व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपण यहोवाला कोणती भेट देऊ शकतो?

आपण यहोवाला कोणती भेट देऊ शकतो?

येशूने एकदा म्हटलं: “घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.” (प्रे. कार्ये २०:३५) ही गोष्ट आपल्या आणि यहोवाच्या नात्यालाही लागू होते. असं का म्हणता येईल? कारण यहोवाने आपल्याला बऱ्‍याच भेटवस्तू दिल्या आहेत आणि यामुळे आपल्याला आनंद होतो. पण यहोवाला भेट दिल्यामुळे  आपल्याला जास्त  आनंद होईल. आपण यहोवाला कोणती भेट देऊ शकतो? नीतिसूत्रे ३:९ मध्ये म्हटलं आहे: “तू आपल्या द्रव्याने [मौल्यवान गोष्टींनी, NW] . . . परमेश्‍वराचा सन्मान कर.” आपल्याकडे असलेल्या मौल्यवान गोष्टींमध्ये आपला वेळ, आपली कौशल्यं, शक्‍ती आणि साधनं सामील आहेत. आपण या सर्व गोष्टींचा उपयोग खऱ्‍या उपासनेला वाढवण्यासाठी करतो, तेव्हा आपण यहोवाला भेट देत असतो आणि यामुळे आपल्याला आनंद होतो.

भौतिक गोष्टींमधून यहोवाला भेटवस्तू देण्याच्या बाबतीत दुर्लक्ष होऊ नये म्हणून कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? प्रेषित पौलने करिंथकरांना सांगितलं, की त्यांनी दान म्हणून काही रक्कम “बाजूला काढून” ठेवावी. (१ करिंथ. १६:२) जर तुम्हाला तुमच्या क्षेत्रात दान देण्याच्या पद्धतींबाबतीत अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही काय करू शकता? खाली दिलेल्या चौकटीत याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

सर्व देशांमध्ये ऑनलाईन दान देण्याची सोय उपलब्ध नाही. पण इतर कोणत्या मार्गांनी दान दिलं जाऊ शकतं याबद्दल डोनेशन्सच्या पेजवर माहिती मिळू शकते. काही देशांमध्ये या पेजवर दान देण्याबाबतीत सहसा विचारल्या जाणाऱ्‍या प्रश्‍नांबद्दल एक दस्तऐवज उपलब्ध असतं.