५३ मध्ये येशू जे बोलला आणि प्रभूच्या सांजभोजनाच्या वेळी तो जे बोलला त्यात कोणते फरक आहेत हे आपण पाहू या.

८. योहान ६:५३-५६ मध्ये सांगितलेल्या घटनेत आणि प्रभूच्या सांजभोजनाच्या घटनेत कोणते फरक आहेत? (चित्रंसुद्धा पाहा.)

तर चला, या दोन घटनांमध्ये कोणते दोन फरक आहेत ते पाहू या. पहिला, योहान ६:५३-५६ मधले शब्द येशू केव्हा आणि कुठे बोलला? येशू हे शब्द इ.स. ३२ मध्ये गालीलच्या समुद्राजवळ बोलला. याच्या एका वर्षानंतर, त्याने यरुशलेममध्ये प्रभूच्या सांजभोजनाची सुरुवात केली. दुसरा, तो हे शब्द कोणाला उद्देशून बोलला? योहान ६:५३-५६ मधले शब्द तो गालीलमध्ये त्याच्यापुढे जमलेल्या यहुद्यांना बोलला. या लोकांना त्यांच्या आध्यात्मिक गरजांपेक्षा त्यांच्या शारीरिक गरजा भागवण्याची जास्त काळजी होती. (योहा. ६:२६) आणि येशूने जेव्हा त्यांना अशी गोष्ट सांगितली, जी त्यांना समजायला कठीण गेली, तेव्हा त्यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवायचं सोडून दिलं. इतकंच काय तर येशूचे काही शिष्यसुद्धा त्याला सोडून गेले. (योहा. ६:१४, ३६, ४२, ६०, ६४, ६६) आता, या घटनेची तुलना आपण येशूने एका वर्षानंतर म्हणजे, इ.स. ३३ मध्ये सुरू केलेल्या सांजभोजनाशी करू या. येशूच्या ११ प्रेषितांना त्याने शिकवलेल्या सगळ्याच गोष्टी समजल्या नाहीत. पण तरीही सांजभोजनाच्या वेळी ते त्याच्यासोबत हजर होते. गालीलमध्ये जमलेल्या लोकांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला नव्हता. पण या विश्‍वासू प्रेषितांना ही पक्की खातरी होती, की येशू देवाचा मुलगा आहे आणि तो स्वर्गातून आलाय. (मत्त. १६:१६) म्हणूनच येशूने त्यांची प्रशंसा केली. तो म्हणाला: “माझ्या परीक्षांमध्येही माझ्यासोबत राहिलेले तुम्हीच आहात.” (लूक २२:२८) या दोन फरकांवरूनच ही गोष्ट स्पष्ट आहे, की येशू योहान ६:५३ मध्ये सांजभोजनाच्या वेळी काय करायचं याबद्दल बोलत नव्हता. आणि यासाठी आणखीही पुरावे आहेत.

येशू गालीलमध्ये यहुद्यांशी जे बोलला त्याबद्दल योहानच्या सहाव्या अध्यायात सांगितलंय (डावीकडे). या घटनेच्या एका वर्षानंतर, येशू यरुशलेममध्ये त्याच्या विश्‍वासू प्रेषितांच्या एका छोट्या गटाशी बोलला (उजवीकडे) (परिच्छेद ८ पाहा)


येशूच्या शब्दांचा आपल्यासाठी काय अर्थ होतो?

९. येशूचे सांजभोजनाच्या वेळचे शब्द कोणाला लागू होतात?

प्रभूच्या सांजभोजनाच्या वेळी येशूने आपल्या प्रेषितांना बेखमीर भाकर दिली आणि त्यांना सांगितलं, की ती त्याच्या शरीराला सूचित करते. मग त्याने त्यांना द्राक्षारस देऊन म्हटलं, की तो “कराराच्या रक्‍ताला” सूचित करतो. (मार्क १४:२२-२५; लूक २२:२०; १ करिंथ. ११:२४) येशू कराराबद्दल जे बोलला ते खूप महत्त्वाचं आहे. त्याने या कराराला ‘नवीन करार’ म्हटलं. आणि या करारात सगळे लोक नाही तर जे “देवाच्या राज्यात” येशूसोबत राज्य करणार आहेत, फक्‍त तेच सामील आहेत. (इब्री ८:६, १०; ९:१५) त्या वेळी येशूच्या प्रेषितांना ही गोष्ट समजली नाही. पण लवकरच पवित्र शक्‍तीने त्यांचा अभिषेक होणार होता. आणि येशूसोबत स्वर्गातून राज्य करण्यासाठी त्यांना नवीन करारात सामील करण्यात येणार होतं.—योहा. १४:२, ३.

