व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास करण्यासाठी एक टीप

चांगलं वातावरण तयार करा

चांगलं वातावरण तयार करा

तुमच्या वैयक्‍तिक अभ्यासातून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा आहे का? तर मग, अभ्यासासाठी एक चांगलं वातावरण तयार करायला खाली सुचवलेल्या काही गोष्टी तुम्हाला मदत करतील.

  • एक चांगली जागा निवडा. शक्य असेल तर अभ्यासासाठी अशी जागा निवडा जी स्वच्छ आणि नीटनेटकी आहे आणि तिथे पुरेसा प्रकाश आहे. तुम्ही बसण्यासाठी टेबल-खुर्ची वापरू शकता किंवा बाहेर मोकळ्या आणि निवांत ठिकाणी बसू शकता.

  • एकांत मिळेल अशा ठिकाणी बसा. प्रार्थना करण्यासाठी येशू “पहाटे” उठून एका “एकांत ठिकाणी” गेला. (मार्क १:३५) तुम्हाला जर एकांतात राहून अभ्यास करणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरच्यांना किंवा तुमच्यासोबत राहणाऱ्‍यांना कधी अभ्यास करणार आहात ते आधीच सांगू शकता, म्हणजे तुमचं लक्ष विचलित होणार नाही.

  • तुमचं लक्ष भरकटू देऊ नका. अभ्यास करताना लक्ष विचलित करणाऱ्‍या गोष्टी टाळा. त्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा टॅबला सायलेंट मोडवर किंवा एअरप्लेन मोडवर ठेवू शकता. अभ्यास करताना एखादं काम आठवलं तर ते लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला ते नंतर करता येईल. आणि तरीही लक्ष लागत नसेल तर थोडं थांबा आणि जरा फेरफटका मारून या.