१०. येशू गालीलमध्ये लोकांशी जे बोलला आणि प्रभूच्या सांजभोजनाच्या वेळी जे बोलला त्यातला आणखी एक फरक कोणता आहे? (चित्रसुद्धा पाहा.)

१० लक्ष द्या, प्रभूच्या सांजभोजनाच्या वेळी येशू जे शब्द बोलला, ते ‘लहान कळपाला’ उद्देशून होते. हा गट त्या वेळी तिथे हजर असलेल्या विश्‍वासू प्रेषितांपासून सुरू झाला. (लूक १२:३२) येशूने फक्‍त त्यांनाच भाकर खायला सांगितली आणि द्राक्षारस प्यायला सांगितला. यानंतर जे या गटाचा भाग बनणार होते, त्यांनासुद्धा प्रभूच्या सांजभोजनाच्या वेळी भाकर खायची होती आणि द्राक्षारस प्यायचा होता. कारण या गटाचा भाग असलेलेच येशूसोबत स्वर्गात राज्य करणार आहेत. तर येशू गालीलमध्ये लोकांशी जे बोलला आणि प्रभूच्या सांजभोजनाच्या वेळी त्याच्या प्रेषितांशी जे बोलला, त्यातला हा आणखी एक फरक आहे. येशू सांजभोजनाच्या वेळी जे बोलला ते एका लहान गटाला उद्देशून बोलला. याउलट गालीलमध्ये तो जे बोलला, ते असंख्य लोकांना लागू होतं.

सांजभोजनाच्या वेळी भाकर खाणारे आणि द्राक्षारस पिणारे मोजकेच आहेत. पण आपल्यापैकी प्रत्येक जण येशूवर विश्‍वास ठेवून सर्वकाळाचं जीवन जगू शकतो (परिच्छेद १० पाहा)


११. येशू गालीलमध्ये जे बोलला ते एका छोट्या गटाला उद्देशून नव्हतं असं आपण कशावरून म्हणू शकतो?

११ येशू जेव्हा गालीलमध्ये लोकांशी बोलला, तेव्हा बहुतेकांना त्याच्याकडून फक्‍त अन्‍न हवं होतं. पण त्याने त्यांचं लक्ष खरोखरच्या अन्‍नापेक्षा आणखी जास्त महत्त्वाच्या एका गोष्टीकडे वळवलं. एक अशी गोष्ट जिच्यामुळे त्यांना सर्वकाळाचं जीवन मिळणार होतं. येशूने त्यांना सांगितलं की शेवटच्या दिवशी मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत केलं जाईल आणि ते सर्वकाळ जगतील. या वेळी तो प्रभूच्या सांजभोजनाच्या वेळेप्रमाणे एका लहान गटाबद्दल बोलत नव्हता. याउलट, त्याने सांगितलं की हा आशीर्वाद सगळ्या लोकांसाठी आहे. इतकंच काय तर, तो म्हणाला: “ही भाकर खाणारा प्रत्येक जण सर्वकाळ जगेल. . . . मी देत असलेली भाकर म्हणजे माझं शरीर आहे. जगाला जीवन मिळावं म्हणून मी ते देईन.”—योहा. ६:५१.

१२. येशूने सांगितल्याप्रमाणे सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी काय करण्याची गरज आहे?

१२ येशूचं म्हणणं असं होतं का, की या पृथ्वीवर होऊन गेलेल्या प्रत्येक व्यक्‍तीला सर्वकाळाचं जीवन मिळेल? नाही. त्याने म्हटलं की ‘ही भाकर खाणाऱ्‍या प्रत्येकाला’ म्हणजे जो त्याच्यावर विश्‍वास ठेवेल त्याला सर्वकाळाचं जीवन मिळेल. आज जगात स्वतःला ख्रिस्ती म्हणवणाऱ्‍या बऱ्‍याच जणांना असं वाटतं की त्यांनी जर फक्‍त ‘येशूवर विश्‍वास ठेवला’ आणि त्याला आपला तारणारा मानलं तर त्यांचं तारण होईल. (योहा. ६:२९) पण तारण मिळवण्यासाठी यापेक्षा जास्त काहीतरी करण्याची गरज आहे. कारण गालीलमध्येसुद्धा बऱ्‍याच जणांनी सुरुवातीला येशूवर विश्‍वास ठेवला. पण नंतर ते त्याला सोडून निघून गेले. त्यांनी असं का केलं?

१३. येशूचे खरे शिष्य बनण्यासाठी काय करायची गरज आहे?

१३ गालीलमध्ये बहुतेक लोक येशूच्या मागे यासाठी आले होते, कारण तो त्यांना हव्या असलेल्या गोष्टी देत होता. त्यांना फक्‍त चमत्काराने बरं व्हायचं होतं, मोफतचं अन्‍न खायचं होतं आणि त्यांना हव्या असलेल्या गोष्टी ऐकायच्या होत्या. पण येशूने हे दाखवून दिलं की त्याच्या खऱ्‍या शिष्यांनी यापेक्षा जास्त करायची गरज आहे. तो या पृथ्वीवर फक्‍त लोकांच्या शारीरिक गरजा पूर्ण करायला आला नव्हता. येशूच्या खऱ्‍या शिष्यांना तुम्ही ‘माझ्याकडे या’ हे त्याचं आमंत्रण स्वीकारायची गरज होती. म्हणजे, त्याने शिकवलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना स्वीकारायच्या होत्या आणि त्या पाळायच्या होत्या.—योहा. ५:४०; ६:४४.

१४. येशूच्या खंडणी बलिदानापासून फायदा मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

१४ येशूने गालीलमध्ये जमलेल्या लोकांना शिकवलं की आपल्या शरीराचं बलिदान देऊन आणि आपलं रक्‍त सांडवून तो त्यांच्यासाठी सर्वकाळाचं जीवन जगणं शक्य करणार होता. त्यांना या गोष्टीवर विश्‍वास ठेवायचा होता. आणि आजच्या काळातही लोकांना या गोष्टीवर विश्‍वास ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. (योहा. ६:४०) योहान ६:५३ मध्ये येशूला असं सांगायचं होतं की आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवणं गरजेचं आहे. आणि हा आशीर्वाद मिळवण्याची संधी असंख्य लोकांकडे आहे.—इफिस. १:७.

१५-१६. योहानच्या सहाव्या अध्यायातून आपल्याला कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात?

१५ योहानच्या सहाव्या अध्यायात जे सांगितलंय ते आपल्यासाठी आणि आपल्या जवळच्या लोकांसाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यातून हे कळतं की येशूला लोकांची किती काळजी आहे. गालीलमध्ये असताना त्याने लोकांचे आजार बरे केले, त्यांना देवाच्या राज्याबद्दल शिकवलं आणि गरजेच्या वेळी त्यांना खायला-प्यायला दिलं. (लूक ९:११; योहा. ६:२, ११, १२) पण याहून महत्त्वाचं म्हणजे, त्याने त्यांना हे शिकवलं की “जीवनाची भाकर” तोच आहे.—योहा. ६:३५, ४८.

१६ येशूने ज्यांना ‘दुसरी मेंढरं’ म्हटलं, ते प्रभूच्या सांजभोजनाच्या वेळी भाकर खात नाहीत आणि द्राक्षारस पीत नाहीत. त्यांनी तसं करूही नये. (योहा. १०:१६) असं असलं तरी येशूच्या खंडणी बलिदानापासून त्यांनाही फायदा होतो. पण हा फायदा मिळवण्यासाठी खंडणी बलिदानामुळेच सर्वकाळाचं जीवन मिळू शकतं या गोष्टीवर त्यांनी विश्‍वास ठेवणं महत्त्वाचं आहे. (योहा. ६:५३) याउलट त्या वेळी जे भाकर खातात आणि द्राक्षारस पितात ते हे दाखवून देतात की देवाच्या राज्याचे वारस म्हणून त्यांना नवीन करारात सामील करण्यात आलंय. तर मग आपण अभिषिक्‍त जनांपैकी असू किंवा दुसऱ्‍या मेंढरांपैकी, आपल्या सगळ्यांसाठी योहानचा सहावा अध्याय खूप महत्त्वाचा आहे. कारण त्यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी खंडणी बलिदानावर आपला मजबूत विश्‍वास असला पाहिजे.

गीत १५० आपल्या तारणासाठी यहोवाला शोधा!

a योहान ६:५-३५ या वचनांवर आधीच्या लेखात चर्चा करण्यात आली आहे.

b येशू ज्या पाण्याबद्दल बोलला ते सर्वकाळच्या जीवनासाठी यहोवाने केलेल्या तरतुदींना सूचित करतं.